अस्तित्व !!! (भाग ५ )  

Submitted by Sujata Siddha on 17 January, 2020 - 02:59

अस्तित्व !!! (भाग ५ )  

ती परत आल्याच्या काही दिवसांनंतरची गोष्ट, ती रविवारची सकाळ होती , चहाचा कप हातात घेऊन , जमिनीवर बसून शुभ्रता निवांतपणे पेपर वाचत होती ,एवढ्यात मधल्या पानावरच्या एका फोटोने तिचं लक्ष वेधून घेतलं, गडचिरोली मधल्या’ सिरोंचा ‘ गावातलं दृश्य होतं ते, एक देखणा तरुण एका खडकावर वर बसलेला आणि त्याच्या पुढ्यात गावातली खूप सारी लहान मुलं , त्याला बिलगून उभी राहिलेली ,मुलं परिस्थितीने गरीब दिसत होती पण त्यांचे चेहेरे मात्र चांगलेच हसरे आणि प्रसन्न दिसत होते. तीने पेपर हातात घेतला, नीट पाहण्यासाठी ,आणि … OMG तो चक्क नील चा फोटो होता, नीलचा !!...तेही एकदम ट्रॅडिशनल वेषात ,पांढरा झब्बा , ब्लू जीन्स , आणि हे काय ?.. कानात भिकबाळी पण घातलेली दिसतेय , कित्ती गोड दिसतोय , .जवळजवळ 5-6 वर्षांनी पहात होती ती त्याला, लग्न झालं असेल का त्याचं ? ‘सगळं वाचून ती स्तब्ध झाली आणि अशा चारी बाजूंनी धोका असणाऱ्या , विस्फोटक परिस्थितीत’ नील ‘ने गडचिरोली मधल्या आदिवासी मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली होती ,सुरूवातीला १० मुलांपासून सुरू झालेली त्याची संख्या आता १५० पर्यँत झाली होती , तिकडे आदिवासींवर जे अत्याचार होतात त्याविरूद्ध तो एकटा दंड थोपटून उभा होता .त्यांचा लाडका’ नील भैय्या ‘झाला होता तो , आणि अर्थातच नक्षलवाद्यांच्या डोळ्यावर आला होता ,त्यांनी त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला होता , एकदा नाही अनेकदा , पण तो त्यातून वाचला होता , त्याच्या केसालाही कधी धक्का लागला नव्हता . शुभ्रता अवाक झाली ,कसं शक्य आहे हे ?इतकी निष्ठा ? आणि एवढी निर्भयता ? कुठून आलं याच्याकडे हे ? आपल्या घरावरच्या एका हल्ल्यात आख्ख कुटुंब उध्वस्त झालं ,आणि हा आपणहोऊन आगीत उडी घेऊनही , सुरक्षित ? हे काही फक्त सत्कृत्याचं तेज नाही , ह्याला साधेनची जोड असेल तरच असा चमत्कार घडू शकतो . इतकी निर्भयता त्याशिवाय येत नाही हे ती पक्कं जाणून होतीच त्यामुळेच ती संभ्रमात पडली, नील च्या बाबतीत काहीही घडू शकतं तिला वाटलं . आणि त्याच्या research चं काय ? तिला जीन्स आणि T-shirt मध्ये , फॅशनेबल हेअर स्टाईल करून , Cologne.’ लावून , मुलींच्या मागे फिरणारा नील आठवला , अर्थात त्याही वेळेला तो असे काही उपक्रम करत होताच , पण तो सगळं आयुष्य याला वाहून घेईल असं मात्र तिला वाटलं नव्हतं , आत्ताचा तो फार वेगळा दिसत होता , देखणा तर तो होताच पण आधीचा उनाड भाव जाऊन आता एक वेगळा सभ्य आणि सौम्य भाव आला होता त्याच्या चेहेऱ्यावर, ‘नील ‘ चं हे बदललेलं रूप तिला खूप आवडलं होतं , त्यामुळेही असेल कदाचित ,पण तिला एकदम त्याच्याबद्दल जिव्हाळा ,दाटून आला ,पण तिने मन आवरलं , माहिती नाही तो आपल्याला सिंगल आहे की नाही , आणि आता आपण त्याला आवडू कि नाही , किंवा कदाचित लग्न झालंही असेल आत्तापर्यँत , तिला जुने दिवस आठवून हसू आलं .एखादी वनकन्या पटवली असेल का याने ? मनात आलेला विचार तिने थोडासा जेलस होऊन उडवून लावला आणि ती अंघोळीला गेली . अंघोळ करताना देखील त्याचा तो भिकबाळी घातलेला हसरा चेहरा तिच्या सतत डोळ्यासमोर उभा रहात होता , आज मन ताब्यात नव्हतं हेच खरं !!
अंघोळ करून शुभ्रता बाहेर हॉल मध्ये आली , खूप दिवसांनी गाणं गुणगुणत ओले केस पुसत होती , हॉलच्या खिडकीतून सूर्याचे कोवळे किरण सगळ्या घरभर पसरले होते , तेवढ्यात फोन वाजला . उगाच वाटून गेलं तिला कि नील चा असेल ,का? जरा उत्सुकतेनेच ती फोन जवळ गेली ,फोन तिच्या ऑफिस मधल्या एका मैत्रीणीचा होता ,
“हॅलो शुभ्रता!..”
“हाय सुप्रिया, बोल ना .”
“ऐक ना आज तुझा काय प्रोग्रॅम आहे ? “
“वेगळा असा काही नाही गं , नेहेमीसारखा आराम करणार आहे का ग ? “ शुभ्रा म्हणाली
“ मी एके ठिकाणी जाणार आहे , सकाळी १० वाजता निघायचंय ,तू येशील सोबत म्हणून ?”शुभ्रा ने घड्याळात पाहिलं आठ वाजयला आले होते .
“कुठे जाणार आहेस ? “
“खरं म्हणजे मलाही नीटसं कळलं नाही ,spiritual sessions आहेत काही बहुतेक , काल अगं असंच मेडिटेशन वर वाचता वाचता ‘क्रिया योगा ‘ नावाची एक वेब साईट सापडली ,माहिती वाचून खूप curiosity वाटली म्हणून त्या website वर दिलेल्या नंबर वर फोन केला तर जे session घेतात स्वतः: त्यांनीच फोन उचलला , खूप फ्लुएंट इंग्लिश मध्ये बोलत होते ते, मेलं माझं इंग्लिश कुठे एवढं भारी ? त्यामुळे मला जास्त कळलं नाही ग ,पण मनाला बर वाटेल असं काहीतरी आहे , सकाळी दहा वाजता त्यांची sessions सुरु होतात , address आहे माझ्याकडे , आपण गाडीवर जाऊया , तुला यायला आवडेल असं वाटलं म्हणून तुला विचारलं “ सगळं एका दमात बोलून सुप्रिया थांबली.
क्षणभर शुभ्रा विचारात पडली, तिचा तो छोटासा pause देखील सुप्रियाला सहन झाला नाही , “चल ना, नाही म्हणू नकोस
Please , अजून दोन तास आहेत तुला आवरायला आणि तसही तुला आवरायची काय गरज ? ,तुझं काय आमच्यासारखं आहे का बाई ? कसंही रहा तुम्ही सुंदरच दिसणार “
“हो क्का ? एवढं buttering ? बरं येते , पण तू मला घेऊन जायचं आणि येताना घरी पण सोडवायचं , मी आज मुळीच गाडी चालवणार नाही ,कबूल असेल तर बघ .”
“कुबूल , कुबूल , , लै वेळा कुबूल “ सुप्रिया खुशीत येऊन म्हणाली . “ तयार रहा मी आलेच “ “
..ये !.” शुभ्रा म्हणाली आणि फोन ठेऊन तिने कामं आवरायला घेतली , खरं तर त्या वेळी शुभ्रा ला कुठे ठाऊक होतं की ही सहज म्हणून केलेली visit तिच्या आयुष्याला पुढे मोठी कलाटणी देणार आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान