
नुकत्याच झालेल्या पॅरीस ट्रीपच्या आधी वेगवेगळ्या फोरम्समध्ये "Top 10 things to do in Paris" शोधत असताना एकाने लिहिलं होतं की वेळ असेल तर एखादा बेकींगचा क्लास करा. टुरीस्टांसाठी कमी वेळाचे क्लास असतात. गेल्या वर्षभरात बेकींगचं भूत चढलेलं असल्याने ही आयडीया एकदम आवडली आणि मग इंटरनेटवर शोधाशोधी केली. एका बेकींग स्कूलमध्ये "Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट" तयार करण्याचा क्लास माझ्या वेळेत उपलब्ध होता. मग लगेच रजिस्टर करून टाकलं. Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट हा फ्रेंच ब्रेकफास्टचा अविभाज्य घटक. अमेरीकेतही बेकर्यांमध्ये तसच स्टारबक्स सारख्या ठिकाणी क्रुसाँट मिळतो. ह्याचा उच्चाराची जरा मजाच आहे. मी आधी क्रॉसाँ हा फ्रेंच उच्चाराच्या जवळ जाणारा उच्चार ऐकला होता. पण अटलांटात तसं म्हंटलं की लोकं "ओह, यू मिन क्रॉईसंट ?" अस अगदी तर्खडकरी उच्चारात विचारायचे. नंतर मग वेस्ट कोस्टला क्रुसाँट बरेच ठिकाणी ऐकलं. फ्रान्समध्ये ह्यात कोणाला "र" उच्चारताना ऐकलं नाही. (तसही ते शब्दातली अर्धी अक्षरं उच्चारत नाहीत!) तर त्या क्लासमध्ये शिकलेली आणि नंतर जरा ट्रायल अँड एरर करून जमलेली ही रेसिपी.
पीठासाठी (Dough)
१. २ कप केक फ्लोअर. (पॅरीसमध्ये T45 अश्या काहितरी श्रेणीचं पीठ मिळतं ते सगळ्यात चांगलं. इथे मी "केकसाठी चालेल" असं लिहिलेलं पीठ आणलं.
२. १ टीस्पून मीठ
३. ५ ग्रॅम इंस्टट यीस्ट
४. अर्धा कप पाणी
५. १ टेबलस्पून वितळवलेलं बटर.
६. ३ टेबलस्पून साखर
बटरब्लॉकः
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर
- १ अंड
- शुगर सिरप साठी अंदाजे साखर आणि पाणी.
Dough:
१. इंस्टंट यीस्ट अर्धाकप कोमट पाण्यात घालावं. त्यात चमचाभर साखर घालून ढवळावं आणि बाजूला ठेऊन द्यावं. सुरुवातीला थोडासा फेस येतो.
२. Dough बनवण्यासाठी लागणारे सर्व कोरडे घटक (पाणी आणि बटर सोडता) एकत्र करून घ्यावे. मधे खोलगट खड्डा करून त्यात बटर आणि पाणी ह्याचं मिश्रण ओतावं. थोडं थोडं एकत्र करून मग त्यात यीस्ट घालावं. यीस्टचा फेस आतापर्यंत दुप्पट झाला असेल.
३. सगळं मिश्रण चांगलं मळून घ्यावं. सुरूवातीला ते पिठूळ असतं पण जवळ जवळ १५ मिनीटे चांगलं मळल्यावर मिश्रण ताणलं जायला लागतं ( elastic mix) आणि छान मऊ होतं. ह्या पिठाचा गोळा करून तो प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून किंवा घट्ट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेऊन द्यावं. तयार पीठ अजिबात बाहेर ठेऊ नये नाहीतर ते लगेच फुगायला लागतं. आत्ता ते फुगवायचं नाहीये. ही मिश्रण सुमारे सहातास फ्रीजमध्ये ठेवावं.
बटरब्लॉकः
१. बटरपेपरची साधारण ८ इंच बाय ६ इंचाची घडी करून त्यात बटरची स्लॅब ठेवावी लाटण्याची ठोकून आणि लाटून बटरची आयताकृती स्लॅब बनवावी. बटर अजूनही बटरपेपरच्या आतच आहे. कडांपर्यंत बटर जायला हवं. ही स्टेप बटर फ्रीजमधून काढून लगेच करावी आणि ठोकून / लाटून झाल्यावर बेटरपेपरसकट पुन्हा फ्रीजमध्ये टाकावं.
मुख्य कृती:
१. पिठाचा गोळा फ्रीजमधून बाहेर काढून आयताकृती लाटावा. आतापर्यंत पीठ थोडसं फुगलं असू शकतं पण अगदी दुप्पट वगैरे होत नाही. पीठ एकदम सरसर लाटलं जातं आणि खूप ताणलं जातं. चांगलं फूट-दीड फुटापर्यंतही लाटता येऊ शकतं.
२. बटरब्लॉक फ्रीजमधून बाहेर काढून बटर पेपरची घडी उघडावी. (बटर काढू नये). आता बटरची बाजू लाटलेल्या पीठाच्या खालच्या कडेला जूळवून बटरपेपर उपडा टाकावा आणि वरून अलगद काढून घ्यावा. म्हणजे बटर हाताला न लागता बटरब्लॉक पीठावर लावला जाईल.
३. आता आयताकृती पीठाच्या बटरसकट, लांबीच्या बाजूने अर्ध्या घड्या घालाव्या आणि मध्यातून दुमडून घ्यावं. म्हणजे आता बटर आणि पीठ मिळून ५ थर तयार झाले.
४. आता पुन्हा हे आयताकृती लाटून घ्यावं. लाटताना जरा हलक्या हाताने लाटावं म्हणजे बटर पिठातून बाहेर येणार नाही. आकार आधीच्याच पिठाएव्हढा करून पुन्हा मघासारख्या घड्या घालाव्या. आता एकूण १० थर झालेत.
५. हे पीठ पुन्हा प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून साधारण अर्धातास फ्रिजमध्ये ठेवावं. (इतकं लाटल्याने बटर मऊ होऊन पिठातून बाहेर येऊ शकतं त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. नाहीतर मग ह्याच स्टेपला क्रुसाँटला आकार द्यायला सुरुवात करावी.)
६. पीठ फ्रिजमधून बाहेर काढून पुन्हा आयाताकृती लाटावं आणि वरच्या प्रमाणे घड्याकरून परत लाटावंं. आता एकूण २० थर झाले असतील. ***
७. चाकूने ह्या लाटकेल्या पीठाचे उंच निमुळते त्रिकोन करून घ्यावे. ह्या त्रिकोणाच्या बेसला छोटी खाच पाडावी (हा झाला आयफेल टॉवरचा आकार ). आता ह्या आयफेल टॉवरच्या बेसच्या बाजू धरून वर गुंडाळी करत जावं. हे साधारण गोगलगाईच्या शंखासारखं दिसतं.
*
ट्रे
८. सगळे क्रुसाँट बेकींग ट्रेमध्ये ठेऊन त्यावर थोडं पाणी शिंपडावं आणि अवन सुरू न करता फक्त दिवा लावून अर्धा तास ठेऊन द्यावे. अवनमधल्या उबदार तापमानामुळे आणि यीस्ट मुळे क्रुसाँट फुगतात आणि आकाराने जवळ जवळ दुप्पट होतात! क्रुसाँटवर पाणी शिंपडायचं नसल्यास एका भांड्यात उकळत पाणी घेऊन ते ही अवनमध्ये ठेवावं. पाण्याच्या वाफेमुळे दमटपणा राहून क्रुसाँट कोरडे पडत नाहीत.
फुगलेले:
ह्या फोटोत थर दिसतायत.
९. अवन २०० डीसेला प्रिहीट करायला लावावं आणि तोपर्यंत एक अंड फेटून ब्रशने फुगलेल्या क्रुसाँटना लावावं.
१०. क्रुसाँट १५ ते २० मिनीटे सोनेरी रंगावर बेक करून घ्यावे.
११. एकीकडे शुगर सिरप तयार करून ठेवावं. मी मायक्रोवेवमध्ये केलं. अंदाजानेच केलं.
१२. तयार क्रुसाँट अवन बाहेर काढून लगेच त्यावर शुगर सिरप लावावं. ह्याच उद्देश केवळ चमक येण्यासाठी. आपल्याला पाकातले क्रुसाँट करायचे नाहीयेत. ह्या शुगर सिरपची गोड चव लागता कामा नये. "शुगर सिरप लगाया भी और पता भी नही चला" इतपतच गोड आणि तितकच लावायचं.
*
१३. ताजे ताजे क्रुसाँट कॉफीबरोबर ब्रेकफास्टला खायला घ्यावे. एक दिवस टिकतात. फक्त गार झाल्यावर त्यातलं बटर घट्ट होतं. त्यामुळे गार झालेले खायला घेताना अवन किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे. ताजे खाताना त्याचा वरचा थर कुरकुरीत लागतो पण शिळे मऊ लागतात. चवीत फार फरक वाटला नाही.
** - इथपर्यंत तयार केलेलं पीठ दोन दिवस फ्रिजमध्ये राहू शकतं किंवा त्यापेक्षा अधिक डीपफ्रिजरमध्ये राहू शकतं.
१. जरा खटाटोप आहे. पण गरम गरम क्रुसाँट अत्यंत भारी लागतात! बटरी चव आणि वरून कुरकुरीत आणि आतून हलकं, मऊ, विरघळणारं टेक्श्चर एकदम अहाहा! लागतं.
२. ह्यात बरेच वेरीएशन्स करता येतात पण बटर क्रुसाँट हेच खरे 'क्रुसाँट'. तसच हा गोगलगाईचा आकार फक्त बटर क्रुसाँटलाच देतात. बाकी सगळे चौकोनी आपल्या पॅटीस सारखे करतात. ह्यात व्हॅनिला क्रिम, चोकोलेट चिप्स, बदाम / पिस्ते / आक्रोड ह्यांची पेस्ट, पेस्तो सॉस, बारीक चिरलेले कांदे, काय वाट्टेल ते भरुन वेगवेगळ्या चवी आणता येतात. आम्ही क्लासमध्ये बरेच प्रकार केले होते. पण मी घरी अजून केले नाहीत.
३. बटर वापरण्यात काटकसर करू नये. हवतर थोडा जास्त व्यायाम किंवा जरा जास्त आयएफ करावं.
४. अमेरीकन ब्रँडचं बटर वापरू नये, कारण त्यात फॅट कमी असतं म्हणे. शक्यतो युरोपीयन ब्रँडचं बटर चांगलं.
५. लाटताना बटर वितळून बटर बाहेर यायला लागू शकतं. तसं झालं तर घड्या घालून पटकन फ्रीजमध्ये टाकावं. नाहीतर पीठ आणि बटरचे थर नाहीसे होऊन सगळा लगदा होतो.
६. वेळेत फ्रिजींग / प्रुविंगचा वेळ धरलेला नाही.
भारीच.
भारीच.
इथे बंगलोरला यूबीसिटी मॉलमध्ये एक फ्रेंच रेस्टॉरंट आहे. तिथे व्हेजिटेबल क्रॉसॉं आणि हॉट चॉकलेट हे कॉम्बिनेशन आम्ही ३-४ वेळा घेतलं आहे. फारच जबरदस्त लागतं ते. नुसते बटर घातलेले क्रॉसॉं घेऊन बघितले पाहिजेत पुढच्या वेळी.
रेसिपीही करून बघितली पाहिजे
फुल्ल एसी सोडून करण्याजोगा
फुल्ल एसी सोडून करण्याजोगा प्रकार वाटला. >> मी फ्रीजर मध्ये पाट ठेवून त्यावर लाटता येईल का हे पाहिले. जमू शकते.
किंवा फ्रीज च्या खालच्या भागातही.
नुसतीच जळजळ! इथे काही चांगले
नुसतीच जळजळ! इथे काही चांगले Croissant मिळत नाहीत आणि ही पाकृ कुवतीच्या बाहेरची आहे. त्यामुळे नुसतेच आठवणीत रमणे आले.
Croissant चे एग-न-चिज अप्रतिम लागते. आता ते ब्रेड / पाव वापरून करतो पण ती मजा नाही त्यात.
तुला___/\___
ऑसम्म!
ऑसम्म!
तयार झालेले कसले भारी दिसतायत !! घरी केलेत हे खरंच वाटणार नाही कुणाला.
तिसर्या स्टेपला पाच थर की सहा थर? - इथे मी पण जरा अडखळले होते.
मग म्हटलं, कशाला नसत्या चिकित्सा... आपल्याला कुठे करायचेत 
मला वाटले फ्रेंच लोक बरीच
मला वाटले फ्रेंच लोक बरीच अक्षर असून सुद्धा उच्चारत नाहीत तसे काही थर असून सुद्धा मोजत नसावेत.
फारच सुरेख फोटो आणि मस्त पाकृ
फारच सुरेख फोटो आणि मस्त पाकृ. घरी करून बघणे कुवती बाहेरचे आहे त्यामुळे बाहेरून आणून खाण्याला प्राधान्य!
पुन्हा एकदा धन्यवाद.
पुन्हा एकदा धन्यवाद.
मग म्हटलं, कशाला नसत्या चिकित्सा... आपल्याला कुठे करायचेत >>>>>
!
हां तर घड्या आणि थरांचा हिशोब लागला! मी करताना तिसर्या स्टेपमध्ये डबल फोल्ड नव्हता केला. फक्त बटर सकट खालून मध्यात आणि त्याच्यावर वरच्या उरलेला भाग दुमडला. त्यामुळे ५ थर झाले. पुढचे सगळे डबल फोल्ड घातले. इथे लिहिताना पहिल्या फोल्डचा फोटो नसल्याने डबल फोल्डच लिहिला गेला. अर्थात हौस असेल आणि बटर घट्ट राहील तितक्या घड्या घाला..
अतिशय मेहनतीची कृती आहे हे
अतिशय मेहनतीची कृती आहे हे समजलं. फोटो वगैरे तपशीलवार दिल्यामुळे कळतंय. पण मला वाटतं वी विल स्टिक टु कॉस्टको. चिल्लर कंपनीचा खाण्याचा आवाका पाहिला तर त्याची क्वांटिटीपण कधीतरी चालते. अंडं आणि क्रुसॉ सँडविच फेवरीट ब्रेफा आहे बच्चेकंपनीचा.
दुसर्ञा देशात जाऊन तिथलं लोकल जेवण बनवायला शिकणं हे आवडलं. अभिनंदन
>>> मला वाटले फ्रेंच लोक बरीच
>>> मला वाटले फ्रेंच लोक बरीच अक्षर असून सुद्धा उच्चारत नाहीत तसे काही थर असून सुद्धा मोजत नसावेत.

एरवी कॉस्कोची बल्क क्वांटिटी
एरवी कॉस्कोची बल्क क्वांटिटी नको होते खरी पण क्राँसाँ बाबतीत तसं नाही. मी एका वेळेला दोन पॅक्स आणते. एक फ्रीजमध्ये आणि एक काढला जातो खायला. आम्ही घाटी स्टाईल चहात बुडवून, क्राँसॉमध्ये दिपचे पंजाबी सामोसे स्टफ करुन, बॉईल्ड एग्ज घालून, लंचमध्ये पेस्टो लावून आणि बेसिल, मोझरेल्ला चीज घालून सँडविच वगैरे पद्धतीने खातो.
मी फ्रीजर मध्ये पाट ठेवून
मी फ्रीजर मध्ये पाट ठेवून त्यावर लाटता येईल का हे पाहिले. जमू शकते.>>>
अरे वा... मस्त आयडिया. माझा फ्रीझर सेक्शन वर असल्यामुळे त्यात जमणार नाही पण खालच्या भागात प्रयत्न करून पाहता येईल.
रच्याकने, आधी प्रयत्न केलेला तेव्हाचे बरबरीत बटरी लाटण आठवून अंगावर काटा आला. इतके बटर टाकून द्यायच्या कल्पनेची भीती वाटून मी जे काही बनले होते ते तसेच बेक केले व झालेला पदार्थ चहात बुडवून घश्याखाली लोटला।

कसले भन्नाट दिसतायत. मला एकदम
कसले भन्नाट दिसतायत. मला एकदम त्या 5 मिनिट क्राफ्ट च्या फेसबुक व्हिडीओज ची आठवण आली.
कोकोनट क्रांसां हि मी नेटवर
कोकोनट क्रांसां हि मी नेटवर बघूनच केले होते. लिंक आठवत नाही आता पण ओल्या नारळाची फ्लेकी करंजी लागली.
बर्याच वेळा, पील्सबरी रेडीमेड क्रांसा आणून , खारीबिस्किट पण बनवलेत.
पील्स्बरीत मार्जारीन असतं ज्यास्त म्हणून ते अॅसीडीक लागते क्राण्सां चहात बुडवून. बटर फ्लेवर असतं, हेल्थी नाहिच आहे पण कधीतरी चलता है.
इथे फिल्लिन्ग कसे करायचे आहे ते मस्त दाखवलेय,
https://youtu.be/xpmoYGmNbBk
हि माझी फेव बेकर आहे. मस्त दाखवते. नवशिक्याना मस्त सांगते.
Parag you can open a nice
Parag you can open a nice bakery Cafe in Pune in your second innings post retirement. Really admire your passion about baking. Here we have weekly special workshops on baking. This week Pooja dhingra celebrity Baker is teaching strawberry based dessert s.
