नवऱ्याची मैत्रीण . . .
लग्नाआधीची नवऱ्याची जवळची मैत्रीण, हा विषय म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या कपाळाला आठ्या आणणारा विषय,
त्यात ते अजूनही जवळचे मित्र मैत्रीण असतील तर ह्या विषयावरून नवरा बायकोत हमखास पेटते, आणि कहर म्हणजे ते एकमेकांसोबत व्हाट्सअप फेसबुक वरून रोज बोलत असतील तर मग सांगायलाच नको. . .
अशाच एका विषयावर एक काल्पनिक कथा लिहण्याचा प्रयत्न . . .
मी वृंदा, मी माझा नवरा सारंग, आई बाबा, दीर असं आमचं कुटुंब, आई बाबा मुलीसारखी आणि दीर बहिणीपेक्षा जास्त जीव लावतो, तसं मी सगळ्यांना लग्नाच्या आधी पासूनच ओळखते, मी सारंगच्या चुलत मामाची मुलगी,
आईने आधीच मला सारंग साठी पसंत केली होती, आणि माझ्या बाबांनीपण होकार दिला होता, हे मला आधीपासूनच माहित होत फक्त सारंगला माहित नव्हतं आधी,
तर माझा सारंग, सांगू तेवढं कमीच आहे त्याच्या विषयी, म्हणजे,
असाच होता मनात माझ्या माझा साजन गं, स्वप्नी पहिला तसा भेटला माझा साजन गं ...
कृष्ण सावळा वर्ण, शरीराने सुदृश, उंच, पाणीदार डोळे, आणि निर्मल हास्य, डोळ्यांत कायमच सगळ्यांसाठी माया जिव्हाळा असतो त्याच्या, त्याने माझा हात हातात घेऊन आयुष्यभर त्या प्रेमळ नजरेत कैद करावं मला कायमच असं वाटत राहतं,
कधी कोणाला उलट बोलणार नाही, कोणावर ओरडणार नाही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मन जपणारा,
त्याचा स्वभाव इतका गोड़ आहे ना, मी त्याच्या सोबत एक दोन महिने जी व्यक्ती राहील ती त्याच्या नक्कीच प्रेमात पडेल,
जशी मी पडलीये त्याच्या प्रेमात . . .
देव माणूस म्हणावा अगदी तसा आहे माझा सारंग, देवाचे आभार मानू तितके कमी आहेत असा साथीदार दिल्याबद्दल .. .
माझ्यावर तर खूप प्रेम करतो, मी सांगेल ते आणून देतो, आणि ह्या तीन वर्षाच्या संसारात एकदा हि आमचं भांडण झालं नाही, तो काही वाईट वागलेलं मला आठवतच नाही,
आई बाबांचा खूप आदर करतो, अजूनही बाबा म्हणतील तोच शेवटचा शब्द, त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाही हो, आईवर हि खूप प्रेम आहे त्याच फक्त किंचित एकमेकांमध्ये दुरावा जाणवतो मला, मी खूप वेळा विचारलं पण काहीच नाही असंच दोघे म्हणाले, असो असेल काही . . .
आणि मी, दिसायला तशी मध्यम आहे, म्हणजे पहिल्या नजरेत कुणी माझ्या प्रेमात पडेल अशी मुळीच नाही, माझ्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला सहज मिळाली असतीही तरीही त्याने आई बाबांच्या इच्छेसाठी माझ्याशी लग्न केलं आणि मी खूप सुखी आहे त्याच्या सोबत . .. .
पण कधी कधी असं वाटतं इतक्या चांगल्या माणसाला एखादी तरी जवळची मैत्रीण असेलच ना, मी असंच खूप वेळा विचारलं देखील त्याला पण तू आहेस ना माझी मैत्रीण अजून कशाला कोण हवी इतकंच म्हणतो आणि विषय बदलतो,
पण असंच कधीतरी मी त्याला विचारांत हरवलेला पहिला आहे, कधीतरी अचानक भरलेले डोळे, तर कधी मोबाईल स्क्रिन कडे एकटक भावुक होऊन पाहताना पाहिलं आहे,
तेव्हा मला खूप टेन्शन यायचं, मी दोन तीन वेळा खोदून खोदून विचारलं देखील पण काही साध्य झालं नाही,
त्याच्या नकळत मी त्याचा मोबाईल पण चेक केलाय, पण ना कोणी अनोळखी फोटो मिळाला ना अनोळखी फोन नंबर,
संशय घ्यावा असा माणूस तो नाहीच, त्यामुळे मी सोडून दिल होतं, शोध घ्यावा असं कधी वाटलं नाही मला पण आज वाटलं . . .
आज माझ्या घरी एक मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली होती, पत्रिका जाऊदेत, मी स्वतः मुलगी असून तिच्याकडे वेड्यागत पाहत राहिले, इतकी सुंदर दिसत होती ती,
माझ्या इतकीच उंचीला पण एकदम मेंटेन्ड बॉडी, नक्कीच योगाभ्यास करत असावी, सुंदर लाघवी हास्य, फिक्कट निळ्या रंगाची साडी पदर एका बाजूने मोकळा सोडलेला, एका बाजूने खुले सोडलेले तिची लांब सडक केसं, बापरे किती सुंदर होते ते, कॉफ़ी रंग आणि छान अशी चमक, तिची इतकी लांब आणि सुंदर केसं पाहून मला माझ्या हातभर केसांची कीवच आली, उजव्या हाताला घड्याळ आणि डाव्या हातात पर्स, तिच्या सावल्या सौंदर्यावर हे सगळं खुलून दिसत होतं, आणि तशीही कोणतीही अविवाहित मुलगी साडी मध्ये खूप सुंदर दिसते आणि हि तर कडक दिसत होती. . . अजून एक पेज लिहता येईल इतकी सुंदर होती ती पण जास्त तारिफ नको ना. . .
मी घरात एकटीच होते, तिने सरळ दारात उभी राहून सारंगच घर हेच का?? असं विचारलं . . .
मी ह्या आधी तिला कधीच पहिली नव्हती, मी हो सांगून तिला आत यायला सांगितलं, किती गोड़ हसते ती,
तू वृंदा ना?? मला तिने कसं ओळखलं मला प्रश्नच पडला.
मी तिला विचारलं देखील तुम्ही मला आणि सारंगला कसे ओळखता म्हणजे मी तुम्हाला ह्या आधी कधीच पाहिलं नाही वैगेरे ,
मग तिने सांगितलं कि मी आणि सारंग खूप चांगले मित्र होतो, तुझा सागर दादा आहे ना तोही ओळखतो मला.
सारंगची मैत्रीण आहे पण सारंगने कधीच हिच्या विषयी मला सांगितलं नव्हतं, माझ्या मनात खूप विचार येत होते पण मी ते बाजूला केले.
ती खूप काही सांगत होती, छान बोलत होती, खूप आपुलकीने घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. मला तर काही कळतच नव्हतं ती सगळ्यांना ओळखते मग मलाच कशी माहित नाही हि,
ती इतकी सुंदर मराठी बोलत होती, इतकी स्पष्ट शुद्ध आणि अस्खलित कि मला तिच्या सोबत बोलायला शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती, आम्ही आपली साधी गावरान मराठी बोलतो, कधीच तरी शुद्ध, पण तिच्या समोर मला माझ्या भाषेची किंचित लाज वाटली . . .
ती नक्कीच खूप शिकलेली असणार, विचारू का हिला ??पण घरी आलेल्या पाहुण्याला त्याच शिक्षण कसं विचारणार?? ती थोडीना मुलगा पाहायला आलीये, मी माझ्याच विचारांवर हसले. . .
तिला मी चहा नाश्ता विचारला पण काही न घेता माझ्या जवळ प्रेमाने बसली,
माझ्या हातात तिच्या लग्नाचं कार्ड आणि दोन कॅडबरी डेरीमिल्क मोठे वाले देऊन म्हणाली,
" मी इकडे नसते राहायला, पण बाबांची इच्छा आहे कि माझं लग्न गावाकडेच व्हावं, त्यामुळे इकडे येणं झालं, आलीच आहे तर म्हटलं सारंग आणि तुला भेटूनच जावं, तुमच्या लग्नात तर मला नाही जमलं यायला पण तुम्ही सगळे आवर्जून या, मी वाट पाहीन सगळ्यांची, प्लिज सारंगला सांग मी आले होते म्हणून, त्याला सांग त्याला यायचंच आहे माझ्या लग्नात नाहीतर मी रागवेन, आणि एक सांगू खूप लकी आहेस तू जे तुला सारंग मिळाला"
इतकं म्हणून ती गेली . . .
ती गेली आली माझ्या डोक्यात विचारांचे किडे सोडून गेली, एकतर ती सारंगला एकेरी नाव साद घालत होती, म्हणजे ते जवळून एकमेकांना ओळखत असणार.
मैत्रीण आहे मग मला कधी बोलला का नाही?? मी कितीवेळा विचारलं पण हिच्या विषयी कधीच काही बोलला नाही, का?? त्याने मुद्दाम लपवून ठेवलं का माझ्यापासून ??? कि अजून काही . . .
संशय नाही पण नको नको ते विचार मन व्यापू पाहत होते, संध्याकाळी काय ते कळेलच सारंग आला कि म्हणून मी सगळे ते विचार गॅस वर पेटवून स्वतःला कामात गुंतवून घेतलं,
तरीही तिचे विचार मनात येत होते, ती किती सुंदर दिसते, तिची हसण्याची स्टाईल, भाषा, तिची केसं, आपल्या सारखीच असून देखील आपल्यापेक्षा किती वेगळी आणि सुंदर दिसते ती, मी हि तिच्या सारखी दिसायचा प्रयत्न करेन, वृंदा किती गचाळ राहतेच तू, सुधर जराशी, अशे काही बाही विचार करत, कधी संध्याकाळ झाली कळलं देखील नाही . . .
सारंग आला, जेवण उरकलं, मीही पटापट कामं उरकून माझ्या रूममध्ये गेले. सारंग नेहमी सारखा मोबाईलवर मेसेज वैगेरे चेक करत बसला होता. मला पाहून नेहमी सारखा मी बाजूला बसावी म्हणून सरकला.
मी कार्ड आणि कॅडबरी त्याच्या हातात दिले, त्याने माझ्या कडे पाहून हे काय असं विचारलं.
ते एक मुलगी आली होती आपल्या घरी तुला विचारात होती, म्हणे तुझी जवळची मैत्रीण आहे, आणि सगळ्यांना नीट ओळखत होती ती, मग माझ्या पासून का लपवलं तू तुझी कुणी मैत्रीण आहे म्हणून??ते वाच आधी आणि सांग मला कोण आहे नक्की ती . . . मी नाटकीच रागावले
काहीही काय बोलतेस वेडे तू, जुन्या ऑफिसच्या मॅम वैगेरे असतील,असं म्हणून त्याने ते कार्ड उघडलं. त्याने कार्ड मध्ये ते नाव वाचल आणि तो बिथरलाच, त्याची नजर कावरी बावरी झाली होती, ते वाचून जणू त्याचा श्वास जागीच थांबला असावा असं काहीतरी, किंचित धाप लागल्यागत झालं त्याला, मी विचारलं काय झालं??
पाणी . .. पाणी देतेस का प्लिज . ..
मी पळत जाऊन पाणी घेऊन आले, पाहते तर तो सावरलेला दिसत होता, पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या, आणि त्याने घाईघाईत पुसल्या असाव्या त्यामुळे ते लगेच लक्षात येत होतं,
काय झालं रे ??? मी विचारलं तर म्हणाला, डोकं दुखतंय अचानक, झोपलो कि बर वाटेल असं म्हणाला, तो थोडा वेळ तसाच हरवल्यासारखा बसून होता,
तसं आमच्यामध्ये मीच जास्त बोलते, म्हणून मीच सुरुवात केली,
किती गोड़ आहे रे ती, मी जर मुलगा असते ना तर कधीच तुला सोडून तिच्या मागे लागले असते,
बळेबळेच हसला तो,
सांग ना रे नक्की कोण आहे ती???
अगं खरंच फक्त ओळख होती इतकंच, तुझ्या सागर दादा आणि माझी चांगली ओळख होती, खूप वर्ष आधी सोडून गेली होती ती सगळं, हे गाव, इथल्या ओळखी आणि सगळंच.
आता कुठे रहरे काय करते काही माहित नाही आणि माहित करून तरी काय करणार. . . त्याने एक मोठा सुस्कारा सोडला,
खूप डोकं दुखतंय झोपुयात आपण, असं म्हणून तो मला पाठ करूनच झोपला . . .
डोकं कसं दुखेल असं अचानक?/ आणि कार्ड वाचायच्या आधी ठणठणीत होता हा?? तीच नाव वाचून ह्याला काहीतरी झालं??
नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, हा काहीतरी लपवतोय माझ्यापासून, पण काय??
ह्याच तिच्यावर प्रेम वैगेरे???
ह्या नुसत्या विचारानेच मी घाबरले, मी माझ्या मनाची समज घातली,
नाही नाही कसं शक्य आहे, तो असा नाहीये, वृंदा मुर्खासारखी काहीही विचार करू नकोस, शांत हो, असं काहीच नसणार आहे,
मी खूप डिस्टर्ब झाले होते, त्याला पाहिलं तर तो कदाचित झोपला होता.
खूप प्रयत्नांनी मी माझ्या विचारांना दूर लोटले, ते काय आहे ना, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि तो माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला प्रेम करत असेल हा विचार सहन नाही होतं ना.
असो,
मी हि झोपले होते पण दोन तीन तासांनी मला माझ्या बाजूने दबलेल्या हुंदक्यांचे आवाज येत होते,मी अर्थातच झोपेत होते, पण कुणी तरी उशीत तोंड कोंबून रडल्याचं मला स्पष्ट जाणवत होतं,
मी तर खूप घाबरले होते मी आधी सारंगला उठवायला वळले होतेच, तर तोच डोळे पुसत चोळत उठला, मी पटकन डोळे बंद केले, तो अजूनही हमसत होता,
आई शप्पत म्हणजे हा, स्वतः रडत होता??? का?? विचारावंस वाटलं तर त्याने दुसऱ्या हाताने ते कार्ड बाजूला ठेवलं आणि वॉशरूमला गेला, मी पाहिलं तर कार्ड ओलं होतं,
म्हणजे हा तिच्याच मुळे??/
आता रडायची वेळ माझी होती, एकतर ती इतकी सुंदर होती कि तिच्यासाठी कुणीही माझ्या सारख्या शंभर बायका सोडेल,
तो फ्रेश होऊन आला, मी झोपायचं नाटक केलं, माझ्या उश्या शेजारी बसून माझं डोकं कुरवाळत बसला काही क्षण, मला काहीच सुचत नव्हतं,
पुन्हा नको विचारूस ती माझी कोण आहे ? मी नाही सांगू शकणार आणि तू समजूही नाही शकणार, स्वतःच्या विस्कटलेल्या आयुष्याची काय ओळख सांगू तुला मी .
पण मी आपली नात्याशी एकनिष्ठ आहे आणि कायमच राहीन.
इतकं म्हणून तो झोपला . . .
मी जागीच थरारले होते, तो झोपला आणि माझी झोप मात्र उडाली होती कायमची . . .
म्हणजे सारंग आणि मारवा . . . सारंग तिच्यावर प्रेम . . .
मला हे वाक्य मनातल्या मनात देखील पूर्ण करायची हिम्मत होत नव्हती, विचारांमध्येच पहाट झाली, मी रात्रभर जागीच होते,
सकाळी उठले, डोकं खूप दुखत होतं, त्यापेक्षा मनात काहीतरी जड जड वाटत होतं, कसेतरी सकाळची कामे उरकली, नाश्त्याला सगळे आले, पण सारंग कुठेच नव्हता,
कोणाला काही न सांगता देव जाणो कुठे गेला होता, मी त्याच्यासाठी नाश्ता काढून आवरा आवर करून घेतली,
३ तास होऊन गेले ह्या माणसाचा पत्ता नाही, म्हणून मी त्याला कॉल केला, तर फोने रूम मधेच, ऑफिस ला कॉल केला, दोन वेळा कुणी उत्तर दिलं नाही, माझा जीव कासावीस झाला होता,
पुन्हा केला तेव्हा कुठे फोन उचलला गेला, विचारलं तर तो ऑफिस ला गेलाच नव्हता, आता माझं डोकं खराब झालं होतं,
हा नक्कीच तिला भेटायला गेला असणार, मी आतल्याआत धुमसत होते, घरी येउदेत मग सांगते वृंदा काय आहे ते, सागर दादाला विचारून उगीच घरात सगळ्यांना कळलं असत म्हणून मी त्यांना हि काही विचारलं नाही.
माझ्या डोक्यात विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं, मला कसले कसले विचार येत होते, सारंग आणि मारवा एकमेकांना भेटत आहेत, तो तिच्याकडे एकटक पहाट आहे, ती लाजतेय, त्याने तिचा हात हातात घेतलाय, ती अलगद त्याच्या मिठीत शिरतेय,
मला संशय नव्हता घ्यायचा त्याच्यावर पण आता जे घडत आहे, ते डोळ्यांसमोर ते मी डोळसपणे कसं झिडकारू??
शेवटी बायकोच मन आहे ते, मी कसं सहन करणार होते ते, माझा प्रचंड मनस्ताप होतं होता.
तो घरी आला कि मी सरळ त्याला विचारणार होते, शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे . . .
संध्याकाळी नेहमीपेक्षा एक तास उशिराच तो घरी आला, चेहरा उतरलेला दिसत होता, तरीही कृत्रिमपणे हसण्याचा प्रयत्न करत होता,
मला वाटून गेलं, हा आजच असा मुखवटा घेऊन हसतोय कि आधीपासूनच असा आहे, कि मी नीट लक्ष दिलंच नाही त्याच्याकडे,
त्याच्या हसणाऱ्या चेहर्या मागे त्याचा खरा चेहरा असावा का?? ज्यावर भूतकाळाचे काळे व्रण असावेत.. .
माझं काही चुकलं आहे का?? कि मीच ओळखू शकले नाहीये त्याला??माझं मन नकळत दुहेरी विचारांत हरवून गेलं. . .
मी स्वतःला सावरलं, असेल ते असेल पण जे घडत हे त्याचा आधी सोक्षमोक्ष लावायला हवा, मी रूम मध्ये गेले, सरळ दार लावून घेतलं आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला
कुठे गेला होतास न सांगता आज???
" सॉरी, अगं ऑफिसला अर्जेंट काम निघालं, म्हणून लगेच न सांगता जावं लागलं, आणि चुकून फोन घरीच राहिला" तो कसातरी नजर चोरून म्हणाला . .
हा चक्क खोटं बोलला माझ्याशी, माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता, इतके वर्ष ज्या माणसाने माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाही तो माणूस चक्क खोटं बोलतोय माझ्या तोंडावर,माझी तळपायाची आग मस्तकात गेली,
शांत वैगेरे गेलं खड्ड्यात, हा बाहेर जाऊन शेण खाणार आणि आम्ही ह्याच्या इज्जती सांभाळत राहायचे..
खोटं बोलू नकोस सारंग, ऑफिसला कॉल केला होता मी, तू तिकडे नव्हतास, आणि काय रे, काय होतंय तुला ह्या दोन दिवसात हा, ती मारवा आल्यापासून होतंय ना हे सगळं??
तिलाच भेटायला गेला होतास ना?? सांग ना??
लाज नाही वाटली?? बाहेर तोंड काळं करायचं होतं तर माझ्यासोबत लग्नच का केलं??
तो काहीच बोलत नव्हता, कदाचित असं काही घडेल ह्याची त्याला अपेक्षा नसावी, तो गप्प होता म्हणून मला जास्त राग येत होता, गप्प आहे म्हणजे ह्याचा गुन्हा ह्याला मान्य आहे असा अर्थ होता,तो काहीच न बोलता रूम मधून बाहेर जात होता तर मी त्याला अडवलं,
बाहेर गेलास ना तर सरळ आई बाबांसमोर गोंगाट भरेल कि कळलं,
आणि तीही इतकी सतीसावित्री बनून माझ्या घरी आली होती, लाज नाही वाटली माझ्या पायरीवर पाय ठेवायला तिला, शी, घाणेरडी कुठली, लग्न झालेल्या माणसाबरोबर संबंध ठेवते आणि वागते कशी जशी देवीचं,
माझंही तोंड सुटलं होतं,
तिच्याविषयी एक अक्षरदेखील वाईट नकोय हा तुझ्या तोंडातून मला, कळलं ..
आणि मला न जुमानता सरळ दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपला. . .
# आमचं पाहिलं भांडण . . .
मी खूप रडले त्या रात्री, असल्या माणसासोबत कशाला राहायचं, त्याला तीच आवडते मग मी का राहू इथे,मी सकाळी सगळं उरकून, आई बाबांना थातुर मातुर कारण देऊन त्याच्या समोरून माहेरी आले, एका, एका शब्दाने देखील अडवलं नाही त्याने मला.
म्हणजे त्याच्या लेखी मी काहीच नाहीये, माझी किंमत शून्य आहे तिच्या समोर. . .
मी मनात त्या मारवा ला खूप शिव्या दिल्या खूप जास्त, तिच्या मुळे माझ्या आयुष्यच वाट्टोळं झालं होतं.
मला खूप राग आला होता, इतका कि दोन दिवस त्याचे येणारे कॉल मी घेतलेच नाहीत, ना मेसेजला उत्तर दिल., इतकंच काय तर तिसऱ्या दिवशी सरळ फोन बंद करून ठेवला.
माझ्या आई बाबाला काही कळू दिलं नाही, पण पाचव्या दिवशी तो मला घ्यायला आला.
मी तोपर्यंत घटस्फोट वैगेरेचा विचार करून मोकळे झाले होते, खरेपणी असं काही करायची माझी हिम्मत नव्हतीच पण रागत मी ठरवलं होतं.
तो आला तसा मी दार आतून बंद करून बसले, आई बाबा मला आवाज देत होते मी कोणालाच उत्तर दिलं नाही,मग तो आला, वृंदा, तीच प्रेमळ साद, पण मी आवाज दिला नाही,
मी रागात माझं लग्न झालं आहे, मला सगळं सांभाळावं लागत वैगेरे सगळं विसरून गेले होते, आई बाबांना त्याने काहीतरी सांगितलं असेलच मी का रागावले आहे ते, त्यामुळे मला इतकं टेन्शन नव्हतं,
त्याने पुन्हा आवाज दिला, सगळं सांगतो तुला, आधी घरी चल, प्लिज . . .
मला सगळं ऐकायचंच होतं, पाहायचंच होतं मला, मला कश्या प्रकारे फसवलं आहे ते, मी दार उघडलं, माझ्यासमोर केविलवाणा चेहरा घेऊन तो उभा होता, माझ्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होतं नव्हती त्याची,पण खोलवर खूप रडल्यासारखा, हरल्यासारखा दिसला मला, अगतिक वाटला, पण मला दया आली नाही.माझा राग जास्त हवी होता माझ्या मनावर त्यावेळेस.
गाडीत बसले, तो एकही शब्द बोलला नाही, मला तरी काय पडली होती, मी हि बोलले नाही, त्याने सरळ घरी न नेता आमच्या शेतावर नेली,
आमचं तिथे छोटंसं घरवाजा खोपट आहे, आणि बाहेर मस्त बाज आहे, त्यावर आम्ही बसून मस्त शेत, हिरवळ न्याहाळत बसतो.
त्याने जवळ जवळ मला खेचतच त्या बाजेवर बसवलं आणि तो स्वतः माझ्या पायाजवळ मातीत बसला, माझ्या मांडीवर डोकं ठेऊन स्वतःच माझा हात त्याच्या केसांत ठेवला. . .
आणि त्याने सगळं सगळं सांगितलं . . .
वृंदा सगळ्यात आधी मारवा विषयी तुझ्या मनात जे काही विष तू भरून ठेवलं आहे ते आधी फेकून दे, आणि ज्या माणसा विषयी अपलाल्या काही माहिती नसेल ना तिच्याविषयी चुकीचंच काय कुठलंच मत ठरवू नये.
तू तिला दोष देतेस ना, अगं तिने माझ्यामुळे जितकं सहन केलं आहे ना, त्याची भरपाई मी आयुष्यभर नाही करू शकणार,
माझ्यामुळे आणि नकळत आपल्या जुळलेल्या ह्या नात्यामुळे. . .
सागरच्या वर्गात शिकायची ती, तिच्या काकांच्या लग्नात मला एकदा तो घेऊन गेला होता, तिथेच ओळख झाली,
नंतर सागर BSc ला आणि ती इंजिनीरिंगला गेली, मी त्यावेळेस नवीनच जॉबला लागलो होतो, मला सायन्सच काही जमलंच नाही, त्यामुळे मधेच शिक्षण सोडून बाबांनी ओळखीवर जॉब शोधून दिला,
गम्मत म्हणजे मी त्याच रोडने जॉबला रोज जायचो ज्या रोडवर ती बससाठी थांबलेली असायची, आमची सकाळी जाण्याची वेळ एकच होती, एक दोन वेळा नॉर्मल ओळख म्हणून मी तिला स्माईल दिली ती हि ओळख द्यायला लागली,
मस्त वाटायचं ग ती दिसली कि, काहीतरी भारी फीलिंग यायची, ती रोजच दिसावी असंच वाटायचं.
दिसली कि दिवस एकदम प्रसन्न जायचा आणि नाही दिसली कि काहीतरी चुकल्या सारखा वाटतं राहायचं . .
आमचे स्वभाव एकदम जुळायचे, आणि विचारदेखील, माझ्यासारखीच हळवी आहे ती, प्रेमळ आणि साफ मनाची . . .
एक दिवस अचानक मला तिने थांबवलं, खूप घाईत होती ती, पेपर होता तिचा आणि तिला उशीर झाला होता, मला तिने सोडशील का कॉलेज ला म्हणून विचारलं,
मी तर एका पायावर तयार होतो, तिला सोडलं कॉलेजला, तेव्हा मला कळलं कि माझं ऑफिस तिच्या कॉलेज च्या फक्त दोन स्टेशन पुढे होतं, आमचा रास्ता पण एकच होता.
मला त्या दिवशी तिचा फोन नंबर मिळाला, तुला सांगू काय खुश होतो मी त्या दिवशी, खूप म्हणजे खूप. . .
आम्ही हळू हळू मेसेज वर बोलू लागलो, हळू हळू एकमेकांना सगळं शेअर करू लागलो, मेसेज वरून कॉल, वेळ मिळेल तसं ती माझ्यासोबत बोलू लागली. मी आठवड्यातून दोनेक वेळा तिला कॉलेज ला सोडू लागलो. तिचा मी बेस्ट फ्रेंड झालो आणि माझ्या साठी ती माझं आयुष्य . . .
खूप काळजी घ्यायचो आम्ही एकमेकांची, तिचा सागर सोबत आत काही संबंध उरला नव्हता पण माझं नवीन नातं जुळलं होतं तिच्याशी,
ती भेटली कि दिवस अगदी फुलपाखरासारखा जायचा, तिच्यासोबत बोललो कि जेवण खाण्याचं काही भान राहतं नसायचं,
तिला ना खूप शिकायचं होतं, मोठं नाव करायचं होतं, मला हि ती कॉलेज चालू कर पुन्हा शिक्षण पूर्ण कर सतत सांगायची, मी हे सोडून तीच सगळं ऐकायचो, ती कितीही मोठी झाली शिकली तरीही मला कधीच अंतर देणार नव्हती इतका माझा तिच्यावर विश्वास होता, कारण तीही माझा एकही शब्द झाली पडू देत नसायची,
तिच्या सोबत राहून तिच्या प्रेमात आकांत बोडलो होतो मी, आणि तिच्या हि मनात प्रेमाचं अंकुर फुटलं होतच, तिच्या डोळ्यांतून ते स्पष्ट दिसत होतं पण ती पुढाकार घेणार नव्हती..
एक दिवस मी तिच्यासोबत तिच्या कॉलेजला गेलो होतो. माझ्यासाठी तिने तिचे दोन तास बुडवले, खूप गप्पा मारल्या आम्ही, समोरासमोर बसून, ती माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोलत होती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि प्रेम मला स्पष्ट दिसायचा आणि माझ्या डोळ्यांत त्या दिवशी तिला तिच्या साठीच प्रेम दिसू नये म्हणून मी नजर चोरून बोलत होतो.
तीच ते गालातल्या गालात हसणं, ओठांच्या हळुवार हालचाली, लाजून नजर चोरणं, मला वेड लावून गेलं होतं. खूप गोड़ आहे गं ती, त्या दिवशी पहिल्यांदाच मी असा एकटा म्हणजे आम्ही दोघांनी सोबत वेळ घालवला होता,घरी आलो तर गड जिंकल्यासारखं जाणवत होतं मला, इतका खूप होतो मी.
तीच इंजिनीरिंगचं शेवटचं वर्ष होतं, ते झालं कि मी तिला लग्नाची मागणी घालणार होतो आणि ती होत म्हणणार होती, मला पूर्ण खात्री होती. .
आम्ही दोघेही आमच्याच विश्वात रमून गेलो होतो.
खूप स्वप्ने पहिली होती मी तिच्या सोबत,
तिच्या मांडीवर डोकं ठेऊन भविष्याची स्वप्ने रंगवायची होती, तिचा हात हातात घेऊन आयुष्याची वाट चालायची होती, तिच्या मिठीत शिरून ह्या जगाला विसरून जायचं होतं, आणि खूप काही . . .
तिच्यासोबत चार वर्ष फुलपाखरं सारखी गेली, तीच शिक्षण पूर्ण झालं कि मी तिच्या घरी जाणार होतो लग्नाची मागणी घालायला आणि मलाही ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं होतं, सगळं सगळं सुरळीत चाललं होतं ,पण . . .
पण अचानक आईने एक दिवस घरात माझ्या लग्नाचा विषय काढला आणि तुला माझ्यासाठी पसंत केलीये सांगून टाकलं बाबांचं पण तेच मत होत, मी हादरून गेलो होतो.
उभ्या आयुष्यात मी आई बाबांच्य मनाविरुद्ध काहीच केल नव्हतं , माझ्यासाठी आई बाबा मारवाला हसत हसत स्वीकारतील असं मी गृहीत घरून चाललो होतो, मी खूप घाबरलो होतो त्या वेळेस, एकतर आई बाबानीं ठरवून टाकलं होतं सगळं, तुझ्या घरीहि बोलून झालं होतं, मी चांगल्या कचाट्यात सापडलो होतो.
मी ओळखत होतो ग तुला पण ओळखी व्यतिरिक्त कधीच काही भावना नव्हती .
आईला साखरपुडा करून घ्यायचा होता, मला मुलगी पसंत आहे कि नाही तिने विचारलंच नाही. बाबांनी विचारलं चालेल ना वृंदा ?बायको म्हणून ?
मी काहीच बोललो नाही, हो नाही काही नाही, हिम्मतच नाही झाली.
नक्की काय आड यायचं माहीत नाही, मी नेहमी ते बोलतील ते करत आलो होतो, त्यांना नाही बोलायची हिम्मत झालीच नाही माझी.
मी घाबरलो होतो गं खूप, काही निर्णय होत नव्हता.
तिचे मेसेज कॉल आले मी चार पाच दिवस टेन्शन मध्ये तिच्यासोबत एकही शब्द बोललो नाही.बाबांसोबत बोलायचा प्रयत्न केला पण नाहीच हिम्मत झाली.
आम्ही शब्द दिलाय आणि तसाही माझा सारंग आमच्या शब्दाबाहेर नाही, जगात अशक्य शक्य होईल पण सारंग आमचं शब्द पडू देणार नाही, आईचे शब्द नुसते कानात घुमत होते.
पाच सहा दिवस मी तिच्यासोबत काहीच बोलोलो नव्हतो आणि आणि एक आठवड्याने तिनेही कॉल करणं बंद केलं.
तिलाहि खूप राग आला असावा माझ्या वागण्याचा, मी मुलगा असूनहि माझं प्रेम मिळवायला असमर्थ होतो.
मला नाही माहित नक्की काय आड येत होत आईबाबासोबत तिच्याविषयी बोलायला आणि सगळ्यात मूर्खपणा म्हणजे मी तिच्या सोबत हे जे घरी घडत होत त्या विषयी बोलायचं टाळलं.
खूप हिम्मत करून मी आईजवळ विषय घेतला , खूप समजावलं तिला, माझं किती प्रेम आहे केव्हापासून ओळखतो सगळं, ती किती चांगली आहे, घरी किती चांगले आहेत, खूप म्हणजे खूप समजावलं.
पण आई नाही ऐकली ग, म्हणाली बिगर जाती वाली पोरगी सून म्हणून मी स्वीकारणार नाही, आणि जरी तू माझ्या मनाविरुद्ध काही केलं, तर एकतर ती घरात राहील नाहीतर मी.
आईच असं वागणं मला अपेक्षित नव्हतं, ती का इतका बाऊ करते मला कळत नव्हतं.
मी पुन्हा २ दिवसाने बोललो आईसोबत तर म्हणाली, ती घरात आली तर माझं मेलेलं तोंड बघशील, आता तू ठरव तुला ती पाहिजे कि आई आणि बाबा सोबत बोलला तरी माझा निर्णय मी नाही बदलणार. लोक आमच्या तोंडात शेण घालतील तुम्हाला काय, २ महिन्याचं प्रेम २ आठवडयात विसरता येतं. वृंदा सारखी मुलगी शोधून हि सापडणार नाही तुला, त्यामुळे फक्त वृंदाचा विचार कर आता.
मी खूप मूर्खासारखं वागलो ग त्यावेळेस तिच्यासोबत वीसेक दिवस बोललोच नाही तिनेहि रागवून कॉल करणं बंद केलं.
आणि
लोक काय बोलतील ह्या विचाराने आई बाबांनी माझं काय होईल, मला काय वाटतं आहे हा विचार नाही केला कदाचित, त्यांचं हि चुकीचं नव्हतच, माझंच चुकलं सगळीकडे,
मी निर्णय घेतला, माझ्या सुखासाठी मी आईच्या जीवाशी खेळू शकत नव्हतो, तसं काही तिने खरंच केला असतं तर ना मी आयुष्यभर सुखी राहू शकलो असतो ना मारवा ते गिल्ट घेऊन जगू शकली असती, शेवटी मी आईला सांगितलं तुला पाहिजे तसं कर पण पुन्हा मरायची भाषा करु नकोस.
तुझ्यासाठी ती ऐकेल माझं, जाईल माझ्या आयुष्यातून कायमची.
त्या संभाषणापासून आई आणि माझ्यात एक दुरावा निर्माण झाला तो अजून तसाच आहे जाणवला असेल तुला हि, आणि आमच्यात जे बोलणं झालं ते सागर ला सुद्धा नाही कळू दिलं मी. विषय तिथेच बंद झाला.
साखरपुडा ठरला, मी स्वतः माझं आयुष्य माझी स्वप्ने उध्वस्त करून घेतली. मी स्वतः मारवाला हे सगळं सांगायला गेलो होतो तिच्याघरी.
एव्हाना महिना व्हायला आला असेल आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता, मी गेलो तेव्हा ती एकटीच रूम मध्ये पडून होती, मला पाहताच तिने घट्ट मिठी मारली ग, काय नव्हतं त्या मिठीत, त्याच मिठीत प्राण जावेत असं राहून राहून वाटलं मला तेव्हा, तिचे ओघळणारे अश्रू माझ्या पाठीवर ओघळत होते, त्या गरम अश्रूंमध्ये पण तिच्या प्रेमाची उब मला जाणवत होती, तिचे हात माझ्या पाठीभोवती पुरत नव्हते म्हणून नखांनी घट्ट ओढलेला माझा शर्ट, तिच्या हृदयाची धडधड, तिचा ह्या ४ वर्षात प्रथमच होणार इतका जवळचा स्पर्श, सगळं माझ्याप्रेमासाठी होतं. तिची धडपड मला जाणवत असून हि मी स्वतःला रोखलं.
ती माझ्या मिठीतच रडत रडत बोलत होती. आई गेले रे सारंग अटॅक ने, तिला खूप मिस केला मी खूप एकटी पडले होते. पण तू कुठे हरवला होतास काय माहित, रडून रडून दमले मी, तुझ्या कुशीत येऊन तू थोपटावं आई सारखं सतत वाटत होत रे.
बाबा बोलत आहेत आपण इथे नाही राहायचं त्यांना सतत आईची आठवण इथे सतावते. त्यांनी ट्रान्सफर पण करून घेतलीये, पण मला नाही जायचं, तुझ्यासाठी थांबायचं आहे, तू बोल ना मला नको जाऊस?? आपण बोलूयात ना बाबांसोबत, बोलूयात ना?? बोलशील ना तू त्यांच्यासोबत? बोल ना सारंग ?
मारवा मी तुला हे सांगायला आलो होतो कि ... आई बाबानीं ... माझं लग्न ठरवलं आहे एका मुलीसोबत, आणि थोड्याच दिवसात साखरपुडा आहे आमचा
ह्या वाक्यासरशी झटका लागावा तसं तिने मला दूर लोटलं, त्या मिठीतुन आणि तिच्या आयुष्यातून
तिच्या डोळ्यात जे होत ते शब्दात उतरावण मला कधीच शक्य नाही होणार.
ती गेली तिच्या बाबांसोबत आणि तू आलीस माझ्या आयुष्यात.
महिन्यात साखरपुडा झाला, मला तिचा विरह सहन नव्हता होतं, खूप कोसल मी स्वतःला, खूप रडलो, हसणं खेळणं सोडून जिवंत पुतळा झालो होतो मी, पण सांगणार तरी कोणाला, माझ्या हातानेच मी सगळं माझ्यावर ओढवून घेतलं होतं,
मग काय, एक आदर्श नवरा आणि मुलगा ही जबाबदारी इतकंच माझं आयुष्य स्वतःला शिकवलं आणि शिकलो मुखवटा घेऊन जगायला.
खोटं हसता येत
खोटं रडता नाही येत
ती माझी कोण आहे मला नीटस सांगता नाही येत ...
