गांधारी एक अद्वितीय नारी या माझ्या लेखाचे केलेले पोस्टमार्टम

Submitted by Swamini Chougule on 15 December, 2019 - 05:24

माझ्या कडून लिखाणात झालेल्या चुका
संत -संथ हवे
वल्लभाचारी - बल्लवाचारी हवे
आंबा ,आंबलिका ,आंबिका - अंबा,अंबालिका, अंबिका हवे
आणि हो मुजरा नाही तर प्रणाम किंवा प्रणिपात
बाप रे !इतक्या चुकांसाठी किती चर्चा पण
माझा फायदाच झाला तलवारीचे प्रकार कळले ,
आणि खूप सुंदर माहिती; हा आता त्यासाठी बरीच कुचकट बोलणी ही खाल्ली हरकत नाही सुधारणा करेन पण माझ्या ज्ञानात भरच पडत आहे
धन्यवाद __/\__

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबालिक नाही हो!
अंबालिका.
आणि तो क्रम
अंबा, अंबिका अंबालिका असा आहे..थोरली, मधली, धाकटी

मस्त येड्यात काढता हं तुम्ही.
शीर्षक खालील प्रमाणे बदलाल का?
गांधारी एक नारी या माझ्या अद्वितीय लेखाचे केलेले पोस्टमार्टम

@भरत
कळल्या पण यावर जास्त चर्चा झाली ना म्हणून

@बोकलत
किती छान ओळखता वो मला ;तरी बरं हे सोशल मीडिया आहे आभासी जग

मराठीत खूप चुका होत असतील तर टोंगा भाषेत लेख लिहीत चला. लोक गुगलकडून भाषांतरीत करून घेतील. व्हेंडा, त्स्वाना आणि त्सोंगा हे पर्याय देखील आहेत.

@वीरू
एक प्रश्न आहे इथे इमोजी कसे (मायबोलीवर) टाकतात कृपया मला सांगाल का?

कुचकट नव्हे, कुजकट. >> एखाद्या दिशेला 'कूच' करतो ना आपण, ती कृती करण्याचा 'कट' शिजवणे म्हणजे कुचकट. इथे दूधनीच्या व्याकरणाच्या नियमांनुसार प्रथमपदाच्या स्वराची अवनती होते. त्यामुळे कू चा कु झाला.

ह्या चार ओळींच्या लेखासाठी, खरेतर हा लेख नाही तर ही तुमचीच तुमच्या लेखावरील प्रतिक्रिया, तिच्यासाठी नवीन धागा उघडला... प्रयोजन काय ह्या सगळ्याचे?

तुम्हाला माबोवर चाहते व वाचक मिळवायचे असतील तर चांगले लेखन हा राजमार्ग आहे. तो तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही असा शॉर्टकट शोधून वापरत असाल तर असे शॉर्टकट वापरून मिळालेली प्रसिद्धी शॉर्ट असते हे लवकरच कळेल.

हातात असलेला वेळ चांगले लेखन करण्यात सत्कारणी लावण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!!

@साधना ताई
मायबोलीवर चाहते वाढवण्याची आणि इथे प्रसिद्धी मिळवण्याची माझी अजिबात इच्छा नाही बरं हे एकच मध्यम आहे का मला प्रसिद्धी मिळवण्यासाठी? अशी अजून ठिकाणे आहेत जिथे मी लिहिते कारण मी इथे
नवीन आहे पण या क्षेत्रात नवीन नाही तिथे माझे चाहते आहेत व मी त्यातच समाधानी आहे .या चार ओळी लिहिण्याचा हेतू असा की मी काय चुका केल्या व त्यासाठी काय काय रामायण झालं !बरं यातली एक चूक मी पहिल्याच लेखात केली होती ती तिथे निदर्शनास नाही आली पण दुसऱ्या लेखात हीच चूक उचलून चवदारपणे चघळली गेली आणि या सर्वांची सुरवात का ?कोणी ? केली .ते तुम्हाला सगळे तिथले प्रतिसाद वाचल्यावर कळेल कारण मी दिलेल्या एका प्रतिसादावरून हे सर्व सुरू झाले बरं तो प्रतिसाद वाकड्यात जाणारा ही नव्हता .मला त्या मुळे वेगळीच शंका आहे पण मला त्यात पडायचे नाही.
तुम्ही जाऊन सगळे प्रतिसाद काळजी पूर्वक वाचावेत ही नम्रविनंती आणि कृपया माझ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नये ही विनंती (मी इथे लिहिते माझ्या टायपो चुका मला कळाव्यात व त्यात सुधारणा व्हावी व माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून)

