बलात्कार्य्राचे encounter!!!!

Submitted by मेधाविनी घरत on 6 December, 2019 - 08:54

आज हैदराबाद प्रकरणातील आरोपीचं encounter करण्यात आलं.
अर्थातच हे सगळे प्रकरण घडवून आणण्यात आलं हे न समजण्याारखे आपण कोणीही दूधखूळे नाही.
या encounter नंतर समाजाच्या विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
उच्च स्तरांवरील काही प्रतिक्रया माझ्या वाचनात आल्या.
त्यात काही intelectual मानले जाणारे प्रतिथयश नट , राजकारणी, लेखक यांचा समावेश आहे.
बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.

यातील अनेक विचारवंत गेली कित्येक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या हिडीस घटनांनी मुळीच विचलित झालेले दिसत नाहीत. स्वतंत्र भारतात गेले ७५ हून अधिक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांनी समाजाचा लोप होत नाही असे त्यांचे मत आहे वाटते.त्या जश्या काही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत जणू.रोज सकाळच्या चहासोबत चावायला मसाला.
पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय???
हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे.
काही वेळा झोपलेल्या समाजाला जागे करायला अश्या अपवादांची चपराक लावायचाच लागते.सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यावर कायद्याच्या रक्षकांनी न्याय व्यवस्थेवर काढलेला हा desperate तोडगा होता.त्यांची सालटी काढायला हे विचारवंत लांडगे जमले. मग यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय?
बाहुबली मध्ये स्त्रीलोळूप सेनापतीला शासन होते तो प्रसंग हे सगळे विचारवंत भारावून जाऊन पाहतात, मग सत्यात उतरल्यावर इतका तळतळाट कश्यासाठी?
याला hippocracy म्हणतात.
माझ्या मते हे सगळे विचारवंत केवळ भी्माचार्य आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण मान खाली घालून पाहणारे.
नको तिथे नियमांची आणि morality chi फुटपट्टी लावणारे षंढ विचारवंत.
अरे त्या निष्पाप मुलींच्या वेदनांची जरा तरी तमा बाळगा.
ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?
केवळ संविधानाने वाटेल तशी मते प्रदर्शित करण्याचा हक्क दिले आहेत म्हणून जीभ मोकाट सोडायची.
घरी बसून वाहत्या गंगेत हात धुणे सोपे असते.
बाकी तर समाज उतरणीला लागलाच आहे या so called विचारवंतांचा मते.पण तो नेमका कोणामुळे लागला आहे त्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
For we don't deserve you, we are Hippocrates!!!
आम्हाला माफ कर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉक्टर मनाली, उद्या जर तुमच्या डॉक्टर सहकाऱ्याला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाला अशा आरोपावरून पोलिसांनी अटक केली आणि एन्काऊंटर करून मारून टाकलं तर मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढू नका. पोलिसांनी न्याय केला असे समजा.>>
'सुतावरून स्वर्ग गाठणे ' किंवा 'स्लिपरी स्लोप ' ज्याला म्हणतात त्या टाईपचे थोडे आर्ग्युमेण्ट आहे हे.

ताई म्हणून की भाऊ की ताऊ ??

माझ्या भावाने किंवा मुलाने असे कृत्य केले (मला नवरा नाही) तर त्याचा एन्काऊंटर झाल्याचे मला फारसे वाईट वाटणार नाही.

https://www.maayboli.com/user/74317

वैयक्तिक
नाव
आपले ते हे
स्त्री/पुरुष
पुरुष
सध्या मुक्काम (गाव/शहर)
,
देश
:
Screenshot_20191208-113409.png

हा एनकाउंटर योग्य होता, तर उन्नावप्रकरणातल्या आरोपींचा एनकाउंटर का नको?>>>
शेळ्या खाणाऱ्या वाघाला मारणे सहज शक्य नाही, म्हणून लांडग्याला सुद्धा मारू नये का?

Submitted by पुरोगामी गाढव on 8 December, 2019 - 01:02>>

अहो म्हणूनच तर नवरा नाही ना!! सारकॅझम ची व्याख्या गुगल करून पहा.

आपल्यासारख्या आहेत आणि नाहीत हा मुद्दा आहे कारण त्यावरच आपल्या संतापाची पातळी ठरते. उन्नावमधल्या आमदाराच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुली बद्दल आणि मुलीच्या कुटुंबाबद्दल तुम्हांला एक अक्षरही लिहावंसं वाटलेलं नाही, याचं कारण काय असेल?>>
हे मात्र अगदी खरं आहे. व्हिक्टीम प्रिव्हिलेज्ड क्लास मधला असला कि मध्यम वर्ग खवळून उठतो. ग्रामीण/दलित केसेस मध्ये मात्र फारसा बोभाटा होता नसावा. कोपार्डी प्रकरणात रस्त्यावर उतरलेला एक विशिष्ट 'समाज' नितीन आगे प्रकरणात मूग गिळून होता. चालायचंच .

मला वाटले काही पुरूष असतात ना त्यातले. (नवरा करणारे). एखादी दुर्घटना घडली कि काय असे वाटले. त्यांना एण्काउंटर मधे तर नाही ना मारले ?

पुन्हा तेच! भरत आला परत. Uhoh पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर काय घुटमळता हो?
आणि संतापाची पातळी तुमची बदलत असेल वर्ण, जात, धर्म, रंग आणि जन्मठिकाण वगैरे पाहून, माझी बदलत नाही. बलात्कार अक्षम्य गुन्हा आहे आणि ज्याने केलाय त्याला मृत्यूच दिला गेला पाहिजे.
मग ती पिडिता मुलगी रस्त्यावर राहणारी असो अथवा महालात राहणारी.

पोलीसांनी केले ते योग्य की अयोग्य हे कोर्ट ठरवेलच. पण न्याय प्रक्रिया जर न्याय द्यायला असमर्थ असेल तर कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास डळमळीत होणारचं लोकांचा.

कुठेही कुठलेही मुद्दे घुसडायचे आणि ते धरून बसले की झाले.... हेच करणार असाल तर दुर्लक्ष करणे हे योग्यच आहे तुमच्या बद्दलही जे डॉक्टरने आधीच अवलंबले आहे आणि आता मी ही लक्ष देणार नाहीये तुमच्या प्रतिसादांकडे.

कारण कसं आहे ना, झोपलेल्या व्यक्तीला उठवता येत. झोपेच सोंग घेतलेल्या व्यक्तीला नाही.
त्यामुळे कितीही किर्तने गायली तरी घोरणेच ऐकू येते प्रत्युत्तर म्हणून.

धाग्याला राम राम !

मिनल ताई, लिहित राहा तुम्ही माबोवर.

या एन्काउंटरमुळे तुमचा पोलिसांवरचा विश्वास वाढला असल्याबद्दल तुमचे आणि पोलिसांचे अभिनंदन.

<पण न्याय प्रक्रिया जर न्याय द्यायला असमर्थ असेल तर कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास डळमळीत होणारचं लोकांचा. >

सोपं करून पाहूया. पायरीपायरीने जाऊया

त्या पोलिसांनी हे एनकाउंटर कायदा आणि न्यायप्रक्रियेवर त्यांचा विश्वास नाही , म्हणून केलं असं तुम्हांला म्हणायचंय का?

मी मधुरा,

कोर्ट जर एन्काऊंटर योग्य की अयोग्य ठरवणार असेल, तर तुम्हाला तुमच्या बोलण्यातला विरोधाभास, आयरनी वगैरे लक्षात येतेय का?

<<< त्या पोलिसांनी हे एनकाउंटर कायदा आणि न्यायप्रक्रियेवर त्यांचा विश्वास नाही , म्हणून केलं असं तुम्हांला म्हणायचंय का? >>>
"अब तक छप्पन" सिनेमा बघा.

स्त्रियांच्या सुरक्षेसाठी असे काही उपाय करता येतील का?
https://twitter.com/PTI_News/status/1203600534105550849
Uttar Pradesh govt plans to set up 'cow safaris' in state for better safety and upkeep of bovines: UP Animal Husbandry Minister Laxmi Narayan Chaudhhary

लेखातल्या मतांशी अगदी सहमत आहे डॉक्टर,
कौर्याची एवढी परिसीमा गाठणारे माणूस म्हणून घेण्याचे सुद्धा लायक नाही
त्यामुळे ते गरीब-श्रीमंत कोणत्या जात -धर्माचे होते हा मुद्दाच येतच नाही
त्यांनी गुन्हा जंगली पशूंसारखा करायचा आणि त्यांना न्याय कायदयाने व्हावा अशी अपेक्षा ठेवायची ?
त्यांना गुन्हा करायचं स्वातंत्र्य आहे, मग कायद्याच्या रक्षकांना न्याय करायचं स्वातंत्र्य नको का ?
दुष्टांचे निर्दालन हाच न्याय कोणत्याही देशाचा असावा

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उदयानंतर कुणीही अतिरेकी विचारांचा मनुष्य आज देशप्रेमी म्हणून विचार करू पाहणा-यांना झोडपू लागला आहे. देशाचे तालिबानीकरण पूर्ण झालेले आहे.

वर पोलिसांनी केलेल्या गँगरेपची लिंक दिलेली आहे तरीही आपलेच तुणतुणे घेऊन वर इतर सगळे गाढव असतील तर अशा प्राण्यांना काय म्हणावे ?

मी मधुरा,

कोर्ट जर एन्काऊंटर योग्य की अयोग्य ठरवणार असेल, तर तुम्हाला तुमच्या बोलण्यातला विरोधाभास, आयरनी वगैरे लक्षात येतेय का?>>>>>>>>>> ते उपहासाने म्हणले आहे, हे देखील समजत नाहीये की विनोद करता आहात?

भरत,

माझा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे असे का वाटले तुम्हाला?

अपराध्यांना शिक्षा झाली इतकाच काय तो आनंद आहे.

विश्वास वगैरे चा काय प्रश्न आलाय इथे? कारण न्यायव्यवस्थेचाच एक भाग आहेत पोलिस. जर न्यायव्यवस्था विश्वासपात्र उरलेली नाही तर......

विश्वास वगैरे चा काय प्रश्न आलाय इथे? कारण न्यायव्यवस्थेचाच एक भाग आहेत पोलिस. जर न्यायव्यवस्था विश्वासपात्र उरलेली नाही तर......>> पोलीसांना न्याय व्यवस्थेचा भाग करून टाकल्यावर प्रश्नच उरत नाही काही! खासदार आमदार पण पोलीस, न्यायाधीश पण पोलीस आणि पोलीस पण पोलीस.. मज्जाच मज्जा!

.. >>>> सुरूवात कुणी केली ? >> म्हणजे कोणी तुम्हाला न आवडणारं मत मांडल
तर लगेच तो दुसऱ्या अबक पक्षाचा का ? Happy काय संबंध ? त्यापलीकडे विचारसरणी आहे
वर पोलिसांनी केलेल्या गँगरेपची लिंक दिलेली आहे >>>
दोन घटनांची तुलना करण म्हणजे पुरोगामी विचार नाही दादा
किंवा विरोधी मत म्हणजे तालिबानी विचार असही होत नाही
इतर सगळे गाढव असतील तर >> सगळ्यांना नाही हो तुमच्याच नावात गाढव आहे ना म्हणून ती म्हण सुचली
अशा प्राण्यांना काय म्हणावे ? >> मनुष्य प्राणी म्हणा
आपलेच तुणतुणे घेऊन >> दुसऱ्याचं म्हणणं म्हणजे तुणतुणं आहे हा कोणता विचार आहे मग ?

वा वा, स्वतःचा बचाव करायला येतो आणि समोरच्याचे प्रतिसाद संदर्भासहीत न वाचता राजकारण आणले असे आरोपही करता येतात का ? म्हणजे हम करे तो कायदा असेच धोरण दिसतेय की तुमचे. तुम्ही काय वाचलेय यापूर्वी ? की आली लहर केला कहर छाप प्रतिसाद देणार आहात इथून पुढेही ?

For we don't deserve you, we are Hippocrates!!! >>> या वाक्याचा अर्थ समजला नाही. कारण Hippocrates हा एक ग्रीक डॉक्तर होता त्याच्या नावाने पदवीदान समारम्भात नवे डॉक्टर शपथ घेतात. तसेच तुम्हाला hypocrites असे म्हणायचे असेल तर आपण सर्व ढोन्गी का आहोत?

पोलिस सामान्य जनता नव्हेत. ते कायद्याचे रक्षक आहेत. ----- शिक्षा ठरवणं आणि लगोलग अंमलात आणणे हे त्यांच्या कार्यकक्षेत येत नाही. ----त्यांनी त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन करून स्वतः कायदा हातात घेणे हाच एक मोठा गुन्हा आहे. >>> हे वरदाताईचे मत बरोबर आहे. समजा एखाद्या श्रीमन्त माणसाला एखादा मनुश्य नको आहे कारण त्याच्या जमिनीवर त्याच डोळा आहे. त्यासाठी तो पोलिसाना पैसे देऊन त्याच्यावर काही गम्भीर आरोप ठेऊन गोळी घलून मारु शकतात. आपल्याकडले सर्व पोलीस अगदी प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. कोणाहि आरोपीची पूर्ण चौकशी होऊन कोर्टानेच शिक्षा दिली पाहिजे.

