NDE (निअर डेथ एक्सपीरीअन्स) बद्दलच्या किरकोळ शंका

Submitted by सामो on 4 December, 2019 - 10:45

Embraced by light, Three minutes in heaven अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास NDE सारख्या साईटवरती घालवून व त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.

शंका १- हवेत तरंगणे इतके सहज का गृहीत धरले जाते? म्हणजे सामान्य आयुष्यात तर आपण सहसा असे अचानक तरंगायला लागत नाही. मग मृत्युपश्चात NDEer ना मृत्यूचे भान यायला इतका वेळ का लागतो?

बरं स्वत:चं शरीर त्रिमितीमध्ये पाहून अनेकाना ही जाणीव होते की आपण स्वत:ला समाजत होतो तितके देखणे नाही. किंवा तितके बारीक नाही, सुडौल नाही यंव न त्यंव.
शंका २ मग परत आल्यानंतर किती NDEers स्वत:चे रुप, आकार सुधारण्याचा प्रयत्न करतात? निदान तसे खुले आम सांगतात? शून्य. बहुसंख्य NDEers मानवतावादी व अध्यात्मिक मूल्यांबाबतच बोलतात.

मृत झाल्याची एकदा व्यक्तीची खात्री पटली की लगेच एका काळ्या टनेल अर्थात बोगद्यातून तिचा प्रवास सुरु होतो.काहीजणांनी असे म्हटले आहे की अन्य जीव या बोगद्यातून प्रवास करत असल्याचे त्यांना जाणवले.

शंका ३- मग इतक्या गर्दीत या बोगद्यात धक्काबुक्की होते का? बरे सर्वच जण चुपचाप मार्गाक्रमण का करतात? कोणी शीळ घालत नाही की वेळ जायला गाणे म्हणत नाही. मृत्युपश्चात परलोकात विनोदाचे वावडे असते का?असो.

पुढे थोड्या टिवल्याबावल्या झाल्यानंतर, प्रकाश दिसतो/ लक्षात येतो. आणि मग व्यक्ती एका अतिशय तेजस्वी फार प्रखर नाही अशा तेजोमय प्रकाशाकडे आकर्षित होते.

यावर शंका ४- मला जर प्रकाश आवडत नसेल जर मला कुंद पावसाळी ढगाळ हवा आवडत असेल तरी मी प्रकाशाकडेच आकर्षित व्हायचे का? कोणीही प्रकाशाव्यातीरीक्त अन्य सुंदर सौम्य तेजाबद्दल बोलत नाही.

या प्रकाशाचे वर्णन करताना तर सर्व NDEers च्या जिभेवर साक्षात सरस्वतीच नृत्य करू लागते. तो प्रकाश किती दयाळू, समजूतदार, नॉन-जजमेण्टल आहे ते सांगायचे अहमहमिका सुरु होते .मग हाच प्रकाश या व्यक्तीला तिचाच जीवनपट दाखवतो व NDEer ने अन्य जीवांना दिलेले दु:ख , वेदना, यातना तो उलगडून दाखवतो इतकेच नव्हे तर NDEer त्या दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून तेच दु:ख स्वत: भोगतात. मग NDEer ना जाणवते की ते किती आत्मकेंद्रॆत, स्वार्थी आयुष्य आजवर जगत आले वगैरे वगैरे. उपरतीच होते म्हणा ना.

शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????

मग पुढे NDEers ना त्यांचे जन्मजन्मान्तरीचे सुहुद, मित्र भेटतात. व हे मित्र त्यांना ज्ञानामृत पाजतात.

शंका ६- जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते? कोणीही NDEer ने परत आल्यावर या ज्ञानाच्या जोरावर एखादा गणिती सिद्धांत सोडवला आहे किंवा फार महत्वाचा नाही तर नको पण एखादा बारीकसा का होईना शोध लावला आहे असेही काही दिसत नाही.

सरतेशेवटी NDEer ना २ पर्याय दिले जातात परलोकातच रहाणे अथवा पृथ्वीवर परत जाणे. नाही जायचे म्हटले तरी त्याना "कार्य अपुरे आहे" या सबबीखाली सक्तीने पाठविले जाते. व परत आल्यावर "विशिष्ठ ध्येयाने झपाटून" ती व्यक्ती जीवन जगते वगैरे.

शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील? पण ते उत्पन्न charity ला जाते असे एकाही NDEer ने लिहिल्याचे ऐकिवात नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक प्रश्न चेतना शी संबंधित आहे शरीराचे विश्लेषण करण्यास विज्ञान समर्थ आहे .
शरीर रचना , कार्य, ह्याची माहिती आपल्याला बर्या पैकी आहे .
पण चेतना विषयी खूप प्रश्न अनूतरित आहेत.
बलाढ्य शरीर असणारा व्यक्ती च्या एका हाताची,चेतना गेली तरी तो हात शक्ति हिन होतो.
त्याचे मजबूत स्नायू कार्य करण्यास असमर्थ होतात.

चेतना ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे शरीर जास्त महत्वाचे नाही.

>>>>>चेतना ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे शरीर जास्त महत्वाचे नाही.
दोन्ही समान महत्वाचे आहे. चेतनेशिवाय शरीर म्हणजे प्रेत आहे तर शरीराशिवाय, चेतना म्हणजे फ्क्त 'एक्टोप्लाझ्मा(?' एक्टोप्लाझ्मा सुद्धा मॅनिफेस्ट होण्याकरता लागतो. काही ना काही मिडिअम लागणारच.
तेव्हा २ चाके आहेत. एक नाही तर दुसर्‍याला अर्थ नाही.

कृत्रिम बुध्दीमत्ता जी निर्माण होत आहे ती मानवी मेंदू चा अभ्यास करूनच.

यांत्रिक मानव तयार होत आहेत , .
.पण साजिवात जी भावना असते,मन असते, स्वतः ची जाणिव असते,.
कल्पना करण्याची क्षमता असते , .
आणि एक प्रकारचा "मी " पना असतो.
हा मी पना कसा येतो .
हा गहन प्रश्न आहे.
" मी" पना येतो तेव्हा स्वतःचे अस्तित्व जाणवते.
यंत्रात ह्या भावना नसतात.

मन म्हणजे काय ह्याचे उत्तर अजून माहीत नाही.
मेंदू हाच मनाचा उगम कर्ता आहे असे समजले तरी.
यांत्रिक मानवत मन अजून निर्माण झाले नाही,भावना अजून निर्माण झाल्या नाहीत.
," मी," पना अजून निर्माण झाला नाही.

हे मी पण बाह्य शक्ती मुळे येते आणि ती शक्ती अज्ञात आहे.

Near death experience .
चे खरे खोटे ठरवताना वरील प्रश्न पहिले सुटले पाहिजेत

मध्यंतरी एक थिअरी वाचली. त्याचे नाव लिहून ठेवायला हवे होते ती थिअरी अशी होती की तुम्ही एकटेच सचेतन आहात, अर्थात तुमच्या एकट्यातच कॉन्शसनेस आहे. अन्य सर्व लोक हे तुमच्या मनाने निर्माण केलेले आहेत ते सचेतन नाहीत.
तसं पहायला गेले तर आपण अन्य लोकांना सचेतन मानतो हा निष्कर्ष असतो. सर्व लोक श्वास घेतात, आजारी पडतात, पुस्तके वाचतात वगैरे वगैरे म्हणुन ते सचेतन असावेत.
अशा थिअरीज वाचून सटपटायलाच होते.

Solipsism - ही ती थिअरी. केशवकुल बर्‍याच दिवसात दिसले नाहीत. त्यांना हा विषय आवडला असता Happy

अन्य सर्व लोक हे तुमच्या मनाने निर्माण केलेले आहेत ते सचेतन नाहीत.>> हे मॅट्रिक्स सिनेमात आहे. होल वर्ल्ड इज अ सिमुलेशन.

हेमंत तुमचा प्रतिसाद चांगला होता. काळजी घ्या. मलाही अगदी तस्सच अनुभव २५ वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा क्वचित असे सर्वांच्या बाबतीत होते. निदान काहींच्या तरी. असो.

Near death' experience येणाऱ्या लोकांचे प्रमाण आता जास्त असावे .
कारण आधुनिक वैद्यक शास्त्र आणि विविध आधुनिक उपकरण माणसाला मृत्यू च्या दारातून परत आणतात.
पुनर्जीवित च होतो तो व्यक्ती असे म्हणायला हरकत नाही.
Heart. अटॅक आलेल्या व्यक्ती ला cpr दिला की तो मरता मरता वाचलेला असतो.
त्याचा मृत्यूच झालेला असतो पण cpr मुळे तो पुनर्जीवित झालेला असतो.
त्याच प्रमाणे ventilator, जीवन सुरक्षा यंत्रणा ही उपकरणं माणसाला मृत्यू पासून वाचवतात.

अशा लोकांना near death experience येणार च कारण ते मृत्युच्या अवस्थेत पोचलेले च असतात.

