गांधारी एक अद्वितीय नारी

Submitted by Swamini Chougule on 9 December, 2019 - 07:52

मी सहा वर्षांची असताना दूरदर्शनवर दर रविवारी आठ वाजता (वेळ नेमकी लक्षात नाही ) महाभारत ही मालिका लागत असे ती पंचेचाळीस मिनिटांची असे. जेंव्हा ही मालिका मी पहायचे तेंव्हा मा‍झ्या बालबुद्धिला एक प्रश्न पडायचा की ती डोळ्याला पट्टी बांधलेली बाई कोण व तिने डोळ्याला पट्टी का बांधली असावी?मी मा‍झ्या आईला हा प्रश्न विचारला की ती डोळ्याला पट्टी बांधलेली बाई कोण आहे आणि तिने डोळ्याला पट्टी का बांधली आहे ? आईने दिलेले उत्तर मला अजून आठवते ,
“ ती गांधारी आहे ;आंधळ्या धृतराष्ट्रांची पत्नी आहे .पती आंधळा म्हणून तिने ही आजन्म डोळ्याला पट्टी बांधून जग न पाहण्याची प्रतिज्ञा केली होती “
आई काय म्हणाली त्याचा अर्थ मला त्या वयात कळला नाही पण तेंव्हा पासून माझ्या मनात गांधारी विषयी आकर्षण निर्माण झाले.मी मोठी होत गेले तसं गांधारी विषयी जिज्ञासा वाढतच गेली .मला जे माध्यम मिळाले त्या माध्यमातून मी तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत गेले .
कधी सीरिअलच्या माध्यमातून, कधी पुस्तकांतून तर कधी इंटरनेटच्या माध्यमातून, या सगळ्या माध्यमातून ती मला उलगडत गेली . तिच्या बद्दल जितके जाणून घेतले तितकी ती अजूनच समजत गेली .
ती कोण होती?ती कशी होती?तिने आंधळ्या माणसाशी लग्न का केले ?तसेच तिला शंभर पुत्र कसे झाले ?तिचे भाव विश्व कसे होते? महाभारत युध्दा विषयी तिचे काय मत होते म्हणजे युध्द व्हावे का नको वगैरे वगैरे ? तसेच तिचे सर्व पुत्र युद्धात मारले गेले तेंव्हा तिची मनस्थिती काय झाली असावी? पती धृतराष्ट्राशी तिचे संबंध कसे होते? तिने श्री कृष्णाला श्राप का दिला ?(श्री कृष्ण विष्णू अवतार आहेत हे माहिती असून ही)तिचा मृत्यू कसा झाला व कोणत्या स्थितीत झाला ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे .खरं तर गांधारी बद्दल काही लिहणे खूप मोठे धाडस आहे .पण माझ्या बुद्धीनुसार; आकलन शक्तीनुसार मी गांधारीचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
जर मी कुठे चुकत असेन तर जरूर सांगा . आज पासून मा‍झ्या बरोबर चला नवीन प्रवासाला ,एक नवीन लेखमाला एक नवीन प्रवास घेऊन येत आहे .

गांधारी ... .एक अद्वितीय नारी

सोज्वळ, सुंदर तेजस कांती ,
वर्ण असे जसे दुग्ध केसरी,
सिंह कटी अन भुजंग वेणी,
नयन असती कमल दला परी,
अधर जणू की गुलाब पाकळी ,
राजस ,सात्विक ,श्वास कुसुमी,
असे वर्णन ती कोण सुंदरी,
ही तर असे सती गांधारी !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सामो
@मी माधुरी
@च्रप्स
धन्यवाद, आणि लिंक देण्याचे प्रयोजन माझ्या ब्लॉग ची माहिती व्हावी .अजून नवीन आहे पुढे जाऊन इथल्या पेक्षा तिथे नक्कीच नवीन काही दिसेल याची खात्री देते

त्या काळी विज्ञान फार प्रगत होते.
जसे की ब्रम्हास्त्र म्हणजे गाईडेड न्यूक्लीअर मिसाईल असू शकते, किंवा पुष्पक विमान एखादे UFO.
असो, गांधारी ने १०० अपत्यांना टेस्ट-ट्यूब सारख्या प्रकारातून किंवा सर्रोगसी तुन जन्म दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेदांमध्ये देखील या तंत्रांबाबत माहिती आहे.

अगदी बरोबर vichar गांधारीने शंभर पुत्र व एका कंन्येला टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाने जन्म दिला होता
धन्यवाद

@सस्मित
धन्यवाद ही शुद्ध लेखन सुधारल्या पासून पहिला प्रतिसाद

अगदी बरोबर विचार. धृतराष्ट्राच्या डोळ्यांवर उपचार करणंही शक्य होतं पण मग पुढलं सगळं महाभारत घडलं नसतं म्हणून नाही केले.

धृतराष्ट्राच्या डोळ्यांवर उपचार करणंही शक्य होतं पण मग पुढलं सगळं महाभारत घडलं नसतं म्हणून नाही केले.>> वॉव टेस्ट ट्युब बेबीज पेक्षा हे जास्त प्रायोरिटी होती असे वाटते.