अन रात झाली शाम्भवी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 11 December, 2019 - 05:54

अलवार त्याचा अस्त झाला

अन रात झाली शाम्भवी

चांदवा घेऊन तारे

जणू सूर छेडे भैरवी

कोण या हृदयात आले ?

वाट शोधून ती नवी

प्रहर भासे वेगळा जणू

अंतःपुरा उगवे रवी

गुंजते सुमधुर कर्णी

नाद लावे भार्गवी

श्वास गेले लोपुनी

अन चित्त झाले पाशवी

भेट होता लोचनांची

आत फुटली पालवी

बहरला तो प्रेमवृक्ष

दृष्टी झाली हिरवी

============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

DJ.. साहेब धन्यवाद ...

निरु साहेब , आपला अभिप्राय वाचला आणि थेट आपल्या पानात घुसलो .. अहाहा काय ते मसाराचे वर्णन लिवलंय .. मज्जा आली .. सुंदर .. हळूहळू सवडीने सर्व धागे वाचून काढेन म्हणतोय करा बरेच प्रतिसाद आलेयत प्रत्येक धाग्याला ..