एक अजून प्रश्न पडतो माणसाचा मृत्यु झाल्या नंतर मेदू च्या पेशी जीवंत पण काही वेळ राहत असतील काही चेतना त्यांच्या मध्ये जीवित राहू शकतात भले शरीरावर त्यांचे नियंत्रण गेले असले तरी विचार करण्याची क्षमता,आणि भावना निर्माण होणारी केंद्र जीवित असू शकतात.
अशी लोक विविध उपाय नी वाचली तर त्यांना त्या काळात जो अनुभव आला ते आठवत च असेल.

आपण एकटेच सचेतन ही कल्पना ऍक्सेप्ट करायला आवडली असती .. कारण त्याचा अर्थ दुसरं कुणीच आतापर्यंत कधीच वेदनांमधून गेलेलं नाही आणि जगात त्रास , वेदना सहन करणारे सगळे लोक , प्राणी सगळं एक इल्यूजन होतं असं समजून बरं वाटलं असतं . दुसरं म्हणजे आपल्याला जे काही दुःख दुसऱ्यांमुळे झालं , तसे दुसरे कोणी नव्हतेच , एक हायर पावर गेम खेळत होती एवढंच असं समजून आल्यावरही बरं वाटेल . प्रत्येकासाठी तो एकटाच सचेतन। असलेली एक स्वतंत्र मॅट्रिक्स .. जेणेकरून जे काही शिकायचं आहे ते प्रत्येक जीव शिकत राहील .

तसं असावं असं वाटत मात्र नाही .

वाचलेला एक किस्सा - विवेकानंद यांना आत्मज्ञान , साक्षात्कार वगैरे झालेला होता असं त्यांचे सहकारी मानत . एके दिवशी त्यांच्या वर्तुळातील एका निकटच्या सहकाऱ्याने - माया म्हणजे काय मला दाखवा अशी विनंती केली . त्यावेळी विवेकानंदांनी त्याचा हात हातात घेतला किंवा खांद्यावर हात ठेवला - त्या माणसाला हे सगळं जग दिसायचं बंद झालं .. आणि काहीच नाही , मोठ्ठी पोकळी आहे , पृथ्वी - जमीन काहीही नाही , आपण स्वतः तरी आहोत की नाहीत हे समजत नाही - असा काहीतरी अनुभव आला .

त्यातून भानावर आल्यावर ते विवेकानंदांना म्हणाले - अरे ,

ते त्यांना एकेरी कधीच हाक मारत नसत पण त्यावेळी ते भानावर नव्हते , अर्धवट त्याच अनुभवाच्या अवस्थेत होते . तर ते म्हणाले की जर काहीच खरं नाही आहे तर हे समाजकार्य , प्रबोधन कार्य हा सगळा पसारा , व्याप तरी कशाला , यात कशाला अडकायचं ... त्यावर विवेकानंदांनी शरीर आहे तोपर्यंत जगाच्या उपयोगी पडेल असं कार्य सतत चालू राहीलं पाहिजे , सगळं खोटं आहे म्हणून एकांतवासात , गुहेत जाऊन बसण्याला काही अर्थ नाही .. असं उत्तर दिलं .

फारसं काही समजलं नाही .. जग खरं असेल नसेल , कदाचित स्वप्न असेल कुणाचंतरी .. पण असंख्य जीव ते सत्य म्हणून भोगत आहेत , दुःख भोगत आहेत , त्यांच्यासाठी ते दुःख निःसंशय खरं आहे ... जग मिथ्या आहे म्हणून त्यांना भूक लागायची थांबत नाही किंवा दुखणं आलं तर वेदना व्हायच्या राहत नाहीत ..

एकूण हा किस्सा खरा मानायचा ठरवला तर आपण एकटेच सचेतन ही थिअरी जड अंतःकरणाने सोडून द्यावी लागते .

पण हल्ली हल्ली असं वाटतं की जरी दिसतात ते सगळे लोक सचेतन आहेत तरी त्या सगळ्या कठपुतळ्या आहेत , आपण स्वतः धरून .. हायर पावरच सगळ्यांना खेळवते आहे / माया / गेमच चालू आहे - मल्टिपल प्लेअर्स असलेला ... 8 बिलियन प्लेअर्स फक्त पृथ्वीवर , प्राणी बिणी धरले तर आणखी कितीतरी ..

>>>>.तरी त्या सगळ्या कठपुतळ्या आहेत , आपण स्वतः धरून
अनुगच्छतु प्रवाहं. वहात रहा!
डु नॉट रेझिस्ट. जितकं रेझिस्ट कराल, त्रास होतो. लेट गो!!!

राधानिशा, स्वगत आवडले.

>>>>> त्यावेळी विवेकानंदांनी त्याचा हात हातात घेतला किंवा खांद्यावर हात ठेवला - त्या माणसाला हे सगळं जग दिसायचं बंद झालं .. आणि काहीच नाही , मोठ्ठी पोकळी आहे , पृथ्वी - जमीन काहीही नाही , आपण स्वतः तरी आहोत की नाहीत हे समजत नाही - असा काहीतरी अनुभव आला .
बाप रे कसे वाटले असेल?
तसं पहायला गेलं तर प्रत्येक सजीव हा चेतनेचा पुंजका आहे. आणि चेतना एकसलगच असावी.
आपला मेंदू विविध रीतींनी सत त ईन्टरप्रिट करत असतो. आहे रे- नाही रे. ब्लॅक व्हाईट…….. यालाच ड्युअ‍ॅलिटी म्हणत असा वे.

रामकृष्ण परमहंस यांच्याशी कालीमाता बोलते असं त्यांचे शिष्य मानत असत . त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांना अन्न जात नसे अजिबात त्यावेळी काही शिष्य त्यांना म्हणाले की आईला सांगा थोडं जेवण जाऊ दे ( म्हणजे खाता येऊ दे आणि पचू दे ) त्यानंतर ते म्हणाले की आई म्हणते आहे , इतक्या तोंडांनी तू जेवतो आहेसच , याच तोंडाने कशाला खायला पाहिजे ...

आपली कधी अशी अवस्था होईल का .. की हर प्रकारचं सुख कोणा ना कोणाद्वारे भोगलं जात आहेच , ते याही देहाने भोगायलाच पाहिजे असा हट्ट का .. आपण खरोखर अतृप्त आहोत का ? मधे एक विनोद वाचला होता , दुसरों की खुशी में खुशी मान रहे है क्यूनकी अपनी तो मिल नहीं रही .. Lol .. हे सहज शक्य आहे असं वाटतं त्या दिशेने विचाराचा प्रयत्न केला तर ..

हे मूळ गंभीर विषयापासून भरकटलं आहे बहुधा ...

मला एक नि अर डेथ अनुभव आलेला आहे.

एक स्वप्न पडले. साधारण क्रोएशिआ किंवा डुब्रोवनीक - गेम ऑफ थ्रोन मधील राजधानीचे शहर असल्या टाइप शहर आहे. युरोपातले. खाली दगडी रस्ता, लोक घोडे, कौलारू घरे. टापांचे आवाज. मग ह्या कोलाहलातून एक एंजल टाइप मुलगी वर वर जाते. तिने चीज कॉटन चा व्हाइट स्मॉकिन्ग केलेला पाय घोळ ड्रेस घातलेला आहे. त्याच्या विंग सारख्याच मोठ्या बाह्या आहेत वर हवेत जाते पण गाउन उडत नाही हवेने. चेहर्‍यावर पॅनिक नव्हे तर शांत भाव आहेत. ही वर वर जाते. पण काही क्षणातच एका मोठ्या ताम्ब्याच्या / धातूच्या चिमणीत पडते. आवाज येतो मेटा लिक व ती त्या मेटल मध्ये पडते शांतपणे पडून राहते.

ह्या स्वप्नातून उठल्यावर मी नक्की स्वतःची पल्स चेक केलेली होती. अजुनही ते सर्व दृश्य दिसते . मी चांगली चित्रकार असते तर नक्की चित्र काढले असते.

भास च असतो पण आपल्याला ते सत्य वाटत ह्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जेव्हा आपणा आकाशात चंद्र बघतो तेव्हा आपल्याला वाटत चंद्र वर आहे आणि पृथ्वी खाली आहे पण तसे ते मुळीच नसते चंद्र खालच्या दिशेला असतो आणि पृथ्वी वरच्या दिशेला असते. हे सत्य असते

( किंवा वर किंवा खाली असा कोणताच प्रकार अस्तित्वात च नसतो).
असे अनेक प्रकार विश्वात आपण आता समजू लागलो आहोत.

>>>>>पण गाउन उडत नाही हवेने
हे एक बरे झाले Happy
जोक्स अपार्ट, रोचक स्वप्नं आहे.
>>>>>हे सहज शक्य आहे असं वाटतं त्या दिशेने विचाराचा प्रयत्न केला तर ..
होय अगदी अगदी!!! मी प्रयत्न करते याचा.

>>>>>.किंवा वर किंवा खाली असा कोणताच प्रकार अस्तित्वात च नसतो
होय अवकाशात कुठले वर-खाली आणि कुठले डावे-उजवे!

Pages