स्त्रीराज्य- येथे पुरुषांना बंदी आहे

Submitted by टोच्या on 21 January, 2020 - 06:11

परीकथांमध्ये वा पुराणकथांमध्ये आपण अनेकदा स्त्रीराज्याच्या सुरस कथा वाचलेल्या असतात. स्त्रियांनीच स्त्रियांसाठी चालवलेल्या अशा राज्याचं आपल्याला कुतूहल असतं. पण, ही फक्त कल्पनाच आहे का? जगात असं स्त्रीराज्य अस्तित्वात आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो… आहे असं एक ‘लेडीज ओन्ली’ गाव, जेथे पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे.
--
उमोजा. स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं राज्य. या गावात पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे. पण, हे काही परीकथेतलं गोडगुलाबी गाव नव्हे, तर ते आहे अन्याय, अत्याचारग्रस्त, पुरुषी वर्चस्व झुगारून स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या क्रांतिकारी स्त्रियांचं गाव. आफ्रिकन देश केनियातील ‘उमोजा’ हे ‘लेडीज ओन्ली’ गाव आज जगाचं लक्ष वेधून घेत आहे.
गरिबी आफ्रिकन देशांच्या पाचवीलाच पूजलेली. साहजिकच भारताप्रमाणेच पुरुषसत्ताक पद्धतीचा पूर्वीपासूनच या खंडामध्ये अंमल आहे. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू. तिच्याशी लग्न केले की ती आपली मालमत्ताच झाली, या पुरुषी अहंकाराचा वारसा प्रत्येकाने अगदी पुरेपूर जपलेला. मनाजोगता हुंडा न दिल्यास पत्नीला मारहाण करणे, तिला असह्य वेदना देणे, लैंगिक अत्याचार करणे या बाबी तर येथील मुली-महिलांसाठी नित्याच्याच. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात जाणे या अबला महिलांसाठी केवळ अशक्यच. वर्षानुवर्षे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये बालपणापासून मुली अशा नरकयातना भोगत आलेल्या आहेत. त्यातच स्त्रीला लैंगिक सुखाच्या आनंदापासून दूर ठेवण्यासाठी बालपण ते कुमारवयादरम्यान मुलींची केली जाणारी सुंता हा तर या महिलांसाठी नरकच. सगळी सुखे भोगण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच. वयाने मोठ्या पुरुषांशी बळजबरीने विवाह, बलात्कार हे या महिलांना नित्याचेच. घरून पाठबळ नसलेल्या या महिला ब्रिटिश सैनिकांच्या वासनेच्याही शिकार ठरल्या. १९९० दरम्यान सुमारे ६०० महिलांवर ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केले. त्यानंतर सैन्याविरोधात महिलांवर बलात्कार केल्याचे खटले भरण्यात आले. मात्र, त्यानंतर बलात्कारामुळे अपवित्र झाल्या म्हणून, तर काहींना लैंगिक आजार झाले असतील म्हणून या महिलांना नवऱ्यांनी घराबाहेर हाकललं. अशा बेघर झालेल्या महिलांनी जायचे कुठे हा प्रश्न होता. रिबेका लोलोसोली ही महिलाही अशीच घरगुती हिंसेची शिकार होती. मग त्यांनी पुरुषांच्या क्रूर, स्वार्थी जगापासून दूर जायचं ठरवलं. तिच्यासारख्या १५ पीडित महिलांनी एकत्र येऊन स्वतंत्र गावच वसवलं. या गावात त्यांनी स्वत:चे नियम बनवले. पुरुषांना पाय ठेवू द्यायचा नाही, हा पहिला नियम. या गावातील सगळ्या महिला अगदी समान असतील आणि सर्वांना सगळं स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार असेल. साहजिकच, बालपणापासून अत्याचाराने स्वत:चं अस्तित्वच हरवून बसलेल्या या स्त्रियांना स्वत:चे मोकळे आकाश मिळाले. जीवन जगण्याचा एक उद्देश मिळाला.