पण सांगू तू आल्या नंतर मी तिचा विचार केव्हाच नाही केला. तुझ्या सोबत जी सात वाचन घेतली ती मनापासून निभावतोय आणि निभावेल अगदी आयुष्यभर.तुला सांगणार होतो पण तू समजून घेशील कि नाही म्हणून नाही बोललो.
माझं तुझ्यावर हि प्रेम आहेच ग, फक्त तिची आठवण आली कि त्रास होतो खूप, सगळे मुखवटे तिच्या आठवणी पुढे गळून पडतात.
आणि माझ्या मूर्खपणा मुळे मी तिला गमावून बसलो हे टोचत राहतं सतत मनात.
विसरून जावी तशी ती नाहीच ग पण तुला फसवावं असा मी नाही , हो ना ? ??
मी ते प्रेम मागे टाकलं आहे केव्हाच तू रागावू किंवा टेन्शन नको घेऊस. मी एकनिष्ठ आहे आणि राहील, आणि तिच्यापेक्षा तू कमी आहेस किंवा तू कॉम्प्रमाईस वैगेरे आहेस असा चुकूनही विचार करू नकोस, मनापासून प्रेम आहे माझं तुझ्यावर, खरंच, प्लिज विश्वास ठेव माझ्यावर . . .
तिला भेटायची ओढ लागते पण मला नाही भेटायचं किंवा बोलायचं, आता सावरलोय तुझ्या सोबत तुझ्याशिवाय नकोय कुणी मला, खरंच.
विश्वास ठेवशील माझ्यावर ???
मी त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप रडले, मीच कारण होते कुठेतरी त्याच्या अपूर्ण प्रेम कथेला.
तरी हि त्याने मला एकदाही जाणवू दिल नाही आणि आता हि तो मलाच समजावत होता. मला खूप वाईट वाटलं आणि स्वतःचा राग हि आला कि मी ह्या माणसावर संशय घेतला.
आणि
पुन्हा तिची आठवण आली कि माझ्यासोबत तिच्या आठवणी शेअर करायच्या हे प्रॉमिस घेऊन आम्ही घरी आलो.
तो त्या रात्री खुप सुखाने झोपला,कदाचित मनावरचं मोठं ओझं कमी झाल्यासारखं, मी रात्रभर त्याला पाहत बसले.
ती लग्न झालं कि कायमची जाणार होती, मला वाटत होतं सारंग ने तिला शेवटचं भेटून यावं, म्हणून मी त्याला एकट्याला लग्नाला जा म्हणाले, पण तो मला हट्टाने सोबत घेऊन गेला, अभिमानानेच माझी बायको म्हणून ओळख करून दिली तिला.
मी तिला ह्ग करून तिच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या, आणि मी स्वतः त्याला सांगितलं म्हणून त्याने देखील तिला ह्ग करून शेवटचा निरोप घेतला, त्या एक दोन क्षणांची किंमत सारंगसाठी आणि मारवासाठी काय होती ते त्या दोंघांबरोबर मीहि जाणून होते. ती इतकी जवळ असताना देखील त्याने एकदाही मला दुर्लक्षित केलं नाही, माझा हात एकदाही सोडला नाही .
ती आली आणि गेली पण मला तिचा मित्र देऊन गेली ....
सारंग आणि माझ्या नात्यात नवीनच गोडवा आलाय, नवरा बायको सोबत आम्ही बेस्ट फ्रेंड झालो आहोत.
तिची आठवण आली कि तो तिच्या आठवणी शेअर करतो, म्हणतो आधी रडायचो पण तुझ्यासोबत
सोपं झालय सगळं.
मी हि तिला विसरून जा वैगेरे सांगत नाही, मी पात्र आहे त्यापेक्षा दहा पट जास्त प्रेम करतो तो माझ्यावर अजून काय हवय ...
आणि
जिच्या वाटायचं होतं ते पूर्ण प्रेम त्याने माझ्या ओटीत ओतलं आहे. मग तिच्या आठवणींना हि जागा देऊ नये इतकी कृतघ्न मी कशी वागू शकते .
आणि मी तिला मनापासून स्वीकारली आहे आणि न रागावता न लाजता सांगेल हो ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे ...
ते सगळं ठीक आहे पण लग्नाला
ते सगळं ठीक आहे पण लग्नाला गेलं की लोक प्रेशर कुकर किंवा स्टीलची जडशी ३ किलोची रोळी असं काही काही घेवून जातात. नवरा-बायको दोघांचा हात मोकळा कसा राहतो एक्स प्रेयसीला मिठ्या मारायला?

गदगदलेला मोड ऑन
गदगदलेला मोड ऑन
अजय चव्हाण +१
गदगदलेला मोड ऑफ
सर्व प्रतिसाद भयंकर (चांगल्या
सर्व प्रतिसाद भयंकर (चांगल्या अर्थाने) आहेत.
बरेचदा आयुष्यातल्या सर्व नातेवाईक बायकांना खुश ठेवू इच्छिणारा पुरुष नंतर सर्व बायकांच्या शिव्या खातो.
इथे काल्पनिक कथा नायकाने
1. आईशी खुन्नस घेतली आहे आणि तिला गिल्ट देऊन तो वावरतोय.आई कधीतरी म्हातारपणी वैतागून 'मेल्या त्यापेक्षा त्या फटाकडी शी लग्न करायचं होतंस थोडा कणा दाखवून' असं कळवळून म्हणणार.
2. आवडणारी(ब्राऊन केस, लोरीयल ऍड वाली, प्रियांका चोप्रा/करीना/ऐश्वर्या स्टाईल सुंदर आकाशी सॅटीन सिल्क विथ सेक्वीन वाली साडी पिन अप एक लेयर पदर घेऊन नेसणारी, एक लग्न पत्रिका द्यायला साडी किंमत चांगल्या दुकानात 5000 रु, ऍक्सेसरीज 1000 रु, हेअर स्ट्रेटन आणि डीप कंडिशनिंग 7000 रु) सुंदर आणि मनमिळाऊ मुलगी गमावली.आता ती तिच्या नवऱ्याच्या डोक्याला तिच्या अबसेन्ट माइंडेड वागण्याने भुंगा लावेल.म्हणजे परत तिच्या वैतागलेल्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून एक अशीच कथा इथे येईल.
3. बायकोला ही सर्व कथा ऐकून 'तू कॉम्प्रमाईज आहेस.तरीही मी लै भारी असल्याने तुझ्याशी आनंदाने संसार करणार आहे' असं दाखवून दिलंय.उद्या बायकोला एखादा सुंदर सुपिरियर तरुण भेटला तर ती स्वतःची वर्थ दाखवून द्यायला त्याच्याशी चांगले वागेल, कदाचित त्याला प्रेमात पाडून मग त्या प्रेमाला नकार देऊन नवऱ्याला हे सर्व सांगून नवऱ्यावर आयुष्यभर पावशेर ठेवेल.
मोरल ऑफ स्टोरी: नात्यात मल्टी टास्किंग नको.आणि नो अजाईल. नो स्क्रम. फॉलो वॉटरफॉल वर्किंग मॉडेल.
बायकोने पण तिच्या मित्राला
बायकोने पण तिच्या मित्राला मिठी मारलेली चालते काय?
नात्यात मल्टी टास्किंग नको
नात्यात मल्टी टास्किंग नको.आणि नो अजाईल. नो स्क्रम. फॉलो वॉटरफॉल वर्किंग मॉडेल.------

पटतंय अगदीच
निरोप घेताना मिठ्या मारणे
निरोप घेताना मिठ्या मारणे हल्ली कॉमन झालंय उच्च वर्गात.
