मला बाबा बनायचंय

Submitted by हाडळीचा आशिक on 6 January, 2020 - 16:25

"मला बाबा बनायचंय"

साईंच्या दर्शनबारीत बायकोसोबत रांगेला ऊभा होतो. भल्यामोठ्या लांबलचक रांगा बघून, दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी दोनतीन तास सहज लागतील याचा अंदाज आला. पैसे भरून विआयपी पास घेण्याची माझी तयारी होती पण व्यवहारशून्य ही डोळे वटारून नाही म्हणाली. एकतर आधीच वैतागलेलो; बाहेर पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानदाराने आणि त्याच्या एजंटने पाच-सहाशे रुपयांना टाकलं होतं. त्यावेळी 'हे कशाला' असं विचारल्यावर मला म्हणाली, "साईंसाठी!"
आत्ता घेतलेलं हे हारतुरादी मटेरियल मंदिरात जाऊन थोड्यावेळाने पुन्हा दुकानात येणार होतं. पुन्हा विकलं जाणार होतं. कधीकाळी आवडतं म्हणून अर्थशास्त्राची बहिस्थ विद्यार्थिनी बनलेल्या बायकोला पूजासाहित्याचं वरील अर्थशास्त्र समजावलं तर तुच्छ कटाक्ष टाकून केलेला 'इतक्या लांबून आलोय आपण..तू खिशाकडे बघू नकोस' असा उपदेश ऐकावा लागला..
..आणि आता हे असलं ताटकळत रांगेत उभं राहणं!

काही वर्षांआधी कॉलेजला असताना मित्रांसोबत पहिल्यांदा साईंकडे आलो त्यावेळी चारसहा तास रांगेत थांबूनही कंटाळा आला नव्हता. उलट दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत ऊभं राहण्याची तयारी होती कारण नजरेस पडणारी हिरवळ! आता मात्र ती सोय नव्हती. गपगुमान हिच्यापुढे चेहऱ्यावर कमालीचे सात्विक भाव आणून उभा राहीलो. कासवगतीनं रांग पुढे सरकत होती.

साईंच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतेवेळी 'बाबू! ते बघ बाबा' म्हणणारा एक बाबा नजरेस पडला. त्याच्या कडेवर गोड चिमुकली होती. बापानं बोट करून दाखवलेल्या साईंच्या मुर्तीकडे बघून ती खळखळून हसत होती. लहान मुलांचं निरागस हसणं बघत राहावं इतकं विलोभनीय असतंच. तिचं हसणं बघून दोनतीन तासांचा सर्व शीण गेला.
समोर बघून तिनं मंजुळ स्वरात उच्चारलेला 'बाsबाss' शब्द स्पर्शून गेला. तो ऐकून मनात आलं, बस झालं करीयरमागे धावणं.. आता 'बाबा बनूयात!' Happy

गेल्या आठवड्यातील गुरुवारी तिनचार वर्षांनतर आम्ही पुन्हा एकदा साईंच्या दर्शनबारीत ऊभे होतो पण फक्त काही मिनिटांसाठी! कारण यावेळी बायकोनं स्वत:हून शॉर्टकट वापरण्याचा निर्णय घेतला होता, माझ्या मनात शुद्ध सात्विक भाव असूनही.
बड्डेगर्ल असलेली बाबू कडेवरून साईंच्या मुर्तीकडे पाहून गोड हसत होती. Happy

यावेळी वाचलेला वेळ साईंचं 'वैभव' बघण्यात गेला. ते बघत असताना मनात सहज विचार आला, 'बस झालं हे मरमर करीयर.. आता 'बाबा' बनूयात!'

जनहो!
आता मला 'बाबा' बनायचंय. प्लिज मार्गदर्शन करा. माझ्यासारखे आणखी काहीजण असतील त्यांनाही हा धागा उपयोगी ठरेल. Proud

मला पडलेले काही बेसिक प्रश्न

१) बाबा बनण्यासाठीची प्राथमिक तयारी काय असते? त्यासाठीचा काही फौंडेशन कोर्स वगैरे असतो का?
२) नाव काय घ्यावं?
३) वेशभूषा कशी असावी?
४) प्रचार आणि प्रसार कसा करावा?
५) चमत्कार कसे दाखवावेत?
६) परदेशातल्या संधी?
७) आधुनिक तंत्रज्ञान?

आणखी प्रश्न, मुद्दे असतील तर भर घालून मला परीपूर्ण बाबा बनण्यासाठी मदत करा.

_हाडळीचा आशिक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दोनच आहेत हो
आणि तीन झाले की कोणीही नसबंदी करू नये
उद्या दुसरे लग्न करायची वेळ आली आणि मुले पहिल्या बायकोसोबत राहिली तर काय करणार..

Ok

सध्या एक नाव चांगलंच गाजत आहे म्हणे ! करोडोच्या प्रॉपर्ट्या वगैरे...प्रत्येकी एक्वीस हजार, अक्रा हजार आणि पाच हजाराच्या रांगा लागतात ऐकलंय. जास्त पैशे लव्कर नंबर. >> कोण ?

धाग्याचे शीर्षक वाचून वाटले की मुल जन्माला कसे घालावे ह्याविषयी सल्ला हवा असावा>>>>> हायला, मलाही पहिल्यांदा तेच वाटलेले.मग हा.आंचे नाव वाचले आणि धागा वाचला.
एक आणि ३ मुद्द्यांसाठी :

आता तुम्ही हा.आ.,तेव्हा तुमची जागा पडक्या/ओसाड जागेत, स्मशानात किंवा स्मशानाजवळ येणार. तेव्हा तिथे
अल्पवस्त्रात जितके विक्षिप्त वागता/वावरता येईल तितके वागा/ वावरा.बाकीचे मुद्दे तुमचे तयार झालेले शिष्यगण भरून काढतील.

हा आ, तुम्ही बोकलतांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य दीक्षा कुणाची घ्यावी ते सांगतील तसेच ह्या बाबागिरीच्या व्यवसायतील खाचा खोचा समजावतील ! Wink
आणि लक्ष असू द्या बाबाजी! Wink

कोण ?>>>
हे पहा.
Submitted by हाडळीचा आशिक >> काय राव तुम्ही! तो बाबाजी लाखो करोडोमध्ये खेळत होता. आणि तुम्ही एक वर्ष झालं इथे धागा काढुन विचारुन रायले. निम्म्या पब्लीकला तर बाळाचे बाबा होण्याबद्दलचा धागा वाटला. इथली संसारी जनता तुम्हाला काय सल्ला देईल? Light 1

भन्नाट प्रतिसाद...
मी थोडं भरीस भर म्हणून टंकतो
आपण लहानपणापासून कसे अवतारी आहात (म्हणजे शेंबडाने माखलेले नाक,तोंड , अंगभर भस्मविलेपित अर्थात चिखल,मातीविलेपित किटं, केसात माती, लाळ , शेंबूड गळून गळून कडक झालेलं आंगडं वगैरे अवतार नाही.) म्हणजे चमत्कारी आहात. आपले मातापिता कसे थोर होते आदी एखाद्या पुस्तकात नमूद करून भक्तगणांना वाटा.
राजकारणी, पोलीस यांना तुमच्या गडगंज कमाईतला हिस्सा दिला तर तुमच्या चलाखीकडे ते कानाडोळा करतील नाहीतर तिसरा डोळा उघडून तुमचे भस्म करतील. कमाई वाढल्यावर भागिदारी करा.
यांना सांभाळलं तर अंधश्रध्दा वगैरे म्हणायची कोणाची टाप ...
Last but not least... चमत्कार जसे की हवेतून वस्तू काढणे, गायब करणे या साठी हडळ मदत करु शकते...
शुभेच्छा ...जय हो तांबडेबाबा...

आ. ह. Lol

च्रप्स डीपीही बघून आलात..
तुमच्या बोलण्याने उत्सुकता चाळवून मी सुद्धा बघून आलो ..
मला झोपायचे आहे ओ आता.. माझ्या स्वप्नांचा तरी विचार करायचा Sad

च्रप्स डीपीही बघून आलात..
>> असला इंटरेस्टिंग आयडी असेल तर बघतो...
भारी असतात डीपी यांचे..( हे तेच आहेत असे असेल तर)

साद देती हिमशिखरे या पुस्तकात प्रधान महोदयांनी सामान्य माणुस ते संन्यासी होण्याचा सारा प्रवास लिहला आहे.

Pages