केनियाची राजधानी नैरोबीपासून ३८० किलोमीटरवर संबुरू कौंटीत उमोजा हे गाव वसविण्यात आलं. या गावात अध्यक्ष सोडून सर्व महिला समान आहेत. येथे येणाऱ्या महिलांमध्ये घटस्फोटित, एचआयव्ही बाधित, बलात्कारीत, नवऱ्याने टाकलेल्या अशा सर्व प्रकारच्या महिला आहेत. घरातून पळून आलेल्या, हाकलून लावलेल्या, अनाथ मुली-महिलांनाही येथे आसरा दिला जातो. साहजिकच त्यातील अनेकींना मुलेही आहेत आणि त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीही त्यांचीच. त्यामुळे या सर्व महिला मिळून गावात प्राथमिक शाळाही चालवतात, जेथे ही मुले शिकतात. त्यांच्या आरोग्यासाठी येथे क्लिनिकही उघडण्यात आले आहे. याशिवाय, आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणारं कल्चरल सेंटर आणि संबुरू राष्ट्रीय उद्यान, तसेच गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कॅम्पिंग साइटही उपलब्ध करून दिली जाते. या गावाला पर्यटक भेट देऊ शकतात; तथापि, गावात मुक्कामी राहण्याचा कुठल्याही पुरुषाला अधिकार नाही. फक्त या गावातील महिलांची मुलेच येथे राहू शकतात. गावातील महिलांना जमीन धारण करण्याचा किंवा जनावरे पाळण्याचा अधिकार नाही. उपजीविकेसाठी या महिला पारंपरिक दागिने, हस्तकलेच्या वस्तू बनवितात आणि विकतात. यातून त्यांची रोजीरोटी चालते.
आतापर्यंत पुरुषांच्या डोळ्याला डोळा न भिडवणाऱ्या बायकांनी स्वत:चं गाव स्थापन केलेलं पाहून पुरुष चिडले नसते तरच नवल. त्यांनी या महिलांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. या गावाजवळच स्वतंत्र गाव उभारून राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. येथे येणाऱ्या पर्यटकांनी या महिलांकडून वस्तू विकत घेऊ नयेत यासाठीही प्रयत्न केले. मात्र, या सर्व महिला स्वत:च्या निश्चयावर ठाम होत्या. पुरुषांच्या नावे असलेली जवळपासची जमीन या महिलांनी विकत घेतली.
सुरुवातीला सगळंच नवीन असल्यामुळे जम बसविताना त्रास झाला. इतरांकडून भाजीपाला खरेदी करून या महिला आसपास विकू लागल्या. पण, हा व्यवसाय दुसऱ्यांवर अवलंबून होता आणि त्यांना स्वत:ला शेती करण्याचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्या भाजीपाला पिकवू शकत नव्हत्या. परिणामी, हा व्यवसाय बारगळला. नंतर त्यांनी पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू पर्यटकांना विकण्याचा नामी मार्ग शोधून काढला. रंगीत खड्यांचे दागिने, कमी अल्कोहोल असलेली घरगुती बीअर, इतर हस्तकलेच्या वस्तू या महिला तयार करून पर्यटकांना विकतात. विशेष म्हणजे या वस्तू विकण्यासाठी त्यांनी वेबसाइटही तयार केलेली आहे. त्यांची ही धडपड पाहून केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसेसने त्यांना ‘मसाई मारा’ अभयारण्यातील काही महिला गटांकडून प्रशिक्षण देण्यास मदत केली. याशिवाय केनियाच्या पुरातत्व आणि सांस्कृतिक मंत्रालयानेही या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली.

भारतातील आदिवासी पाड्यांप्रमाणेच येथील घरेही शेणामातीची आहेत. गोवऱ्यांनी किंवा शेणामातीच्या मिश्रणाने लिंपलेल्या भिंती, वर गवत वा चटईचे छप्पर अशी टुमदार गोलाकार घरे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. येथील महिलांचे जीवनमान उंचावणे, गरिबीतून वर आणणे हा या गावातील महिलांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. गावातील सर्व महिलांना विशिष्ट ड्रेस कोड आहे, अर्थातच पारंपरिक. आदिवासी पद्धतीचा, कलाकुसर केलेला पोषाख, पारंपरिक पद्धतीचे दागिने परिधान करणे त्यांना सक्तीचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुलींची सुंता ही बाब या गावातून हद्दपार करण्यात आलेली आहे. २००५मध्ये या गावात ३० महिला आणि ५० मुले होती. दहा वर्षांत म्हणजे २०१५मध्ये ४७ महिला आणि २०० मुले येथे राहात होती.

