लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे.
माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या. मलाही बरे वाटायचे.लागेल ती वस्तू कुणीतरी आणून द्यायचे. मात्र घराबाहेर पडण्याचा प्रसंग कधी आलाच नाही.असं करता करता एक महिना झाला. आपले शेजारी कोण आहेत हेदेखील मला माहित नव्हते. बर्याचदा ओळखीच्या बायका घरी यायच्या आणि हाॅलमध्ये बसून गप्पा मारून जायच्या.मला अशावेळी चहा करण्याच्या निमित्ताने किचनमध्ये पाठविले जाई. अगदीच कोणी बाई माझ्याशी ओळख करून घ्यायला आत आली, तर मला तिच्याशी बोलता येई, अन्यथा मी केलेला चहा दुसरेच कुणी बाहेर घेऊन जाई. हळूहळू माझ्या मनाचा कोंडमारा होऊ लागला,मात्र काहीच बोलता येईना. वरकरणी सर्व ठीक होते.
कधी एखादी वस्तू हवी असेल तर 'अग तू कशाला जातेस?अमका(अमकी) आणेल ना.! अशी नव्या नवरीसाठी काळजी दाखविली जाई.
पुढे मी नवर्याबरोबर राहण्यासाठी पुण्याला निघाले. घरातून बाहेर पडताना जाणवले , मी चक्क दोन महिन्यांनी घराबाहेर पडत होते.
बरे , आता नवर्याबरोबर पुण्याला आले, स्वतंत्र संसार थाटला, तरी हे 'काळजी प्रकरण' काही थांबेना. आता नवर्याला माझी ' काळजी' वाटत होती.
मी जवळच्या एका शाळेत अर्ज केला आणि माझी तिथे लगेच शिक्षिका म्हणून नेमणूक झाली.मात्र अगदी भाजी पासून ते माझे कपडे,चप्पल,पर्स इ. सर्व खरेदी नवर्याच्या सोबतीने पर्यायाने त्याच्या पसंतीने होऊ लागली. कधीतरी एखादी वस्तू मी घेतलीच ,तर ती कशी महाग पडली किंवा खराब आहे, हे ऐकवले जाऊ लागले. अजून काही दिवसांनी अशी वेळ आली कि एकटीने अगदी दहा रूपयांची वस्तू खरेदी करायची सुद्धा
माझी प्राज्ञा नव्हती. मला नवरा बरोबर असल्याशिवाय कोणतेच बाहेरचे व्यवहार करता येईनात! सतत 'घरचे काय म्हणतील किंवा मी चूक तर करीत नाही ना' हीच भिती!
दोन वर्षानी मला मुलगा झाला. आई आजारी असल्याने येऊ शकली नाही. सासूबाई आल्या. त्यांच्याच पद्धतीने बाळाचे सर्व काही करत होते. पटत नसले तरी. उदा. बाळाच्या कानात रोज तेल घालणे, रडत असल्यास नजर काढणे इ.
बाळ पंधरा दिवसांचे होते. अचानक त्याला ताप आला.
यावर त्याला दवाखान्यात न नेता त्या दोन दिवस फक्त नजर काढत होत्या. अजून दोन दिवस गेले. ताप वाढला. बाळाची अवस्था नाजूक झाली होती.माझी घालमेल होऊ लागली. संध्याकाळी बाळ दूध देखील घेइना. तरी सासूबाई ढिम्म .
'काहितरी नजरच लागली असेल , एवढ्याशा बाळाला काय दवाखान्यात न्यायचे. डाॅ. विनाकारण अॅडमीट करून पैसे ऊकळेल' . याला नवर्याचीही सम्मती. रात्रभर मी विचार करीत जागले. शेवटी युक्ती सुचली.!
सकाळी उठून नवरोबा आणि सासूला म्हटले, तुम्ही दोघे देवाला जाऊन या, बाळासाठी साकडे घाला. याला मात्र दोघे तयार झाले. ते दोघे घराबाहेर पडताच बॅग घेतली, बाळाला उचलले आणि तरातरा चालत गेटजवळ पोहोचले, तोच वाॅचमनकाका मागून हाका मारत आले. अहो ताई, तान्ह्या बाळाला घेऊन एकट्याच कुठे निघालात? मग त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. बाळाला डाॅ. कडे नेते हे कळल्यावर
त्यांनाही पटले.त्यांनी आश्वासन दिले, ताई तुम्ही निर्धास्त रहा.
कुणाला कळणार नाही. बाळाला जपून न्या अन जपून आणा!
