गाण्याचे नोटेशन कसे काढावे? आणि Obligato's कसे सेट करावे?

Submitted by sulu on 6 June, 2013 - 13:20

गाण्याला scale चे महत्त्व काय?
नोटेशन कसे काढतात?
Obligato कसे बनवावेत? काही सल्ले?

कुणाला माहित आहे का? काही माहिती, दुवे मिळले तर बरे होईल.

मधुरीता:
१.कुठल्याही गाण्याचे नोटेशन काढताना त्याचा बेस स्वर शोधावा. बेस स्वर म्हणजे गाण्याची सुरुवात होते तो स्वर नाही तर ज्या स्वरावर त्या गाण्याचा ठेहराव आहे तो स्वर.
२. बेस स्वर म्हणजेच त्या गाण्याची ओरीजीनल पट्टी. तो 'सा' समजुन सा-प-सां वाजवावे म्हणजे गाण्यासाठी लागणारे 'सप्तक'(scale) मिळेल.
३. मग त्या सप्तकात गाणे वाजवण्यास सुरुवात करावी. आणि ज्या पट्ट्या गाण्यासाठी वापरल्या जातील त्या बेस स्वरापासुन ('सा' पासुन) किती अंतरावर आहेत त्यानुसार त्यांचे स्थान निश्चीत करावे.(सा-ग, सा-म, सा-गा इत्यादी) आणि तसे लिहुन काढावे.
४.नोटेशन लिहिताना 'शुद्ध, कोमल आणि तीव्र' स्वरांचे भान ठेवावे.(flat स्वर).

मेधावि
कोणत्याही गाण्याचे नोटेशन काढता येते परंतु त्याला मर्यादा असतात. जसे की काही स्वरांच्या आधी किंवा नंतर किंवा मधेसुद्धा काही कणस्वर असतात जे नोटेशन मधे मांडणे अवघड असते. तसेच स्वरांचा लगाव, वजन ह्या गोष्टीसुद्धा नोटेशनमधे मांडता येत नाहीत. त्यामुळे एखाद्या बंदिशीचे कितीही चांगले नोटेशन काढले तरी ती संपूर्ण चाल होत नाही. म्हणूनच भारतीय अभिजात संगीतात गुरुमुखातून मिळणार्‍या विद्येला अनन्यसाधारण महत्व आहे.

दादः
सुमेधाव्ही ने वर म्हटलय तसं... नोटेशनने आकार, बांधणी, ताल, चौकट कळू शकते पण त्यातली (कला)कुसर भारतीय नोटेशनमधे उतरवणं कठीण आहे... आपल्याकडे नोटेशन सिस्टिम तितकी प्रगत नाही त्यामुळे असेल कदाचित.

उदा. सारे जहांसे अच्छा ह्यात (' दिलेले स्वर कोमल अथवा तीव्र(म) धरावेत)
सारे जहासे अच्छा
ग'ग'रे सारेनि सासा

आता ह्यात आपण म्हणताना जहा हे 'सारे' असं सरळ आणि इतकच नाही म्हणत. जहा नंतर पुढल्या स्वराला किंचित स्पर्श करून येतो. त्यामुळे नोटेशन अधिक समृद्धं करायचं तर..
ग'ग'रे सारे(ग')नि सासा

पास्चिमात्यं नोटेशन पद्धत खूप प्रगत आहे. पियानो सारख्या वाद्याच्या सुरांवरचे आघात आणि व्हॉल्यूम ह्यावरही त्यात बारकावे आहेत.

लेकाने कीबोर्डवर वाजवून त्याचं तय्यार स्क्रिप्ट दाखवलं तेव्हा मज्जा वाटली होती. आता असं वाटतं की, ज्याला उत्तम कीबोर्ड वाजवता येतो अन मिडी सॉप्फ्टवेअर, म्युझिक रायटर तंतरज्ञानाची Happy चांगली कल्पना आहे त्याने मराठी गाणी वाजवून त्याची स्क्रिप्ट्स काढायला हवीत. मात्रं ती वेस्टर्न स्क्रिप्ट बोलीत असतिल... ते एक शिकलं की झालच.
(नाहीतर... गुरुमुखी विद्या घेणं आलं.)

रेडिमेड नोटेशन घेऊन गाण्याची आऊटलाईन वाजवता येईल. पण त्यातल्या बारकाव्यांसठी कान तयार करायला हवा अन हातही

मधुरीता:
नोटेशन काढण्यासाठी उत्तम वाजविण्याबरोबरच वाजविणारा उत्तम कानसेन ही हवा हे दाद यांनी सांगीतलेले १०१% पटणारे.
नोटेशन काढणे हे थोडे जिकिरीचे आणि वेऴकाढु काम असले तरीही ते तितकेच उपयुक्त ठरते. उदा: एखादे गाणे नोटेशन काढले असल्यास कधिही वाजविता येते. तसेच नोटेशन पाहिल्यावर कोणते स्वर वापरले आहेत ते पाहुन गाणे कोणत्या रागावर आधारीत आहे ते समजते.

गाण्याचे नोटेशन काढण्यासाठी step by step जाणे जास्त चांगले. तयार नोटेशन वाजविताना दिलेल्या तालात आणि लयीत वाजविणे अवघड जाते. म्ह्णुन सुरुवातीला आपल्यापुरते सोपे नोटेशन काढणे कधिही चांगले.

त्यासाठी आपल्याला नोटेशन काढताना काय आवश्यक आहे ते आधी पाहु-
१. स्वरांचे ज्ञान (शुद्ध, कोमल, तीव्र)
२. सप्तकाचे ज्ञान( मंद्र, मध्य, तार सप्तक)
३.तालाचे ज्ञान
४.लयीचे भान
५. स्वरलिपी लेखनाचे नियम व चिन्हे
६.कण स्वर, मींड, एकत्र वाजवायचे स्वर इ. च्या खुणा

हे सारे आवश्यक असले तरीही आपण वरती म्हटल्याप्रमाणे सोपे नोटेशन काढता येते. त्यासाठी सुरुवातिला गाण्याच्या प्रत्येक शब्दाचे नोटेशन काढायचे. म्युझिकचे नोटेशन काढताना 'लल ला ला' असे म्हणत स्वर ओळखुन लिहुन काढायचे. हे सारे करताना ताल, लय इ. थोडा वेळ बाजुला ठेवायचे. आणि मग ते नोटेशन शब्दानुसार वाजवीत म्हणायचे, म्हणजे हळुह्ळु लय साधत जाते. मग हातावर ताल देत कुठला शब्द तालाच्या कुठल्या मात्रेवर येतो ते पाहुन तालाच्या खुणा त्या नोटेशन खाली कराव्यात.
ही पद्धत वापरुन हळुहळु नोटेशन काढणे जमत जाते.

संगीतकार एखादी चाल बसवतो तेव्हा ताल आणि लय कशी निवडतो ( निवडते?)

अनेकदा आपल्या वाचनात येते की अमुक एका संगितकाराला ही चाल देताना काय काय अनुभव आले. ते एखाद्या चित्रकाराने रंगविलेल्या पेंटींग सारखेच असते. गाण्याची बांधणी, त्यातील आशय, शब्दरचना, गाण्याचा बाज, गायक, गायीका, गाणे कोणत्या प्रसंगावर चित्रीत होणार आहे या आणि अशा बर्‍याच गोष्टींचा विचार करुन संगितकार गाण्यावर स्वरसाज चढवतो.

प्रत्येक संगीतकाराची स्वतःची स्वतंत्र शैली असते. उदा: ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या अनवट आणि भरपुर चढउतार असलेल्या सुरावटी किंवा बाबुजींच्या ऐकुन सोप्या वाटणार्‍या पण हाताळायला अवघड अशा वैशीष्ट्यपुर्ण चाली.

या चाली देताना ताल आणि लयाची कशी निवड करतात असा प्रश्न तुम्ही केला आहे. पण ह्याचे उत्तर 'आधी कोंबडी की आधी अंडे' यासारखे अवघड आहे. कारण काही संगीतकार आधी गीताचा अभ्यास करतात. त्यातील शब्दोच्चार, त्यावरचे आघात, नाद, गाण्याचा बाज, गीताचा अर्थ, भावना,गीताचा प्रकार या बाबींचा विचार करुन मग चाल बांधतात आणि त्याचवेळी त्याचा ताल आणि लय ठरवितात. उदा: भजन असेल तर ताल भजनी/केहरवा लय स्लो, लावणीसाठी दादरा, दिपचंदी इ. आणि लय गीतानुसार, यामध्ये गीत प्रकार आणी शब्द यांनी गाण्याची चाल बांधीव असते.

तर काही संगीतकार आधी चाली बांधतात. त्यावर स्वरसाज चढवितात मग गीत त्यावर लिहुन घेउन गीतानुसार, प्रसंगानुरुप आणि वैशीष्ट्यपुर्ण चालीनुसार ताल व लय ठरवितात. किंवा आधिच ताल व लय ठरवुन त्यावर गीत लिहुन घेतात. या प्रकारात ताल व लय निवडीचे भरपुर स्वातंत्र असते. उदा: ए. आर. रहमान आधी चाली देतो, ताल व लय ठरवितो, वाद्यांची निवडही करतो आणि मग गीताची रचना त्या चालीनुसार बनवतो. यामध्ये गीताचा अर्थ आणि शब्दांची घडण बदलण्याचा धोका असतो. पण लय, ताल आणि स्वरमेळाचे वैविध्य अनुभवता येते.

असे म्हणतात की गाण्याचे नोटेशन काढताना नुसते स्वरज्ञान असुन चालत नाही, तर गाण्यातील बोल, त्याचा आशय, त्याच बरोबर शब्दांची घनता, आघात, गाण्याला रंगत आणणारा लयपुर्ण ठेका इ. अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी गाण्यासाठी वापरलेला ताल आणि लय(गती) यांचाही विचार गाण्याचे नोटेशन काढताना करावा लागतो.

हिंदुस्थानी संगितात, अनेक ताल वाद्यांचा वापर केला जातो जसे की, तबला, घट, ढोलकी, चिपळ्या इ.
हे ताल ठरावीक आणि नियमीत आघातांनी बनलेले असतात. त्यांना मात्रा असे म्हणतात.
हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीतात विविध मात्रांचे ताल प्रचलीत आहेत, ८ मात्रांचे, ६ मात्रांचे, १६ मात्रांचे इ.
या तालांचे ज्ञान असणे आणि त्यातील तालाच्या खुणा माहीत असणे हे नोटेशन लिहिताना जरुरीचे असते.
तालाबरोबरच तालाची गती (लय) विचारात घ्यावी लागते. गाण्यातील ओळीत तालाची गती ही नियमीत आणि एकसारखी ठेवावी लागते. नाहीतर गाणे मध्येच फास्ट्/स्लो असे काहीसे होइल. याचा बॅलन्स ठेवणे यालाच लयीची जाण्/भान असे म्हणता येइल. त्यासाठी ताल आणि लयीविषयी थोडी माहीती खाली देत आहे.

तालः गाण्याचा ठेका (नियमीत) . ताल मोजण्याचे साधन म्हणजे मात्रा(बिट्स). तालातील एकुण मात्रा या खंडांमध्ये विभाजीत केलेल्या असतात.
लयः तालाची गती(स्पीड अथवा टेंपो). तालाच्या प्रत्येक खंडामध्ये एकसमान गती असणे आवश्यक असते. नाहीतर गाण्याचा बॅलन्स कोलमडतो आणि गाणे वरती सांगीतल्याप्रमाणे फास्ट/स्लो असे काहीसे होइल.

उदा:
ताल : केहेरवा
मात्रा: ८....................(एकुण मात्रा)
खंडः ४(२,२,२,२)........(तालाचे विभाजन आणि त्यातील मात्रा)
सम: १ ली मात्रा.......(तालाची सुरुवात)
कालः ५ वी मात्रा.....(तालाचा मध्य किंवा आघात न येणारी महत्वाची मात्रा)
टाळी: १,३,७............(खंडातील पहिली मात्रा ज्यावर आघात येतो)

1--------2--------|3-------4--------|5--------6--------|7--------8-------|
धा------गे--------|न--------ती------|न--------क-------|धी-------न------|
सम(x).....................................काल(o)....................................(१ आवर्तन)

|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|
|::::::::::::::::::::::::::लय (एकसमान गती)::::::::::::::::::::::::::::::::::::|

मधुरीता:
सर्वांना कळण्यासाठी पेटी विषयी थोडी माहिती-
(हिच माहिती कॅसिओ आणि सिंथेसायझरलाही लागु होते.)

१. पेटीमध्ये(हार्मोनिअम) मध्ये तीन सप्तक पट्ट्यांचा सेट असतो. प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्‍या पट्ट्या असतात.

२. कुठलिही पट्टी 'सा' समजुन वाजविता येते. आणि प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्‍या पट्ट्या असतात.

३. त्या 'सा' पट्टीपासुन सलग येणार्‍या १२ काळ्या-पांढर्‍या पट्ट्या मिळुन एक सप्तक सेट तयार होतो.

४. प्रत्येक सप्तकात एकुण बारा स्वर असतात.

५. त्यामध्ये (७) शुध्द स्वर - सा रे ग म प ध नी
(४) कोमल स्वर- रे`, ग`, ध`, नी` (शुद्ध स्वरापेक्षा कमी उंचीचा)
(१) तिव्र स्वर- म` (शुद्ध स्वरापेक्षा जास्त उंचीचा)
एकुणः [ १२ ] स्वर

६. पेटीवर या स्वरांचा क्रम 'सा' पासुन पुढे दिला आहे. 'सा' नंतर क्रमाने येणार्‍या काळ्या-पांढर्‍या पट्ट्यांचा हा स्वर क्रमांक आहे.

पेटीवरती स्वरांचा क्रमः
१------२------३------४-----५-----६-----७-----८-----९-----१०-----११-----१२ | १३
सा---- रे`---- रे ----ग`----ग----म----म`----प----ध`---- ध---- नी` ----नी | सां

पाटील
वेस्टर्न नोटेशन (CDEFGA) हे फिक्स पट्यांवर चालु होतात तर सरगम कुठुनही चालु करता येते हे कशामुळे?
तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती
तसेच tabs आणि chords चे कोरिलेशन कसे करायचे हे कुणाला माहीट असेल तर प्लिज लिहा

sulu
पाश्चिमात्य संगीतात 'harmony' ला प्राधान्य असल्यामुळे त्यांचा C नेहेमीच 'पांढरी १ - सा' असतो आणि बदलत नाही . हिंदुस्थानी अभिजात संगीतात, कुठलेही वाद्य 'गायकी' अंगाने वाजवत असल्याने 'Melody' महत्त्वाची असते आणि वेगवेगळे गायक आपापल्या कुवती नुसार जसे वेगवेगळ्या पट्टीत गातात तसे वाजवताना कुठलाही सूर 'सा' पकडून वाजवता येते असे मला कळलेले गणित

मधुरीता:
आपले हिंदुस्थानी संगीत सप्तक कल्पनेवर आधारीत आहे. म्हणजे सा ते नी पर्यंत ७ स्वरांचा समुह. आणि शेवटी येणारा 'सां' हा आठवा स्वर न मानता नंतर येणार्‍या सप्तकातील सुरुवातिचा 'सा' मानला आहे. तो सुरुवातीच्या सा च्या दुप्पट frequency चा असतो म्हणुन तो सप्तकात धरत नाहीत. आणि असे सप्तक कुठल्याही पट्टीपासुन सुरू करता येते ही भारतीय संगीताची लवचीकता सिद्ध करते. म्हणुनच आज जगातले सर्वात शास्त्रशुद्ध संगीत म्हणुन भारतीय संगीताकडे पाहतात. तसेच आपले संगीत कंठ संगीत (classical) म्ह्णुन जास्त ओळखले जाते. त्यामुळे गायक गायीकेच्या पट्टीनुसार गाणे वाजविणे अपेक्षीत असते. म्हणुन एकच 'सा' स्वर निश्चीत नसुन वेगवेगळया पट्ट्या 'सा' म्हणुन वापरतात.

पाश्चात्य संगितात ऑक्टेव्ह(octave) ही संकल्पना आहे. यामध्ये कायमस्वरुपी पांढरी १ हाच 'सा' मानुन वाजविला जातो आणि त्यानुसार इतर पट्ट्यांची नावे निश्चीत केली आहेत. त्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे CDEFG अशी पट्ट्यांना नावे आहेत. आणि ते वाजविणे सोपे जाते. तसेच ते harmony पद्ध्तीवर आधारीत असुन अनेक वाद्यांचा आणि गायकांचा मेळ घालुन वाजविले जाते. त्यामुळे सर्व वाद्यांना एकत्रित वाजविणे सोपे जावे म्हणुन एकच पट्टी (पांढरी १) 'सा' म्हणुन वापरली जाते.

तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती>>>>>

मला पाश्चात्य संगिताबद्द्ल जास्त माहिती नाही. पण कुठल्याही संगीतात संज्ञा वेगळ्या वापरल्या तरीही मुख्य प्रवाह तसाच राहतो. म्हणुन गिटार बद्द्ल माहिती नसताना मी मात्रा मोजायची माहिती देण्याचे धाडस करीत आहे. चु.भु. दे. घे.

मात्रा/बिट्स हे ताल मोजायचे साधन आहे. कोणतेही गाणे वाजवायचे असल्यास प्रथम त्याचा ताल कुठला आहे हे जाणुन घ्यावे लागते. पाश्चात्य संगीतात ४ बिट्स, ८ बिट्स, १६ बिट्स आणि ३२ बिट्स चे ताल वापरतात. त्यांना ROCK1,ROCK2 आणि POP1,POP2 या किंवा अशासारख्या संज्ञा वापरतात.

एकदा ताल किती बिट्सचा आहे हे समजले की, सिलेक्ट केलेल्या गाण्याच्या एका ओळीत तालाची किती आवर्तने(१ ल्या मात्रेपासुन शेवटच्या मात्रेपर्यंतचा काल) आली आहेत हे शोधायचे. काही वेळा एका ओळीत ताल २ वेळा, तर काही वेळा ३ वेळा रिपिट होतो. त्यावरून गाण्याची गती कळते.

तालाच्या पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. बहुतेक गाणी समेपासुन सुरुवात झालेली असतात. मग गाण्यात येणारी आवर्तने मोजली तर तितक्या वेळा त्या ओळीत सम येणार आणि समेवर गाण्यात आघात असतो. अशी सम शोधली कि मग गाण्याच्या मात्रा तिथुन मोजणे सोप्पे होते आणि ठेका सुरू करणेही सोपे जाते.

उदा:
हॅपी बर्थ डे टु,यु ~~~~~
१--------------| १
सम-----------|सम

या गाण्यात ४ बिट्स(किंवा ८ बिट्सचा डबल स्पीड) चा ताल असल्याने हॅपी आणि यु या शब्दांवर १ली मात्रा म्हणजे सम येते. आणि गाण्याच्या एका ओळीत तालाची २ आवर्तने (१ ते ४ मात्रा, १ ते ४ मात्रा) येतात. तसेच हॅपी आणि यु या शब्दांवर समेचा आघात जाणवतो.

sulu
ऑब्लिगाटोज बद्दल मला कळलेले थोडेसे -
Wiki नुसार, classical concert मध्ये कुठलाही बदल ( थोडक्यात शून्य improvisation) न करता वाजवलेला स्वर-समुह म्हणजे ऑब्लिगाटो.

साधारण भावगीते किंवा चित्रपट संगीताचा विचार केल्यास आपल्या सारख्यांच्या भाषेत 'गाण्याच्या दोन लायनींमधलं म्युजिक' म्हणजे हे ऑब्लिगाटोज.

ऑब्लिगाटोज म्हणजे counter symphony नाही. थोडक्यात गायक-गायिका गाणं म्हणत असताना मागे जी supporting व्हायोलिन किंवा सतार ऐकू येते ते नव्हे तर गाण्याची ओळ किंवा कडवे म्हणून झाले की दुसरे कडवे ( अंतरा) सुरु व्हायच्या आधी जे म्युजिक असते ते. बर्याच जणांच्या मते 'Music arrangement किंवा score' म्हणून जो प्रकार म्हटला जातो तो हाच.

मला ऑब्लिगाटोज बद्धल प्रचंड आकर्षण निर्माण झालेय ते थोडे संगीत समजायला लागल्यावर. अनिल मोहिले, रेहमान, एस. डी, आर डी मला या प्रकारात महानतम वाटतात. पण हे कसे निवडावेत, कुठल्या स्वर्-समुहाला कुठले वाद्य निवडावे, ताल बदलावा किंवा नाही याबद्दल नीट माहिती नाही. म्हणून हा धागा काढला आहे.

तेव्हा जाणकारानी जरून माहिती द्या. कदाचित हे musical score writing किंवा arrangement पेक्षा वेगळे असेलही, तर जरूर तसा खुलासा करावा ही विनंती.

मधुरीता:
यामध्ये जे लिहिले आहे ते वाचुन मला कळलेला obligato चा अर्थ म्हणजे फक्त कडव्यांच्या मधला म्युझीक पार्ट नाही तर त्याचे अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. त्यातले खाली काही दिले आहेत.

१) म्युझिक अरेंजरने बनविलेला ठराविक पार्ट तसाच वाजविला पाहिजे आणि त्यात बदल चालणार नाही असा compulsory part of music.

२)काही वेळा अवघड रचना सोपी करुन वाजवितात, तेव्हा obligato ने दर्शविलेला पार्ट मात्र बदलला जात नाही. तो संगितकाराचा signing note असलेला आणि संगितकार ज्यामधुन सहज व्यक्त होतो असा पार्ट असतो आणि तो तसाच वाजविला जातो.

३)obligato चा असाही अर्थ होतो की, म्युझिक मधला तो ठराविक पार्ट तेथे दर्शविलेल्या ठराविक वाद्यानेच अथवा वाद्यांनीच वाजवावा असा निर्देश.

४)गाण्यामध्ये एखादा म्युझिक पिस ओरिजिनल गाण्यात ज्या वाद्याने वाजविला गेला आहे तो तसाच त्याच वाद्याने solo रितीने वाजविणे. त्यावेळी इतर वाद्यांनी वाजविणे थांबवावे लागते.

हे सगळे वाचुन मला काही obligato आठवितात, जसे 'हिरो' चित्रपटातला बासरीचा सोलो पिस. शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांमधले वाद्यांचे(पियानो) साईनींग नोट्स दाखविणारे पिस, अजय-अतुल यांचा नटरंग मधला ढोलकीचा, घुंगरु आणि तबला आणि इतर वाद्यांचा अप्रतीम पिस इ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.कुठल्याही गाण्याचे नोटेशन काढताना त्याचा बेस स्वर शोधावा. बेस स्वर म्हणजे गाण्याची सुरुवात होते तो स्वर नाही तर ज्या स्वरावर त्या गाण्याचा ठेहराव आहे तो स्वर.
२. बेस स्वर म्हणजेच त्या गाण्याची ओरीजीनल पट्टी. तो 'सा' समजुन सा-प-सां वाजवावे म्हणजे गाण्यासाठी लागणारे 'सप्तक'(scale) मिळेल.
३. मग त्या सप्तकात गाणे वाजवण्यास सुरुवात करावी. आणि ज्या पट्ट्या गाण्यासाठी वापरल्या जातील त्या बेस स्वरापासुन ('सा' पासुन) किती अंतरावर आहेत त्यानुसार त्यांचे स्थान निश्चीत करावे.(सा-ग, सा-म, सा-गा इत्यादी) आणि तसे लिहुन काढावे.
४.नोटेशन लिहिताना 'शुद्ध, कोमल आणि तीव्र' स्वरांचे भान ठेवावे.(flat स्वर).
सध्या इतके पुरे.....

आम्हाला काही समजत नाही त्यतले पण अतीशय उत्तम माहीती आहे व उपयुक्त आहे हे समजते

धन्यवाद धागाकर्त्याचे व जाणकार प्रतिसादकांचे

सर्वांना कळण्यासाठी पेटी विषयी थोडी माहिती-
(हिच माहिती कॅसिओ आणि सिंथेसायझरलाही लागु होते.)

१. पेटीमध्ये(हार्मोनिअम) मध्ये तीन सप्तक पट्ट्यांचा सेट असतो. प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्‍या पट्ट्या असतात.

२. कुठलिही पट्टी 'सा' समजुन वाजविता येते. आणि प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्‍या पट्ट्या असतात.

३. त्या 'सा' पट्टीपासुन सलग येणार्‍या १२ काळ्या-पांढर्‍या पट्ट्या मिळुन एक सप्तक सेट तयार होतो.

४. प्रत्येक सप्तकात एकुण बारा स्वर असतात.

५. त्यामध्ये (७) शुध्द स्वर - सा रे ग म प ध नी
(४) कोमल स्वर- रे`, ग`, ध`, नी` (शुद्ध स्वरापेक्षा कमी उंचीचा)
(१) तिव्र स्वर- म` (शुद्ध स्वरापेक्षा जास्त उंचीचा)
एकुणः [ १२ ] स्वर

६. पेटीवर या स्वरांचा क्रम 'सा' पासुन पुढे दिला आहे. 'सा' नंतर क्रमाने येणार्‍या काळ्या-पांढर्‍या पट्ट्यांचा हा स्वर क्रमांक आहे.

पेटीवरती स्वरांचा क्रमः
१------२------३------४-----५-----६-----७-----८-----९-----१०-----११-----१२ | १३
सा---- रे`---- रे ----ग`----ग----म----म`----प----ध`---- ध---- नी` ----नी | सां

मधुरीता- वेस्टर्न नोटेशन (CDEFGA) हे फिक्स पट्यांवर चालु होतात तर सरगम कुठुनही चालु करता येते हे कशामुळे?
तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती
तसेच tabs आणि chords चे कोरिलेशन कसे करायचे हे कुणाला माहीट असेल तर प्लिज लिहा

पाटील,
पाश्चिमात्य संगीतात 'harmony' ला प्राधान्य असल्यामुळे त्यांचा C नेहेमीच 'पांढरी १ - सा' असतो आणि बदलत नाही . हिंदुस्थानी अभिजात संगीतात, कुठलेही वाद्य 'गायकी' अंगाने वाजवत असल्याने 'Melody' महत्त्वाची असते आणि वेगवेगळे गायक आपापल्या कुवती नुसार जसे वेगवेगळ्या पट्टीत गातात तसे वाजवताना कुठलाही सूर 'सा' पकडून वाजवता येते असे मला कळलेले गणित Happy

गिटार सट्रमिंग म्हणजे थोडक्यात 'पिक' ने ताल वाजवायचा. अगणित स्ट्रम प्रकार आहेत. त्यामुळे तुम्ही कसे निवडता ते लिहिता का?

