थोडे टूकार आहे, थोडे चूकार आहे

Submitted by किरण कुमार on 2 January, 2020 - 04:26

(पुणे कन्याकुमारी सायकल सफरीतून-२०१९)
KK20191220_125539.jpg

आयुष्य कुठे कुणाचे नियमानुसार आहे
थोडे टूकार आहे, थोडे चूकार आहे

माथ्यावरी घाटाच्या नेवूनी बोलतो तो
संपले चढ आता , पुढती उतार आहे

काही ढगाळ वाटा काही उन्हात होत्या
नव्हतेच भान कुठली तारीख वार आहे

संपात केली त्यांनी वाहने बंद सारी
ओसाड रस्त्याने गेले ते सायकल स्वार आहे

ध्येयाची पर्वा नसता जगतो मुक्त प्रवासी
संवाद तो स्वताशी असला प्रकार आहे

भूक असते केवळ आजन्म प्रवासाची
तहानलेल्या मार्गी उर्मी चिकार आहे

ते मांडणे कशाला मी चांदण्यात असता
हर एक निशब्द मार्ग माझी शिकार आहे

- किरणकुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

""" भूक असते केवळ आजन्म प्रवासाची
तहानलेल्या मार्गी उर्मी चिकार आहे """

सुंदर कडवं ,, आणि तितकीच सुंदर कविता .. दंडवत स्वीकारा साहेब .. मस्तच