प्रत्येक महिलेला आपल्या उत्पन्नातील दहा टक्के हिस्सा कर म्हणून द्यावा लागतो, जो शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी वापरला जातो. इतर गावांतील मुलांवर लहान वयातच गायी-गुरे चारण्याची जबाबदारी येऊन पडते. मात्र, उमोजातील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. त्यांना कामाला जुंपले जात नाही. येथील प्राथमिक शाळेत ५० मुले शिक्षण घेतात. गावात नर्सरी स्कूलही सुरू करण्यात आले आहे. गावातील महिला इतर गावांमध्ये जाऊन महिला हक्कांविषयी जागृती करतात. गावातीलच एका झाडाखाली सरकार चालतं. ज्याला ‘ट्री ऑफ स्पीच’ म्हटले जाते. या झाडाखाली सभा घेतल्या जातात. सभांच्या अध्यक्षस्थानी अर्थातच रिबेका असते. गावाच्या विकासासाठी येथे चर्चा केली जाते, निर्णय घेतले जातात.
अत्याचार करणाऱ्या समाजापुढे तोंड न उघडणाऱ्या, साध्या-सोज्वळ बायकांच्या सहनशक्तीची परिसीमा होते, तेव्हा अशी क्रांतीची ठिणगी पडते आणि या स्त्रीशक्तीपुढे पुरुषी ताकदही निष्प्रभ ठरते, हे या महिलांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळेच रणचंडिकांचे हे गाव आज जगभरातील पर्यटकांसाठी कुतूहल बनलेले आहे.

रिबेका ठरली ‘रिबेल’!
वाम्बा नावाच्या गावात १९६२ मध्ये जन्मलेली रिबेका. सगळे मिळून सहा भाऊ-बहिणी. १९७१मध्ये तिने वाम्बा येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कॅथोलिक नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण, फी भरण्यास पालक असमर्थ ठरल्याने कोर्स पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच तिला घरी बसावे लागले. वयाच्या अठराव्या वर्षी तिचं फॅबियानो डेव्हिड लोलोसोली या तरुणाशी लग्न लावून देण्यात आलं. हुंडा म्हणून तब्बल १७ गायी देण्यात आल्या. रिबेका हुशार होती. त्यामुळे तिने गावामध्ये वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याबरोबरच ती महिलांच्या अधिकारांसाठीही उभी राहू लागली. तिच्या नवऱ्याने लवकरच तिच्या व्यवसायातून काढता पाय घेतला. यानंतर तिचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. चार लोकांनी तिला मार मार मारलं आणि तिचे पैसे घेऊन पोबारा केला. नवऱ्याला आपल्या जिवाशी, आपल्या व्यवसायाशी काहीच देणंघेणं नाही, हे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये तिच्यासह नवऱ्याच्या अत्याचाराला वैतागलेल्या काही बायकांनी एकत्र येत नवीन ठिकाणी वस्ती केली. हेच उमोजा. १९९५मध्ये उमोजा गावच्या महिलांनी रिबेकाला त्यांच्या संघटनेचं अध्यक्ष निवडलं. त्यानंतर तब्बल दहा वर्षे ती त्या पदावर होती. तिची ख्याती जगभरात पसरू लागली. संयुक्त राष्ट्राकडून तिला एका कॉन्फरन्सचे आमंत्रण आले. तिने तेथे जाऊ नये म्हणून तिला जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. पण ती डगमगली नाही. तिने तेथे जाऊन आपले विचार मांडलेच. संयुक्त राष्ट्रांना भेट दिल्याने आसपासच्या पुरुषांनी गाव बंद करण्यासाठी तिच्याविरोधात कोर्टात खटलाही भरला. याउपरही ती बधली नाही. २००९मध्ये रिबेकाच्या पतीने बंदुकीसह उमोजावर हल्ला केला. सुदैवाने रिबेका तेथे नव्हती, म्हणून वाचली. तिने महिलांना स्वतंत्र करण्याचं, त्यांना अधिकार मिळवून देण्याचं, आनंद वाटण्याचं काम सुरूच ठेवलं. रिबेकाच्या या कामाची दखल जगाने घेतली. २०१० मध्ये तिला ग्लोबल लीडरशिप अॅवॉर्डने गौरविण्यात आलं.