एन्काउंटर चे चार प्रकार आहेत
१) विदेशी दहशतवादी - हे जिहादच्या नावाखाली कोणत्याही देशात जाऊन दहशतवाद माजवतात. यांची विचारसरणी फार पक्की असते त्यांना आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नसतो त्यामुळे त्यांचे वैचारिक पुनर्वसन अशक्य आहे असे बहुसंख्य मानसोपचारांचे मत आहे. अशा लोकांना तुरुंगात एक तर आजन्म ठेवणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना एन्काउंटर करून मारून टाकणे हे समाजाच्या दृष्टीने जास्त सोपे ठरते. उदा आय एस आय एस चे दहशतवादी.

२) भरकटलेले स्वदेशीय दहशतवादी- यांची माथी धर्म (जात किंवा प्रदेश याच्या नावावर) भडकावून त्यांना दहशतवादी बनवलेले असते. हे अत्यंत निर्ढावलेलेच असतात असे नाही तेंव्हा त्यांचे पुनर्वसन शक्य असते. परंतु बरयाच वेळेस त्यांनी अशा तर्हेचे गुन्हे केलेलं असतात कि त्या गुन्ह्यांचे पुरावे मिळवणे अशक्य असते. आणि पुराव्याशिवाय त्यांना सोडवण्यासाठी वकिलांचा फौजफाटा जय्यत तयार असतो. त्यामुळे न्यायालयात त्यांच्या विरुद्ध भक्कम आणि सज्जड पुरावा उभा करणे फार कठीण असते. यात धार्मिक दहशतवादी किंवा विद्रोही असे नक्षलवादी असतात.

काही वेळेस अशा माणसांचे एन्काउंटर करून त्यांना नष्ट करणे समर्थनीय ठरू शकते.

या दोन्ही तर्हेच्या दहशतवाद्यांविरुद्धचे युद्ध हे सुरक्षा दलांसाठी एक असमतोल (ASYMMETRIC) युद्ध असते ज्यात सुरक्षा रक्षकांनी मानवाधिकाराचे उल्लंघन करून चालत नाही परंतु दहशतवाद्यांनि काहीही केलेलं चालते.

३) यात एक तर निर्ढावलेले गुन्हेगार वारं वार चोरी,दरोडे, खिसेकापू असे लोक असतात किंवा बरेचसे परिस्थितीमुळे अगतिक झालेले गरीब लोक असतात जे अन्यायाविरुद्ध खवळून उठतात आणि गुन्हा करतात उदा बायकोवर बलात्कार झाल्यामुळे/ मुलाला विनाकारण कोठडीत टाकून रहाणं केल्यामुळे शस्त्र हातात घेतलेला आदिवासी/ गरीब खेडूत इ.

४) केवळ भावनेच्या आहारी जाणारे यात संतापाच्या भरात मारहाण किंवा खून केलेले अथवा संधी मिळाल्यावर वासना अनावर होऊन बलात्कार करणारे.

या तिसऱ्या आणि चौथ्या गटातील गुन्हेगार हे गुन्हेगार असले तरीही त्यांचे एन्काउंटर करून त्यांना संपवणे हे कधीही समर्थनीय होणार नाही.कारण हि माणसे सामान्यतः समाजाला तितकी धोकादायक म्हणता येणार नाही आणि अशा लोकांचे पुनर्वसन शक्य असते.

या लोकांना दहशतवादी लोकांच्या स्तरावर नेणे चूक ठरेल. पोलिसांना अमर्यादित अधिकार दिले तर आपल्याला नको असलेल्या माणसाला संपवणे हे फार सोपे असते त्यामुळे (केलेल्या किंवा) न केलेल्या बलात्काराबद्दल सरळ संशयिताला उडवणे हा शिष्टाचार झाला तर अनाचारच माजेल.
पोलीस खाते हे सरकारच्या अखत्यारीत असते त्यामुळे उद्या आपल्या राजकीय विरोधकाना संपवण्यासाठी पोलीस दलाचा वापर होऊ लागला तर आपली स्थिती कम्युनिस्ट राजवटीसारखी होईल. ( कम्युनिस्ट राजवटींनी गेल्या शतकात १०-११ कोटी स्वकीयांनाच केवळ संशयापोटी संपवलेले आहे)
पण न्यायसंस्था हि स्वतंत्र आहे आणि ती कोणत्याही प्रचलित सरकारच्या म्हणण्यानुसार चालत नाही त्यामुळे शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायसंस्थेचाच असायला हवा. त्यात ताबडतोबीने आमूलाग्र बदल करणे आवश्यक झाले आहे यात कोणताही संशय नाही.

