लाचारी vs समंजसपणा

Submitted by अमृताक्षर on 8 January, 2020 - 04:07

प्रश्न सुटलेला आहे..धन्यवाद..!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे कोण काय आणि कसं सांगणार आणि तुम्ही कसं वागायचे हे कसं ठरवणार?
घरातून बाहेर पडल्यावर या गोष्टींना तोंड द्यावेच लागेल, तुमच्या परीने तुम्ही भांडा, शांत रहा, खोली बदला, तक्रार करा असे उपाय करून बघु शकताय, अजून काय करणार वेगळे?
काहीही विषय घेऊन मते विचारण्यापेक्षा सोल्युशन स्वतःच शोधणे हे उत्तम नाही का?

ए माझी बाय, समंजसपणा वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे. सोडुन दे तो. तुम्ही ८ जणी मिळुन एकीला आवरु शकत नाही? हॉस्टेल कडे तक्रार करु शकत नाही? इवल्याश्या मुंग्या सुद्धा कोणाला त्रास देत नाही, पण त्यांच्या वाटेला गेले की त्या काय करु शकतात माहीत आहे ना?

एकदा प्रयत्न करुन बघ. डॉ. बाबासाहेबांचे हे वाक्य सुवर्णाक्षरातले आहे की अन्याय करणारा नव्हे तर तो अन्याय सहन करणारा जास्त अपराधी असतो. आतल्या आत कुढुन इथे समस्या मांडण्यापेक्षा तिथे जाऊन लढ. माझ्या मुलीला मी हेच सांगीतले तेव्हा कुठे माझ्या डोक्याला शांतता मिळालीय.

सुहृद काही काही लोकांशी नाही डील करता येत..चिडचिड होतेच माणसांची..मी फक्त तशा लोकांशी कस डील करावं यासाठी हा प्रश्न विचारलाय..कारण प्रत्येकाला कधीतरी अशी माणसं भेटलेली असतात तर प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो..बाकी माझा प्रॉब्लेम तर मीच सोडविणार आहे..फक्त पुढे आयुष्यात अशी माणसं भेटत राहील तर योग्य प्रकारे डील करता यावं ही अपेक्षा आहे म्हणून विचारलं..

अमृताक्षर, योग्य आणि अयोग्य हे खूपदा किंवा नेहमीच परिस्थितीवर अवलंबून असते. एक उत्तर सगळी कडे चालेल असे नाही.
ती मुलगी तुला सहन करण्याइतपत त्रास देत असेल आणि
तिला सुधारण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे तुझ्या आयुष्यात असतील तू आपोआप दुर्लक्ष करशीलच, आणि जर अगदीच शक्य नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून खोली बदलशील यात काय वेगळे होऊ शकणार आहे?

मी जी परिस्थिती सांगितली आहे ते एक उदाहरण आहे.. प्रश्न हा आहे की कुणी आपल्याशी सारखच विनाकारण भांडण उकरून काढत असेल तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं की कायम भांडत बसावं..
दुर्लक्ष केल्याने समोरचा व्यक्ती आपल्याला लाचार समजून अजून भांडतो बोलतो की शांत होत असतो?

आणि मी सहसा कुणाशी भांडायच टाळत असते कारण त्याने मी दिवसभर खूप डिस्टर्ब होते..अभ्यास पण होत नाही..म्हणून आतापर्यंत दुर्लक्षच केलय सगळ..

एप्रिलमधे जाणारच आहे ना सोडून

एप्रिलमधे जाणारच आहे ना सोडून ती? नक्की ना?
मग दुर्लक्ष करा.

आणि तुम्हाला पीन मारणाऱ्या मैत्रिणीला पण सांगा की "मला भांडावसं वाटलं तर मी भांडेन नाहीतर भांडणार नाही. लाचार-बिचार काय समजायचंय ते समजायला तू मोकळी आहेस."

मूळ प्रश्न - हा विषय तुझ्या डोक्यात दिवसभर ठाण मांडून बसतो का? असा आहे - म्हणजे
परिस्थिती क्रं.१: समजा तू भांडलीस आणि मग दिवसभर आपण कसे भांडलो किंवा यापुढे काय असा विचार करत बसलीस.
परिस्थिती क्रं. २: समजा तू भांडली नाहीस आणि मग दिवसभर विचार करत बसलीस की भांडले असते तर.
या दोन्हीत तुझे नुकसानच आहे. त्यातल्या त्यात विषय डोक्यातून पूर्णपणे काढून टाकायचा प्रयत्न करणे हा प्राप्त परिस्थितीत सर्वात चांगला उपाय आहे.

तुम्ही mpsc चा अभ्यास करताय ना? मग तिच्याशी भांडुन तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देऊ शकाल का, याचा विचार करा आणि तिला वठणीवर आणण्यासाठी तुम्हाला किती दिवस खर्च करावे लागतील (त्यात यश मिळेल की नाही ही गोष्ट वेगळी) याचा हिशेब करा.
समजा याचा बदला म्हणुन तीने तुमच्या परीक्षेच्या मुलाखतीच्या दिवशी भांडण केले तर तुमचे किती नुकसान होईल याचाही विचार करा. डोके शांत ठेवुन काम करण्यासाठी हे एक सेवापुर्व प्रशिक्षणच आहे असे समजुन न भांडता व मनस्थिती बिघडु न देता येणा-या प्रसंगाला तोंड द्या. शुभेच्छा.

सरळ होस्टेल बदलायचं ना. अटॅच टॉयलेट बाथरुम असलेले होस्टेल शोधायचं. जशास तसं वागायचं. नसेल जमत तर गप सहन करायचं.

हां तर मायबोलीकरांचे सल्ले ऐकून मी जस वागते तेच अगदी बरोबर आहे..शांत राहणे आणि दुर्लक्ष करणे..अशी लोक कधीच बदलू शकत नाही त्यांच्या वाट्याला न जाणे हेच उत्तम..बाकी कुणी लाचार म्हणू दे नाहीतर भित्री म्हणू दे..
सगळ्यांचे खूप आभार..!

जिज्ञासा हो अगदी तसच व्हायचं..दोन्ही गोष्टी केल्या तरी माझीच जास्त चिडचिड व्हायची..पण शांत राहून दुर्लक्ष करणे त्यातल्या त्यात योग्य वाटतं..मी शांत राहिली की तिला भांडायला कारणच सापडत नाही मग..

दुर्लक्षच करा.
<<<कुणाशी भांडून आपल डोकं खराब करून घेणं आणि आपल्या अभ्यासावर परिणाम करून घेणं मला आवडत नाही..म्हणून मी समंजस पणा दाखऊन परवा शांत बसले>>>> अगदी योग्य केलं.
याला लाचारी म्हणाव का?>>>>> आजिबात नाही. मुर्खांच्या नादी लागुन भांडुन आपला वेळ आणी मनःशांती घालवु नये.
अजुन चार महिनेच आहेत दुर्लक्ष करा.

Aadesh203 मी जिथे राहते तिथे खूप विद्यार्थी आहेत हॉस्टेल मिळत नाही लवकर..2 2 महिने वेटींग असते म्हणूनच तर सगळा घोळ आहे हा..नाहीतर कुणाला अशा विचित्र लोकांसोबत राहायला आवडेल बर..आणि प्रत्येक वेळी नाही हॉस्टेल बदलता येणार..अशा लोकांशी डील करताना मनःस्वास्थ्य कस टिकवाव हेच जमायला पाहिजे आता..

आताच्या परिस्थितीत आठ जणींनी मिळून तिला समज द्या. सकाळी आवरण्याचे वेळेनुसार नंबर लावून घ्या आणि तिची एकाधिकारशाही मोडून काढा.
बाकीच्यांनी सांगितले आहे ते बरोबर. काही जणांच्या वाट्याला देव निष्ठूरपणे असली भांडकुदळ माणसे देत असतो. हॉस्टेल असे तडकाफडकी बदलता येत नाही. दुसरीकडे असे कोणी नाही याची खात्री काय?तेव्हा जास्तीत जास्त वेळ बाहेर राहून अभ्यासात मन रमवणे आणि त्या मुलीकडे दुर्लक्ष करणे हाच उपाय आहे.

समंजस पणा दाखऊन परवा शांत बसले याला लाचारी म्हणाव का?

No. This is correct way to live life. Do not try to argue with idiots. Tell them calmly your point. If they cross limits and try to bring you down to their level, just ignore them.

मी तिला भांडून काय भेटल असतं?

Peace of mind is most precious thing. Do not loose it at the cost of cheap arguments.

अशा लोकांशी कस डील करायचं?

People will provoke you. Stay cool.

कुणी आपल्याशी सारखच विनाकारण भांडण उकरून काढत असेल तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं की कायम भांडत बसावं..
दुर्लक्ष केल्याने समोरचा व्यक्ती आपल्याला लाचार समजून अजून भांडतो बोलतो की शांत होत असतो>>>>

समोरच्याला भांडायचे आहे तर त्याला इंधन देऊ नका. काही लोक असतात असे, त्यांच्याशी तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा वगैरे द्यायला लागला की त्यांना अजून दहा हत्तीचे बळ येते. जिथे योग्य बाबींवर भांडून निर्णय लागणार आहे तिथेच भांडा.

आता एप्रिलमध्ये सोडून जाणार म्हटल्यावर तीन महिने शांत राहून काढा. नाहीतर तुमचा दिवस खराब होणार, तिला मजा येणार. कोण लाचारी वगैरे बोलत असेल तर त्यांना पॉवर ऑफ attorny द्या, त्यांना येऊन भांडुदे तुमच्यातर्फे Happy Happy

सहन केल्यामुळे त्या आदिवासी मुस्लिम डॉक्टर मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली. तुम्ही मुळीच सहन करू नका. शक्यतो पोलिस ठाण्यात तक्रार करा. घरच्या दहा-बारा लोकांना बोलावून घेऊन समज द्या. काही फक्त आव आणतात मारीन, चिरिन पण ते फार भित्री भागुबाई असतात.

अरे भांडण म्हणजे एकमेकीच्या झिंज्या उपटणे, एकमेकीला गाढवासारख्या लाथा घालणे नव्हे. तिला ठामपणे सांगायचे की जसा तुझा इथे हक्क आहे, तू जशी पैसे मोजतेस तसे मी पण अधिकारी आहे, बास ! एवढे ठामपणे सांगणे याला भांडण म्हणता येणार नाही.

मी शांत राहिली की तिला भांडायला कारणच सापडत नाही मग.>>>>>

तुम्ही तिची ऊर्जा काढून घेताय. योग्य मार्गावर आहात.

सहन केल्यामुळे त्या आदिवासी मुस्लिम डॉक्टर मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली>>>>

बरोबर आहे. सहन करायचे नाहीच. ते करायला लागलो की आपल्याला त्रास होणार. तक्रार करायची, आवाज उठवायचा, सगळ्यांना सांगायचे. जे अमृताक्षर ने केले. तरीही फायदा होत नाही म्हटल्यावर सरळ दुर्लक्ष करायचे. त्रास देणारी व्यक्ती नाहीच आहे असे समजून शांत राहायचे. मनस्ताप करून घेतला की आत्महत्येची वेळ येते, ज्यात आपला जीव जातो, ज्यांच्यामुळे हा प्रसंग आला ते तुरुंगात गेले तरी जिवंत राहतात.

विरू mpsc च करतेय पण तिची पोस्ट निघेना..मुली म्हणतात म्हणूनच ती अस वेड्यासारखं वागते..

तुम्ही तिच्या शी भांडत असाल किंवा नसाल.
तुम्ही भांडत नाही असं तुमचं मत आहे.
आणि न भांडल्या मुळे तुम्हाला मनस्ताप कमी होतो असा पण तुमचा दावा आहे .
पण अॅक्टुली तुम्ही तुमचे मन स्वस्थ हरवून बसला आहात पण समस्येवर उपाय नसल्या मुले सहन
करत आहात.
एक तरी तुम्ही सर्व 8, जनी मिळून तिच्या प्रत्येक कृतिला विरोध करा.
एक आढवडा रोज असेच वागा काय मनस्ताप होयचा आहे तो होवू ध्या.
त्या मुळे एकतर ती सुधारेल आणि समस्या कायमची सुटेल.
नाही सुधारली तर तुम्ही सरळ ते हॉस्टेल सोडा आणि दुसरी जागा बघ...
समस्या मुळा मधूनच सोडवायच्या असतात.
त्या वर विचार करून आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्ष वाया घालवण्यात काही शाहणपण नाही.

