बहिष्कार करा

Submitted by Asu on 13 December, 2019 - 22:13

बहिष्कार करा

महन्मंगल जे जे पवित्र, सुंदर
मानवतेचे जेथे मंदिर
हात जोडून नमस्कार करा
दुष्ट बीभत्स क्रूर भयंकर
मानवतेचे स्मशान घर
लाथ मारून बहिष्कार करा

अन्याय अत्याचार बलात्कार
यातच आयुष्य सरणार!
अमानुषतेचा धिक्कार करा
माता-भगिनी मुलगी दारा
नारीचा सन्मान करा
नरपशुंचा बहिष्कार करा

लिंगाभवती ज्या फिरते पौरुष
दुष्कर्मा ना पुरते निमिष
त्या लिंगाचा तिरस्कार करा
मानवजन्म फुलविण्यासाठी
नका लागू मिटविण्यापाठी
खुनी आयुष्याचा बहिष्कार करा

निसर्गनिर्मित अजब अद्भुत
अंतर्बाह्य घडवण मजबूत
नारीस जगण्या सहकार करा
अपमानिती जे स्त्रीत्वाला
भ्रष्ट करती मांगल्याला
त्या दुष्टांचा बहिष्कार करा

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults