सुप्त मन

Submitted by सामो on 12 December, 2019 - 15:58


.
अबौद्धिक व चाकोरीबद्ध, वारंवारता अति असलेलं काम करणार्‍या व्यक्तीची इच्छा असू शकते की आपल्याला बौद्धिक किंवा निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारे काम मिळावे. आपण महत्त्वाचे निर्णय घावेत. आपल्यात तो करीष्मा असावा लोकांची मते बदलण्यात आपण महत्त्वाचे प्यादे ठरु. "ऑल्सो रॅन" च्याहूनही काहीतरी आहे अन ते यश आपले व्हावे. अनेकांनी आपली वाहवा करावी.
.
किंवा एखाद्या व्यक्तीस कुटुंबियांनी परीपूर्ण , उबदार घर, मऊसूत पोळी-भाजी आयतीच ताटात कोणी वाढणारी, निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती आदि गोष्टी हव्याशा वाटत असतील. मग वरुन ती व्यक्ती कितीही रुक्ष वाटेना. त्याच्या मनात एक हळवा कोपरा असू शकतो जो की समस्त जगापासून दडलेला व त्याच्या मर्मबंधातील मनिषा आहे असा.
.
एखादी पौगंडावस्थेतील अतिअभ्यासू व शाळेखेरीज अन्य विश्व नसणार्‍या मुलास वारंवार मनातून असेही वाटू शकते की तो एखाद्या खेळात प्रवीण असावा, त्याने रोब झाडावा, एक प्रकारचा बेदरकार अन बेफिकीर पर्सोना / मुखवटा त्याचा असावा. अनेक मुलींना तो आवडावा अन त्यालादेखील ही पॉप्युलॅरिटी अ‍ॅट इझ घेता यावी.
.
एखादी नाकासमोर चालणार्‍या, सपक आयुष्य जगणार्‍या स्त्रीच्यादेखील काही वाइल्ड फॅन्टसी असू शकतात.
.
पण या सर्व गोष्टी साध्या डोळ्यांना दिसतात कोठे? अगदी अनेक वर्षे आपले एखाद्या व्यक्तीशी जीवाभावाचे मैत्र असू असते, अन तरीही त्या व्यक्तीच्या अंतर्मनात दडलेल्या त्या व्यक्तीच्या आकांक्षांबद्दल, स्वप्नांबद्दल, फॅन्टसीबद्दल अर्थात कल्पनाराज्याबद्दल आपण पूर्णतः अनभिज्ञ असू शकतो नव्हे असतोच.
.
यासंदर्भात एक दोन मार्मिक उदाहरणे आठवतात. एका लेखकाचे बहुधा थॉमस मूर यांचे मध्यमवय या विषयावरचे पुस्तक वाचनात आले होते ज्यात त्यांनी या सुप्त इछा-आकांक्षा-फॅन्टसी चा उल्लेख केलेला होता व त्यांनी मिडलाइफ पॅसेजबद्दल हे विश्लेषण केले होते की आयुष्यभर दबलेल्या या इच्छा या काळात तीव्रतेने डोके वर काढतात कारण माणसाला कळते की "नाऊ ऑर नेव्हर". आता आपल्या व्हायटॅलिटीची, आरोग्य तसेच संपूर्ण आयुष्याचीच उतरंड सुरु होणार आहे तेव्हा जे काही साध्य करायचे ते आत्ता नाही केले तर जन्मभराची अतृप्तता सहन करावी लागणार. या लेखकाच्या म्हणण्यानुसार, जिथे प्रकाश असतो तिथे सावली ही असतेच. या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची एक "शॅडो पर्सनॅलिटी" असते. शॅडो कारण ती सोशली अ‍ॅक्सेप्टेबल असेलच असे नाही किंबहुना नसतेच. जितक्या वेळा आपण एखादी गोष्ट इच्छाशक्तीने बलपूर्वक नाकारतो, तितकी ती गोष्ट या शॅडोमध्ये ढकलली जाते अन तेव्हढी ती पर्सनॅलिटी मजबूत बनत असते, तिला आकार येत असतो. मध्यमवयात व्यक्तीचे असे छुपे व्यक्तीमत्व अत्यंत जोरात, तीव्रतेने डोके वर काढते. व्यक्तीच्या बाह्य मुखवट्याशी विसंगत असे हे व्यक्तीमत्व उफाळून येते. शक्य आहे.
.
शकोला (Chocolat) या सिनेमातही या सुप्त इच्छांच्या रेट्याचे मार्मिक चित्रण केलेले आहे. फ्रेन्च खेड्यामध्ये एक जिप्सी स्त्री जाते व चॉकलेट चे दुकान थाटते. त्याबद्दल खूप विरोध ती सहन करते. पण हळूहळू तिचा क्लायंट बेस बनत जातो व तिला त्या त्या व्यक्तीच्या मनात डोकावता येते. त्यांच्या सुप्त इच्छा जाणून घेता येतात. तिचे चॉकलेटस जादूने त्या व्यक्तीच्या सुप्त इच्छाच जणू वरती काठावरती आणतात.
.
ख्रिश्चिअ‍ॅनिटीमधील कन्फेशन्स चा संबंध मला छुप्या व्यक्तीमत्वाशी लावावासा वाटतो कारण त्यात इतकी अपराधीपणाची भावना असते की नक्की तत्सम कृती शॅडो पर्सनॅलिटीमध्ये अर्थात छुप्या व्यक्तीमत्वामध्ये लोटली जातात.
.
लहानपणी एखादी गोष्ट करु नको सांगीतली की तीच कराविशी वाटते की नाही? जन-गण-मन/ वंदे मातरम ला स्तब्ध उभे रहायचे असते तेव्हा किती मुलांच्या नाकाला, गालाला खाज सुटल्यासारखे होते? जितका टॅबू जास्त तितकी ती करण्याची इच्छा जास्त होते.
.
ज्योतिषाबद्दलच सांगायचे झाले तर, १२ वे घर हे सुप्तमन, वेड्यांचे इस्पितळ, तुरुंग व दवाखाने, धार्मिक स्थळे यांचे घर आहे. आणि तुम्ही पहाल तर यातील प्रत्येक गोष्ट ही जगापासून लपलेली आहे. १२ वे मीन या जलराशीचे घर हे अशा छुप्या गोष्टींचेच घर आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. अजून विस्तारपूर्वक लिहायला हवे होते. सामो जी वेगवेगळ्या अनेक विषयांवर लिहिताना घाई होते असे वाटते. कृपया तुमचा आवाका खूप मोठा आहे, तेव्हा विषयांना पुर्ण न्याय द्या.

