सनकी भाग ६

Submitted by Swamini Chougule on 10 January, 2020 - 21:45

शिवीन कायाने घातलेल्या काँट्रॅक्टच्या अटी मान्य करायला तयार नव्हता. कारण त्या अटी खुपच जाचक व पूर्ण कायाच्या फायद्याच्या होत्या.
शिवीन कायाकडे पाहत बोलू लागला.
शिवीन,“ it’s very unfair to me. I can’t afford that. काय आहे हे its not joke. पहिली अट
१ कोणते ही डिजाईन तुम्ही अप्रुव केल्या शिवाय मी वर पाठवू शकणार नाही पण तुम्ही केलेले डिजाईन मा‍झ्या अप्रुअल शिवाय पाठवणार. मला अमान्य आहे.
२ जर मी मध्येच कोणत्याही कारणास्तव प्रोजेक्ट सोडला तर मी प्रोजेक्ट मध्ये लावलेले पैसे बुडणार व तुम्हाला मी वरून दंड म्हणून 15cr द्यायचे. मला हे ही अमान्य आहे.
३ संपूर्ण प्रोजेक्ट संपू पर्यंत माझे फॅशन हाऊस कोणतेही नवीन प्रोजेक्ट व छोटे-मोठे काम सुध्दा घेणार नाही. ही अट ही मला मान्य नाही.
४ माझा बिजनेस पार्टनर या प्रोजेक्ट मध्ये लक्ष घालू शकणार नाही. ही अट सुध्दा मान्य नाही.

या चार अटी वगळल्यास मी काँट्रॅक्ट साइन करेन. असे बोलून शिवीन कायाच्या ऑफिस मधून बाहेर पडला. कायाच्या हे लक्षात आले की शिवीन अडचणीत आहे पण तो मूर्ख नाही. म्हणून कायाने आपण दोन पाऊले मागे यायचे असे ठरवले पण तिने शिवीनला तसे भासू दिले नाही.शिवीनने दोन दिवस झाले तरी कायाच्या ऑफिसशी संपर्क साधला नाही तसेच Mr मानेला ही काही कळवले नाही. काया मात्र इकडे हायपर झाली.
काया घरीच होती कालपासून तिने ना सुधीरचा फोन घेतला होता ना ऑफिस मध्ये आली होती. सुधीरला तिची काळजी वाटत होती, म्हणून तो कायाच्या घरी आला तर कामवाली शांताबाई घरात झाडू -पोच्या करत होती. सुधीरने तिला काया कोठे आहे असे विचारले तर शांताबाईने ती त्या रूममध्ये आहे असं सांगीतले.मग सुधीरचा नाईलाज झाला व तो हॉलमध्ये सोप्यावर बसला. तो विचार करत होता. ती रूम म्हणजे दोन बेडरूम सोडून एक छोटीशी अडगळीचे समान ठेवायची रूम होती पण काया त्या रूम मध्ये कोणाला ही जाऊ देत नसे ना सुधीरला ना तिच्या स्वतः च्या आईला मग शांताबाई सफाईसाठी तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या रूमला कायम कुलूप असायचे व चावी कायाकडे असे वेळ प्रसंगी तिजोरीची ही चावी सुधीरकडे सोपवणारी काया त्या रूमची चावीच काय पण कोणाला रूमकडे फिरकू ही देत नसे.तिला वाटलं की ती त्या रूम मध्ये तासंतास जाऊन बसायची. आज ही तसंच झालं होतं. कायाची ती रूम म्हणजे सुधीर ,तिचे आई-बाबा व इतर सगळ्यांसाठी एक गूढ ,एक कोडे होते.
काया रूम मधून बाहेर आली. तिने रूमला कुलूप लावले व ती चावी स्वतःच्या गळ्यात असणार्‍या काळ्या दोऱ्याला लावली. एक लांब काळा दोरा तिच्या गळ्यात कायम असायचा पण तो इतका लांब होता की सहसा कोणाला कपड्यामुळे दिसत नसायचा त्या दोऱ्याला एक छोटेशे हुक होते त्याला ती चावी लावत असे. ती रात्री झोपताना तरी तो दोरा काढायची की नाही हे तिलाच माहीत पण ती चावी मात्र सतत तिच्या बरोबर असायची. असं काय होत त्या अडगळीच्या रूममध्ये काय माहीत जे कायाला सगळ्या जगा पासून लपवायचे होते.
काया झोकांड्या खातच चालत होती. सुधीरने ओळखले की तिने आज वाईन घेतलीय. त्याला माहित होतं की काया अधे- मधे वाईन घेते. म्हणजे ती काय पक्की दारुडी नव्हती पण तिला खूप ट्रेस आला की ती वाईन घ्यायची.ती झोकांड्या खातच हॉल मधील एका खुर्चीवर येऊन बसली. सुधीर तिला पाहत होता. काया शांताबाईला हाक मारून म्हणाली.

काया, “ शांताबाईssss दोन ग्लास व बाटली घेऊन या!”शांताबाईने तत्परतेने दोन ग्लास वाईनची बाटली व सोडा एका ट्रे मधून आणून समोरच्या टीपॉयवर ठेवला.कायाने दोन ग्लास मध्ये अर्धी वाईन व अर्धा सोडा भरला आणि एक ग्लास सुधीरच्या हातात दिला.

सुधीर , “ दि काय हे किती घेतलीस आज तू?”काळजीच्या सुरात सुधीर बोलला.

काया, “ अरे सुधीर काही जास्त नाही घेतली. मी थोडीच तर घेतलीय आणि सेलिब्रेशन करायला नको. ” अस म्हणून कायाने एक घोट वाईनचा घेतला.

सुधीर,“ कसलं सेलिब्रेशन?” सुधीरने बुचकळ्यात पडून विचारले.

काया, “ अरे कसले सेलिब्रेशन म्हणजे? ज्या माणसाला मी माझे सर्वस्व दिले. ज्याच्या बरोबर आयुष्य जगण्याची स्वप्न पाहीली तो माणूस आज मला ओळख सुद्धा दाखवत नाही. मी अनोळखी असल्या सारखं वागला तो माझ्याशी.” काया जड आवाजात बोलत होती.

सुधीर,“ त्या नालायक शिवीनसाठी तू स्वतः ला का त्रास करून घेतेस? तू काळजी करू नकोस तो नाक घासत परत येतो की नाही ते बघा.”

काया,“ एsss सुधीर तुझं तोंड सांभाळ! माझ्या शिवीनला शिवी द्यायची नाही... ” अस बडबडत ती उठत होती पण तिचा तोल गेला पण सुधीर ने तिला सावरले. तो म्हणाला.

सुधीर ,“ ठीक आहे बाई नाही देत शिव्या तू बेडरूम मध्ये चल आणि आराम कर.
काया काही बोलण्याच्या व चालण्याच्या स्थितीत नव्हती ती पूर्ण नशेच्या अंमला खाली होती. सुधीरने तिला बेडरूम मध्ये नेऊन झोपवले व शांताबाईला तिची काळजी घ्यायला सांगून तो ऑफिसला गेला.
●●●●●
काया बेडवर अस्ताव्यस्त पडली होती. तिचा फोन सतत वाजत होता. त्या आवाजाने ती जागी झाली. काय वैताग आहे असे म्हणून तिने फोन पाहीला. फोन सुधीरचा होता.तिने घड्याळात पाहीले. घड्याळात आठ वाजले होते. संध्याकाळ झाली होती. तिने फोन उचलून कानाला लावला. तिला डोके जड वाटत होते. तशीच ती चिडून सुधीरला बोलू लागली.
काया,“ काय रे सुधीर मी फोन उचलत नाही म्हणजे मी झोपलेय हे तुला कळत नाही. उगीच तुझी कटकट.” अस बोलत ती बेडवर बसली.
तिकडून सुधीर बोलत होता.

सुधीर ,“दि माझं ऐकून तर घे खूप महत्त्वाची बातमी आहे.”तो उत्सुकतेने बोलत होता.काया जरा ना खुशीनेच म्हणाली.
काया, “काय बातमी आहे सांग बाबा?”

सुधीर, “दि ती रिचा सरनाईक आहे ना; तिचा फोन आला होता.मिटिंगसाठी येणार आहे म्हणून.” तो कायाला सांगत होता.

काया,“ कोण रिचा सरनाईक? ”ती त्रस्त आवाजात म्हणाली.

सुधीर,“ दि रिचा सरनाईक अग शिवीन ठाकूरची फीआन्से आणि बिझनेस पार्टनर; ती येणार आहे उद्या अकरा वाजता मिटींगला आपल्या ऑफिस मध्ये म्हणजे शिवीन ठाकूर ही येणार पाहू, उद्या काय होतंय ते असं ही आपण थोडं एक पाऊल मागे घ्यायचे ठरवलंच आहे” सुधीर बोलत होता. कायाला रिचा सरनाईक कोण हे आठवले पण ती तंद्रीतच सुधीरला म्हणाली.
काया,“ ठीक आहे उद्या पाहू काय ते ओके by”अस म्हणून तिने फोन ठेवला पण ती भूतकाळात केव्हांच गेली होती. तिला कॉलेजचे दिवस आठवू लागले.
रिचा सरनाईक एक श्रीमंत व खानदानी घरातील मुलगी. गोरी-गोमटी,गोल चेहरा,मोठे पाणीदार डोळे,नाक सरळ नसलं तरी तिच्या चेहर्‍याला शोभणारे, सडपातळ बांधा, उंची पाच फूट पेक्षा जास्तच,लांब कमरे पर्यंत केस ते ही कायम मोकळे सोडलेले असत. रहाणीमान अगदी तिच्या श्रीमंतीला साजेसं. अशी रिचा एका नजरेत कोणालाही आवडेल अशी. ती शिवीनची बालमैत्रीण व फॅमिली फ़्रेंड ही होती. तसेच ती शिवीनची बेस्ट फ्रेंड देखील होती.
त्यामुळे रिचाला अनेक मुली मस्का मारत असत की शिवीन बरोबर तिने त्यांचं प्रेम प्रकरण जुळवून द्यावं म्हणून पण रिचा कोणाला ही मदत करत नसे. तसेच शिवीनचे मित्र देखील त्याच्या मागे लागायचे की रिचा बरोबर त्यांची सेटिंग करून द्यावी म्हणून पण शिवीन ही हात वर करून मोकळा व्हायचा.
असे रिचा व शिवीन दोघे ही कॉलेज मध्ये मोस्ट पॉप्युलर होते. दोघांची मैत्री पाहून मग कॉलेजमध्ये त्या दोघांना कपल म्हणून चिडवू लागले होते पण ते दोघे आमच्यात फक्त मैत्री आहे असे म्हणत. निखळ मैत्रीचा आव आणणार ते दोघे आज खरच कपल झाले होते. अशा सर्व विचारात व भूतकाळात हरवलेली काया फोनच्या आवाजाने भानावर आली. तिने फोन उचलला तो तिच्या आईचा होता.आईशी जुजबी बोलून तिने फोन ठेवला कारण तिचं डोकं हँग ओहर मुळे खूप दुखत होते. काया उठून फ्रेश झाली व तिने शांताबाईने करून ठेवलेले लिंबूपाणी फ्रीज मधून काढले व पीले ; तिला आता जरा बरं वाटलं. नंतर ती जेवली व झोपली कारण उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users