Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 January, 2020 - 00:54
सरप्राईज गिफ्ट द्याव का? त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर? त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला माझ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे! बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले मागच्या वर्षी तो होता पुतळी हार! माझ्या पसंतीच डिझाईन. नेटवर शोधून काढल! आता यावर्षी मुलीला काय घ्यावं? एकत॒र मी गिफ्ट देणे हेच एक सरप्राईज असते त्यातून सरप्राईज गिफ्ट असा मामला आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>तर आनंद कमी होणार आहे का
>>>तर आनंद कमी होणार आहे का तिला??>> पण ऋन्मेष मला कोणी गिफ्ट काय देउ विचारलं की मी फक्त एखादं पुस्तक मागते. कारण त्यांना खर्चात पाडायचे नाही. पण मनातून मला सरप्राईझ गिफ्ट यावी असेच वाटते मग किती का लहान असो.
> सर्वच स्त्रीयांना दागिने
> सर्वच स्त्रीयांना दागिने आवडतातच असे नाही. स्वतःच्या अनुभवावरुन सांगते, दागिने खरोखर आवडत नसतील तर अशा गिफ्ट्सचे फक्त ओझेच वाटते. > +१
अगदी दागिने असं नै
अगदी दागिने असं नै
पण टिकाऊ जास्त लोंबते झगामगा न दिसणारे चांगल्या प्रतीचे कानातले कोणीही स्त्री वापरत असेल.
आता सरप्राईज+पारंपारिक+इरॆशनल
आता सरप्राईज+पारंपारिक+इरॆशनल हे कॉंबिनेशन म्हणजे जरा अवघडच. मी बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले तेव्हा पुतळीहार हे पक्क डोक्यात आल होत. त्यामुळे डायरेक्ट लक्ष्मीरोडला जाउन ओळखीच्या सुयोग घोडके सराफाकडे नेटवरील पटणार डिझाईन ऒर्डर व पैसे देउन मोकळा झालो होतो.सरकारकडून पेन्शनची थकबाकी मिळतीये म्हणून हे उद्योग सुचताहेत.
गिफ्ट फार खर्चिक नसेल तर
गिफ्ट फार खर्चिक नसेल तर surprise चालेल पण महागातल, खूप दिवस टिकणार अस असेल तर त्या व्यक्तीच्या पसंतीने घेतलेलं अधिक चांगलं अस मला वाटत. जेव्हा तुम्ही तिला सांगाल मी तुला अमुक अमुक भेट देणार आहे तो क्षण तिच्या साठी surprise gift प्रत्यक्ष घेण्याएव्हढा च अनमोल आहे. त्या वेळचा तिच्या चेहऱ्यावरचा आनन्द प्रत्यक्ष गिफ्ट मिळाल्या एवढाच असेल. प्लस दुकानात जाऊन, चार गोष्टी बघून हवी ती गोष्ट निवडण्यात तिला जास्त मजा येईल तुम्ही डायरेक्ट तुमच्या आवडीची वस्तूं आणून तिला देण्या पेक्षा.
मनीमोहर तुमच्या सुचनेचा विचार
मनीमोहर तुमच्या सुचनेचा विचार करतो ,स्वत:शी जरा तडजोड करावी लागेल.
अजनबी एखाद्याच्या संमती शिवाय
अजनबी एखाद्याच्या संमती शिवाय त्याच्या नावाने एफडी करता येते का? फॊर्मवर सही लागेल ना!
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 January, 2020 - 04:56 >>>
बँकेत जाऊन चौकशी करा।
प्रकाश मुलीच लग्न झाल असेल तर
प्रकाश मुलीच लग्न झाल असेल तर छोटस डायमंडच मंगळसुत्र, नसेल तर डायमंडच पेंडट असलेली बारीक चेन. किंवा डायमंडच कानातल. तनिश्क मध्ये मस्त होते मागे बघितलेले तेव्हा.
माझ्या पप्पानी मला पेंडट दिलेले , मी इंजीनीअर झाल्यावर . इतकी वर्ष झाली तरी मी ते दररोज वापरते.
शेवटी लक्ष्मीहार व पुतळीहार
शेवटी लक्ष्मीहार व पुतळीहार यांचे कॉम्बिनेशन असलेले नेकलेस डिझाईन फिक्स करुन लक्ष्मीरोडला जाउन माझे हितचिंतक सुयोग घोडके सराफ यांच्याकडे ऒर्डर देउन टाकली व मोकळा झालो. तत्त्पुर्वी बायकोने स्वत:ला घ्यायचे आहे असे मुलीला सांगून ते डिझाईन संमत करुन घेतले.हुस्सश्य!
माझं नुस्कान कोन भरून देनार
माझं नुस्कान कोन भरून देनार वो आता
तुमची लुस्कानी द्यवाकं!
तुमची लुस्कानी द्यवाकं!
आपली मुलगी लष्करी अधिकाऱ्याची
आपली मुलगी लष्करी अधिकाऱ्याची बायको आहे तर किमती वस्तू / दागिने हे इकडून तिकडे नेण्याची जोखीम फार वेळेस पडते ( प्रत्येक वेळेस घर बदलायचे आणि बदली झाल्यावर शहर बदलायचे). आणि ते १० वर्षांपैकी साडे नऊ वर्षेपेक्षा जास्त लॉकरची धन होते. (स्वानुभव).
माझ्या बायकोचे बरेचसे दागिने आईच्या लॉकर मध्येच पडून होते.
यापेक्षा मुलीच्या नावाने डी मॅट अकाउंट काढा आणि टाटा कन्सल्टन्सी किंवा तत्सम ब्लु चिप कंपनीचे समभाग घ्या काही वर्षांनी त्याला सोन्यापेक्षा जास्त भाव येईल आणि तिला ज्यावेळेस अशा मोठ्या रकमेची गरज पडेल( उदा घर घ्यायचे आहे) तेंव्हा हा पैसा कामास येतो.
राहिलेल्या पैशाने तिला आवडेल अशी सुंदर साडी किंवा ड्रेस घेतला जाऊ शकतो.
दुसर्या कोणाच्या नावे डिमॅट
दुसर्या कोणाच्या नावे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसा उघडायचा?
आपले पैसे वापरून दुसर्या कोणाच्या नावे शेअर्स घेतले तर तो बेनामी व्यवहार होईल का?
सुबोध खरे सरप्राईज+पारंपारिक
सुबोध खरे सरप्राईज+पारंपारिक+इरॆशनल हे कॉंबिनेशन हा गिफ्टचा निकष होता.
क्षमस्व
क्षमस्व
आपले पैसे वापरून दुसर्या
आपले पैसे वापरून दुसर्या कोणाच्या नावे शेअर्स घेतले तर तो बेनामी व्यवहार होईल का?
मुलीच्या नावाने डी मॅट खाते उघडायचे आणि आपल्या डी मॅट खात्यातून समभाग तिकडे ट्रान्स्फर करायचे.
सख्ख्या/ जवळच्या नातेवाईकाला दिलेली भेट हि भेट करातुन किंवा (तिला/ त्याला) आय करातून मुक्त असते.
मुलीच्या नावाने demat अकाउंट
मुलीच्या नावाने demat अकाउंट उघडायला तिची सही, तिचे kyc लागेल की नाही?
जेव्हा तुम्ही तिला सांगाल मी
जेव्हा तुम्ही तिला सांगाल मी तुला अमुक अमुक भेट देणार आहे तो क्षण तिच्या साठी surprise gift प्रत्यक्ष घेण्याएव्हढा च अनमोल आहे. त्या वेळचा तिच्या चेहऱ्यावरचा आनन्द प्रत्यक्ष गिफ्ट मिळाल्या एवढाच असेल. प्लस दुकानात जाऊन, चार गोष्टी बघून हवी ती गोष्ट निवडण्यात तिला जास्त मजा येईल तुम्ही डायरेक्ट तुमच्या आवडीची वस्तूं आणून तिला देण्या पेक्षा.
नवीन Submitted by मनीमोहोर on 29 January, 2020 - 10:42
>>>>>
+७८६
मी हेच सांगत होतो. ममो यांनी छान शब्दात सांगितले.
मला एकदा माझ्या बायकोने तीन चार टीशर्ट गिफ्ट म्हणून दिले. टीशर्ट तशी काय छानच वाटतात. मला आवडली. मग पुढच्या बड्डेला तिने आणखी जोश दाखवत पाच ब्रांडेड शर्ट एकदम दिले बड्डे गिफ्ट म्हणून. एवढ्यात माझे दिड वर्ष निघते. मी जर स्वत: घेतले असते तर त्यातले एकच घेतले असते. उरलेली बरी वा चांगली होती. पण माझ्या पसंतीची नव्हती. आणि आता मला पुढचे दिड वर्षे माझ्या पसंतीने नवीन शर्ट घेताही येणार नव्हते. कारण ते बजेट आटोपले होते. याची जाणीव होताच मला ती नाराजी पटकन लपवता आली नाही आणि बायकोला रडू फुटले
येनीवेज, याच साठी मी कधीपासून महागडे सरप्राईज गिफ्ट नको असे म्हणत आहे.
>>>>मला ती नाराजी पटकन लपवता
>>>>मला ती नाराजी पटकन लपवता आली नाही आणि बायकोला रडू फुटले Sad>>>>
क्रौर्य आहे हे डोमेस्टिक व्हायलन्स 
मुलीच्या नावाने डी मॅट खाते
मुलीच्या नावाने डी मॅट खाते उघडायचे आणि आपल्या डी मॅट खात्यातून समभाग तिकडे ट्रान्स्फर करायचे. >>>> ही कल्पना झकास आहे.
Pages