७ दिवस पावसाळी प्रवासाची योजना सुचवा

Submitted by कपीला on 31 December, 2019 - 12:26

मला रेकंमेंडेशन हवे आहे. जुलै मध्ये महाराष्टरामध्ये १ आठवडा फिरायला जाण्यायोग्य स्थळे कुठली ? ६ लोक आहोत - आई, बाबा , आजी, ३ मुले (१७, १२ आणि ८ वर्षे ). काही निकष , काही गरजा अश्या , (अडीक अशी यातली कुठली नाही. )
१. पुण्या-मुंबई पासून वाहतूक शक्य - रेल्वेला प्राधान्य
२. दर्शनीय स्थळे , निसर्गरम्य देखावे
३. मस्त खान-पान सहजपणे उपलब्ध
४. राहण्याची उत्तम सोय- घरघुतीला प्राधान्य
५. ६-७ दिवस, २ ते ३ जवळपास राहण्याचे बदल चालतील पण एका ठिकाणी मुक्काम करून अनेक गोष्टी करता आल्या तर फारच उत्तम , खूप सारखा प्रवास नको
६. भगण्यासारखा खूप काही असावं
७. साहसे चालतील
८. पाण्यातले खेळ किंवा इतर मनोरंजनाच्या किंवा आगळ्या वेगळ्या गोष्टी चालतील
९. प्रेरणादायी जागा किंवा संस्था भेट
१०. वन्यजीव, पक्षी , वनस्पती , जंगलं चालतील पण माहितीपूर्ण गाईड उपलब्ध असावेत
११. logistics टिप्स - transportation, राहण्याच्या सोयी, खाण्या-पिण्याच्या जागा, नियोजनाबद्दलच्या इतर सूचना व प्रस्ताव ही कृपया द्यावेत - आपण स्वतः अनुभवलेले, अवापरलेल्या सेवा असतील तर फारच उत्तम
१२. अशी नियोजन करणारी पर्यटन संस्था सुचवलीत तरी चालेल
आभरी आहे

Group content visibility: 
Use group defaults

जुलैच का? मुलांची वयं पाहता गणपतीच्या दिवसांत शाळा बुडवली तर चालते. दोन रविवार आणि मधल्या एक दोन सुट्ट्या धरूनच शाळेत अनुपस्थिती कळवून जाता येते. कोकण भाग सोडून इतर ठिकाणची रेल्वे तिकिटं मिळतात.
शाळा सुरू होताच दांड्या मारणे बरोबर नाही.

सॉरी, तुमच्या उत्साहावर पाणी ओतावंसं वाटत नाहीये, पण यावर्षीच्या पावसाळ्यात झालेला पाऊस, जिकडे तिकडे आलेले पूर पाहून खूप मोठा, खर्चिक, पक्का plan करू नका असं सुचवावंसं वाटतं. Flexible plan केलेला बरा. किंवा २/३ पर्याय ठेवा.

कोकणात दिवेआगरला राहण्याची, जेवणाची उत्तम सोय असते. (आधी गेला नसाल तर) दिवेआगरला मुक्काम करून श्रीवर्धन, हरिहरेश्वर पाहून, मुरूड जंजिरा, अलिबागमार्गे मुंबई असा एक plan सुचवते. आठ नाही, पण चारपाच दिवस.

पुढच्या वर्षी परत एवढा पाऊस पडेल असं अजिबात नाही, पण जुलै म्हणजे भर पावसाचाच महिना.

अमेरिकेतून भारतात सुट्टी साठी येणार असतील
हे लक्षात आलं नाही. पाऊसही पाहायचा आणि प्रवास स्थळदर्शन तीन वयोगटांना आवडणारे म्हणजे टुअर आयोजकांची कसोटीच. रेल्वे - कोकण रेल्वेचा भरोसा नसतो. रस्त्यांचाही नसतो.
-----