ऑब्लिगाटोज बद्धल कोणाचा काही अनुभव आहे का?

सुंदर धागा..(मला टेक्निकल काही कळत नाही.. पण समजावुन घ्यायला आवडेल).

मध्यंतरी मी खय्याम यांच्यावर आधारीत एक कार्यक्रम पाहिला. त्यात कार्यक्रम करणार्‍यानी सांगितले की खय्याम यांचे "गंधार" वर खुप प्रेम आहे आणि त्यांच्या बर्‍याच गाण्यात "गंधार" आहे. उदा.
ये मुलाकात इक बहाना है
प्यार का सिलसिला पुराना है (यात जो "है" आहे तो त्यानी "गंधार" मधे एंड केला आहे.)

माझे प्रश्नः
१.कुठलेही गाणे "सारेगमसागxxxxxx" असे नोट करता येते का/येइल का?
२.वरील गाण्यातला प्रत्येक अक्षर्/शब्द याला विशिष्ट सूरआहे का? उदा. वरील गाणे हे "ग" मधे एंड होते हे कसे कळते?

<कुठलेही गाणे "सारेगमसागxxxxxx" असे नोट करता येते का/येइल का?>

हो. उदा, सारे जहाँ से अच्छा - ग ग रे सा रे नी सा सा, प ध सा रे ग रे सा सा, ग म प म प ग म ध प, प ध सा रे ग रे सा सा, सा नी ध प..

कोणत्याही गाण्याचे नोटेशन काढता येते परंतु त्याला मर्यादा असतात. जसे की काही स्वरांच्या आधी किंवा नंतर किंवा मधेसुद्धा काही कणस्वर असतात जे नोटेशन मधे मांडणे अवघड असते. तसेच स्वरांचा लगाव, वजन ह्या गोष्टीसुद्धा नोटेशनमधे मांडता येत नाहीत. त्यामुळे एखाद्या बंदिशीचे कितीही चांगले नोटेशन काढले तरी ती संपूर्ण चाल होत नाही. म्हणूनच भारतीय अभिजात संगीतात गुरुमुखातून मिळणार्‍या विद्येला अनन्यसाधारण महत्व आहे.

sulu, माझे गिटारचे स्किल्स अगदी बेसिक आहेत, जास्त करुन tabs नोटेशन प्रमाणे वाजवतो आणि ते शोधायचा प्रोसस मधुरीता यानी सांगितलया तसाच आहे. पहिल्यांदा गाण्याची स्केल शोधायची आणि त्या स्केल मधले ठरावीक नोट्स चे कॉबिनेशन गाण्याप्रामाणे वाजवुन बघायचे , जसे जसे नोटेशन्स जुळत जातील तसे लिहुन काढायचे, नंतर वाजवताना स्पेसिंग , बेंडींग, हॅमरींगवर प्रयत्न करत राहयचे आणि त्याप्रमाणे इम्प्रुव्ह, इम्प्रोव्हाइज करायचे. नेटवर बर्‍याच गाण्यांचे टॅब्ज / युट्युब लेसन्स आहेत ते बघुन पण वाजवतो.
कॉर्ड्स शोधायला जमत नाहीत आणि येकाच गाण्याचे ईंडिअन ठेक्याप्रमाने, वेस्टर्न , जाझ , ब्लुज स्टाइल प्रमाणे वेगवेगळे स्ट्रमींग होते जे मला जमत नाही, मी वाजवताना पायने ठेका पकडतो आणि त्या प्रमाणे स्ट्रमिंग करायचा प्रयत्न करतो. म्हणुनच मात्रा कशा मोजायचया हे वर विचारलेय , ते जमले तर बार आणि बिट्स चे गणितही जमेल बहुतेक Happy

सगळ्यांना इतक्या छान प्रतिसादाबद्द्ल प्रथम धन्यवाद.

पाटिल, तुम्ही पाश्चात्य संगितातील cdefg या नोटेशन बद्द्ल विचारले होते आणि त्यावर सुलु यांनी छान माहिती ही दिली होती. त्याबद्द्ल थोडी अजुन माहिती द्याविशी वाटली.

आपले हिंदुस्थानी संगीत सप्तक कल्पनेवर आधारीत आहे. म्हणजे सा ते नी पर्यंत ७ स्वरांचा समुह. आणि शेवटी येणारा 'सां' हा आठवा स्वर न मानता नंतर येणार्‍या सप्तकातील सुरुवातिचा 'सा' मानला आहे. तो सुरुवातीच्या सा च्या दुप्पट frequency चा असतो म्हणुन तो सप्तकात धरत नाहीत. आणि असे सप्तक कुठल्याही पट्टीपासुन सुरू करता येते ही भारतीय संगीताची लवचीकता सिद्ध करते. म्हणुनच आज जगातले सर्वात शास्त्रशुद्ध संगीत म्हणुन भारतीय संगीताकडे पाहतात. तसेच आपले संगीत कंठ संगीत (classical) म्ह्णुन जास्त ओळखले जाते. त्यामुळे गायक गायीकेच्या पट्टीनुसार गाणे वाजविणे अपेक्षीत असते. म्हणुन एकच 'सा' स्वर निश्चीत नसुन वेगवेगळया पट्ट्या 'सा' म्हणुन वापरतात.

पाश्चात्य संगितात ऑक्टेव्ह(octave) ही संकल्पना आहे. यामध्ये कायमस्वरुपी पांढरी १ हाच 'सा' मानुन वाजविला जातो आणि त्यानुसार इतर पट्ट्यांची नावे निश्चीत केली आहेत. त्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे CDEFG अशी पट्ट्यांना नावे आहेत. आणि ते वाजविणे सोपे जाते. तसेच ते harmony पद्ध्तीवर आधारीत असुन अनेक वाद्यांचा आणि गायकांचा मेळ घालुन वाजविले जाते. त्यामुळे सर्व वाद्यांना एकत्रित वाजविणे सोपे जावे म्हणुन एकच पट्टी (पांढरी १) 'सा' म्हणुन वापरली जाते.

तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती>>>>>

मला पाश्चात्य संगिताबद्द्ल जास्त माहिती नाही. पण कुठल्याही संगीतात संज्ञा वेगळ्या वापरल्या तरीही मुख्य प्रवाह तसाच राहतो. म्हणुन गिटार बद्द्ल माहिती नसताना मी मात्रा मोजायची माहिती देण्याचे धाडस करीत आहे. चु.भु. दे. घे.

मात्रा/बिट्स हे ताल मोजायचे साधन आहे. कोणतेही गाणे वाजवायचे असल्यास प्रथम त्याचा ताल कुठला आहे हे जाणुन घ्यावे लागते. पाश्चात्य संगीतात ४ बिट्स, ८ बिट्स, १६ बिट्स आणि ३२ बिट्स चे ताल वापरतात. त्यांना ROCK1,ROCK2 आणि POP1,POP2 या किंवा अशासारख्या संज्ञा वापरतात.

एकदा ताल किती बिट्सचा आहे हे समजले की, सिलेक्ट केलेल्या गाण्याच्या एका ओळीत तालाची किती आवर्तने(१ ल्या मात्रेपासुन शेवटच्या मात्रेपर्यंतचा काल) आली आहेत हे शोधायचे. काही वेळा एका ओळीत ताल २ वेळा, तर काही वेळा ३ वेळा रिपिट होतो. त्यावरून गाण्याची गती कळते.

तालाच्या पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. बहुतेक गाणी समेपासुन सुरुवात झालेली असतात. मग गाण्यात येणारी आवर्तने मोजली तर तितक्या वेळा त्या ओळीत सम येणार आणि समेवर गाण्यात आघात असतो. अशी सम शोधली कि मग गाण्याच्या मात्रा तिथुन मोजणे सोप्पे होते आणि ठेका सुरू करणेही सोपे जाते.

उदा:
हॅपी बर्थ डे टु,यु ~~~~~
१--------------| १
सम-----------|सम

या गाण्यात ४ बिट्स(किंवा ८ बिट्सचा डबल स्पीड) चा ताल असल्याने हॅपी आणि यु या शब्दांवर १ली मात्रा म्हणजे सम येते. आणि गाण्याच्या एका ओळीत तालाची २ आवर्तने (१ ते ४ मात्रा, १ ते ४ मात्रा) येतात. तसेच हॅपी आणि यु या शब्दांवर समेचा आघात जाणवतो.

अभिजात संगीत म्हणजे काय याची माहिती कुठून मिळेल>>>>>
जाई, तुला अभिजात संगीताबद्द्ल नेमकी कुठली माहिती हवी आहे ते स्पष्ट झाले नाही. तुला नेमकी कोणत्या विषयाची माहिती हवी आहे?

मधुरीता
भारतीय संगीतातले राग,
कर्नाटकी संगीत, हिँदुस्थानी संगीत, वेगवेगळी घराणी याबद्दल माहिती हवीय

जाई,
तु दिलेल्या विषयांची माहिती राग-बोध या पुस्तक मालिकेतुन मिळेल. ही पुस्तके सहज उपलब्ध आहेत. तसेच भारतीय संगिताबद्द्ल छान माहिती देणारे 'संगीत शास्त्र' नावाचे पुस्तक मिळाले तर बघ.

ऑब्लिगाटोज बद्दल मला कळलेले थोडेसे -
Wiki नुसार, classical concert मध्ये कुठलाही बदल ( थोडक्यात शून्य improvisation) न करता वाजवलेला स्वर-समुह म्हणजे ऑब्लिगाटो.

साधारण भावगीते किंवा चित्रपट संगीताचा विचार केल्यास आपल्या सारख्यांच्या भाषेत 'गाण्याच्या दोन लायनींमधलं म्युजिक' म्हणजे हे ऑब्लिगाटोज.

ऑब्लिगाटोज म्हणजे counter symphony नाही. थोडक्यात गायक-गायिका गाणं म्हणत असताना मागे जी supporting व्हायोलिन किंवा सतार ऐकू येते ते नव्हे तर गाण्याची ओळ किंवा कडवे म्हणून झाले की दुसरे कडवे ( अंतरा) सुरु व्हायच्या आधी जे म्युजिक असते ते. बर्याच जणांच्या मते 'Music arrangement किंवा score' म्हणून जो प्रकार म्हटला जातो तो हाच.