मिठी मारल्यावर मनात कोणती भावना आहे
>>>(काल्पनीक पात्राबद्दल
>>>(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप ऑन)
आईबाबांना स्पष्टपणे 'मला अमुक अमुक मुलीशी लग्न करायचं आहे' सांगू न शकणारी, त्याच्या आधीच सुंदर सर्व प्रकारे वाईफ मटेरियल मुलीला प्रेम बॉडी लँग्वेज ने दाखवणारी आणि मग मुलगी पण प्रेमात पडली की तिला 'आईबाबांना दिलेलं वचन निभावायला दुसरीशी लग्न करणार' सांगणारी, स्वतःच्या बायकोला उगीच संशयास्पद वागून ताप देणारी, तिने खोदून विचारल्याशिवाय खरं न सांगणारी भयताड मुलं जन्मालाच का येतात?
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप मोड ऑफ)
नवीन Submitted by mi_anu on 29 November, 2019 - 08:59>>>>>
मोरल ऑफ स्टोरी: नात्यात मल्टी
मोरल ऑफ स्टोरी: नात्यात मल्टी टास्किंग नको.आणि नो अजाईल. नो स्क्रम. फॉलो वॉटरफॉल वर्किंग मॉडेल.>> अगदी बरोबर
@ सोहनी, जरी या कथेवर उलटसुलट प्रतिसाद आले तरीही तुमची लिहिण्याची ओघवती भाषा आणि शैली सहज आहे, लिहीत राहा
येस येस... सोहनी, प्लीज लिहीत
येस येस... सोहनी, प्लीज लिहीत राहा. गोष्ट छान आहे. गोष्टीतल्या कॅरेक्टरला चार शिव्या घातल्या ह्यापेक्षा मोठी पावती लेखकाला नसते. लोक त्या पात्रात गुंतली हे महत्त्वाचे.
मात्र जीवन मारवा जास्त आवडली होती. माहोल होता त्यात... इथे बायको लग्नाला रिकाम्या हाताने, नट्टापट्टा न करताच गेली.. माहोल नै बना...
सोहनी, कथा छान आहे. तुमचं
सोहनी, कथा छान आहे. तुमचं लिहिणंही छान आहे.

पण जरा फिल्मी आहे.
कधी कधी माबोकरांच्या आचरटपणाला जाम उधाण येतं. सो प्रतिसादांची मजा घेत रहा आणि लिहित रहा.
मी अनु + १
आणि बायकोला एवढा गिल्ट दिलाय वर रडुन कॉम्प्रो केल्यासारखी फीलिंग देतोय तरी बायको एवढी त्यागमुर्ती, समजुतदार
हो सोहम.तुमच्या कथेतल्या
हो सोहम.तुमच्या कथेतल्या पात्राबद्दल लोक इतकं बोलतायत म्हणजे कथा मनापर्यंत पोहोचलिय.
लिहीत राहा.
अनुच्या कमेंट्स
अनुच्या कमेंट्स
त्याने त्या वेळेतहि एक हात माझा धरून आणि एका हाताने तिला हृदयाशी धरलं.<<<<

कुछ कुछ होता है.. आठवला अगदी.
मुळात हे सगळे प्रतिसाद वाचून,
मुळात हे सगळे प्रतिसाद वाचून, भीतीवाला मोड ऑन . . .
सगळ्या प्रतिक्रियांचे स्वागत. . .
माझ्या कथेतील पात्रांची रिस्पेक्ट हि देखील पूर्णपणे माझी जबाबदारी आहे मग ते काल्पनिक का असेनात.
म्हणून थोडं एक्सप्लेन करते . . .
प्लिज भैताड वैगेरे नाहीये तो, एक सरळ मार्गी माणूस आहे, जो " MY WIFE =MY LIFE " ह्या समीकरणातला नाहीये, ज्याच्या साठी आई वडील सगळ्यात आधी आहेत, ( बायकोला मान प्रेम सन्मान नाही असं नाही हा) पण प्रत्येकाला हवं ते महत्व देणारा आहे.
आणि, ठरवून नाहीच होत हो प्रेम, त्याने एकदाही ती सुंदर आहे वैगेरे म्हणाला नाही, तो म्हणाला ती गोड़ आहे, सोज्वळ आहे आणि सहविचारी आहे,
- सुंदर मुलगी पटवली हे वाक्य सुद्धा ना बोलणारा व्यक्ती . .
वृंदाला कधीच अंतर दिलं नाहीये त्याने, नाहीतर कथा काहीतरी नक्कीच वेगळी असती, आणि भूतकाळ सांगून तिच्या मनावर त्याने बिंबवलं नाहीये कि तू तडजोड आहेस किंवा माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, फक्त जे होतं ते सांगितलं ते सुद्धा हे नातं जपण्यासाठीच ना. . .
माझ्या विचारांत चुका असतीलही आणि मान्य हि करतेय . .
हरिहर सर - भांडणाऱ्यांपैकी नाहीये तो, म्हणून उरकलं लगेच . .
च्रप्स सर - जोक होता कि खरंच म्हणालात ???
मी अनु मॅम, वावे मॅम आणि हेल्पमी मॅम - गर्ल फ्रेंड, नाही म्हणू शकले मी तिला, प्रेम होत पण अव्यक्त होत, म्हणजे फक्त प्रेम आहे म्हणून ते नाव द्यावंसं नाही वाटलं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या पेक्षा काहीतरी वेगळं वाटलं म्हणून. ..
लग्नाआधी एक मेन्टॅलिटी असते, त्याने माझ्याशी असं वागावं मला हे द्यावं ते द्यावं, इत्यादी . . तिला तिच्या मेन्टॅलिटीमध्ये असणाऱ्या प्रेमापेक्षा जास्त मिळालं इतकंच,
स्वतःला कमी लेखत नाहीये ती . .
सीमंतिनी मॅम, आणि क्युटी मॅम - कदाचित मी मिठी हा शब्द वापरायला नको होता,
बाकी हल्ली विष करायला मित्र मैत्रिणी ह्ग करू शकतातच. . .
अगदी लग्नातदेखील, म्हणजे इतका वेळ नसतोच तरीही, एक ह्ग करण्या इतपत वेळ असतोच . . .
( वृंदा ने फक्त त्याला काय वाटलं असेल ह्या उद्देशाने म्हणलं आहे कि शेवटचा निरोप देताना देखील त्याने तिला दुर्लक्षित केलं नाही )
जास्त झालं असेल खरंच सॉरी . . .
राजेश सर - योग्य म्हणालात तुम्ही, त्याची एकच चुकी दाखवायची होती कि तो स्वतःच्या प्रेमासाठी लढला नाही, आणि त्यात मारवा ची चरफड झाली . . .
अजय सर - थँक यु, हो म्हणजे त्याने स्वीकारलं आहे ते नातं मनापासून, आणि ना सांगण्याचं कारण इतक्या लवकर कुणी समजून नाही घेत, आणि चांगलं चाललं आहे मग कशाला जुन्या गोष्टी उकरायच्या,
पण आठवण तर येतेच ना??
सीमंतिनी मॅम - जस्ट अ ह्ग, मिठीच्या ऐवजी दुसरा शब्द सुचला नाही म्हणून, जवळचे मित्र मैत्रीण शुभेच्छा देतात ना ह्ग करून तेच होत ते,
जास्त झालंय तिथे असं वाटतंय मला पण . . .
मी अनु मॅम - खुन्नस नाही हो, आपण आपल्या आईशी कसं मनमोकळे पणाने बोलतो, सगळं शेअर करतो,
आता त्या मध्ये थोडासा दुरावा आहे इतकंच,
इतका खर्च नाही हो,
सिम्पल सारी, नॉर्मली नॅचरल केस असतात हो असे ( सॉरी पण माझे स्वतःचे आहेत, आणि नो पार्लर टच)
आणि तू कॉम्प्रमाईस आहेस असं त्याने एकदाही नाही दाखवलं, नाहीतर तिने त्याला स्वीकारलं नसतंच हे सगळं ऐकून,
संशयास्पद म्हणजे कधीच तरी आठवण येतेच ना . . .