वॉव जबरी फोटो. पाकृ वाचली
वॉव जबरी फोटो. पाकृ वाचली नाही पण फार आवडीचा प्रकार. हा घरी बनवणे अचाट आहे..
क्वॅसाँ/ क्रुसाँट घरी करायला
क्वॅसाँ/ क्रुसाँट घरी करायला जमू शकतील असे वाटणेच या पाकृचे यश आहे. धन्यवाद Adm.
पुढच्या ४ दिवसात पाहुणे, त्यामुळे वाढलेली जास्तीची कामे यानंतर उरलेल्या वेळात उत्साह शिल्लक राहिल्यास करून पाहण्यात येईल
चर्चगेटच्या इथले क्रोसां आता
चर्चगेटच्या इथले क्रोसां आता नाहीय काय? कित्येक वर्षात गेले नाहीय त्या बाजूला>>>>>>>>
एशियाटिकच्याच थोडंसं पुढे तिसरी बिल्डिंग गेलॉर्ड हॉटेल आहे. तिथे आधीपासूनच मिळतात. पण तेही थोडं हायफाय आहेच.
चर्चगेटच्या इथले क्रोसां आता
चर्चगेटच्या इथले क्रोसां आता नाहीय काय?>>> नाही. आता तिथे मार्किव्ज आहे.
मस्त फोटो! तोंपासू!!
मस्त फोटो! तोंपासू!!
घरी करून बघणे कुवती बाहेरचे आहे त्यामुळे बाहेरून आणून खाण्याला प्राधान्य!>>+१
धन्यवाद.
धन्यवाद.
अमा, Thanks for the kind words.
भारीच! फोटो देखणे आहेतच ,
भारीच! फोटो देखणे आहेतच , जोडीला कृतीही छान तपशीलवार दिलेय. पॅरीस ट्रिपमधे बेकिंगचा क्लास करणे आणि नंतर निगुतीने इतका उच्चदर्जाचा होमवर्क करुन तो इथे शेयर करणे हे सगळेच फार आवडले!
मीपण बेकिंग चॅलेन्ज्ड आहे .
पॅरीस ट्रिपमधे बेकिंगचा क्लास करणे आणि नंतर निगुतीने इतका उच्चदर्जाचा होमवर्क करुन तो इथे शेयर करणे हे सगळेच फार आवडले! >>> + १००००
मीपण बेकिंग चॅलेन्ज्ड आहे . पण फोटो खरच ईतके सुंदर आहेत आणि ईतकं तपशीलवार लिहिल आहेत की करून बघावएसे वाटतायेत .
धन्यवाद .
मस्त रे पग्या!
मस्त रे पग्या!
ट्रिपच्या टू डू लिस्टमध्ये तिथली खास पाकृ शिकणं हे खूपच भारी आहे.. आवडलंच!
तुम्हाला दंडवत की तुम्ही हे
तुम्हाला दंडवत की तुम्ही हे घरी केलंत. सुरेख माहिती. घरी करता येऊ शकतात पण पेशन्स पाहीजेत आणी तेच नेमके माझ्यात नाहीत. मला जाम आवडतात हे. सॉलिड लागतात. प्रॉब्लेम एकच की नंतर या सगळ्या पाव- ब्रेड सारख्या प्रकाराने अॅसिडीटी होती. पण खरच खाण्याचा मोह आवरतच नाही.
2019 मध्ये बनवायला सुरूवात
2019 मध्ये बनवायला सुरूवात केली होती.
2020 मध्ये एकदा लाटल्याबरोबर बटर बाहेर यायला लागले.
सगळं प्रकरण सध्या फ्रीजमध्ये ढकलण्यात आलं आहे.
आगेकी अपडेट्स के लिए हम लगातार आपकी संपर्क मे बने रहेंगे.
पल पल की जानकारी आपको देते रहेंगे
अपडेट्स -
एकंदरीत राडा झालेलं ते प्रकरण फ्रीझमधून काढून परत एकदा लाटलं . अपेक्षेप्रमाणेच पीठाचे पातळ पापूद्रे फाडून बटर बाहेर आलं
मग नेटाने ते कापून "आयफेल टॉवर" बनवले आणि क्रोसाँ चा आकार देण्याचा प्रयत्न केला . पण पीठ ईतके लिबलिबित आणि तुपकट होते की ते नेमके क्रोसाँ न वाटता नुसत्याच कशाबशा गुंडाळल्य्ल्या अंथरूणाच्या वळकट्या वाटत होत्या .
अगोदरच ईतक्या मउ पीठावर काय पाणी शिंपडायच म्हणून नावालाच पाण्याचे शिंतोडे उडवून नुसतीच डीश अवनमध्ये ढकलली . (चूक १)
पाउण तासाने बाहेर काढली आणि बोटाने अंदाज घेतला , वरचा थर थंडीत होणार्या त्वचेसारखा कोरडा पडला होता .
एवढे एवढे से सात आठ गोळे(??) २० मि. काय बेक करायला ठेवायचे म्हणून १२ मिन. टायमर लावला .
नंतर बघितले तर , वरचा रंग अजिबातच बदलला नव्हता . परत १० मि ठेउया असा विचार केला .
पहिल्यान्दा ५ मिन बेक करयला ठेवले . काहीतरी गडबड झालीयं हे जाणवलं कारण मगासपासून बटर सोडत फुगणारे गोळे अचानक आकसायला लागले आणि वेगळाच वास यायला लागले . अवन बंद केला . नंतर लक्शात आलं की कन्वेक्शनच सेटींग बदललं मगाशच्या गडबडीत . नीट सेट करून १० मि. बेक केले . वरचा रंग बदलला .
थोडे थंड झाल्यावर तुकडा पाडून चव घेउन बघितली , घरच्याना चवीला दिलं थोड थोड .
जे पण काही डेश मध्ये तयार होतं ते क्रोसाँ चं हट्टी भावंड म्हणता येईल . कडक खारी/चिरोटे/नान्कटाई नक्की काय ते सांगता येणार नाही .
पण चवीला भन्नाट झालं होतं . मी वरून थोड साखरेचं पाणी ओतलचं . नवरा म्हणाला चांगलं लागतयं , थोड मीठ जास्त झालयं . साबा म्हणाल्या
चवीला चांगलं झाललयं , खुसखुशीत झालायं , जमलयं - या दिवाळीला बेक्ड करंजा करून बघू. लेकाने कूकीज सारखं खाल्लं . मी चहात बुडवून बटर सारखं . दोन बुडुकली उरली ती आज मैत्रीणिसाठी ऑफिसमध्ये आणली आहेत .
तात्पर्य : नविन वरश्याच्या सुरुवातीला " मी बेकिंगचा प्रयत्न करू शकते" असा एक आशावाद तयार झालायं .
झाल्या प्रकरणाचा फोटो नंतर टाकते --
इथे इतक्याजणांनी क्रुसाँटच
इथे इतक्याजणांनी क्रुसाँटच कौतुक केलेलं बघून ब्रिटानियाचे चॉकलेट, व्हॅनिला क्रिम असे दोन क्रुसाँट खाऊन बघितले. नाही आवडले. याच्यापेक्षा क्रिमरोल, खारी चांगले लागतात. कदाचीत गरम, ताजे क्रुसाँट बरे असतील. पण मीकाही स्वतःहून परत त्याच्या वाटेला जाणार नाही.
स्वस्ति...काय भारी लिहीलंय!
स्वस्ति...काय भारी लिहीलंय!
चव भारीचांगली लागत असणं हा सगळा बटर चा प्रताप बरं!
पण पीठ ईतके लिबलिबित आणि
पण पीठ ईतके लिबलिबित आणि तुपकट होते की ते नेमके क्रोसाँ न वाटता नुसत्याच कशाबशा गुंडाळल्य्ल्या अंथरूणाच्या वळकट्या वाटत होत्या .>>> त्या स्टेजला परत फ्रिजला ठेवायला हवे होते अस वाटतय, मी नॉन बेकर कॅटेगरी आहे पण अमेरिकेत ढ माणासाला सुद्धा बेकिन्ग जमेल असे अनेक रेडि टु बेक प्रकार असतात तर एकदा पिल्सबरीचे रेडि टु गो क्रुसान्ट रुम तापमानाला आणायला फ्रिज बाहेर काढुन ठेवले आणि विसरले काहितरी काम सपवौन किचन मधे आले आणी मग ट्युब पेटली, तरी नेटाने पॅकेट उघडुन बघितल तर सगळ्या छान रोलचा पीठाचा लिबलिबित गोळा झाला होता , फक्त मी ते परत फ्रिजरला टाकले मग हफ अवर ने लाटुन प्रयोग केले.
तरी तुम्ही नेटाने करुन बघितल याबद्दल अभिनदन!
स्वस्ति, तुम्ही माझा अनुभव
स्वस्ति, तुम्ही माझा अनुभव शब्दबद्ध केलाय...

Pages