२ लेख भटकंतीच्या स्वप्नरंजनाचे

Submitted by सामो on 12 December, 2019 - 15:48

लेख १ - दिवास्वप्ने- भटकंतीची

“God gave us memory so that we might have roses in December.” - या वाक्यात एक बदल करावासा वाटतो, “God gave us daydreams so that we might explore richness otherwise evading us.” ..... माझ्या दिवास्वप्नांबद्दल बोलायचं झालं तर,पद्मा गोळे यांची अत्यंत सुंदर कविता लहानपणे शिकले होते तीच इथे चपखल बसते -

"मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी,
.
.
अशी झेप घ्यावी , असे सूर गावे
घुसावे धगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली, भुरे केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखांवरी"

माझ्या स्वप्नात माझे एका जातीवंत भटक्या, जिप्सी व्यक्तीत आमूलाग्र रुपांतर झालेले असेते. सामाजिक, सांस्कृतीक इतकेच काय मानसिक सर्व बंधने झुगारुन (झुगारुन - This word has most most beautiful ring to it) मी विमुक्त पक्षासारखी भटकत असते. कधी अतीव निसर्गरम्य विस्कॉन्सिन उत्तर किनार्‍यावर वॉलाय मासा, ट्राऊट मासा खात असते तर कधी बॅकपॅक घेऊन रेल्वे, बस चा , पायीसुद्धा प्रवास करत दक्षीणेच्या टेक्सासमधील शहरात जाऊन पोचते. रोडीओ शो चा आस्वाद घेते. कधी कॅलिफोर्नियाच्या ग्लॅमरस रस्त्यांवर झगमगाटात पाय फुटेल तिथे भटकते तर कधी नेवाडा वाळवंटातील लास वेगस शहरात कॅसिनोंचा आस्वाद विस्फारलेल्या नेत्रांनी घेते. कुठे व्हरमाँटचा केशरी पानगळ ऋतू मला साद घालतो तर कुठे पेनसिल्वेनिआचा इतिहास.

आमीर अब्द-अल-कादीर यांच्या "द लाइफ ऑफ नोमाड" कवितेत वर्णन केल्याप्रमाणे कूपमंडूक शहरी, पिंजर्‍यातील आयुष्य टाकून देऊन, भव्यतेची गळामीठी घ्यावीशी वाटते, निसर्गाच्या कुशीत जावेसे वाटते.-

O THOU who preferrest the dull life of the town
to wide, free solitude,
dost thou despise nomadic tents
because they are light, not heavy
like houses of stone and lime?
like houses of stone and lime?
If only thou knewest the desert's secret!
But ignorance is the cause of all evil.
If thou couldst but awake in the dawning Sahara
and set forth on this carpet of pearls,
where flowers of all colors shower delight
and perfume on our way.

उंच डोगरमाथ्यावर तारे मोजत रात्र घालवावी हे तर स्वप्नच आहे. सकाळी जाग यावी तीच पक्षांच्या किलबिलाटाने. ऊठावं अन रस्ता पकडावा. जंगली मांजरीबद्दल ऐकलेले आहे की या मांजरीचे पाय जंगलाचा तोच भाग (स्पॉट) परत कधीच स्पर्श करत नाहीत. त्या अगदी त्या प्रकारचे विमुक्त जिवंत वाईल्ड आयुष्य जगण्याचे दिवास्वप्न रंगवते. ही मुक्ततेची, भटकेपणाची साद हा जणू माझ्या स्वत्त्वाचा एक अविभाज्य, दुर्लक्षीत भागच जाणवतो. कदाचित सर्वांनाच ही साद कमी-जास्त प्रमाणात ऐकू येत असेल. त्याशिवाय का पूर्वी कहाण्या ऐकू येत - अमक्याने घरदार टाकून सन्यास स्वीकारला, कोणी गायब झाले.

वॉल्ट व्हिटमन यांची केवळ अजरामर कविता "साँग ऑफ ओपन रोड"-

Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.
.
.
All seems beautiful to me,
I can repeat over to men and women You have done such good to me I would do the same to you,
I will recruit for myself and you as I go,
I will scatter myself among men and women as I go,
I will toss a new gladness and roughness among them,
Whoever denies me it shall not trouble me,
Whoever accepts me he or she shall be blessed and shall bless me.

मग दूधाची तहान लागलेली व्यक्ती ज्याप्रमाणे ताकावर-पाण्यावर तहान भागवते तशी मी "आऊटडोअर अँथॉलॉजी" प्रकारची पुस्तके वाचत सुटते, त्या पुस्तकात हरवून, विरुन जाते.काय काय सापडतं अशा पुस्तकात- साहसी प्रवासवर्णने, शिकारी-मासेमारीचे रोमांचक अनुभव, हिमवादळात घ्यावयाची काळजी, तर कुठे भटकंतीत अचानक भेटलेल्या अनवट अनोळखी लोकांची व्यक्तीचित्रणे.
अशी पुस्तके फार आवडतात, अक्षरक्षः वेड लावतात. अशी पुस्तके पायाला भिंगरी लागून न देता, प्रवासाची ओढ काही प्रमाणात शमवतात.

"खिर्श्चॅनिटीमधील सॅक्रिड लिवींग वॉटर" = आपली दिवास्वप्ने!! जगायची उर्जा देणारा, मानसिक बळ वाढवणारा आपल्या हृदयातील गुप्त झरा. Be fearless to indulge in it. Be true to your dreams.
_______________________________________________________

लेख २ - भटकंतीचा झपाटून टाकणारा मूड

AFOOT and light-hearted, I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me, leading wherever I choose.