(माहितीचा स्त्रोत- विकीपीडिया आणि इतर संकेतस्थळे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच कौतुकास्पद गोष्ट. यापूर्वी कधीही ह्या गावाबद्दल वाचले नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
Boy kids ची वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत ह्या गावात राहतात? ह्या गावाची one day / half day पर्यटन टूर आहे का?

राजसी, मुले साधारण अठरा वीस वर्षांची होईपर्यंत गावात राहत असावी. टूरबद्दल काही कल्पना नाही. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

<मला या गावात रहायला आवडेल.>
राजदीप, आपण मच्छिंद्रनाथ आहात काय?

छान गाव छान माहिती.
पण अजून काही वर्षांनी या सिस्टीमचे भविष्य काय हा प्रश्न पडला. मुले मोठी झाल्यावर त्यातील जे मुलगे आहेत त्यांना गावाबाहेर काढणार का? आईकडे मुक्कामालाही राहू शकणार नाही का? ज्या मुली आहेत त्यांची लग्ने जोडीदार वगैरे असंख्य प्रश्न आहेत. की ज्यांना पोरांसह एकत्र राहायचेय त्या महिला मग गाव सोडणार?

रोचक आहे.
१९९० पासून म्हणजे फक्त ३० वर्ष झाली आहेत. १५ महिलांनी सुरवात केली आणि २०१५ पर्यंत ४७ महिला आणि २०० मुले. महिला आणि बालकांसाठी असलेल्या एखाद्या संस्थेसारखं वाटतंय हे सगळं.
> २००९मध्ये रिबेकाच्या पतीने बंदुकीसह उमोजावर हल्ला केला. > हे असलं काही न होता ते गाव भरपूर काळ(४००+ वर्ष) टिकून राहिले तर कशी सिस्टम डेव्हलप झालेली असेल बघायला हवं.

स्वतंत्र विचाराच्या आणि पुरुषी अत्याचार सहन न करणाऱ्या स्त्रिया ची संख्या आता खूप आहे.
त्या मुळे फक्त स्त्रियांची गावे जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होणे गरजेच आहे.
त्या मुळे पुरुषांशी संघर्ष करण्याची गरज लागणार नाही आणि मनासारखं कसलेच बंधन नसलेले जीवन फक्त स्त्रियांच्या राज्यात राहता उपभोगत येईल.
अशी गाव निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

<पण अजून काही वर्षांनी या सिस्टीमचे भविष्य काय हा प्रश्न पडला. मुले मोठी झाल्यावर त्यातील जे मुलगे आहेत त्यांना गावाबाहेर काढणार का? आईकडे मुक्कामालाही राहू शकणार नाही का? ज्या मुली आहेत त्यांची लग्ने जोडीदार वगैरे असंख्य प्रश्न आहेत. की ज्यांना पोरांसह एकत्र राहायचेय त्या महिला मग गाव सोडणार?>
ऋन्मेष, त्यांचा मूळ उद्देश आहे स्वतंत्र होणे. मुले कामधंद्यासाठी बाहेर जाणारच. या महिलांची मोठी मुले या गावात मुक्काम करू शकतात. ज्या महिलांना मुलांबरोबर रहायचे, त्या त्याच्याबरोबर जाऊ शकणारच ना. बंधन असण्याचं कारण नाही. मुलींचेही विवाह होणार, त्या लग्न होऊन सासरी जाणार. शिक्षणामुळे त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
<हे असलं काही न होता ते गाव भरपूर काळ(४००+ वर्ष) टिकून राहिले तर कशी सिस्टम डेव्हलप झालेली असेल बघायला हवं.>
अॅमी, हे गाव स्थापन झालं तेव्हाची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता सगळंच बदलतंय. महिला शिकताहेत, हक्कांसाठी जागृत होतायत. त्यामुळे या गावाला चारशे वर्षांचे भविष्य असेल असे वाटत नाही.
<<स्वतंत्र विचाराच्या आणि पुरुषी अत्याचार सहन न करणाऱ्या स्त्रिया ची संख्या आता खूप आहे.
त्या मुळे फक्त स्त्रियांची गावे जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होणे गरजेच आहे.
त्या मुळे पुरुषांशी संघर्ष करण्याची गरज लागणार नाही आणि मनासारखं कसलेच बंधन नसलेले जीवन फक्त स्त्रियांच्या राज्यात राहता उपभोगत येईल.
अशी गाव निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.>>
राजेश१८८, यातील उपरोध सोडला तर भारतातही शिक्षित समाज काही अंशी(?) वगळता ग्रामीण भागात हिंसाचार आहेच. त्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेय हेही खरे. पण, कोणतीही गोष्ट सहनशिलतेच्या पलिकडे गेली की त्याचा विस्फोट होणारच. हे गाव त्याचेच उदाहरण. मला नाही वाटत इतरत्र कुठे अशी गावे तयार होतील…

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद

स्त्रियांची गावे जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होणे गरजेच आहे.

हे विधान अनैसर्गिक म्हणून चुकीचं आहे.

२००५मध्ये या गावात ३० महिला आणि ५० मुले होती. दहा वर्षांत म्हणजे २०१५मध्ये ४७ महिला आणि २०० मुले येथे राहात होती.

महिला ३० च्या ४७ झाल्या( यात काही ५ ते १० वयोगटातील तेथे राहणाऱ्या मुलीही स्त्रिया झाल्या असतील). पण मुले १५० ने वाढली
हे कसं झालं?
सगळ्या स्त्रिया जर पुरुषपीडित होत्या आणि एकही पुरुषाला तेथे राहता येत नव्हते तर असं कसं झालं?

Men are permitted to visit the village, but not allowed to live in Umoja.[6]

Only men who were raised as children in Umoja may sleep in the village.[17]

https://en.wikipedia.org/wiki/Umoja,_Kenya

म्हणजेच या गावातील महिलांनीच यातील बरीचशी मुले जन्माला घातली आहेत असेच दिसते

शेवटी माणूस निसर्गापुढे हतबल असतो हे सत्य आहे

तेंव्हा केवळ स्त्रियांची भरपूर गावे असावीत या विचारसरणी पेक्षा प्रत्येक गावात स्त्रीला समान हक्क हा मिळालाच पाहिजे हि विचारसरणी पुरुषांत रुजवली गेली पाहिजे.

मला "बाई मुलगाच आहे आणि तो पुरुष आहे ( त्याने काहीही केले तरी चालले) " हि विचारसरणी स्त्रियांनी टाकून आपल्या मुलांना( मुलग्यांना) "मुलीला सन्मानाने वागणूक आणि समान हक्क दिला पाहिजे" हा विचार बालपणापासून रुजवला पाहिजे.

स्त्रियांची गावे जास्त असली पाहिजेत हा विचार म्हणजे उत्तम वृद्धाश्रम आणि अनाथालये जास्त असली पाहिजेत इतकाच चुकीचा आणि पळवाट काढणारा आहे.

स्त्रियांची गावे वृद्धाश्रम आणि अनाथालये निर्माण करण्याची आवश्यकताच भासू नये असा समाज निर्माण करायला पाहिजे.

सरकारी आस्थापना, बॅंका, आयटी वगैरे ठिकाणी स्त्रियांची स्वतंत्र कार्यालये ठेवावीत. या ठिकाणी स्त्रिया बॉस, कर्मचारी, शिपाई असे सर्व कर्मचारी स्त्रियाच असतील. पुरुषांना आत प्रवेश देण्यात येऊ नये. एका खिडकीतून कागदपत्रे पुरुष आत देऊ शकतील. पुरुषांनी प्रवेश करू नये म्हणून महिला पोलिस सिक्युरिटी स्टाफ ठेवावा. जसं महिलांसाठी स्वतंत्र रेल्वे डबे असतात तशी व्यवस्था करावी. म्हणजे लैंगिक शोषणाच्या घटना घडणारच नाही. स्त्रि नं घटस्फोट घेतला तर आई वडीलांनी व नवऱ्यानं तिचा खर्च पन्नास पन्नास टक्के द्यावा. कारण आई वडीलांनी तिला जन्म नसता तर लग्न/ घटस्फोट हे प्रकार झाले नसते. म्हणून आईवडीलांवर तिची जबाबदारी दिली पाहिजे, नुसता मालमत्तेत हिस्सा देऊन उपयोग नाही. हेमावैम.

सुबोध खरे यांचा प्रतिसाद पटला.
पण पूर्णपणे स्त्रियांंच्या गावाचा अनुभव घ्यायला मला आवडेल. लेडीज स्पेशल ट्रेन, बस यांना नेहमीच प्राधान्य दिलंय आणि देत राहीन.

लैंगिक शोषणाच्या घटना घडणारच नाही.

लैंगिक शोषणाच्या घटना फक्त कार्यालयातच घडतात असे आपल्याला वाटते का?

हुतात्मा झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी दिल्ली किंवा उत्तर भारतात स्थायिक होण्यास का तयार नसतात?

मूळ दिल्ली ची असलेल्या एका दिवंगत अधिकाऱ्याच्या बायकोची सत्य स्थिती.

सासू सासरे तिला आपल्या घरी घेण्यास तयार आहेत. परंतु तिने विधवेसारखे पांढऱ्या साडीत राहावे हि अपेक्षा. वडील अंथरुणावर पडलेले आणि भावाची घटस्फोटाची केस चालू असल्याने त्याला बहिणीचे लफडे गळ्यात नको.

दिल्लीत, उत्तर भारतात तरुण स्त्री एकटी राहते आहे म्हणून "उपलब्ध" आहे या मनोवृत्तीचे लोक अपरात्री दारू पिऊन तिच्या फ्लॅटची बेल वाजवून आत येण्याचा प्रयत्न करतात.
अशा अपरात्री एकटी स्त्री कुठे जाईल?

या अधिकाऱ्याच्या पत्नीला गोव्यात घर घेण्यास मी मदत केली. तेथे नौदलाने तिला नौदलाच्या शाळेत प्राथमिक शिक्षकाची नोकरी दिली. आता ती सन्मानाने दोन मुलांना वाढवत गोव्यात सुखात राहते आहे.

हि स्थिती एका पदवीधर सुशिक्षित स्त्रीची आहे. मग गावात राहणारी सैनिकांची विधवा जिला निवृत्तीवेतन आहे पण दुसरा कोणताही आधार नाही अशा स्त्रीची परिस्थिती काय असेल?
दीर चुलत दीरच तिच्या असहायय स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे आणि सासू सासरे मुलाची बाजू घेत होते कारण म्हातारपणाचा आधार हा दुसरा मुलगाच असेल तेंव्हा त्याला दुखवायचे नाही.

जोवर समाजाची "स्त्री हि भोग्यवस्तू आहे" अशी मनोवृत्ती बदलत नाही तोवर लैंगिक शोषणाची घटना घडणारच नाही हे अशक्य आहे.

सुबोध भाऊ मला कार्यालयात होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत म्हणायचं होतं. तसं घरगुती स्तरावर होणारं शोषण फक्त सुप्रजा पैदा करणं आणि सौदी अरेबिया, दुबई सारखी कानून व्यवस्था अवलंबली तरच थांबेल.

छान लेख. नवीन माहिती मिळाली.

