NDE (निअर डेथ एक्सपीरीअन्स) बद्दलच्या किरकोळ शंका

Submitted by सामो on 4 December, 2019 - 10:45

Embraced by light, Three minutes in heaven अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास NDE सारख्या साईटवरती घालवून व त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.

शंका १- हवेत तरंगणे इतके सहज का गृहीत धरले जाते? म्हणजे सामान्य आयुष्यात तर आपण सहसा असे अचानक तरंगायला लागत नाही. मग मृत्युपश्चात NDEer ना मृत्यूचे भान यायला इतका वेळ का लागतो?

बरं स्वत:चं शरीर त्रिमितीमध्ये पाहून अनेकाना ही जाणीव होते की आपण स्वत:ला समाजत होतो तितके देखणे नाही. किंवा तितके बारीक नाही, सुडौल नाही यंव न त्यंव.
शंका २ मग परत आल्यानंतर किती NDEers स्वत:चे रुप, आकार सुधारण्याचा प्रयत्न करतात? निदान तसे खुले आम सांगतात? शून्य. बहुसंख्य NDEers मानवतावादी व अध्यात्मिक मूल्यांबाबतच बोलतात.

मृत झाल्याची एकदा व्यक्तीची खात्री पटली की लगेच एका काळ्या टनेल अर्थात बोगद्यातून तिचा प्रवास सुरु होतो.काहीजणांनी असे म्हटले आहे की अन्य जीव या बोगद्यातून प्रवास करत असल्याचे त्यांना जाणवले.

शंका ३- मग इतक्या गर्दीत या बोगद्यात धक्काबुक्की होते का? बरे सर्वच जण चुपचाप मार्गाक्रमण का करतात? कोणी शीळ घालत नाही की वेळ जायला गाणे म्हणत नाही. मृत्युपश्चात परलोकात विनोदाचे वावडे असते का?असो.

पुढे थोड्या टिवल्याबावल्या झाल्यानंतर, प्रकाश दिसतो/ लक्षात येतो. आणि मग व्यक्ती एका अतिशय तेजस्वी फार प्रखर नाही अशा तेजोमय प्रकाशाकडे आकर्षित होते.

यावर शंका ४- मला जर प्रकाश आवडत नसेल जर मला कुंद पावसाळी ढगाळ हवा आवडत असेल तरी मी प्रकाशाकडेच आकर्षित व्हायचे का? कोणीही प्रकाशाव्यातीरीक्त अन्य सुंदर सौम्य तेजाबद्दल बोलत नाही.

या प्रकाशाचे वर्णन करताना तर सर्व NDEers च्या जिभेवर साक्षात सरस्वतीच नृत्य करू लागते. तो प्रकाश किती दयाळू, समजूतदार, नॉन-जजमेण्टल आहे ते सांगायचे अहमहमिका सुरु होते .मग हाच प्रकाश या व्यक्तीला तिचाच जीवनपट दाखवतो व NDEer ने अन्य जीवांना दिलेले दु:ख , वेदना, यातना तो उलगडून दाखवतो इतकेच नव्हे तर NDEer त्या दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून तेच दु:ख स्वत: भोगतात. मग NDEer ना जाणवते की ते किती आत्मकेंद्रॆत, स्वार्थी आयुष्य आजवर जगत आले वगैरे वगैरे. उपरतीच होते म्हणा ना.

शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????

मग पुढे NDEers ना त्यांचे जन्मजन्मान्तरीचे सुहुद, मित्र भेटतात. व हे मित्र त्यांना ज्ञानामृत पाजतात.

शंका ६- जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते? कोणीही NDEer ने परत आल्यावर या ज्ञानाच्या जोरावर एखादा गणिती सिद्धांत सोडवला आहे किंवा फार महत्वाचा नाही तर नको पण एखादा बारीकसा का होईना शोध लावला आहे असेही काही दिसत नाही.

सरतेशेवटी NDEer ना २ पर्याय दिले जातात परलोकातच रहाणे अथवा पृथ्वीवर परत जाणे. नाही जायचे म्हटले तरी त्याना "कार्य अपुरे आहे" या सबबीखाली सक्तीने पाठविले जाते. व परत आल्यावर "विशिष्ठ ध्येयाने झपाटून" ती व्यक्ती जीवन जगते वगैरे.

शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील? पण ते उत्पन्न charity ला जाते असे एकाही NDEer ने लिहिल्याचे ऐकिवात नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)आणि २) NDErs ना भूलोकी आरसा पाहणे व्यर्ज नसल्याने आपण कसे दिसतो हे पाहून धक्का बसत नाही, की त्यात बदल करायची इच्छाही होत नाही. अन्यथा त्यांनी आरशात बघून केव्हाच केला असता.

३) तिकडे विनोद घडत / करतही असतील पण NDEer ला आपण मेल्याचा अद्याप धक्काच असतो म्हणुन त्याचं लक्ष भलतीकडेच असावे.

४) तो प्रकाश माबोकर नसल्याने Handsome असू शकतो, म्हणुन आकर्षीत होत असतील.

अवांतर:
ध्वनीच्या तिप्पट वेगाने उडणारी विमानं जेव्हा हवाईदलात आली, तेव्हा त्वरणा दरम्यान अनेक वैमानिक काही काळा करता बेशुद्धावस्थेत जात. हे त्यावेळेस त्यांनी अनुभवलेल्या त्वरणामुळे गुरुत्वाकर्षण ७ पटीच्या जवळ परिमाण करते, आणि मेंदूस योग्य रक्तपुरवठा होत नाही यामुळे होते, याला G-Loc म्हणतात.
मग जेम्स व्हिनेरी यांनी यावर संशोधन केलं. G-Loc स्थिती आणण्यास त्यांनी मोठा सेन्ट्रीफ्यूज वापरला आणि त्यात अनेक वैमानिकांसोबत अनेक वर्षे प्रयोग केले. या वैमानिकांचे अनुभव आणि NDEers चे अनुभव सारखेच आहेत.
आपण त्रिमितीत नक्की कुठे आहोत याचे आकलन , दृष्टी नियंत्रण तसेच इतर कार्य/जाणिवांचे मेंदूत विविध ठिकाणी केंद्रे असतात. त्यांना रक्तपुरवठा कमी झाला की असे अनुभव येतात असे त्यांच्या निदर्शनास आले.

Thinking allowed म्हणून एक सिरीज आहे.युट्युबवर ,जरुर पहा. कॉन्शसनेस स्टडीज वर सिरीज आहे.

Not always true! (Copy pasted from https://www.near-death.com/religion/hinduism.html )
Have heard similar experience from my great grandmother.
1. Vasudev Pandey's Near-Death Experience

Vasudev Pandey was interviewed in 1975 and again in 1976. He was born in 1921 and had nearly died in his home of what he described as "paratyphoid disease" when he was about 10 years old. Vasudev had been considered dead and his body had actually been taken to the cremation ground. However, some indications of life aroused attention, and Vasudev was removed to the hospital where doctors tried to revive him, using "injections," with eventual success. He remained unconscious for 3 days and then became able to describe the following experience (as narrated to us in 1975):

Two persons caught me and took me with them. I felt tired after walking some distance; they started to drag me. My feet became useless. There was a man sitting up. He looked dreadful and was all black. He was not wearing any clothes. He said in a rage to the attendants [who brought Vasudev there]:

"I had asked you to bring Vasudev the gardener. Our garden is drying up. You have brought Vasudev the student."

When I regained consciousness, Vasudev the gardener was standing in front of me [apparently in the crowd of family and servants who had gathered around the bed of the ostensibly dead Vasudev]. He was hale and hearty. People started teasing him saying, "Now it is your turn." He seemed to sleep well in the night, but the next morning he was dead."

In reply to questions about details, Vasudev said that the "black man" had a club and used foul language. Vasudev identified him as Yamraj, the Hindu god of the dead. He said that he was "brought back" by the same two men who had taken him to Yamraj in the first place. Vasudev's mother, who died before the time of the interview, was a pious woman who read scriptures which included descriptions of Yamraj. Vasudev, even as a boy before his near-death experience, was quite familiar with Yamraj.

सर्वांचेच आभार. नानबा होय हा वाचला आहे त्या साईटवरती. काही हटके आहेत.
>>>>>>>त्यांना रक्तपुरवठा कमी झाला की असे अनुभव येतात असे त्यांच्या निदर्शनास आले.>>>> होय हे तर्कदेखील वाचलेले आहेत.
@केशव तुलसी - जरुर पाहीन. सुचवल्याबद्दल धन्स.

Many masters many lives navacha ek pustak ahe hya vishayavar, aprateem ahe nakki vacha!

बरेच प्रश्न जगात अनुत्तरित आहेत
.
जे आपल्याला सिद्ध करता येत फक्त त्याचाच विचार करून पुढे जाणे सोयीस्कर आहे
जगात अस्या खूप घटना आहेत त्याचे अस्तित्व आहे पण ते कोणत्याच माहीत असलेला सिद्धांत नी सिद्ध करता येत नाहीत

एक म्हणजे पुस्तक विकून / फिल्म वगैरे करून पैसा कमवण्यासाठी केलेला प्रपंच आहे , म्हणजे सगळं खोटं असा निष्कर्ष काढता येतो ... जर काहींचे अनुभव खरे असतील तर आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ते समजणं जवळजवळ अशक्य वाटतं .

धागा विनोदी लेखन गटात आहे हे लक्षातच आले नाही..
(सिरियस प्रतिसाद काढून टाकण्यात आला आहे)

Lol Lol

विनोदी लेखावर एवढे गंभीर प्रतिसाद का यायलेत?

> ४) तो प्रकाश माबोकर नसल्याने Handsome असू शकतो, म्हणुन आकर्षीत होत असतील. > फक्त माबोकर नाही, मराठी माणूस! अजून मोठा समूहगट Proud Wink

आता विषय निघालाचआहे तर पुरुष हँडसम वाटण्यासाठी आयताकृती चेहरा & प्रॉमिनंट जॉलाईन असावी लागते; पिअर्स ब्रॉसनन, हॅन्सी क्रोन्ये, टॉम क्रूझसारखी. मराठी माणूस शक्यतो गोल चेहऱ्याचा असतो.

मराठी माणूस शक्यतो गोल चेहऱ्याचा असतो.>> असे काही नाही आमच्या इथे एक अस्सल कोकण स्थ लुकचा इले क्ट्रिशिअन आहे. त्याचे अगदी अँगुलर जॉ व घारे निळे डोळे. नीट केस. दिसायला एकदम ग्रेट प्रोफाइल आहे. पुढे वयोमानाने सर्वांचेच फीचर्स सॉफ्ट होतात. चांगल्या लुक्स चा सर्च असा फिल्ट्र लाउन कधीही लिमिट करू नये कीप अ‍ॅन ओपन आय.


मराठी माणूस! अजून मोठा समूहगट Proud
>>

अमराठी माबोकर असू शकत नाही का? तो प्रकाश मराठी वगैरे प्रकारात नाहीय हे गृहीत धरलय, त्यामुळे सरळ दुसरा क्रायटेरिया लावलाय.

विनोदी लेखावर एवढे गंभीर प्रतिसाद का यायलेत? हो ना. NDEत पोचल्यासारखे गंभीर प्रतिसाद NDE धाग्यावरच आहेत, मृत्यूपश्चात अनुभवात लोक किती गंभीर असतील याची कल्पना येते बघा सामो.

>> Many masters many lives navacha ek pustak ahe hya vishayavar, aprateem ahe nakki vacha!>>> खूप ऐकले आहे खरे.
____
सर्व प्रतिसादकांचे आभार.

जाणाऱ्याचे अनुभव न जाणाऱ्याला विनोदी किंवा आनंदाचेही वाटत असतील. कारण तो ते सांगतोय म्हणजे तिथून परतलाय आणि त्याची पार्टीही असेल हा विचार.

