पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 2)

Submitted by Sujata Siddha on 30 January, 2020 - 05:58

पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 2)

शलाका पुन्हा स्मृतींच्या कोषात गेली , स्मृतींच्या आतल्या खोल खोल कोषागारात पुढची घटना अधिक उत्सुकतेने, धुंडाळताना ध्यानीमनी नसताना तिला ते भयानक दृश्य दिसलं , “ त्याची डेड बॉडी !..अरे देवा !.. हा असा कसा गेला अचानक ? बहुतेक सर्पदंश .. आजूबाजूला खूप लोकांचा जमाव , त्याच्याबद्दल हळहळतायत “ मिटलेल्या डोळ्यांपुढचं ते हृदयद्रावक दृश्य बघून इकडे शलाकाचे डोळे आपोआप पाझरायला लागले .
“ ओह फ्रिक SSS ,I am so sorry !.. पुढे जा शलाका , रेंगाळू नकोस ..आता सांग काय दिसतंय ?”
“मी विष पिऊन आत्महत्या करतेय .त्याचा मृत्यू मला सहन नाही झालाय , त्याला शेवटपर्यँत मी सांगू नाही शकले , how much i love him ! oh ..I just can’t live without him .. “ आता आवेग सहन न होऊन शलाका स्फुंदून स्फुंदुन रडायला लागली .
“Poor Girl !.. I feel extremely sorry for you !!... ओके , नाऊ रिलॅक्स !..मागे फिर शलाका ,तुला परत यायचंय ,तुझ्या आताच्या देहात , मी १ ते १० अंक मोजेपर्यँत तू ज्या दरवाज्यातून आत गेलीस तिथून बाहेर ये ,एक ,दोन, तीन, चार ….
सॅमन्थाने तिचा मऊ उबदार तळवा तिच्या कपळावर ठेवला आणि ती सावध झाली .
“Are you ok शलाका ? डोळे उघड , प्लिज गेट अप ...हळूहळू उठून बस . “ खूप जड झालेल्या अंत:करणाने शलाका उठून बसली , डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते , सॅमन्थाच्या असिस्टंट ने तिला नॅपकिन दिला , गरम गरम वाफाळणारी कॉफी आणि दोन गुड डे ची बिस्किट्स आणून दिली . गरम कॉफी पोटात गेल्यावर तिला जरा बरं वाटलं . “कसं वाटतंय ? , are you ok now ?”
“हं … “ शलाका यापेक्षा जास्त बोलू शकली नाही .
“ठीक आहे , नंतर तुला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर just give me a call , आपण बोलू यावर परत “
थोड्याच वेळात सॅमन्थाची फी देऊन तिच्या ‘ bliss ploycilinc ‘ मधून शलाका बाहेर पडली , बाहेर येऊन ओला कॅब करून घरी आली , बरं झालं गाडी आणली नव्हती , चालवता तरी आली असती का आपल्याला ? एवढ्या सुन्न मनस्थितीत ती घरी आली होती कि कोणाशी बोलायची ईच्छा नव्हती , काही करायची ईच्छा नव्हती , आल्या आल्या चिकू तिच्याकडे झेपावला पण त्याला घेण्याएवढी एनर्जीही तिच्यात नव्हती . त्याला सांभाळणाऱ्या सुनीताला तिने डोळ्यांनीच विनंती केली कि please त्याला जरा अजून थोडा वेळ घे . तिची अवस्था कळून सुनीताने त्याची दुधाची बॉटल भरली त्याला बेबी pram मध्ये घालून बाहेर फिरायला घेऊन गेली.आईकडे जाण्यासाठी हट्ट करून रडणाऱ्या चिकूचा आवाज कितीतरी वेळ घुमत घुमत लांब लांब गेला.
कपाळावर हात ठेऊन शलाका नुकत्याच करून आलेल्या ‘PLR (Past Life Regression ) च्या सेशन चा विचार करत होती . नवरा , १ वर्षांचा चिकू आणि ती, एवढं सोपं सुटसुटीत कुटुंब ,सासरची मंडळी चिकार पण ,सगळी आपापल्या कोषात रमलेली फक्त सणवार किंवा फंक्शन पुरती एकत्र येणारी ,फायनान्शिअली सगळेच खूपच साउंड , बुद्धिमत्ता , स्टेट्स ,पोझिशन सगळ्या गोष्टी विनासायास मिळालेल्या,तरीही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शलाका अस्वस्थ होती , सतत उदास वाटणं , सगळं जवळ असूनही सतत काहीतरी अपूर्ण राहिल्याची जाणीव ,जीवघेणं एकाकी पण, कुठल्याही गोष्टी तिला अधिक काळ सुखवायच्या नाहीत , आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अभिषेक शी लग्न होऊन इतकी वर्ष झालेली तरी , तिच्या मनातली प्रेयसी , प्रेम मिळण्याकरिता आसुसलेली राहिली . या सर्वांवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं अलीकडे तिला फार वाटत होतं , अभिषेकशी तिचं पटत नव्हतं असं नाही , पण जोडीदार असा तो कधी तिला वाटलाच नाही ,कारण त्याच्या विश्वात फक्त तो आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टी होत्या , शलाकाला त्यातच त्याने गृहीत धरून टाकलं होतं , तिचं मन , तिच्या आवडीनिवडी तिचे विचार याला त्याच्या लेखी काही किंमत नव्हती , परदेशात जाताना एअरपोर्ट वर आपण व्हील असलेली ट्रॅव्हलबॅग ओढत नेतो ना ? खाली बघत पण नाही , की बॅग नीट आहे ना , सरफेस नीट आहे ना? तोच फील शलाकाला आभिषेक बरोबर राहताना येत असे. पण केवळ आपलं मन जुळत नाही म्हणून त्याला घटस्फोट देऊन चिकूच्या डोक्यावरचं पितृछत्र काढावं इतकी ती स्वार्थी नव्हती . अभिषेक ला हर तऱ्हेने तिने आपल्या भावना सांगायचा प्रयत्न केला होता पण ती त्यात यशस्वी होऊ शकली नव्हती ,सरते शेवटी सर्व समुपदेशक देतात तोच सल्ला तीने निमूट स्वीकारला ते म्हणजे आपलं मन ,आपले इतर छंद , आपली नोकरी आणि करिअर , चिकू, यांच्यात रमवणे . तशीही आई झाल्यावर आपल्यातली प्रेयसी दाबून टाकणे हे ओघाने आलंच.
कधीतरी एके दिवशी बोलता असताना तिच्या एका मैत्रीणीने तिला . PLR (Past Life Regression ) बद्दल तिला कळलं आणि तीला खूप विस्मय वाटला, भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्या प्रमाणे मनुष्याचे अनेक जन्म झालेले असतात , प्रत्येक जन्मात जीव आपल्या ईच्छा पूर्ण करण्याकरता धडपडत असतो , आणि अर्थातच माणसाच्या ईच्छा , आकांक्षा कधी पूर्ण होत नाहीत , त्या अपुऱ्या ईच्छा जितक्या पूर्ण करण्यासाठी जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो ,आणि जन्म -मरणाचं हे रहाटगाडगं सतत चालूच राहतं . , how starnge . खरं तर लॉजिक बरोबर लागतं . बऱ्याचदा आपल्याला Déjà Vu चं फीलिंग येत असतं , तिच्या एका मावस बहिणीला तिने कधीही पॅरिस पाहिलेलं नसताना देखील जेव्हा तिथे ती पहिल्यांदा गेली , तेव्हा तिथल्या बऱ्याच गोष्टी तिला आपल्या ओळखीच्या वाटल्या . हे आणि असं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं पण आपल्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडीत आणि धकाधकीत ते विसरून जातो किंवा कधी कधी इग्नोअर करतो , अर्थात सगळेच असं करत नाहीत ,सतत अद्भुत आणि गूढ गोष्टींचं आकर्षण असणारा एक वर्ग असतो , विश्वाच्या उतपत्तींपासून ते रोजच्या घडणाऱ्या योगो-योगांपर्यत अनेक गूढ वाटणाऱ्या गोष्टींचं त्याला एक आकर्षण असतं ,त्याचा मागोवा घेण्याची त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची त्यांची तयारी असते , शलाका त्यातलीच एक , आजच्या ’पास्ट लाईफ रिग्रेशन ‘ चा खटाटोप त्यासाठीच होता .
पण असं काही दिसेल याची मानसिक तयारी नसल्यामुळे ती संभ्रमात पडली होती , राहून राहून तिला त्या तरूणाचे हसरे डोळे आणि पिळदार शरीरयष्टी आठवत होती . कोण असेल तो ? खरच मी तीच होते का मागच्या जन्मी ? आणि मग तो , कुठे गेला असेल , त्याला कोणता जन्म मिळाला असेल ? ???... कुठे असेल तो ??? .. हे जे सगळं आपल्याला दिसलं ते म्हणजे खरच हा आपला मागचा जन्म असेल का ? .की हे एकप्रकारचं hypnotism होतं ? ...विचार करून करून ती थकली आणि त्यातच तिचा डोळा लागला . रात्री कधीतरी चिकूच्या रडण्याने तिला जाग आली , तो झोपेतच रडत होता , त्याच्याकडे बघता बघता तिच्यातली आई जागी झाली , अपार वात्सल्याने त्याला जवळ घेऊन त्याच्या कुरळ्या जावळाचं तिने चुंबन घेतलं आणि कुशीत ओढलं , तिच्या मायेच्या उबेत त्याला लगेच गाढ झोप लागली .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान