पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 1)

Submitted by Sujata Siddha on 29 January, 2020 - 02:16

पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 1)

“Close your eyes & take a deeeeeeep breath Shalaka !.. “
‘सॅमन्था ‘ने ‘शलाका च्या’ कपाळावर आपला उष्ण हात टेकवत , सूचना दिली , टाचणी पडली तरी आवाज येईल अशी रूम मधली अंधारी शांतता , मंद तेवणारी कँडल , आजूबाजूला दरवळणारा ‘Hyacinth’ चा एक विशिष्ट गंध , आणि पांढरा शुभ्र बेड !.. , शलाका गुंगीत गेली नाही तरच नवल . अर्धवट गुंगीतही जागृत असणारं तिचं मन ‘सॅमन्था ‘च्या सूचना पाळत तिच्या प्रश्नांच्या अनुषंगाने तिला काही घटना दाखवत होतं आणि शलाका ते बघत होती ,
“ imagine you are standing in front of a beautiful sea shore !.. समुद्राच्या लाटांचा खळखळ आवाज , आणि समुद्र गर्जना ऐकायचा प्रयत्न कर , “ सॅमन्था चं एक एक वाक्य कानात साठवून शलाका तसं दृश्य डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करत होती .
“Now imagine a person with whom you feel most comfortable & happy . “
शलाकाने मनाच्या कोपऱ्यात चाचपडून पाहिलं, अभिषेक? छे !..मुळीच नाही, आज सहा वर्ष संसार करूनही त्या दोघांची नाळ काही जुळली नव्हती .हसणं खिदळणं लांबच , गप्पा सुद्धा कधी मारता आल्या नव्हत्या नीट , अभिषेक ला तिच्या कुठल्याच बोलण्यात रस नसायचा आणि अभिषेकला आवडेल असं सतत बोलायचा तिला कंटाळा आला होता . मग कोण कृत्या ? छे , हसणं खिदळणं ठीक आहे पण ती jealous होते बऱ्याचदा आपल्यावर , मग कोण ? आई ...नाही आई खूप वेळा स्वतः:चच रडगाणं गात असते ,, प्रेम आहे आपलं तिच्यावर पण खूप वेळ घालवावा असं नाही वाटत तिच्याबरोबर , मग कोण ? .. एखादा मित्र ? नोप .. लग्नाआधी तिला असा कोणी मित्र नव्हता. वडिल तर लहानपणीच गेलेले .मग कोण ?
“विहान????? “
“Yessss !..” नकळत तिच्या मनाने तिच्यापुढे ‘विहान ‘ची फाईल सरकवली, हो ‘ विहान ‘, ऑफिस मध्ये तिला सिनियर म्हणून नुकताच जॉईन झालेला . तसा वयाने तिच्यापेक्षा खूप लहान,पण असं वाटावं की खूप जुनी मैत्री आहे ,इतकं पटायचं तिचं त्याच्यासोबत , खूप comfortable असायची ती त्याच्याशी बोलताना , याला कारण , ‘विहान ‘ चा स्वभाव.लाघवी , प्रेमळ , समोरच्याला आपलंस करून टाकणारा आणि सतत हसवणारा. तो असला कि दंगा ठरलेला.येस्स ‘विहान ‘ च योग्य , पण त्याला असं ‘इमॅजिन करणं बरोबर आहे का? कुणास ठाऊक आत्ता तरी तोच दिसतोय .नुसतं इमॅजिन तर करायचंय , त्यात काय ? ..
“ त्याच्या हातात हात गुंफून फेसाळणाऱ्या लाटांबरोबर तू मनसोक्त खेळतीयेस “ सॅमन्था च्या पुढच्या सूचनेबरोबर ती शरमली , पण तिला तसं इमॅजिन करायला आवडलं .
“खेळता खेळता समुद्राच्या जवळच एक घनदाट जंगल आहे ,त्याबाजूला तुम्ही दोघे निघाला आहात .खूप लांब पर्यँत, चालत रहा..” मध्ये सॅमन्था शांत राहिली , मग परत तिने सूचना दिली , “तुला आता डावीकडे एक अरुंद पायवाट दिसतेय, शलाका तुला एकटीला तिथून वळायचंय आणि २१ पावलांवर जाऊन थांबायचंय .एकविसाव्या पावलापाशी तुला एक गुहा दिसेल , एक ...दोन.. तीन.. “ सॅमन्थाच्या आंकड्यानुसार वळून ती चालत राहिली . गुहेपर्यँत आल्यावर ती पुढच्या सूचनेसाठी थांबली.
“ समोर अनेक बंद दरवाजे आहेत , त्यातला तुला हवा तो उघड “
समोर असलेल्या अनेक दरवाजांपैकी एक भव्य हिरव्या रंगाचा दरवाजा शलाकाने ढकलला . आणि.. आणि .. अहो आश्चर्यम !.आत्तापर्यँत ती इमॅजिन करत होती .पण तो भव्य दरवाजा उघडताच तिला आतलं दृष्य दिसायला लागलं , उत्सुकतेने ती आत पाहू लागली लांबच लांब पसरलेलं हिरवागार शेत आणि खळखळ वाहणार पाटाचं पाणी,जणू ती एखादा चित्रपट बघतीये , त्या पाटावर दोन बाजूला दोन्ही पाय टाकून एक तरुण आणि तगडा गडी उभा होता .
“काय दिसतंय शलाका? “ सॅमन्थाचा गंभीर आवाज तिला अलर्ट करून गेला .
“ हिरव्यागार शेतात एका खळखळ वाहणाऱ्या पाटाजवळ एक तरुण उभा आहे .” शलाका पुटपुटली.
“कसा आहे तो ? काय कपडे घातलेत ? वर्णन करू शकशील ? “
“हो .. देखणा आहे खूप ,२७-२८ वर्षांचा , उंचापुरा ,तगडा , तालीम करणारा असावा तसा दिसतोय. अंगात लांब पांढरा ट्रान्सपरंट सदरा त्यातून दिसणारा अर्ध्या बाह्यचा बनियान,खाली धोतर , हसरे घारे डोळे आणि हातात जाड जूड चांदीचं कड, “ तिच्या आवाजात जडत्व आलं होतं ,पण त्यातून स्पष्ट बोलण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता . “गुड !..now tell me , is he you ? is he you शलाका ? “
“ no..he is someone else , not me ..”
“ Then who are you Shalaka? Where are you ? आजूबाजूला पहा .. Can you see yourself somewhere ? “
त्या हिरव्या गार शेतात तिने आजूबाजूला पाहिलं आणि .. omg !.. ही मी आहे ? … जांभळी साडी, कुरळे केस, सडपातळ बांधा , कोवळा चेहेरा , नकटं नाक, जेमेतेम ५ फूट उंची ,आणि डोक्यावर पदर, वय वर्ष - १९-२०. “
“काय करतीयेस तू तिथे ?
“त्याला मदत करतेय ,तो मला खूप हसवतोय , माझी चेष्टा करतोय ”शलाका पुढे बोलू लागली “आम्ही दोघे शेतात काम करतोय , मी खूप आनंदात आहे त्याच्याबरोबर , खूप जीव आहे माझा त्याच्यावर ,पण त्याला बहुतेक पत्ता नसावा माझ्या प्रेमाचा .कारण तो मस्त मौला आहे .स्वतः:तच गुंग आहे “
“हं .. पुढे जा ..एखादी महत्वाची घटना , वर्ष काही आठवतंय ?”
शलाका बघत राहिली , चाचपडत राहिली आणि मग तिला ते दिसलं ,ते पाहून तिचा चेहेरा भयभीत झाला , एका खोल विहिरीत ती पडलिये, जिवाच्या आकांताने ओरडतेय आणि तो ,तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतोय .
“ओह !.. काय दिसतंय पुढे ? वाचलीयेस तु ? यश आलंय त्याच्या प्रयत्नांना ? “
“हो , वाचवलंय त्यानं अखेर मला . थँक गॉड !.. खूप ग्रेटफूल वाटतंय त्याच्याबद्दल , त्याने स्वतः:च्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलाय ,मी खूप आनंदात आहे . मला हि परतफेड करता येईल का ? “
“ now go ahed .. आता सांग पुढची एखादी महत्वपूर्ण घटना दिसतेय ?लग्न झालंय तुमचं ? त्याला कळलं तुझं प्रेम आहे त्याच्यावर ?“

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान