मोबाइलमधून फोटो क्रॉप करणे, फोटोची पिडीएफ करणे, नोटची पिडीएफ करणे यामध्ये काही अडचणी आल्या आणि गूगल प्ले स्टोरवरची शेकड्यांनी apps आहेत त्यापैकी काही मला आवडली ती देत आहे.
1) PDF Creator ( by DBD Soft )
2) Photo Crop - Crop the picture ( by farluner apps & games)
Link PhotoCrop - Crop the picture
3) Image to PDF Converter - JPG to PDF, PNG to PDF. ( by Benzveen )
Link Image to pdf app by Benzveen
4) Photo & Picture Resizer: Resize, Batch, Crop ( by farluner apps & games)
5)
Landscape photo फिरवून portrait mode करणे.
हे बहुतेक सर्वच फोटो एडिटर apps करतात. पण असं करताना फाईल साईज कमी करतात. पण
Photo editor by dev.macgyver हे app size कमी करत नाही.
लिंक : Photo editor by dev.macgyver
बदल केलेल्या फोटोची पिडीएफ करता येते. ती फुलसाईज प्रिंट होते.
6)
माबोवर प्रचि/फोटो अपलोड करून लेखात देण्यासाठी-
A ) फोटो अपलोड करणे.
प्रथम फोटो 2 MB size पेक्षा कमी रिसाईज करून घेणे.
A१)माझे सदस्यत्व
A२) खाजगी जागा
A३)upload
A४) browse file
A५) Upload
अपलोड झालेला फोटो यादीत खाली एन्ट्री दिसेल आणि खाली फोटो दिसेल.
B)
खाजगी जागा'मध्ये जी अपलोड करून ठेवलेल्या फोटोंची यादी तारखेप्रमाणे दिसेल त्यामधला कोणताही फोटो लेखनात देण्यासाठी
B१)माझे सदस्यत्व
B२) खाजगी जागा
योग्य फोटोच्या एन्ट्रीवर क्लिक केल्यावर खाली फोटो दिसेल. नवीन अपलोड केलेला फोटो तारखेसह सर्वात खाली दिसेल.
B३) फोटोवर प्रापर्टिज पॉपप करून त्या फोटोची लिंक मिळणार नाही. त्या फोटोवरच क्लिक केल्यावर तो फोटो मोठा दिसेल तेव्हा अड्रेस बारमधून लिंक कॉपी करून घ्यायची.
B ४) उभ्या फोटोसाठी टेम्प्लेट
<img src="लिंक" width="60%"/>
आडव्या फोटोसाठी टेम्प्लेट
<img src="लिंक" width="100%"/>
मिळालेली लिंक योग्य टेम्प्लेटात बदलून ते संपूर्ण कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकल्यास प्रकाशित झाल्यावर फोटो उमटेल.
७)
एकाच पिडीएफ पेजवरती दोन लँडस्केप फॉर्मेट फोटो बसवणे.
यासाठी PDF Creator । Text & Images to PDF
( by Security Coders.) हे app वापरता येते.
प्रथम सेटिंग्ज मध्ये "Image height 200 to full" default आहे तिथे 200 बदलून 300 करा. एक फोटो सिलेक्ट करून टाका, मग दुसरा एक टाका. फोटोची मूळ लांबी रुंदी ज्या प्रमाणात आहे ती येण्यासाठी Image height 280/320 बदल करून खात्री करा. यामध्ये फोटोंचे रेझलूशन कायम राहिल्याने प्रिंट चांगले येतील.
-----------
कुणाला वाटसपमधून फोटो पाठवला की ते
app तो फोटो कम्प्रेस करून पाठवते. ४-५ एमबी साइजच्या फोटोला शंभर दिडशे केबी साइज करते. एखादं डॉक्युमेंट फोटो काढून पाठवलं तर ते नंतर झूम केल्यावर बारीक प्रिंट धुरकट होतात. फोटोची पिडीएफ करून पाठवल्यास आहे ती साईज राहते.
फोटोची पिडीएफ करणे
सामान्यपणे फोटोची पिडीएफ करण्यासाठी जे CamScanner app वापरले जाते तेही फोटोची पिडीएफ करताना साइज कमी करते. शिवाय पिडीएफ डॉक्युमेंटच्या खाली 'scanned by Camscanner' ही ओळ फ्री वर्शनमध्ये येते ती काढता येत नाही.
क्रमांक(3) Image to PDF Converter - JPG to PDF, PNG to PDF. ( by Benzveen ) चे app वापरून पिडीएफ साईज फोटोएवढी मोठी ठेवता येते. कम्प्रेशन High/Medium/Low पर्याय आहेत त्यातील Low ठेवायचा. ही पिडीएफ वाटसपमधून पाठवल्यास साईज बदलत नाही आणि डॉक्युमेंट असेल तर लगेच प्रिंटही करता येते.
फोटो क्रॉप करणे. -
यासाठी असणारी बरीच apps फोटो क्रॉप केल्यावर फोटोची साईज भयानक कमी करतात. क्र (2) Photo Crop - Crop the picture ( by farluner apps & games) वापरल्यास साईज कमी होत नाही. मग याची पिडीएफ करायची.
मोबाईलमध्ये लिहिलेल्या नोटची पिडीएफ करणे.---
यासाठी क्र (1) PDF Creator ( by DBD Soft ) वापरता येते. प्रथम टेक्स्ट टाकायचे, नंतर फोटो हवे तिथे हव्या त्या आकारात टाकायचे आणि PDF करायची.
फोटो लहान करणे -
हे पटकन करण्यासाठी क्र (4) Photo & Picture Resizer: Resize, Batch, Crop ( by farluner apps & games) वापरून पाहा.
OneDrive PDF viewer हे app गूगल प्ले स्टोरवर वेगळे नाही, Microsoft - OneDrive यामधूनच येते बहुतेक. हे वापरून कोणतीही pdf बरीच झूम करता येते. Adobe acrobat पेक्षा अधिक.
तुम्हाला काही चांगली apps माहिती असल्यास लिहा.
फोटोंचे pdf करण्यासाठी बरीच
फोटोंचे pdf करण्यासाठी बरीच ॲप आहेत. पण जेंव्हा ट्रांसपरंट बॅकग्राऊंड असलेल्या png पाठवायच्या असतील किंवा फोटोशॉप, ऑटोकॅड वगैरे फाईल पाठवायच्या असतील तर टेलेग्राम हे ॲप उत्तम आहे. व्हाटसॅप पेक्षा जास्त फिचर्स आहेत. फोटो पाठवताना दोन पर्याय दिसतात. क्विक किंवा ॲज अ फाईल.
महत्वाचे म्हणजे मल्टिप्लॅटफॉर्म आहे. एक मोबाईल नंबर रजी. केल्यावर मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप वगैरेवर वापरता येते.
Telegram घेतलं, बघतो.
Telegram घेतलं, बघतो. एक नंबर रेजिस्ट्रेशन केल्यावर इतर ठिकाणी ते app चालणार म्हणजे तिकडे ओटिपी टाकायचा असावा.
शिर्षकात पि डि अॅफ दिसलं
शिर्षकात पि डि एफ दिसलं म्हणुन इथे लिहितोयः
पिडिएफ फाइली उत्तम प्रकारे वर्ड मध्ये कन्व्हर्ट करायच्या असतिल किंवा इतर काही करायचे असेल जसे साइझ कमी करणे, पॉवर-पॉइंट टु पिडिएफ किंवा उलटे, किंवा पिडिएफ संदर्भात काहिहि काम करायचे असल्यास https://www.ilovepdf.com/ हे एक भारी प्रकरण आहे.
चांगला धागा. बरीच माहिती
चांगला धागा. बरीच माहिती मिळेल असे वाटतेय.
वेबसाईटवरचे एखादे पेज पिडीएफ
वेबसाईटवरचे एखादे पेज पिडीएफ केल्यावर त्यातली नको असलेली पेजेज XODO app मधून काढतो. एखादे पेजही त्यातूनच क्रॉप करतो.
मराठी टेक्स्ट इमेज वर्ड
मराठी हस्त लिखित टेक्स्ट इमेज , वर्ड document मध्ये रूपांतर करण्यास कोणते सुरक्षित ऍप आहे
इमेज टू पीडीएफ कनव्हर्टरची
इमेज टू पीडीएफ कनव्हर्टरची लिंक पेष्टवा प्लीज. प्रो व्हर्जन असेल तर प्राधान्य. फुकट असल्यास व्यक्तीगत असल्यास आभार मानन्यात येतील.
