काटेरी गुलाब

Submitted by Asu on 22 January, 2020 - 23:22

*काटेरी गुलाब*
(गझल)(मात्रा वृत्त-३१)

गंध घेता गुलाबाचा, काटे कधी न बोचले होते
रंग निवळता प्रितीचा, मनोमनी तेच टोचले होते

दिवसा आता लख्ख प्रकाशात, सर्वत्र अंधार आहे
अंधार्‍या रात्रीस तेव्हा, शुभ्र चांदणे दिसले होते

दुःखसागरी बुडतांनाही, अश्रू आता रुसले आहे
मिठीत तुला जवळ घेतांना, अश्रू तेव्हा हसले होते

फूल जरी नाही मिळाले, काटे माझ्या वाट्या आले
प्रेमाची याद म्हणून मी, हृदयी त्यांना जपले होते

मिलनाची मज आस नाही, मीच मरणाची वाट पाही
आयुष्य आता हरलेले, पडले पण सावरले होते

लाकडेच हवी कशाला, आठवणीच तुझ्या खूप होत्या
चितेवर जळण्याआधीच, अस्तित्व माझे संपले होते

-प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults