बलात्काराची चिकित्सा व उपाय

Submitted by Asu on 1 December, 2019 - 09:50

हैदराबादला झालेल्या गॅंग रेपच्या निमित्ताने निर्भयाची आठवण झाली. आपल्याला क्षणाक्षणाला निर्भयाची आठवण होत रहावी असे प्रसंग घडतात यासारखे दुर्दैव नाही.
मी आतापर्यंत शक्य असेल त्या त्या वेळेस माझ्या लिखाणातून अशा नराधमांना लिंग विच्छेदनाची शिक्षा द्यावी असे सुचवलेले आहे. अशा शिक्षेमुळे अपराध्याला वैयक्तिक शिक्षा तर होईलच पण तथाकथित पुरुषत्वाची जखम आयुष्यभर चिघळत राहील आणि तो पुन्हा असा गुन्हा करू शकणार नाही. तसेच कमावता हात गमावून त्याच्या कुटुंबियांना त्याच्या या दुष्कृत्याची शिक्षा भोगावी लागणार नाही.

या निमित्ताने मी लिहिलेला 'बलात्काराची चिकित्सा व उपाय' हा लेख इथे शेअर करु इच्छितो.

'बलात्काराची चिकित्सा व उपाय'

बलात्कार एवढा सार्वत्रिक झाला आहे की, बलात्कारित स्त्री आणि बलात्कार करणारा पुरूष यासाठी ना वयाचे बंधन ना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वा राजकीय प्रतिष्ठेचे बंधन. आईच्या पोटात असलेल्या बालिकेला सोडून कोणत्याही वयाच्या बालिकेवर मरणाच्या दारात असलेला म्हातारा पण बलात्कार करू शकतो. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून रुग्णालयाचा सफाई कामगार, कुणीही, कुणावरही केव्हाही आणि कुठेही बलात्कार करू शकतो. द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१३च्या आकडेवारीनुसार भारतात स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या एकूण अत्याचारात बलात्काराचा चौथा क्रमांक आहे. या लेखात बलात्कार म्हणजे फक्त पुरुषाने स्त्रीवर केलेली बळजबरी असे गृहीत धरलेले आहे.

बलात्काराची कारणे-

मानवजातीच्या उदयापासून अस्तापर्यंत, जोपर्यंत निसर्गाने स्त्री पुरुष निर्माण केलेले आहेत तोपर्यंत बलात्कार होतच राहणार. फक्त ते कमीत कमी कसे होतील किंवा त्यांच्या परिणामांची तीव्रता कशी कमी करता येईल, एवढेच आपण करू शकतो. बलात्काररहित समाज ही कवीकल्पना किंवा दिवास्वप्न आहे.
मानवजातीच्या सातत्यासाठी आणि वंशवृद्धीसाठी (propagation of race) निसर्गाने स्त्री व पुरुष म्हणजेच नर व मादी निर्माण केले. त्यांच्या संबंधातून पुढील पिढ्या निर्माण व्हाव्यात म्हणून निसर्गतःच त्यांच्यात आकर्षण व वासना निर्माण केली. पुढची उन्नत पिढी निर्माण करणे हे म्हणूनच माणसाचे जीवशास्त्रीय कर्तव्यच ठरते. मानव रानटी अवस्थेत असताना, इतर प्राण्यात असतात तसेच त्याचे स्वैर शरीरसंबंध होते. त्यावेळीही, बलात्कार होतच असतील पण, ‘बळी तो कान पिळी’ (servival of the fittest) या न्यायाने ते अनिवार्य होते. नंतर मानवाची उत्क्रांती होत गेली, शेतीचा शोध लागला व मानव एका जागी स्थिर झाल्यावर त्याच्यात संपत्ती किंवा मालमत्ता या संकल्पनेचा उगम झाला आणि मुलगी ही वडिलांची व बायको ही नवऱ्याची मालमत्ता ठरली. मालमत्ता म्हणजे आपला संपूर्ण हक्क असणे. ज्या स्त्रीशी पूर्वी दुसऱ्या पुरुषाचाही शरीरसंबंध येत होता, ती आता कुणा एकाच पुरुषाची मालमत्ता झाली. म्हणजेच स्त्री ही पुरुषाची दासीच झाली.
वर्णसंकर होऊन आपल्या मालमत्तेचे दुसऱ्याला वाटप होऊ नये म्हणून व स्त्री आपली कायमची गुलाम राहावी म्हणून पुरुषसत्ताक समाजाने पुरुषधार्जिणे नितीनियम तयार केले. त्यातूनच योनीशुचितेचा उगम झाला असावा. योनीशुचितेचे स्तोम माजवून पुरुष स्त्रीविरुद्ध बोंब मारायला मोकळा राहिला. योनीशुचितेचा नितीअनितिशी संबंध जोडला गेला. पुरुषांना मात्र लिंगशुचिता नाही.
त्यामुळे, मनाविरुद्ध जरी परपुरुषाशी संबंध आला तरी, स्त्री भ्रष्ट, पतित म्हणून अपमानित झाली. म्हणून तिला आश्रयासाठी, रक्षणासाठी पुरुषांची वेठबिगारी करणे भाग पडले. एखाद्या पुरुषाचा बदला घेण्यासाठी किंवा त्याला अपमानित करण्यासाठी त्याच्या स्त्रीवर बलात्कार करणे, हा एक राजमार्ग झाला. त्यात स्त्रीचा बळी गेला. लिंगभ्रष्ट पुरुष मात्र आजही उजळ माथ्याने वावरतो. त्याच्या प्रतिष्ठेला त्यामुळे बाधा येत नाही. किंबहुना अनेक स्त्रियांशी अनैतिक शरीरसंबंध असणे हा पौरुषत्वाचा जणू पात्रता निकषच आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे स्त्री पुरुषात वासना ही वंश सातत्याच्या दृष्टीने निसर्गतःच असते. खरं तर, ती एक उपजत सहज प्रवृत्ती (instinct) आहे. ज्याप्रमाणे, जगण्यासाठी भूक लागल्यावर उदरभरण आवश्यक असते त्याप्रमाणेच, वासना जागृत झाल्यावर तिचे शमन होणेही आवश्यक असते. पण, आपण आता सुसंस्कृत अशा मानव समाजाचे भाग आहोत. त्यामुळे आपल्याला वासना समाजमान्य मार्गाने आणि नियमांनीच शामवावी लागते. ‘झाली वासना जागृत की केला संबंध’ असे करता येत नाही. कदाचित रानटी अवस्थेत तसे होत असावे. आता मात्र स्थळ, वेळ, काळ व परिस्थिती पाहूनच समाजाच्या नितीनियमांतर्गत समाजस्वीकृत मार्गानेच आपल्याला वासना शमवावी लागते. यालाच आपण सुसंस्कृतपणा म्हणतो. थोडक्यात, आपण सुंस्कृतपणाचे कपडे घातले असले तरी, आत नागडेच असतो. सुसंस्कृतपणाचे कपडे गळून पडले की, आपण नागड्या अवस्थेत जाऊन रानटी वर्तन, म्हणजे बलात्कार करतो. कारण, गरज भागविणे ही रानटीपणाची प्राथमिकता असते, सुसंस्कृतपणा नव्हे. सुरक्षित संधी मिळाल्यास प्रामाणिकपणे सांगायचे तर, किती पुरुष असहाय्य स्त्रीचा गैर फायदा घेणार नाहीत? तत्कालीन राजकीय नितीनियमांनुसार अनुकूल परिस्थिती असतांना शत्रूच्या सुंदर स्त्रीला आपल्या जनानखान्यात भोगदासी न बनविता मातेसमान मानून सन्मानाने स्वगृही पाठविणारा एखादाच शिवाजी राजा!
आपल्याला पाहिजे त्या क्षणी, एखादी अप्राप्य गोष्ट हवी असल्यास ती मिळविण्याचे मार्ग म्हणजे, पैशाने विकत घेणे किंवा फसवून शक्तीच्या बळावर बळजबरीने ती प्राप्त करणे. हीच गोष्ट वासनेच्या बाबतीत होते. त्या क्षणैक गरजेपोटी आपण एखाद्या स्त्रीचे आयुष्य उध्वस्त करतो आहे याचे भानही त्यावेळी रहात नाही. कारण, मानगुटीवर वासनेचे भूत स्वार असते.

बलात्कार टाळण्यासाठी उपाय -

१) वैयक्तिक - बलात्काराच्या संबंधात शारीरिकदृष्ट्या मानसिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या स्त्रीचे सबलीकरण व पुरुषाचे संस्कारीकरण करणे.
जेव्हा एखाद्या स्त्रीवर एक पुरुष बलात्कार करतो, त्यावेळेस खरं तर, आपल्यावर आता बलात्कार होणार, या भावनेने ती स्त्री आधीच गर्भगळीत झालेली असते किंवा मानसिकरीत्या खचलेली असते. त्यामुळे, लढण्याची किंवा समोर असलेल्या परिस्थितीशी धीराने सामना करण्याची ताकदच ती गमावून बसते. अन्यथा, एका पुरुषाशी एक स्त्री तेवढ्याच ताकदीने लढा नक्कीच देऊ शकेल व स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकेल. त्यामुळे, स्त्रीने अशावेळी घाबरून न जाता भान ठेवून आपल्यात लढाऊ वृत्ती जागविणे आवश्यक आहे.
दुसरे असे की, प्रत्येक पुरुष हा कितीही जवळचा नातेवाईक असला तरी, तो देखिल संभाव्य बलात्कारी (Potential raper) असू शकतो. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ही संभाव्यता लक्षात ठेऊनच त्यांच्याशी सांभाळूनच वागायला हवे व काही विचित्र वा शंकास्पद वाटल्यास विश्वासातील जबाबदार व्यक्तीला त्याबद्दल सांगायला हवे. असे आढळून आले आहे की, ९८ टक्के बलात्कार हे ओळखीच्या पुरुषांकडूनच होतात.
बलात्कार झाल्यावर सामाजिक मानहानीच्या भीतीने असा अन्न्याय दडपून न ठेवता त्याबद्दल पोलिसात लवकरात लवकर तक्रार करावी. भारतात फक्त लाखात दोन स्त्रियाच अशी हिंमत दाखवतात असे आढळून आले आहे. याचे कारण आपली समाजव्यवस्था! कोणत्याही स्त्रीवर केव्हाही, कुठेही, कोणाकडूनही बलात्कार होऊ शकतो याची जाणीव ठेऊन स्त्रीने जागरूक राहायला, समर्थ बनायला हवे. निर्मनुष्य ठिकाणी किंवा एकांतात जाण्याचे टाळावे. तसेच, स्वसंरक्षणासाठीची साधने जसे की, चाकू, तिखट फवारा किंवा तत्सम साधने कायम जवळ बाळगायला हवी. कराटे वगैरे सारखे स्वसंरक्षणाचे शिक्षण घ्यायला हवे.
कुटुंबातील मुलांना लहाणपणापासूनच स्त्रीचा सन्मान करायचे, किमानपक्षी बरोबरीची वागणूक द्यायचे संस्कार करायला हवे. अर्थातच, घरातल्या वडीलमाणसांनी या गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणायला हव्या. मुलींनी देखिल, त्या मुलांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नाहीत, ही बाब मनावर बिंबवली पाहिजे. मुलामलींमध्ये लिंगभेदाव्यतिरिक्त काहीही फरक नसतो, ही गोष्ट वडीलधाऱ्यांनी स्वतः मानायला पाहिजे. मुलामुलींना वागवितांना कोणताही भेदभाव न करता दोघांनाही सारखेच वागविले पाहिजे जेणेकरून मुले खऱ्या अर्थाने सुसंस्कारित होतील.

२) सामाजिक - सर्वप्रथम योनीशुचितेचे स्तोम कमी केले पाहिजे. योनीशुचितेचे पावित्र्य राखणे ही पुरुषाचीही जबाबदारी आहे. त्याचे दायित्व फक्त स्त्रीवरच का?
समाजानेही बलात्कार हा इतर कोणत्याही शारीरिक अपघाताप्रमाणे एक अपघात मानला पाहिजे. अपघातात हातपाय मोडला, तरी त्यावर उपचार करून वा अपंगत्व स्वीकारून आपण सन्मानाने आयुष्य जगतोच ना ? बलात्कारित स्त्रीच्या शरीरावर तर आघात होतोच, पण त्यापेक्षाही मनावर जास्त आघात झालेला असतो. या अपघाताने आधीच तिला कायमस्वरुपी मानसिक अपंगत्व आलेले असते. असे असतांना, समाजाने तिच्यावर आणखी आघात का करावा? खरे म्हणजे, स्त्रीचा काहीही दोष नसतांना बलात्कारित म्हणून जगणे नशिबी आलेल्या स्त्रीला आणखी अपमानित न करता तिला शारीरिक, मानसिक व आर्थिक आधार देऊन तिचे सन्मानाने सामाजिक पुनर्वसन व्हायला हवे. बलात्कारित स्त्रीला तिचा काहीही गुन्हा नसतांना पुरुषी क्रौर्य सहन करून सामाजिक शिक्षा सहन करावी लागते. हे थांबायला हवे. बलात्कार करणारा खरा गुन्हेगार पुरुष मात्र समाजात नेहमीसारखाच उजळ माथ्याने वावरतो. खरं तर अशा पुरुषांवर समाजाने बहिष्कार टाकायला हवा, त्याला वाळीतच टाकायला हवे.
मातृत्व हे स्त्रीला दिलेले वरदान आहे, असे आपण म्हणतो, पण अशा बाबतीत तो निसर्गाने स्त्रीला दिलेला शाप ठरतो. पुरुष मात्र विश्वामित्री पवित्रा घेऊन नामानिराळा! बलात्कारित स्त्रीला अशा लादलेल्या संबंधातून गर्भधारणा झाली असली वा नसली तरीही, समाजात सन्मानाने जगता आले पाहिजे. आवश्यक असल्यास आणि शक्य असेल तर त्या स्त्रीचा गर्भपात करून तिला पूर्वीप्रमाणेच जगता आले पाहिजे.

३) वैधानिक- सध्याची बलात्काराची व्याख्या ही पुरुषधार्जिणी आहे व ती सर्वसमावेशक अशी नाही. तरी, ती स्त्रीला न्याय देईल अशी, म्हणजेच लिंगभेदरहित व सर्व समावेशक असावी. तसेच, बलात्काराच्या शिक्षेबाबत पुरुषाच्या लिंगविच्छेदनाचाही विचार व्हावा. कारण, सराईत बलात्कार करणारे केवळ ५-१० वर्षांच्या शिक्षेने सुधारतील, ही अपेक्षा व्यर्थ आहे. उलट, असे सराईत गुन्हेगार त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्यांचा सूड घेण्यासाठी आणि पुन्हा बलात्कार करण्यासाठी तुरुंगातून सुटण्याची वाट पहात असतात. बलात्कार करणारांची वक्तव्ये तसेच त्यांच्या वकिलांची वक्तव्ये आणि काही न्यायाधिशांचे विचार ऐकल्यावर याची खात्री पटेल की, अशा लोकांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन बदलणे केवळ अशक्य!
त्यामुळे, बलात्कार करणाऱ्याला अशी जबर शिक्षा व्हायला पाहिजे, की बलात्कार करण्याआधी तो दहादा विचार करेल आणि बलात्कार केलाच असेल तर त्याला जन्माची अद्दल घडेल. माझ्या मते सर्वात जबर शिक्षा म्हणजे बलात्काऱ्याचे लिंग विच्छेदन! त्याच्या अवास्तव पुरुषत्वाचे साधन आणि पुरुषी अहंकार ज्यात सामावलेला आहे, ते लिंगच उरले नाही, याची जाणीव हीच सर्वात मोठी शिक्षा होऊ शकते. तसेच, लिंगच कापले गेल्याने तो आयुष्यात पुन्हा बलात्कार करू शकणार नाही. पण, त्याच्या शारीरिक कौशल्यावर किंवा क्षमतेवर फारसा फरक न पडल्याने तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा भारही पूर्वीसारखाच उचलू शकतो. म्हणजे, त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबाला भोगावी लागणार नाही. जी आता त्याच्या तुरुंगवासामुळे त्यांना भोगावी लागते. तुरुंगवास कमी करून त्याच्या कुटुंबाचा आधारही कायम ठेवता येईल आणि कुटुंबाला नुकसान न पोहोचता बलात्काऱ्याला जरब बसेल, अशी जबर शिक्षाही होईल.
अर्थातच, वर सुचविलेला लिंग विच्छेदनाचा उपाय हा तज्ञ व्यक्तींशी चर्चा करून कायद्याच्या चौकटीत आणि वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे अपेक्षित आहे. फारतर, जी व्यक्ती पुन्हा दुसऱ्यांदा बलात्कार करण्याची हिंमत करेल, अशाच व्यक्तीला ही शिक्षा द्यावी. या शिक्षेबद्दल फारसे विचारमंथन झाल्याचे दिसून येत नाही. तरी, कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजकारणी व्यक्ती, वैद्यकीय तज्ञ अशा सर्व संबंधित क्षेत्रातील तज्ञांनी खरोखरच विचारमंथन करणे गरजेचे आहे.
******
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

समूहातील सर्व सभासदांना आग्रहाची विनंती आहे की, मी वरील लेखात सुचविलेल्या 'बलात्काऱ्याचे लिंग विच्छेदन' करण्याच्या शिक्षेबाबत मतप्रदर्शन करावे‌. जेणेकरून, या शिक्षेचा कायदेशीर शिक्षेत अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने विचारमंथन घडून एक चळवळ उभी राहावी. ही अपेक्षा!

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

समूहातील सर्व सभासदांना आग्रहाची विनंती आहे की, मी वरील लेखात सुचविलेल्या बलात्काऱ्याचे लिंग विच्छेदन! करण्याच्या शिक्षेबाबत मतप्रदर्शन करावे‌. जेणेकरून, या शिक्षेचा कायदेशीर शिक्षेत अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने विचारमंथन घडून एक चळवळ उभी राहावी. ही अपेक्षा!

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

Group content visibility: 
Use group defaults