App link image to pdf app,
App link image to pdf app, by Benzveen
हे पिडीएफ कम्प्रेस न करणारे app सापडल्यावर आणखी शोधाशोध केली नाही. प्रो वर्शन म्हणजे काय माहिती नाही. एक डॉक्युमेंट पाठवताना कम्प्रेस्ट पिडीएफ बरोबर वाचता येत नाही हे समजल्यावर हे सापडले.
जर कॅमस्कॅनर ॲप वापरत असाल तर
जर कॅमस्कॅनर ॲप वापरत असाल तर ते ताबडतोब काढून टाका. मालवेअर असल्याने ते प्ले स्टोअर मधून काढून टाकले आहे.
https://www.livemint.com/technology/apps/malware-detected-in-camscanner-...
अँड्रॉईडचे माहित नाही पण iOS
अँड्रॉईडचे माहित नाही पण iOS मध्ये फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट करणे सोपे आहे. फोटो ओपन करुन प्रिंटचे ऑप्शन निवडायचे. व फोटो सेव्ह करायचा. तो PDF मधे सेव्ह होतो.
विंडोजचे माहित नाही पण macOS मध्ये फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट करणे खुप सोपे आहे. फोटो Preview app मध्ये ओपन करायचा व save as हा पर्याय निवडून PDF मधे सेव्ह करायचा. येथे encrypt चा पर्याय असुन हवा तो पासवर्ड टाकता येतो. या preview app मधे PDF एडीट करायचे अनेक पर्याय आहेत. नको असलेले पेजेस डिलीट करणे, अनेक पेजेस मर्ज करणे, पेज क्रॉप करणे, तसेच टेक्स्ट, ड्रॉईंग, साईन ऍड करणे, पेजचा हवा तो पार्ट हायलाईट करणे, झुम करणे वगैरे. iOS आणि macOS मध्ये PDF साठी अनेक ऍप उपलब्ध आहेत पण त्यांची फारशी आवश्यकता वाटत नाही.
PDF Apps गूगल प्ले स्टोरवर
PDF Apps गूगल प्ले स्टोरवर भरपूर आहेत पण ती बरीचशी मूळ फाईल कम्प्रेस करतात. तसे नको आहे.
PDF एडीट करायचे अनेक पर्याय असलेली Apps ही बरीच आहेत.
-------------
Telegram वापरून पाहिले, मोठा फोटो, फाईल आहे तशी साईज ठेवण्याचा पर्याय आहे. उपयुक्त.
OneDrive PDF viewer हे app
OneDrive PDF viewer हे app गूगल प्ले स्टोरवर वेगळे नाही, Microsoft - OneDrive यामधूनच येते बहुतेक. हे वापरून कोणतीही pdf बरीच झूम करता येते. Adobe acrobat पेक्षा अधिक.
Landscape photo फिरवून
Landscape photo फिरवून portrait mode करणे.
हे बहुतेक सर्वच फोटो एडिटर apps करतात. पण असं करताना फाईल साईज कमी करतात. पण
Photo editor by dev.macgyver हे app size कमी करत नाही.
लिंक : Photo editor by dev.macgyver
बदल केलेल्या फोटोची पिडीएफ करता येते. ती फुलसाईज प्रिंट होते.
(No subject)
धन्यवाद... ॲपमधून फोटो जमला
लिनक्स मध्ये इमेज मॅजिक
लिनक्स मध्ये इमेज मॅजिक सॉफ्टवेअर टाकून साध्या टर्मिनल मधून नुसत्या कमांड वर बऱ्याच गोष्टी करता येतात. इमेज अचूक क्रॉप करता येते (x, y coordinates देऊन), pdf किंवा इमेजच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करता येते, size कमी जास्त करता येतो, वेगवेगळ्या इमेजेस एकमेकांना चिकटवता येतात, असंख्य चित्रे एका फटक्यासरशी (आज्ञा वापरून) modify/क्रॉप/कन्व्हर्ट करता येतात.
Computer साठी सॉफ्टवेर असतात
Computer साठी सॉफ्टवेर असतात तीच वापरून developerनी apps केली असावीत. मोबाईलवाल्यांसाठी apps वापरावी लागतात. दिलेली apps ७-८ एमबीची किंवा लहान आहेत.
एखादवेळेस पुढचा जमाना हा कोऱ्या मोबाइलचा असेल. तुम्हाला हवी असलेली लिनक्स/विंडोज ओएस टाकून वापरायचा. दूर नाही कारण प्रसेसर आणि मेमरी प्रगत झाली आहे. लिक्विड कुलिंगही आलं आहे.