छान सुरवात होऊन, पुढेही ग्रीप पकडून नंतर किंचितसा विस्कळीत वाटला लेख. (हा माझा बुद्धी दोषही असेल.)

काही बाबी छान रिलेट झाल्या.
फॅन्टसीज माझ्यात पुष्कळ आहेत.

शेवटला परिच्छेद अर्थात खटकला. रास कुठलीही असो, सगळेच मानवी मेंदु (अपवाद वगळता) अशा छुप्या गोष्टींचे घर असावेत असे मला वाटते.

>>>>>>>१२ वें घर म्हणजे मीन राशीची माणसे का?? लेख अपूर्ण लिहीलाय वाटते.>>>>>> नाही मीन ही जरी १२ वी रास असली तरी कुंडलीत १२ वे घरदेखील असते ज्यामध्ये ग्रह असू शकतात. हे घर सुप्त/अमूर्त मन दाखवते. याचेच एक्स्टेन्शन आपले व्यक्तीमत्व म्हणजे पहीले घर (लग्न किंवा इंग्रजीत ascendant) पहील्या घरात मूर्त स्वरुप म्हणजे आपले दिसणे/ वागणे/ एकंदर आप्ण जगापुढे कशा प्रकारचे व्यक्तीमत्व उभे करतो, आदि बाबी येतात.
___________
समीर हे फार पूर्वीचे लेख तर आहेतच पण माझे एक लिमिटेशन आहे ते म्हणजे सुचेल ते लिहायचे व नंतर संपादित करायचे नाही. संपादन करताना, प्रचंड कृत्रिमपणा येतो. असो. पण सल्ल्याबद्दल आभार.
__________
>>शेवटला परिच्छेद अर्थात खटकला. रास कुठलीही असो, सगळेच मानवी मेंदु (अपवाद वगळता) अशा छुप्या गोष्टींचे घर असावेत असे मला वाटते.>> मानव फक्त मीन राशीच्या माणसांना सुप्त फँटसीज असतात, सुप्त मन आसते असा अर्थ नाही. १२ वे घर प्रत्येकालाच असते. या घराचा स्वामी कुठे आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी ज्योतिषीपाहून, ज्योतिषी काही भविष्य वर्तवु शकतात.

हेलो, आदू प्रत्येक घराचे काही कारक त्व असते त्या नुसार, प्रत्येक घराला काही गुण बहाल केलेले आहेत. पैकी १२ व्या घराला छुप्या गोष्टी आहेत. जसे तुम्ही तुरुंगात जाणार का, वेड्यांच्या इस्पितळात जाणार का, तुम च्या सुप्त मनात .,... वगै रे वगैरे. मी ही ज्योतिषी नाही व मलाही जुजबीच माहीती आहे.