संदेश संक्रांतीचा

Submitted by Asu on 15 January, 2020 - 01:05

*****************************
सौ.वसुंधरा आणि अरुण पाटील यांचेकडून सर्व आप्तेष्टांना, रसिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तीळगूळ घ्या गोड गोड बोला!!!
*****************************

*संदेश संक्रांतीचा*

गुळाचा गोडवा मनात साठवा
तिळाचा स्नेह नात्यात आठवा
संक्रांतीच्या सणाला गोड हलवा
एकमेकां देऊन सदिच्छा वाढवा

दिवस सुगीचे शेतकरी खुश झाला
तिळगुळ घेऊन गोड गोड बोला

धनु मधून मकर राशीत प्रवेशला
वंदू आपण आज सूर्यनारायणाला
थंडीच्या दिवसात पौष मासाला
सुरुवात झाली मोठ्या दिवसाला

मकर संक्रांतीचा सण हा आला
तिळगुळ घेऊन गोड गोड बोला

नववधू साज शृंगाराने सजवा
काळी चंद्रकळा गोऱ्या अंगी नेसवा
दागिने हलव्याचे अंगभर चढवा
ललनांना हळद कुंकवाला बोलवा

वाण ऊस बोरांचे सुगडात घाला
तिळगुळ घेऊन गोड गोड बोला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults