Vicks च्या मर्यादा

Submitted by अन्नपूर्णा on 30 January, 2020 - 01:35

नेहमीच्या वापरात असणारी, अगदी प्रत्येक घरी हमखास सापडणारी गोष्ट म्हणजे Vicks Vaporab. तर याच्या दैनंदिन वापराने काही दुष्परिणाम होतात का यावर चर्चा करण्यासाठी हा धागा. कारण आमच्या घरी vicks न लावल्यास झोप न येणारे लोक आहेत. तर त्यांच्या आरोग्यविषयक काळजीपोटी हे विचारत आहे. जाणकारांनी माहिती द्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या बहिणीला विक्सची सवय लागलेली.(आहे?) प्रेग्नसी दुसर्या का तिसर्या महिन्यात तिला सर्दीचा प्रचंड त्रास झाला होता तेव्हा पासुन रात्री विक्सची सवय लागली असावी. आता विक्स नाही लावल तर झोप लागत नाही.. अस म्हणते ती.

निलगिरीच्या तेलाचे थेंब शिंपडून झोप येते का बघा! त्या वासामुळे relax वाटतं आणि झोप येते. रामदेवबाबा चं दिव्य धारा roll-on पण चालेल. Soothing Essential oil वापरलं तरी फरक पडू शकेल. त्वचेवर न लावता जर फक्त आजूबाजूला आहे म्हणून झोप येते का बघा.
विक्स परदेशात बॅन आहे म्हणे.

Vicks VapoRub — a topical ointment made of ingredients including camphor, eucalyptus oil and menthol that you rub on your throat and chest — doesn't relieve nasal congestion.
https://www.mayoclinic.org/diseases-conditions/common-cold/expert-answer...

आमच्या घरी vicks न लावल्यास झोप न येणारे लोक आहेत.

हे कारण मानसिक आहे. दोन दिवस व्हिक्स न लावता झोप येणार नाही पण तिसऱ्या दिवशी येईलच. तेवढा धीर धरायला हवा.

विक्स खाल्ल्याने सर्दी बरी होते असा समज किंवा दृढ विश्वास अमच्या भाच्यांना होता. बिनधास्त खात असत.
Happy
रेल्वे स्लीपर डब्यात एकजण असतो तो झोपायच्या अगोदर विक्स,, /अमृतांजन लावतो आणि सर्वांना सुखाची झोप येते.
Wink

विक्स खाल्ल्याने सर्दी बरी होते असा समज किंवा दृढ विश्वास अमच्या भाच्यांना होता. बिनधास्त खात असत. >>> व्हिक्स चे माहित नाही पण आयोडेक्स आणि अमृतांजन हाय होण्यासाठी खातात लोक - हे वाचले होते.

Vicks परदेशी ban नाही. सगळीकडे मिळतं. रादर ते परदेशीच प्रॉडक्ट आहे. एन्सी ची मूळ कंपनी होती.

Vicks अमेरिका आणि कॅनडा या दोन देशात तरी सर्रास मिळते.
गुरुचरण दास हे प्रॉक्टर अँड गंबलचे इंडिया प्रेसिडेंट आणि मग ग्लोबल व्हिपी करिअरच्या सुरुवातीला viks ज्या कंपनीचे होते त्यात अधिकारी होते.

मला सवय आहे झोपताना थोडंसं विक्स नाकाला लावायची, नसेल विक्स तर बाम हुंगते, नाकाला लावत नाही. हे काही असलं किंवा नसलं तरी शांत झोप वगैरे कधीच लागत नाही ती गोष्ट वेगळी Lol

एन्सी ची मूळ कंपनी होती. >>> अरे हो की! आत्ता चेक केले.

म्हणजे आम्ही लोकल एकॉनॉमीला सपोर्ट करतो जेव्हा जेव्हा मी विक्स लावतो! Happy

भारतातील विक्स मधे एक काहीतरी घटक पदार्थ आहे जो इथल्या विक्स मधे नाही. त्यामुळे इतर अनेक पदार्थांप्रमाणे इथले विक्स ब्लॅण्ड वाटते Happy

भारतातील विक्स मधे एक काहीतरी घटक पदार्थ आहे जो इथल्या विक्स मधे नाही. >> मिथिल अ‍ॅन्थ्रा निलेट/ युजेनॉल/ युकॅलिप्टॉल/ जिरॅनिओल चेक करा.

मानव Happy Happy Happy

समारंभात गेटवरच्या पंख्यासमोर सेंटचा डबा बांधतात. हाताला,मनगटाला अत्तर लावण्याचे काम वाचते.

मी एकदा सीलिंग फ्यान, एकग्झॉस्ट फ्यानच्या ( उलट लावलेला) पात्यांना विक्स लावले होते. हुंगायचे कष्ट वाचले.

वासाने आजारी असताना बरे वाटते हे नक्की.

मी एकदा सीलिंग फ्यान, एकग्झॉस्ट फ्यानच्या ( उलट लावलेला) पात्यांना विक्स लावले होते. हुंगायचे कष्ट वाचले....... भारी!

व्हिक्स सतत हुंगणारा कॉलेजमधील एकजण माहीत आहे. नंतर तो पेट्रोलचा वासपण हुंगत असे. कदाचित त्या वासाने काही किक बसत असेल, नक्की माहीत नाही.

मी एकदा सीलिंग फ्यान, एकग्झॉस्ट फ्यानच्या ( उलट लावलेला) पात्यांना विक्स लावले होते. हुंगायचे कष्ट वाचले. >>> गुडनाईट मधलं लिक्विड संपलं की त्यात व्हीक्स भरून लावत चला. Wink

लोकांचं डोकं दुखणं थांबत व्हिक्स नी पण माझे विक्स च्य वासानी डोकं दुखायला लागतं.
बिलकुल वास सहन होत नाही व्हिक्स चा

भारतातील विक्स मधे एक काहीतरी घटक पदार्थ आहे जो इथल्या विक्स मधे नाही

भारतातील व्हिक्स हे कर वाचवण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून विकले जाते. आयुर्वेदिक औषध म्हणून विकायचे असेल तर त्यातील घटक हे नैसर्गिक पदार्थांचे असायला हवेत पेट्रोलियम पासून बनवलेले नाहीत. रिचर्डसन हिंदुस्तान ( आता प्रॉक्टर अँड गॅम्बल) हे सुरुवातीला असे कृत्रिम घटक वापरत असत परंतु न्यायालयाने त्यावर अबकारी कर लावल्यानंतर त्यांनी व्हिक्स मध्ये नैसर्गिक तेलें वापरायला सुरुवात केली.

केवळ रासायनिक मेंथॉल थायमॉल युकॅलिप्टोल इ पेक्षा नैसर्गिक तेलात असणारे वरील तिन्ही अधिक इतर अनेक सूक्ष्म घटक हे जास्त परिणामकारी असतात कारण वनस्पती हे घटक परभक्षी प्राणी वनस्पती किंवा बुरशी पासून स्वतः चे संरक्षण करण्यासाठी वापरतात.
उदा. कृत्रिम अननसाचा स्वाद हा नैसर्गिक अननसाइतका उत्तम असत नाही. कारण त्यात असलेली सूक्ष्म द्रव्ये कृत्रिम स्वादात येत नाहीत.

यास्तव भारतात निर्माण केलेले व्हिक्स हे जास्त परिणामकारी असण्याची शक्यता आहे.