Submitted by सुबोध खरे on 23 January, 2020 - 09:38 >>>>>> < सगळ्या प्रतिसादात हा अतिशय आवडलेला आणि पटलेला प्रतिसाद.

> हे विधान अनैसर्गिक म्हणून चुकीचं आहे.
२००५मध्ये या गावात ३० महिला आणि ५० मुले होती. दहा वर्षांत म्हणजे २०१५मध्ये ४७ महिला आणि २०० मुले येथे राहात होती.
महिला ३० च्या ४७ झाल्या( यात काही ५ ते १० वयोगटातील तेथे राहणाऱ्या मुलीही स्त्रिया झाल्या असतील). पण मुले १५० ने वाढली
हे कसं झालं?
सगळ्या स्त्रिया जर पुरुषपीडित होत्या आणि एकही पुरुषाला तेथे राहता येत नव्हते तर असं कसं झालं?
Men are permitted to visit the village, but not allowed to live in Umoja.[6]
Only men who were raised as children in Umoja may sleep in the village.[17]
https://en.wikipedia.org/wiki/Umoja,_Kenya
म्हणजेच या गावातील महिलांनीच यातील बरीचशी मुले जन्माला घातली आहेत असेच दिसते
शेवटी माणूस निसर्गापुढे हतबल असतो हे सत्य आहे >

हा भाग (किंवा त्याचा उद्देश) मला नीटसा कळला नाही. पुरुष-पितृसत्ताक व्यवस्थेत होणाऱ्या अन्यायापासून सुटका म्हणून हे स्त्री-मातृसत्ताक गाव स्थापन केले आहे ना? त्या स्त्रियांनी लग्न, एकपतीव्रत, आर्थिक स्वातंत्र्य नसणे, त्यातून येणाऱ्या अन्याय रूढी नाकारल्या आहेत.याचा सेक्स-पुनरुत्पादन वगैरेशी काय संबंध?

हो ना तेवढ्यापुरता पुरुष चालायला हरकत नको कुणाची. स्त्रियांनी सेक्स पासून वंचित का रहायचे? पुरुषाशिवाय या गोष्टीला पर्याय नाही म्हणून??

<<मला "बाई मुलगाच आहे आणि तो पुरुष आहे ( त्याने काहीही केले तरी चालले) " हि विचारसरणी स्त्रियांनी टाकून आपल्या मुलांना( मुलग्यांना) "मुलीला सन्मानाने वागणूक आणि समान हक्क दिला पाहिजे" हा विचार बालपणापासून रुजवला पाहिजे.
स्त्रियांची गावे जास्त असली पाहिजेत हा विचार म्हणजे उत्तम वृद्धाश्रम आणि अनाथालये जास्त असली पाहिजेत इतकाच चुकीचा आणि पळवाट काढणारा आहे.
स्त्रियांची गावे वृद्धाश्रम आणि अनाथालये निर्माण करण्याची आवश्यकताच भासू नये असा समाज निर्माण करायला पाहिजे.>>
सुबोध अगदी ‘खरे’. अशी व्यवस्था ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट आहे. त्याची आवश्यकता भासू नये.

<<जोवर समाजाची "स्त्री हि भोग्यवस्तू आहे" अशी मनोवृत्ती बदलत नाही तोवर लैंगिक शोषणाची घटना घडणारच नाही हे अशक्य आहे.>>१११

<<स्त्रि नं घटस्फोट घेतला तर आई वडीलांनी व नवऱ्यानं तिचा खर्च पन्नास पन्नास टक्के द्यावा. कारण आई वडीलांनी तिला जन्म नसता तर लग्न/ घटस्फोट हे प्रकार झाले नसते. म्हणून आईवडीलांवर तिची जबाबदारी दिली पाहिजे, नुसता मालमत्तेत हिस्सा देऊन उपयोग नाही. हेमावैम.>>
राजदीप, घटस्फोटानंतर शक्यतो आईवडीलच मुलीच्या पाठिशी उभे राहतात, तिची जबाबदारी (बहुतांश वेळा) तेच स्वीकारतात.

