नोकरीच्या शोधात..

Submitted by बुन्नु on 30 November, 2019 - 09:42

माझा एक मित्र आहे जो सध्या नोकरीच्या शोधात आहे. या मित्राचे शिक्षण कलेच्या क्षेत्रात झालेले आहे. त्यांनी आर्ट स्कूल मधून पदवी घेतलेली असून काही वर्ष चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट साठी चे मार्गदर्शन क्लासेस चालवले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून काम केले. म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे.
गेले काही वर्ष त्यांनी स्वतः चा इंटेरियर डिझाईन चा व्यवसाय सुरू केला होता.
सध्या काही दिवसांपासून त्या क्षेत्रात जास्त काम नसल्याने त्यांना तो व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. या कारणास्तव ते आता नोकरीच्या शोधत आहेत, आणि त्यांना त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाशी संबंधित नोकरी हवी आहे. मुंबई, पुणे किंवा इतर शहारात देखील चालेल.
कृपया या क्षेत्रात काही संधी असतील तर सुचवा किंवा नोकरी संबंधी मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. बाहेरील देशातही काही संधी मिळू शकतात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users