दूरवर जाणारा मोकळा रस्ता - विस्तीर्ण पसरलेले क्षितीज - वार्‍यावर डोलणारे इवलेसे रानफूल - छातीचा भाता भरभरुन मोकळ्या हवेत घेतलेला श्वास - रानात घुमणारी पक्षाची शीळ - Ahh!! the sweet Wanderlust

तू माझ्यासाठी काय नाहीस - हे सर्व तर आहेसच शिवाय डोंगरमाथ्यावर पाय ठेऊन पाहीलेला सूर्योदय - पायाला लागलेली भिंगरी - रानोमाळ भणाणणार्‍या वार्‍याची शीळ - वेड्यासारखा कोसळणारा पाऊस - जीप्सीपण - कलंदरपण - निसर्गाशी साधले गेलेले तादात्म्य - ओलेत्या , कुंद हवेतील रान, चैतन्याने सळसळणारी झाडे - Whirling dervishes - हे सारं आहेस तू.

उस्फूर्तता - मुक्त विस्तीर्णता - वॉल्ट व्हीटमन यांच्या भाषेतच बोलायचे झाले तर Open Road आहेस तू माझ्यासाठी. कोणत्याही परीमाणांत कैद न होणारा - मनस्वी अन स्वच्छंद, स्वतंत्र अन मुक्त.

अगदी "The Roamer" कवितेतल्या पाळीव भटक्या कुत्र्यासारखा - मूर्तिमंत Wanderlust
.........Ahh!! the sweet Wanderlust

The Roamer - Denise Levertov

The world comes back to me
eager and hungry and often
too tired to wag it's tail

a dog with wanderlust
back from South Boston or the Reservoir

Keeps coming back,
brought by triumphant strangers
who don't understand he knows the way well
Faint jingle of collartag breaking
my sleep, he arrives

and patiently scratches himself on the front steps
I let in blue
daybreak
in rushes the world

visible dog concocted
of phatasmagoric atoms
nudges my hand with wet nose
flumps down deeply sighing

smelling of muddy streams, of thrown away treasures
of some exotic news, not blood, not flowers,
and not his own fur -
unable

except by olifact
to tell me anything.
- where have I been
without the world? Why am I glad
he wolfs his food and gathers
strength for the next journey

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद प्राचीन व शरदजी.
____
सीमंतिनी, होय वॉल्ट व्हिटमनची 'रुट ऑफ ग्रास' मधील 'ओपन रोड' ही एक अवीट कविता आहे. त्यांचीच, कॅप्टन , ओह माय कॅप्टन ही कविता तर इतकी करुण आहे. माझी सर्वात आवडती कविता आहे ती कदाचित नवरा जहाजावरती होता त्यामुळे असेल, पण ही कविता टच्चकन डोळ्यात पाणी आणते.
____________
हा जहाज प्रवास म्हणजे आयुष्य आहे आणि कुठेतरी आपला कॅप्टन आपल्याला सोडुन जाणारा साथीदार आहे , कधी आपली प्रिय व्यक्ती (मग ती वडील असू शकते किंवा कसेही) असा काहीसा अर्थ मी लावते. अर्थात हाच अर्थ सर्वांनी लावला असेल असेही नाही.
___________
O Captain! my Captain! our fearful trip is done,
The ship has weather’d every rack, the prize we sought is won,
The port is near, the bells I hear, the people all exulting,
While follow eyes the steady keel, the vessel grim and daring;
But O heart! heart! heart!
O the bleeding drops of red,
Where on the deck my Captain lies,
Fallen cold and dead.

O Captain! my Captain! rise up and hear the bells;
Rise up—for you the flag is flung—for you the bugle trills,
For you bouquets and ribbon’d wreaths—for you the shores a-crowding,
For you they call, the swaying mass, their eager faces turning;
Here Captain! dear father!
This arm beneath your head!
It is some dream that on the deck,
You’ve fallen cold and dead.

My Captain does not answer, his lips are pale and still,
My father does not feel my arm, he has no pulse nor will,
The ship is anchor’d safe and sound, its voyage closed and done,
From fearful trip the victor ship comes in with object won;
Exult O shores, and ring O bells!
But I with mournful tread,
Walk the deck my Captain lies,
Fallen cold and dead.

सामो, छान लिहीले आहे.
कधीकधी आपल्या बालपणीचे दिवससुद्धा आज एखाद्या दिवास्वप्नासारखे वाटतात. तेव्हा म्हणावेसे वाटते, 'दिल ढूंढता है फिर वही......)

आवडले!
O Captain! my Captain ही elegy त्यांनी प्रेसिंडेंट लिंकनसाठी लिहीली. साहजिकच अगदी आतुन आलेल्या पोरकेपणाच्या दु:खाने ती इतकी करुण आहे.

>>>> O Captain! my Captain ही elegy त्यांनी प्रेसिंडेंट लिंकनसाठी लिहीली. साहजिकच अगदी आतुन आलेल्या पोरकेपणाच्या दु:खाने ती इतकी करुण आहे.>>>> ओहोहो!! हे माहीतच नव्हते.

ओ कॅप्टन माहिती होती पण कवी कोण ते माहिती नव्हते (रादर, आता लक्षात नव्हते कारण कविता कधीतरी शाळेत रेसिटेशन साठी होती). खूप दिवसांनी पुन्हा वाचली. धन्यवाद!
(अनेक धाग्यांवर आपण अनेक कवितांचे विवेचन केले आहे. हे धागे काही शब्दखुणा घालून एकत्र ठेवले आहेत का? कधी कधी अशा इंग्रजी कविता वाचायची लहर येते...)

शब्दखूणा घातलेल्या नाहीत परंत्य इंग्रजी कविता अशी शब्दखूण घालेन. सूचनेबद्दल आभार.
लको, वर्षा, शैलजा अभिप्रायाबद्दल, धन्यवाद.