मला त्या मुळे वेगळीच शंका आहे पण मला त्यात पडायचे नाही.>>> >

मग या धाग्याचे काय प्रयोजन?? या इथे तुम्ही जे लिहिलेय ते तिकडेही लिहिले आहे. वेगळा धागा काढण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शुद्धलेखन व व्याकरणाकडे लक्ष दिलेत तर तुमचाच फायदा आहे हे अनेकजण सांगताहेत. तरीही तुम्ही हीराचे हरी करता, जे केले ते वाचतही नाही पण इथे येऊन लांब प्रतिसाद द्यायला मात्र वेळ आहे. यामुळे मलाही वेगळीच शंका येते जी मी स्पष्ट मांडली. उगीच शंका आहे म्हणायचे, धागे काढायचे आणि मला त्यात पडायचे नाही असेही वर म्हणायचे.... नक्की काय करताय म्हणायचे?

यातली एक चूक मी पहिल्याच लेखात केली होती ती तिथे निदर्शनास नाही आली पण दुसऱ्या लेखात हीच चूक उचलून चवदारपणे चघळली गेली>>>

म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका माहीत असूनही तुम्ही त्या पुन्हा पुन्हा करताय. लोकांनी दाखवून दिल्यावरही दुरुस्त करत नाहीत. आणि मग तुमची गम्मत लोकांनी ओळखून त्यांनीही गम्मत सुरू केली की तुम्हाला वेगळाच संशय येतो. लोकांनाही असाच वेगळा संशय येत असणार ना?

आता तसेही त्या धाग्यावर वेगळीच चर्चा सुरू आहे. त्याचा तुमच्याशी किंवा तुमच्या कथेशी संबंध उरलेला नाही. शब्दांबद्दल चांगली चर्चा सुरू आहे तिथे.

साधनाताई तू म्हणतेस ते मलाही बरोबर वाटतेय. मी काही लेख वाचले. मला लिहायची शैली आवडली. त्यात काहीही नवखेपणा नव्हता हे विशेष. पण व्याकरणाच्या चुका इतक्या बाळबोध होत्या की त्या मुद्दाम केल्याशिवाय होणार नाहीत. आताचे बघ ना, तुला दिलेल्या प्रतिसादात त्यांनी वाक्य पुर्ण झाल्यावर स्पेस देऊन मग पुर्ण विराम, प्रश्नचिन्हे दिली आहेत. ही चुक तर ऑटोकरेक्टमध्ये होणे शक्य नाही. ही चुक अगदी पहिल्या लेखापासून ते आताच्या प्रतिसादापर्यंत आहे त्यामुळे चुकन होणे शक्य नाही. असे का हे मला समजले नाही, पण एवढे मात्र नक्की वाटले की उत्तम शैली असुनही लेखनावर भर न देता इतर गोष्टी करुन काय मिळाले? असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Swamini Chougule तुम्ही लिहित रहा.
शुभेच्छा!

@हरिहर
मला लिहायची शैली आवडली. त्यात काहीही नवखेपणा नव्हता हे विशेष.
या टिप्पणीचा अर्थ मला कळला नाही.म्हणजे शैली आवडली वर त्यात काही नावखेपणा नव्हता.माझा गोंधळ उडाला याचा अर्थ लावताना??

स्वामिनी,

१. शुद्धलेखन सांभाळा.

२. लिहून झाल्यावर, पोस्ट करण्याआधी एकदा वाचून बघा.

पोस्ट करण्या आधी त्रयस्थ व्यक्ती कडून लिखाण एकदा वाचून घेतलेत तर जलद प्रतिक्रियाही मिळेल व त्यात बदल करता येतील योग्य ते.

पण या धाग्यावर नक्की सुचनाच अपेक्षित आहेत का?
नसतील तर एक सांगते, तुमच्या धाग्याबाबतीत तुम्ही वाद घातले नसतेत, तर माबोकरांनी इतके प्रतिसाद, सल्ले दिले नसते आणि लेखाची मजाही उडवली नसती.
तुम्ही छान लिहू शकाल जर इथे लक्ष देण्या ऐवजी तुम्ही लिखाणावर लक्ष दिलेत तर. कारण तुमची शैली काही जणांना आवडलेली आहे, असे इथल्या प्रतिसादांवरून दिसते आहे.

तेवढे शुद्धलेखन आणि वाचून बघण्याचे मनावर घ्या आणि माझा प्रतिसाद हलकेच घ्या. Happy

मी मधुरा
धन्यवाद, मी माझा लेख त्रयस्थ माणसाकडून वाचून मग पोस्ट करेन

Pages