इतर सर्व गुन्हे आणि बलात्कार यामध्ये एक मूलभूत फरक आहे.

तो म्हणजे असा बलात्कार (आणि त्यानंतर केलेली हत्या) आपल्यावर कधीही होऊ शकतो हि एक सुप्त भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात खोल दडून बसलेली असते. यामुळे अशा निर्घृण गुन्ह्याचे वेळेस स्त्रियांची प्रतिक्रिया बऱ्याच वेळेस टोकाची असू शकते.

वैद्यकीय व्यवसायात मी जेंव्हा पहिली बलात्कार झालेली मुलगी रुग्ण म्हणून पाहिली तेंव्हा माझ्या मनातही अपार करूणा होती. परंतु आमच्या नर्सिंग मेट्रनचे वागणे तिच्या बरोबर अतिशय प्रेमाचे होते. या वेळेस एक लखकन डोक्यात विचार चमकून गेला तो म्हणजे मी एक पुरुष आहे त्यामुळे असे काही माझ्या बाबतीत होऊ शकते हा विचारच माझ्या मनात आलेला नसतो

याउलट प्रत्येक स्त्री घराबाहेर एकटी असताना हे आपल्या बाबत होऊ शकते या भीतीची गडद छाया घेऊन वावरत असते. यामुळे पुरुष आणि स्त्री यांच्या "व्यक्त होण्याच्या" पद्धतीत बराच फरक पडू शकतो.

यामुळे बऱ्याच वेळेस अशा गुन्हेगाराला फाशीच द्या असा आग्रह धरताना स्त्रिया जास्त दिसतात.

परंतु जर बलात्काराला फाशी हीच शिक्षा असेल तर कोणताही गुन्हेगार बलात्कार केल्यावर त्या दुर्दैवी स्त्रीला जिवंत सोडणारच नाही.
नाहीतरी फाशीच होणार आहे मग पुरावाच नष्ट करून टाका

हा विषय फार गहन आहे आणि याचे अनेक पैलू आहेत

मुळात बलात्कार ची एकच ढोबळ व्याख्या करता येणार नाही.
आणि बलात्काराची व्याख्या लिंगभेद विरहित असावी .
1) सहमतीने एका पेशा जास्त वेळ शारीरिक संबंध आले असतील तर शेवट च्या शारीरिक संबंध ला बलात्कार म्हणता येणार नाही.
मना विरुद्ध संभोग असे म्हणता येईल पण बलात्कार नाही.
2) ज्या संबंधात सेक्स हा मूळ पाया आहे त्या संबंधाला बलात्कार म्हणता येणार नाही(अनैसर्गिक संबंध वगळून).
3) ज्या स्त्री चा किंवा पुरुषाचा paid सेक्स हा धंधा आहे ते बलात्कार च आरोप करू शकत नाहीत.
4) कोवळ्या वयातील मुलांशी समतीने किंवा बाकी मार्गाने संबंध बनवले तर त्या साठी असे संबंध बनवणारी स्त्री किंवा पुरुष हे बलात्कारी समजले जातील.
5) शारीरिक इजा मनाविरुद्ध सेक्स करणाऱ्या नी केली तर तो गुन्हा फाशी सारख्या शिक्षेस पात्र आहे शारीरिक इजा नसेल तर पहिल्या गुन्ह्यात फाशी ही शिक्षा गैर लागू आहे 4/५ वर्ष जेल ठीक आहे.
पण त्याच प्रकारचा दुसरा गुन्हा केला तर फाशी चीच शिक्षा असावी(ह्यात बलात्कारी स्त्री आणि पुरुष दोन्ही असतील.)
6) स्त्रिया बलात्कार करत नाहीत हा गैरसमज आहे आज च्या काळात स्त्री नी पुरुषावर बलात्कार केल्याची उदाहरणे खूप आहेत फक्त पुरुष पुरुष तसे आरोप करण्यास मानसिक दृष्ट्या तयार नाही.
7)बाकी मनाविरुद्ध सेक्स करणारे पुरुष असो किंवा स्त्री ते गंभीर गुन्हेगार आहेत तेव्हा ते पिडीत व्यक्ततिला शारीरिक इजा करतात किंवा ठार मारतात किंवा अनिसर्गिक संबंध बनवतात त्यांना तबोडतोप फाशी वर चढवा वे

Pages