समस्या मुळा मधूनच सोडवायच्या असतात.
त्या वर विचार करून आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्ष वाया घालवण्यात काही शाहणपण नाही.
नवीन Submitted by Rajesh188 on 8 January, 2020 - 08:45
+१११११

मला नाही वाटत असं वर्षानुवर्षे क्लासमध्ये जनरल नॉलेज, इतिहास वगैरे विषय घोकून स्पर्धा परीक्षा पास होऊन उत्तम अधिकारी बनत असेल कोणी. पायावर उभे राहण्यासाठी प्रेशर असतं, तर काहींना अति महत्त्वाकांक्षा असते. लाल दिव्याची गाडी वगैरे स्वप्नं पहात असतात.

'कितने आदमी थे ' डायलॉग आठवला मला ! सर्वजणी एक सारखे पैसे भरत असतील तर बाथरूम, स्वैपाकघर, कपडे वाळवण्याची जागा सगळ्यांवर समान हक्क असायला हवेत. एकटीने रोज दीड दोन तास तेही पीक टैमला बाथरूम अडवणे ! नॉट अ‍ॅक्सेप्टेबल. सर्व जणी ठरवून तिच्याशी बोला आणि ठणकावून सांगा आणि जे काही नियम ठरवाल त्याची अंमलबजावणी करा. अजिबात ढील देऊ नका.

लातोंके भूत बातोंसे नहीं मानते हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्व जणी आपापले पैसे भरून राहता. ती भरते का सगळ्यांचे पैसे ? का चालवून घेता तिची मनमानी ?

सिरीअसली? आठ जणी मिळून एकीचा त्रास सहन करता? कधी एकत्र होत आवाज चढवला आहे का? की ती एकीशी भांडायला लागल्यावर बाकीच्या सात जणी जाऊ दे आपल्याला काय म्हणून शांत राहता...
अर्थात असे होते.. पण काही वेळा.. जेव्हा तुम्हा आठही वा किमान चार पाच जणींना जरी समजले असेल की ही तुम्हा सर्वंची डोकेदुखी आहे तर एव्हाना तुम्ही मिळून तिच्यावर राशनपाणी घेत चढायला हवे होते. धागे कसले काढताहात...

येनीवेज, हा माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार. परीस्थिती काय कशी आहे नेमकी हे तुम्हालाच ठाऊक..योग्य निर्णय तुम्हीच घ्याल.. पण दात अध्येमध्ये ठणकतो तो सहन करायचा नसतो. एकदा त्रास घेत काढला की मगच बरे वाटते.

बाई दवे, एमपीएससीची नऊ वर्षे अभ्यासाची कुठली परीक्षा असते?
मी एक असिस्टंट ईंजिनीअर क्लास वनची पोस्ट सोडून आलेलो. ती चालत असती तर ताईंना देऊन आलो असतो.

सगळे उपाय करुन झाले असतील तर तिच्याशी चांगला संवाद साधायचा प्रयत्न करा. १-२ वा़क्यंच बोलायची २-३ वेळा दिवसातुन. अगदी 'कशी आहेस', 'गुड मॉर्निंग', 'आज छान दिसतेस' असं साधं. कधी कधी ते काम करतं. किंवा काही विनोदी बोलायचं, एखादी छान घटना घडली असेल जगात तर सांगायची...... तिने बरा प्रतिसाद दिला तर मगं हळुहळु 'आज मी जरा लवकर आंघोळीला जाऊ?' असं प्रेमाने विचारायचा प्रयत्न करायचा.