NDE नंतर प्रकाश, यमराज असे परलोकातील साईडी कलाकार भेटल्याने माणूस अध्यात्मिक बोलायला लागतो. भेटला कुबेर किंवा भेटली लक्ष्मी आणि म्हणाली "मरतुकड्या, होते की रे कायमच प्रसन्न तुझ्यावर. करबुडव्या, इतका कंजूस का जगतोस? जा जिले अपनी जिंदगी". मग सिमरन जशी धावत पळत राजचा हात धरून आगगाडीत आली तसं ते मरतुकडं डोंबाने आग लावायच्या आत आपल्या कुडीत परत आलं.... तर असा माणूस नक्की करेल चॅरिटी.

हाहाहा
>>>>>>>> साईडी कलाकार>>>> =))
... मग सिमरन जशी धावत पळत राजचा हात धरून आगगाडीत आली तसं ते मरतुकडं डोंबाने आग लावायच्या आत आपल्या कुडीत परत आलं.... तर असा माणूस नक्की करेल चॅरिटी.>>>> हाहाहा सॉलिड!!

आजवर केलेल्या बचकाभर पुण्यामुळे खात्री होती की नरक मिळाला तरी यमराज निदान तिथे नेईपर्यंत रेड्यावरती बसू देईल. आता ह्या पोस्टीनंतर पैदल पैदल गाठावा लागणार... यमराजा, माफी दे रे! साईडी कलाकार असलास तर अर्शद वारसी सारखा फ्येमस रे तू...

नरक मिळाला तरी यमराज निदान तिथे नेईपर्यंत रेड्यावरती बसू देईल. >> पूर्वी बसू द्यायचे रेड्यावर.
आता जागतिक वेटलॉस मोहिमे अंतर्गत पायीच नेतात.

मनीम्याऊंंचा प्रतिसाद सुंदर होता , नंतर सावकाश परत वाचेन आणि सेव्हच करून ठेवीन म्हणत होते तर डिलीट करून टाकला आधीच Sad

मनीम्याऊ परत जरुर टाका तो प्रतिसाद. गंभिर असला म्हणुन काय झाले? सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे स्वागत आहे.

तो गंभीर प्रतिसाद पुन्हा येऊन आता NDEer सारखा वागायचा. Wink

बाकी मरणानंतरही वेटलॉसचा विचार करायचा असेल तर मेल्याचा काय फायदा??!!! जाऊ द्या नि ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे....

आई ग्ग!!! सीमंतिनी कसला भारी प्रतिसाद आहे वरचा Happy सुपर्कुल!!! एकदम आवडला.
तेजायला मरुनही वेट्लॉसचं भूत रहाणारच असेल तर .... Happy
___
>>>>>>>> तो गंभीर प्रतिसाद पुन्हा येऊन आता NDEer सारखा वागायचा. Wink>>>>> खी: खी:

- शंका ८
मृत्युपश्चात शरीर हलके होते, दॄष्टी व अन्य इंद्रिये लख्ख काम करु लागतात. फार सुंदर वाटते असे वाचलेले आहे. शिवाय मनोवेगाने कुठेही पोचू शकतो. जर इतके रमणिय असेल आणि मी जर युरोप भटकत राहीले, आणि प्रकाश कंटाळून निघून गेला तर काय? - ही चिंताही मला आजकाल भेडसावत असते.

- शंका ९
बरं सीमोल्लंघन करतेवेळी, आपल्याला मृत्युलोकामधुन, घ्यायला, अनेकानेक जन्मांचे प्रियजन येतात, असेही ऐकून आहे. परंतु तेवढा जन्मोजन्मीचा, आपला तेवढा लोकसंग्रह नसेल आणि आपल्याला घ्यायला कोणी फिरकलच नाही तर? :O

अशा नाना शंका भेडसावतात. Happy

सर्वच अनुभव खोटे आहेत असे विधान करता येत नाही.
मृत्यू पश्चात जग कसे असते हे सिद्ध करता येत नाही.
स्वतः अनुभवावं लागते.
आणि असा अनुभव प्रत्येकाला येईल ह्याची पण शास्वती नाही

Human body is organic material. Once person dies it will start biodegrading. senses will stop working. If left in a jungle it will disintegrate on its own. Religious funeral is not needed. Metal parts if any like teeth filling joint replacements will be left over.

Pages