<<पण पूर्णपणे स्त्रियांंच्या गावाचा अनुभव घ्यायला मला आवडेल. लेडीज स्पेशल ट्रेन, बस यांना नेहमीच प्राधान्य दिलंय आणि देत राहीन.>>
एस, बरेचशे लोक असंच कुतूहल म्हणून या गावाला भेट देत असावेत.

<<छान लेख. नविन महिती मिळाली.>> सिद्धी, मीरा धन्यवाद

खरंच कौतुकास्पद गोष्ट. यापूर्वी कधीही ह्या गावाबद्दल वाचले नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.>>>>>>> +१.

स्थापन केले आहे ना? त्या स्त्रियांनी लग्न, एकपतीव्रत, आर्थिक स्वातंत्र्य नसणे, त्यातून येणाऱ्या अन्याय रूढी नाकारल्या आहेत.याचा सेक्स-पुनरुत्पादन वगैरेशी काय संबंध?
अश्या तीव्र भावना निर्माण होण्यापर्यंत समाजाने स्त्री वर अन्याय केला आहे,पुरुषांनी अन्याय केला आहे.
त्यांना अजुन ह्या समाजात बांधून ठेवून आपण चुकीचा पायंडा पाडत आहे.
स्वतंत्र भु भाग देवून फक्त स्त्री चे गाव,देश निर्माण होणे गरजेच आहे..
आणि त्या गावा शी , देशा शी बाकी उर्वरित जगानी काहीच संबंध ठेवू नये आणि त्यांना सुखाने जगू द्यावे.

स्वतंत्र भु भाग देवून फक्त स्त्री चे गाव,देश निर्माण होणे गरजेच आहे.
>> अशा ठिकाणी मी कोणतंही काम अगदी झाडू मारण्यास तयार आहे. स्त्री ही वात्सल्याची मुर्ती असते. सगळ्या स्त्रिया असल्यावर मला किती प्रेम, आपुलकी मिळेल!

रात्री पुरुषांना तिथे जाणे अलवूड नाही,
मग तिथल्या स्त्रिया रात्री बाहेर गेल्या तर ?

दिवसा तिथे व रात्री अजून कुठेतरी अशी ड्युएल मेम्बर्शीप अलवूड आहे का ?

Sky home very bright
Defeat dark , oh Lord
Give light give us rays

( हे गगन सदन च्या चालित म्हणून बघावे)

मुले १५० ने वाढली
हे कसं झालं
तिथल्या सगळ्या बायका काय व्हर्जिन मेरी आहेत का?

मीपण वरचा प्रश्न त्यासाठीच विचारला, मुले होतात म्हणजे प्रियकर , नवरा, सासू सासरे , माहेरचे वगैरे असणारच ना ?

किंवा, नव्याने येणारी स्त्री बहुतांश वेळा येतानाच प्रेग्नेंट असतील , मग त्यांची मुले तिथेच रहातील

हायला तुम्हाला गणित पण येईना काय?

महिला ३० च्या ४७ झाल्या( यात काही ५ ते १० वयोगटातील तेथे राहणाऱ्या मुलीही स्त्रिया झाल्या असतील). पण मुले १५० ने वाढली.

सतरा बायका फक्त वाढल्या त्या येताना गरोदर असल्या तरी मुले १७ च वाढतील , एखादं जुळं धरली तरी १८ फारतर १९
१५० कशी वाढतील

While Bindel said that many of the women told her that they “couldn’t imagine living with a man” after moving to Umoja, they also told her they still “like” men and want to have children. For women in this culture, having children is even more important than being married. As evidenced by the 200 children in the village, women are still seeking relationships outside of the village, something the men in surrounding villages find amusing, according to Bindel.

“It is not good to be unmarried and have children in our culture,” one young mother of five, all from different fathers, told Bindel. “But it is worse not to have any. Without children, we are nothing.”
http://www.takepart.com/article/2015/08/21/kenya-womens-village-umoja

अमानुष वाटेल पण तेथील स्त्रियांनी पुरुष भृण हत्या जायज केली तर मात्र फक्त स्त्रियांची लोकसंख्या वाढेल.