हरिहर सर, भिकाजी सर, आसा सर,
हरिहर सर, भिकाजी सर, आसा सर, राजेश सर, विचार सर, रीना मॅम, ॲमी मॅम, किल्ली मॅम, देवकी मॅम, अजय सर, सान्वी मॅम
सगळ्यांचे खूप आभार . .
आणि नकारात्मक वैगेरे मला वाईट किंवा राग वाटतच नाही, सुधारणेला वाव आहे इतकं कळतं, माझ्या चुका दाखवून मी त्या सुधारणे हे माझ्याच फायद्याचं आहे,
सो मी लिहत राहीन आणि सुधारणा करत राहीन,
मनापासून आभार सगळ्यांचे . . .
हायला.... मला मॅम !!... .
हायला.... मला मॅम !!... . बुद्धाने म्हणूनच म्हणले आहे "आनेवाला पल जानेवाला है..." उर्फ धिस टू शॅल पास. .. असो.
येस,राईट मॅम, बट आय रियलाईस
येस,राईट मॅम, बट आय रियलाईस इट आफ्टर रिडींग कमेंट्स,
म्हणून म्हणाले मी तो वर्ड नव्हता वापरायला पाहिजे होता तिथे, तुमचं वाक्य अगदीच जशेच्या तसेच सूट झालं असत तिथे,
आता काही करू शकते का??
म्हणजे बदल वैगेरे ???
कर की... तुझीच कथा आहे.....
कर की... तुझीच कथा आहे..... मी माझे पोस्ट काढून टाकते, कारण ते वाक्य सुचलं तू वृंदा चांगली रंगावल्यामुळे...
मॅम बीम नका म्हणू हो लोकांना
मॅम बीम नका म्हणू हो लोकांना ☺️☺️
लिहीत राहा.पब्लिक ने फक्त मतं व्यक्त केलीत इतकंच.कथा नायक काय नायिका काय कसेही वागले तरी तो त्यांचा चॉईस आहे.
बायकोने पण तिच्या मित्राला
बायकोने पण तिच्या मित्राला मिठी मारलेली चालते काय?
नवीन Submitted by नौटंकी on 30 November, 2019 - 07:38 >>>>>>
अगदी हेच मी लिहायचे राहून गेलो. पुरुष जशी स्वप्ने बघतात तशी स्त्रिया बघत नाहीत. (कि नवरा इतका चांगल्या स्वभावाचा मिळेल कि आपल्या समोरच आपल्या लग्नाआधीच्या प्रियकराला मिठीत घ्यायला लावेल) कारण ब्रेनवोश इतके झालेय कि अशी स्वप्ने पाहणे सुद्धा स्त्रिया पाप समजतात. एक पती असला कि दुसऱ्या पुरुषाचा विचार सुद्धा मनात येऊ नये वगैरे वगैरे हे सगळे संस्कृती फक्त बायकांनी पाळायची म्हणे.
मनातील भावना शुद्ध असतील तर
मनातील भावना शुद्ध असतील तर शक्य आहे, समजूतदार नवरे अजूनही आहेत, मिठी म्हणजे नॉर्मल ह्ग,
गुडबाय म्हणून एक ह्ग करायला इतकी काही हरकत नसावी. . .लग्नानंतर प्रियकर, प्रियासी विरून जातात, राहते ती ओळख, एक मैत्री म्हणून कदाचित ..
वरील कथा हि १९५० कळातील
वरील कथा हि १९५० कळातील “माझ्या नवर्याची (न झालेली) बायको” शोभेल.”
कलाकारः
नवरा: राज कपूर
(न झालेली) मनातली बायको: नर्गिस
बायको: मीनाकुमारी
ह. घ्या.
कदाचित मी मिठी हा शब्द
कदाचित मी मिठी हा शब्द वापरायला नको होता,
बरं मग " नमकीन" किंवा "तीखी" वापरुन बघा पुढच्यावेळेस.
छान लिहिलंय, सुंदर कथा, ओघवती
छान लिहिलंय, सुंदर कथा, ओघवती शैली..
असा नवरा आपल्याला मिळावा असे प्रत्येक बाईला राहून राहून वाटेल.
बायको मैत्रीण पत्रिका द्यायला भेटल्या तेव्हा ती सध्या काय करते चित्रपटाची आठवण झाली
वर प्रतिसादांत मिठी पुराण काय
वर प्रतिसादांत मिठी पुराण काय चालूय? वाचले नाही मीसारे प्रतिसाद् पण ईथे रस्त्यवर कित्येक कॉलेजच्या मित्रमैत्रीणी एकमेकाला मिठी मारून टाटा बायबाय करतात. रोजच. आणि कोणाला त्यात वावगे काही वाटत नाही. बसट्रेनमध्ये बाईला चोरून स्पर्श करतानाच्या वासनेने लडबडलेल्या भावना प्रत्येक मिठीत का गृहीत धरतात...
पिक्चर चालवायचा तर या कथेत
पिक्चर चालवायचा तर या कथेत आयुष्यमान किंवा कार्तिक आर्यन घ्यावा लागेल रडया नवऱ्याच्या भूमिकेत.
लोरीयाल केसवाली सुंदर बाई म्हणून आताची कोणीही घेता येईल.यामी गौतम/झानवी कपूर बिपूर
मिठी मारायला लावणारी बायको म्हणून कोण घ्यावी प्रश्न आहे.श्रद्धा कपूर किंवा ईशा देओल किंवा (माझा अभ्यास कमी पडतोय सध्या खूप)
हरकत नसावी. . .लग्नानंतर
हरकत नसावी. . .लग्नानंतर प्रियकर, प्रियासी विरून जातात, राहते ती ओळख, एक मैत्री म्हणून कदाचित
ह्या मताशी सहमत आहे.
ते दोघे कंफर्टेबल असतील तर आपण त्यांचे वागणे चुकीचं ठरवू शकत नाही.
ह्या समाजात असंख्य विचाराची लोक असतात.
एकाच प्रकारचे ठोकळेबाज विचार सर्वांना लागू होत नाहीत .
जेम्स बॉण्ड सर, नक्कीच वापरेन
जेम्स बॉण्ड सर, नक्कीच वापरेन हो . . .
रिन्मेष सर, थँक यु सो मच. माझ्या मनातलं म्हणालात अगदी . . .
कित्ती तरी ऑप्शन आहेत.
कित्ती तरी ऑप्शन आहेत.
रड्या - आयुषमान, राजकुमारराव, कार्तिकआर्यन,
गफ्रे - र्क्रीती सॅनोन, झानवी, तारासुतारा, कियारा
बायको - भूमी, झानवी, तारासुतारा, कियारा, श्रद्धा कपूर
जुनी खोडं घ्यायची तर
शाहरुख खान मस्ट. त्याला अनुभव पण आहे. एकीचा हात धरुन दुसरीला मिठी मारायचा.
बाकी कॅट, करीना, काजोल, प्रिचो, दीपिका, तब्बू वैवै
ऋन्मेश
ऋन्मेश
बरोबर .
आहे
हात पकडणे,मिठी मारणे ह्या गोष्टी सहज होतात त्या मध्ये वासना आहे अस समजन च चुकीचं आहे.
ह्याचा अर्थ हात पकडणे,मिठी मारणे ही क्रिया ह्या मध्ये वासना नसतेच असे पण नाही.
हे सर्व व्यक्तीसापेक्ष आहे
जेम्स बॉण्ड सर, नक्कीच वापरेन
जेम्स बॉण्ड सर, नक्कीच वापरेन हो . . .
सर नका म्हणु हो.
अस पण माबोवर बर्याच जणांना इतक्या सन्मानाची सवय नाहीए.
Pages