बुलेट ट्रेन ची गरज आणि आम्ही !

Submitted by रमेश भिडे on 4 December, 2019 - 10:57

२००९ साली औरंगाबाद आणि जालन्याचे काही उद्योजक चीन भेटीला गेले होते. त्यात मी देखील होतो. बीजिंग शांघाय गुनझावच इन्फ्रास्ट्रक्चर बघून आमचे डोळे अक्षरशः फाटले होते.

चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांची बुलेट ट्रेन हा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. जी, डी आणि सी नावाने रोज धावणाऱ्या २८०० बुलेट ट्रेन्स आहेत ज्या रोज ५५० शहरांना ३४ पैकी ३३ प्रॉव्हिन्समध्ये कनेक्ट करतात. बीजिंग शांघाय हे १३१८ किलोमीटरचे अंतर तुम्ही केवळ साडे चार तासात कव्हर करता. वूहानचे बुलेट ट्रेन मेन्टेन्स शेड तर अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार आहे. २९००० किलोमीटर्सचे बुलेट ट्रेन जाळे आहे आणि २४४० किलोमीटर लांबी असलेली जगातली सर्वात मोठी बुलेट ट्रेन बीजिंग ते हाँगकाँग दरम्यान धावते. चीनची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यांचा रेशीयो काढला तर आपल्या देशात एव्हाना २५०० बुलेट ट्रेन धावायला पाहिजे होत्या. २५०० जाऊ देत पण किमान १०० तरी धावायला हव्या होत्या.

भारत आणि चीनचा प्रवास एकाच कालखंडात सुरू झालेला. ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत? पूर, शेतमाल नुकसान, गरिबी, असाक्षरता असे प्रॉब्लेम त्यांना नसतील का? असतीलच, आहेतच. टोकाची गरिबी आणि अति श्रीमंती त्यांच्याकडे पण आहे. पण असे असतांना देशाची प्रगती कशी होईल ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. ह्या प्रोजेक्टचा पैसा त्या प्रोजेक्टला मग त्या प्रोजेक्टचा पैसा अजून तिसऱ्याच प्रोजेक्टला असे केले की सगळे प्रोजेक्ट बोंबलतात. चीनसारखी लोकशाही आपल्याला नकोच पण कंट्री फर्स्ट हे रुजवायला लागणार आहे आपल्याला.

मुंबईची खरी गरज ते शहर किमान पन्नास टक्के रिकामे कसे होईल हे बघणे अशी आहे. ते कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. मग अश्या परिस्थितीत येणारी लोक मुक्काम करणार नाहीत इतके तर नक्की बघता येईल आपल्याला.

आपल्या पॉलिसीज बघता जगाला ब्रेन सप्लाय करणारा हा आपला देश एक दिवस अश्या ब्रेनड्रेनच्या भीषण गर्तेत अडकेल की त्यातून बाहेर यायला दोन चार पिढ्या खपवाव्या लागतील. माझा एक अमेरिकन मित्र ( ओरिजिनल, एनआरआय नाही ) मला २०१० साली म्हणाला होता, चीन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अमेरिकेच्या पन्नास वर्षे पुढे आहे. त्या हिशोबाने ते आपल्या किती पुढे असतील? घाला बोटे आणि मोजा.

एकंदर काय तर #औघड_आहे_आपले

बाय द वे,

१.कोणतेही सरकार बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद करू शकते, त्या प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वापरू शकत नाही.

२. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायलाच हवी ह्यावर माझी संपूर्ण सहमती आहे.

३. फोटो, अंतरजालातून

साभार : हर्षद शामकांत बर्वे, पुणे

FB_IMG_1575474772581.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुलेट ट्रेन चालू करा किंवा काही त्याच्या पेक्षा भारी असेल ती ट्रेन चालू करा .
पण तो खर्च पूर्ण पने 100% केंद्र सरकारने करावा .
महाराष्ट्र ल बुलेट ट्रेन ची गरज नाही त्या साठी 1 रुपया सुधा महाराष्ट्र नी खर्च करायची गरज नाही
प्रगती ची फळ पूर्ण देश चाखणारा आणि खर्च महाराष्ट्र करणारा हा रिकाम उद्योग आता आपण बंद केला पाहिजे
मुंबई ची घनता 30000प्रती 1 km आहे.
अस शहर प्रगत देशात एक सुद्धा नाही.
म्हणजे आपल्या साधनं संपत्ती ला काडी लावायची आणि पूर्ण देशाला त्याची ऊब द्यायची हे राज्याच्या हिताचे नाही .
फक्त आणि फक्त राज्य हिताचेच प्रकल्प इथे राबवले पाहिजेत.

निव्वळ हास्यास्पद, एकांगी आणि अजेंडा घेऊन लिहिलेला लेख. राजकारण ग्रुप असताना इतरत्र जिलब्या पाडणे म्हणजे तिकडे कसे ते शहाणे कसाही संबंध जोडून कोणतेही विधेयक मनी बिल म्हणून आणतात तसेच. आणि म्हणे कंट्री फर्स्ट. म्हणजे संत्रा की अगदीच हातभट्टी?

आत्ताच फेसबुकवर हाच लेख वाचला. औरंगाबादच्या औद्योगिक परीसरातले उद्योगपती एकमेकांना ओळखतात. त्यांनी एकत्र येऊन मध्यंतरी १०० मर्सिडीज घेतलेल्या होत्या. बर्वे नावाचे कुणी उद्योगपती नाहीत. एक अधिकारी आहेत वाहन उद्योगामधे. रमेश भिडे सुद्धा अस्तित्वात नाहीत. थोडक्यात हे पाडलेले लेख पसवरण्याचे काम सुरू झाले. मध्यंतरी जर्मनीचा जावई होता तसे हे बर्वे.

भारताला बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे की नाही यावर पुष्कळ काथ्याकूट झालेला आहे. परदेशात गेल्यावर तिथे जे काही दिसेल ते आपल्याकडे हवे एव्हढीच ज्याची बुद्धी त्याच्या लेखावर चर्चा करण्यात अर्थ नाही. अंथरूण पाहून पाय पसरावेत माणसाने,

चीनमधे जाऊन तिथला साम्यवाद आपल्याकडे आणावा असे का नाही वाटले या महाशयांना ?
बुलेट ट्रेन प्रचंड खर्चाचा प्रकल्प आहे. आपल्या हितसंबंधित लोकांना कंत्राटे देता येतात. बाकी तिच्या तिकीटात विमान प्रवास स्वस्त पडेल आणि ज्यांना अपडाऊन करायचे ते फ्लाईंग क्वीननेच करतील हे नक्की.

लेखक खालची लिंक द्यायला विसरले बहुतेक. ती दिली असती तर बुलेट ट्रेनची गरज का आणि कुणाला आहे हे लगेच समजले असते.
https://www.jansatta.com/news-update/company-donated-bjp-got-bullet-trai...