माझी एक मैत्रीण आहे. सोयीसाठी तिला पिंटी म्हणू. पिंटी कधीच भांडत नाही. तिला त्रास देणाऱ्या रूममेट्स उलट फार खुश असतात. कारण ज्यादिवशी भांडण होईल असं वाटत असतं तेव्हा, पिंटी फक्त थंड नजरेने तिच्या रूममेट्सचा त्रास सहन करते. आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संडास बाथरूम स्वच्छ करते, अगदी लखलखीत. जेव्हा तिच्या रूममेट्स ते बघतात तेव्हा तिचं कौतुक करतात आणि पिंटी त्यांना छान अशी smile देते. हे सगळं मला तिच्या रूममेट्सनीच सांगितलं. एक्त्यात मी तिला कारण विचारलं असता तिने उत्तर दिलं,

वॉशरूम साफ केल्यानन्तर त्यांना दोन एक दिवसात जुलाब उलट्या वगैरे होतात. चांगलाच खर्च पण येतो आणि वाट पण लागते. कारण वॉशरूम साफ करायला त्यांचाच ब्रश वापरलेला असतो. त्यांच्या काही वस्तू खिडकीतुन बाहेर भिरकावून दिलेल्या असतात. त्यांनी दिलेल्या त्रासाचा मी बदला घेते, अशी कामे केल्याने न भांडता मानसिक स्वास्थ्य टिकून पण राहते. पुढे होऊ शकणारी भांडणे पण माझ्या शांत असण्यामुळे कमी होतात. एकंदर, गुडी गुडी इमेज टिकवून ठेवता येते!

१. तुम्ही उरलेल्या ८ जणीं + ती मुलगी असे घरमालक अथवा जे कोणी ऍथॉरिटी असतील त्यांच्यासोबत समोरासमोर बसून तोडगा काढावा.
२. ती कोना एकाशी भांडायला लागली तर बाकीच्या सर्वानी एकत्र येऊन तिच्याशी भांडण / वाद घालावा. (एकीचे बळ)
३. उरलेल्या सर्वानी मिळून तिला रात्री लाईट घालवून चांगली बुकलून काढा ४-५ वेळा (मुका मार न दिसणारा)
४. सगळ्याजणी मिळून तिला पार्टी देत जा अधून-मधून
५. हे काहीच शक्य नसेल आणि जागा सोडायची नसेल तर मग मूकपणे सहन करत बसा आणि तुमचे ग्रह चांगले असतील तर घर मालक म्हणल्याप्रमाणे जाईल ती एप्रिल मध्ये निघून

> सकाळी आमच्या ओनर ला सांगून पाहिलं तर ते म्हंटले ती तशीच आहे तिच्या सारख्याच तक्रारी येतात तिला मी सांगून पण ती ऐकणारी नाही जाऊ दे लक्ष देऊ नकोस एप्रिल मध्ये जातेय ती सोडून.. > घरमालकानेच ऍक्शन घेण्यास नकार दिला आहे आणि दुर्लक्ष करायला सांगितले आहे.
त्यामुळे धागकर्तीने एकटीने तर भांडायला जाऊ नयेच. पण बाकी सगळ्या एकत्र येऊन भांडणार असतील तरी त्यातही ग्रुप लीडर न होता टीम मेम्बर व्हावे असे वाटते.