मला ऑब्लिगाटोज बद्धल प्रचंड आकर्षण निर्माण झालेय ते थोडे संगीत समजायला लागल्यावर. अनिल मोहिले, रेहमान, एस. डी, आर डी मला या प्रकारात महानतम वाटतात. पण हे कसे निवडावेत, कुठल्या स्वर्-समुहाला कुठले वाद्य निवडावे, ताल बदलावा किंवा नाही याबद्दल नीट माहिती नाही. म्हणून हा धागा काढला आहे.

तेव्हा जाणकारानी जरून माहिती द्या. कदाचित हे musical score writing किंवा arrangement पेक्षा वेगळे असेलही, तर जरूर तसा खुलासा करावा ही विनंती.

जाईच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित खालील दुव्यांवर मिळू शकेल!

http://www.manogat.com/node/6044 हिंदुस्तानी संगीत १ - गोलाकार स्वरसोपान
http://www.manogat.com/node/6090 हिंदुस्तानी संगीत २ - शुद्ध, कोमल, तीव्र, इत्यादी
http://www.manogat.com/node/6180 हिंदुस्तानी संगीत ३ - पट्टी बदललीः तरंगते स्वराकार
http://www.manogat.com/node/6268 हिंदुस्तानी संगीत ४ - पण पट्टी कोणतीः पांढरी २ की काळी ४?
http://www.manogat.com/node/6602 हिंदुस्तानी संगीत ५ - भातखंड्यांचे थाट
http://www.manogat.com/node/7291 हिंदुस्तानी संगीत ६ - राग म्हणजे काय?

मधुरीता (आणि इतर जाणकार)

संगीत या विषयावर (विथ सीडी) अशी पुस्तके आहेत का?

गोळेसाहेब,
फार सुंदर लिंक्स..

मा.बो. वर कुणी संगीत संयोजक किंवा दिग्दर्शक आहेत का? त्याना कदाचित नीट सांगता येईल सारं.

आणि हो, कुणाकडे मराठी गाण्याचे नोटेशन असलेली साईट असेल तर आपल्याला एक-दोन उदाहरणं घेता येतील. आपणच गांण ऐकायचं, नोटेशन्-बरहुकूम गाणं वाजवायचं आणि ऑब्लिगाटोज कसे आणि का निवडलेत ते तपासायचं!

>>>मा.बो. वर कुणी संगीत संयोजक किंवा दिग्दर्शक आहेत का?
मला माहिती असलेले योग आणि प्रशांत द वन आहेत.

गोळे जी,
उत्तम लिंक्स.

एक गोष्ट लक्षात आली. स्वरलिपीलेखन किंवा नोटेशन लिहून काढणे हे एकप्रकारचे 'हमाली' काम आहे ( वरील एका लिंक वर म्हटल्याप्रमाणे) आणि म्हणूनच कदाचित लोक याच्या वाटेला जात नसावेत. इंटरनेट वरही हिंदी गाण्याची नोटेशन लगेच सापडतात पण मराठी नाही. ( कुणी मराठी संगीत-प्रेमी ने हे काम अंगावर घेऊन हा खजिना जगाला उपलब्ध करून दिला तर खूप फायदा होईल.)

अर्थात रेडी-मेड नोटेशन घेऊन वाजवण्यात काय मजा? गाणे ऐकून आपले-आपल्याला नोटेशन काढता आले पाहिजे. ते करण्यासाठी मूळ स्वरज्ञान आवश्यक आहे हे पटलेय.

अत्यंत छान संवाद चाललाय.
सुमेधाव्ही ने वर म्हटलय तसं... नोटेशनने आकार, बांधणी, ताल, चौकट कळू शकते पण त्यातली (कला)कुसर भारतीय नोटेशनमधे उतरवणं कठीण आहे... आपल्याकडे नोटेशन सिस्टिम तितकी प्रगत नाही त्यामुळे असेल कदाचित.

उदा. सारे जहांसे अच्छा ह्यात (' दिलेले स्वर कोमल अथवा तीव्र(म) धरावेत)
सारे जहासे अच्छा
ग'ग'रे सारेनि सासा

आता ह्यात आपण म्हणताना जहा हे 'सारे' असं सरळ आणि इतकच नाही म्हणत. जहा नंतर पुढल्या स्वराला किंचित स्पर्श करून येतो. त्यामुळे नोटेशन अधिक समृद्धं करायचं तर..
ग'ग'रे सारे(ग')नि सासा

पास्चिमात्यं नोटेशन पद्धत खूप प्रगत आहे. पियानो सारख्या वाद्याच्या सुरांवरचे आघात आणि व्हॉल्यूम ह्यावरही त्यात बारकावे आहेत.

लेकाने कीबोर्डवर वाजवून त्याचं तय्यार स्क्रिप्ट दाखवलं तेव्हा मज्जा वाटली होती. आता असं वाटतं की, ज्याला उत्तम कीबोर्ड वाजवता येतो अन मिडी सॉप्फ्टवेअर, म्युझिक रायटर तंतरज्ञानाची Happy चांगली कल्पना आहे त्याने मराठी गाणी वाजवून त्याची स्क्रिप्ट्स काढायला हवीत. मात्रं ती वेस्टर्न स्क्रिप्ट बोलीत असतिल... ते एक शिकलं की झालच.
(नाहीतर... गुरुमुखी विद्या घेणं आलं.)

रेडिमेड नोटेशन घेऊन गाण्याची आऊटलाईन वाजवता येईल. पण त्यातल्या बारकाव्यांसठी कान तयार करायला हवा अन हातही Happy

Pages