आभाळ दाटलंय उत्तरेकडे

Submitted by बोकलत on 10 January, 2020 - 01:26

आभाळ दाटलंय उत्तरेकडे
मी झोपतो पाय ठेऊन दक्षिणेकडे

मी शोधत फिरतो निवारा
घरी आमच्या खूपच पसारा

मी उडायला बघतो आकाशी
वेडावून दाखवी मला पक्षी

झाडावरून नारळ पडला
पिताना चहा बशीतून सांडला

पन्नास गुणिले दोन शंभर
शर्यतीत माझा पहिला नंबर

बघता बघता गाठली तिशी
बायकांना का नसते मिशी

आभाळ दाटलंय उत्तरेकडे
मी झोपतो पाय ठेऊन दक्षिणेकडे

Group content visibility: 
Use group defaults

क्या बात है...
<<झाडावरून नारळ पडला
पिताना चहा बशीतून सांडला
पन्नास गुणिले दोन शंभर
शर्यतीत माझा पहिला नंबर>> याची तारीफ करायला तर शब्दच उरले नाहीत..

वाह!!
>>>>>>>>झाडावरून नारळ पडला
पिताना चहा बशीतून सांडला>>>>> सर्वाधिक खोली असलेला व चित्रदर्शी मिसरा (का काय!)
.
>>>>>>>>बघता बघता गाठली तिशी
बायकांना का नसते मिशी>> कोहं नंतरचा सनातन प्रश्न छान मांडलाय.

आभाळ दाटलंय उत्तरेकडे
मी झोपतो पाय ठेऊन दक्षिणेकडे>>>>>> उत्तम कल्पना

पण नतंर लिहिलेले
नक्की गझल आहे का
कविता का आत्मकथन

आसो

कुणाला वाईट लिहीणे म्हणजे
मायबोलीवर गुन्हा आहे.

माफ करा सेठ,

पण, थोडी मेहनत घ्या हो रचनेवर.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!

-दिलीप बिरुटे

बोकलतनं अमानवीय धागा हैजाक करून लोकांना तोंडात बोट घालाया लावलं. आता शेरबाजार, गजला एकेक प्रांत काबीज कर्त आहे. बोकलतचे पाऊल पडते पुढे..