मन वढाय वढाय

Submitted by nimita on 27 December, 2019 - 06:43

आज एक नवीन कथा लिहायला घेतली आहे.

असं म्हणतात (आणि मानतात ही) की 'स्त्री च्या मनाचा ठाव अगदी भगवंताला सुद्धा लागत नाही'. बरेच लोक जरी ही गोष्ट चेष्टेवारी नेत असले तरी या वाक्यातली सत्यता नाकारता येणार नाही. कारण स्त्रीचं मन असतंच तसं... विशाल..अथांग...काहीसं गूढ म्हणता येईल इतकं खोल ! तिच्या या मनात एकाच वेळी कितीतरी भाव भावनांचे तरंग उठत असतात.... प्रेम, वात्सल्य, करुणा, दया, माया, या आणि अशा सात्विक भावनांबरोबरच राग, अपमान , द्वेष, तिरस्कार असे नकारात्मक भावही ती आपल्या मनात बाळगून असते. कोणत्या क्षणी कोणती भावना उचल खाईल याचा अंदाज तिला स्वतःला देखील नाही बांधता येत.

एका क्षणी जे बरोबर वाटतं तेच पुढच्या क्षणी चुकीचं ठरतं. परिस्थितीनुसार नैतिक आणि अनैतिक याचे मायने बदलत जातात. पण मनाच्या डोहात जरी हे असं वादळ चालू असलं तरी त्याचे तरंग जगापासून लपवून ठेवायचं कसबही असतं तिच्या कडे. स्वतःच्या मनात असलेल्या असंख्य कप्प्यांत तिनी कडू गोड आठवणींचे असे अगणित क्षण दडवून ठेवलेले असतात. पण तिच्या या मनाच्या डोहाचा तळ मात्र तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच गाठता येत नाही. अशाच एका स्त्रीच्या मनात चालू असलेल्या भावनांच्या ऊन पावसाचा लपंडाव म्हणजे ही कथा...मन वढाय वढाय...

लवकरच या कथेचा पहिला भाग घेऊन येते आहे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Waiting!

अशाच एका स्त्रीच्या मनात चालू असलेल्या भावनांच्या ऊन पावसाचा लपंडाव म्हणजे ही कथा...मन वढाय वढाय...
लवकरच या कथेचा पहिला भाग घेऊन येते आहे ! >> प्रस्तावना तर फारच‌ जोरदार झाली आहे. पण ही फक्त पहिल्या भागाची प्रस्तावना आहे की पुर्ण कथेची आहे यावर पण पहिल्या भागाआधी मनोगत येऊ द्या.