तुमची पोस्ट वाचून लहानपणी शाळेत असताना एकीचे बळ ही बालभारतीमधील गोष्ट आठवली. एक काडी सहज मोडते पण ६-७ काड्यांची जुडी मोडणे खूप अवघड असते. माणूस कितीही विचित्र असला तरी ८ विरुद्ध १ सामना जिंकता येत नाही म्हणजे खरंच कमाल आहे.
तुम्ही अशावेळी विदुरनीती चा वापर करा. विदुरनीती सांगते शत्रूला त्याच्याच जमिनीवर त्याच्याच शस्त्राने तेही राजे मित्रांना सोबत घेऊन मारावे म्हणजे आपले कमीतकमी नुकसान होते. हीच नीती तुम्ही अवलंबवा आणि पहा कशी सुतासारखी सरळ होते. तुमच्या धाग्यातली काही उदाहरणे घेऊन सांगतो.
सर्वप्रथम कधीही एकटे भांडू नका. प्रत्येकवेळी निदान ३-४ मैत्रिणी सोबत असतील ही पहा. गरज पडलीच तर क्रमाक्रमाने ठरवून ग्रुपने भांडा. सकाळी १:३० तास अंघोळ किंवा २ तास कपडे धुणे करते म्हणता मग सहज सांगून ऐकले नाही (जी ती ऐकत नाहीच) अश्यावेळी ज्या २-३ मैत्रिणी घरी असतील किंवा निवांत असतील त्यांना सरळ बाहेरून काडी लावायला सांगायची. सकाळी नाही जमले तर दुपारी किंवा रात्री बाथरूमला गेल्यावर असे करायचे. तासभर दरवाजा उघडायचाच नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट कबूल करत नाही (जसे की वेळेवर बाथरूम देणे) तोपर्यंत उघडायचा नाही....पुन्हा त्रास सुरु केल्यास पुन्हा असेच करा. अंघोळीला गेली की तिचा मोबाईल (किंवा इतर महत्वाची वस्तु) लपवा आणि शोधून शोधून दमल्यावर तिचे लक्ष नसताना हळूच सहज दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवा आणि मदत करायचे नाटक करून तुम्ही शोधली असे दाखवा किंवा उलट म्हणजे सज्जड दम भरून वर म्हणल्याप्रमाणे एखादी गोष्ट कबूल केल्यावरच द्या. एखाद्या गोष्टीचा बदला घेत आहे असे वाटले तर ती ज्या प्रकाराने बदला घेत आहे तश्याच प्रकाराने त्याच वेळी ३-४ मैत्रिनींनी एकत्र येऊन तत्क्षणी बदला घ्यावा. तुम्ही म्हणालात तुम्ही झोपताना मुद्दाम फोन वर ती मोठ्यांदा बोलत होती. अश्या वेळी तुम्ही आणि ३-४ मैत्रिणींनी (ज्या जागत असतील) मुद्दाम फोन वर तिच्या शेजारी उभे राहून फोन वर बोलल्याचे नाटक करावे किंवा जोराने गाणी लावावीत जेणेकरून तिला तिथे उभे राहून फोन वर बोलणे शक्य होणार नाही. एकीला त्रास देत आहे असे वाटू लागताच ३-४ जणी एकत्र येऊन तसाच त्रास तुम्ही तिला द्या म्हणजे तिला समजेल. ती ४ शब्द बोलल्यावर लगेच काहीजणी एकत्र येऊन तिला १० शब्द बोला. गप्प बसून दुर्लक्ष करून काही उपयोग नाही. नाही म्हणले तरी थोडा त्रास होतोच. त्यापेक्षा त्रास घ्यायचा नाही तर सर्वजणींनी मिळून द्यायचा (अर्थात तिने दिल्यावरच) हे असे काहीवेळा ठरवून केले की तिला समजेल की कोणालाही त्रास देऊ दे, सर्वजणी एकत्र येऊन तिलाच त्रास देत आहेत तेंव्हा आपोआप त्रास देणे कमी होईल. करून पहा. महाराजांचा गनिमी कावा आणि विदुरनीती कधी फेल जाणार नाही.

तर यावर माझी एक मैत्रीण मला बोलली की तू तिची लाचारी का पत्करते तिला काही बोलत का नाहीस..? तू तिला घाबरते वगैरे..
>>> हीच मैत्रिण तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत असेल. तुम्ही हुशार असाल तर तुम्ही मागं पडावं म्हणून यात अडकवू पहात असतील इतर मुली. हुशार मुलांना मागे ओढण्यासाठी, वाईट वळणावर नेण्यासाठी गुप्त रितीने चाली खेळतात जवळचे मित्र/ मैत्रिणी. खरा मित्र/मैत्रीण ओळखा, पारखा.

अरे,धागा गायब ,हल्ली हे खूपच फ्याड आलंय ह माबो वर, जरा म्हणून खुट्ट झालं,किंवा आपलं काम उरकलं की धागा गायब करायचा Sad ,कदाचित दुसऱ्या कोणाला सुद्धा उपयोग होऊ शकतो असा काही विचारच नाहीं

आम्ही सगळ्यांनी मिळून सराना विनंती केली की तिला एकत्र खालच्या मजल्यावर जायला सांगा किंवा रूम सोडायला सांगा..
आणि इतक्या मुलींनी एकत्र येऊन म्हंटल्यावर त्यांचा इलाज नव्हता..
शेवटी ती खाली शिफ्ट व्हायला तयार झाली..आणि आम्ही सगळे सुटलो एकदाचे..

Aadesh203 भाऊ.
तुमचे प्रतिसाद फार आवडले मला..म्हणून नाही उडवले..
खूप वेळात वेळ काढून प्रतिसाद दिलेले असतात सगळ्यांनी..

Pages