पायरया चढून दवाखान्यात गेले. बाळाला टेबलवर ठेवले. डाॅक्टर चकित!! वीस दिवसांच्या बाळाला घेऊन एकटीच बाई भर दुपारी कशी आली? मग मीच सर्वकाही सांगितले. त्यांनी बाळाला तपासून सांगितले, ताबडतोब काही अॅन्टिबायोटिक्स सुरू करावी लागतील अन्यथा न्यूमोनियाच होण्याच्या मार्गावर आहे. मग जवळच्या मेडिकलमधून औषधे आणून एक डोस डाॅ. समोरच बाळाला दिला.
घरी आल्याबरोबर सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. रोज ठराविक वेळी सर्वांची नजर चुकवून बाळाला औषध देत राहिले. तीन दिवसात बाळ खडखडीत बरे झाले!
नवरोबांना म्हटले, 'देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला!'
हल्ली मायबोलीवरचं हे अशा
हल्ली मायबोलीवरचं हे अशा प्रकारचं लेखन बघून चक्रावायला होतं. अलीकडेच कोतबोत एका डुआयडीने एक डेंजर इश्यू लिहिला होता(जो बहुधा फेक असावा) पण त्यालाही खूप लोक असंच रिएक्ट झाले की ओके, हे असं होऊ शकतं.
हे सगळं बघून आपण भारतातच वाढलो ना, की आपण एका आयसोलेटेड सोशल ग्रुपमध्ये बबलमध्ये होतो, की मायबोलीचा डेमोग्राफिक बदलला असे प्रश्न पडतात.
काहीच्या काहीच्या काही आहे हे. आमची तर कामवाली पण घरी कोणी आजारी असेल तर डॉक्टरकडे नेते. कामवाली, भाजीवाला सगळे परवडत नसताना डॉ बर्वेंच्या खाजगी हॉस्पिटलात जातात (सरकारी हॉस्पिटल स्वस्त असलं तरी फालतू आहे म्हणतात.) अशिक्षित लोक पण इतके स्मार्ट असतात आणि इथे शिक्षिका बाई व तिचा शिक्षित नवरा...
अलीकडेच कोतबोत एका डुआयडीने
अलीकडेच कोतबोत एका डुआयडीने एक डेंजर इश्यू लिहिला होता(जो बहुधा फेक असावा) पण त्यालाही खूप लोक असंच रिएक्ट झाले की ओके, हे असं होऊ शकतं. >>
बहुतेक माझ्या बद्दल बोलताय. डेंजर इश्यू.. फेक इश्यू.. काय बोलणार आता
सनवजी, जगात अनेक गोष्टी
सनवजी, जगात अनेक गोष्टी आपल्या कल्पनेपलिकडील घडत असतात. ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा आहे. घराघरांतून चालत आलेल्या परंपरा, मागास विचारांमुळे शिक्षित लोकांवरही याचा प्रभाव जाणवतो.अजूनही आजारी पडल्यास नजर काढणे, देवाचा कोप झाला असे समजून देवाला जाणे,बळी देणे असे प्रकार चालतात. वरकरणी दिसून येत नाही पण शिक्षित लोकांमध्येही हे प्रमाण जास्त आहे. हे कसे चूक आहे, हेच कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या ओळखीत एकही असा नाही जो
माझ्या ओळखीत एकही असा नाही जो स्वतःच्या बायकोचा फोन आल्यावर घाबरत नाही. >> अरे रे.. सगळ्यात जवळचे नाते इतके वाईट ...
अशा वेळेस तरीही लोक एकत्र का रहात असतील असा प्रश्न मला पडतो.
कथाही डेंजर आहे. म्हणजे कथानक बरका, तुमची कथा नव्हे. ते खूप ठिकाणी वास्तव असावं.
अॅमी, तु म्ही माबोवर नाही हे कळले पण तुमचे ठोकताळे सरसकट खरे नव्हेत.
आमच्याकडे, प्रत्येकजण स्वतःच्या पगाराचे नियोजन करतो. (आम्ही फायनान्शियली 'आहाहा' लिटरेट नाही हे ही सत्य आहे, पण माझे पैसे मी कुठे गुंतवावेत हा सर्वस्वी माझा निर्णय असतो, तसच नवर्याच्या पैशांबाबतीत त्याचा. अर्थातच आम्ही एकमेकांशी चर्चा ही करतो मनात शं का असल्यास. बहिणीला च्या कामाच्या पार्श्वभूमिमुळे तिला ह्या बाबतीत माझ्या पेक्षा जास्त कळतं हा अनुभव आल्याने मी शंका आल्यास तिचाही सल्ला घेते. आर्थिक सल्लागाराचाही.)
धन्यवाद नानबा!
धन्यवाद नानबा!
आपल्याच समाजात जन्मतःच मुलीची हत्या केली जाते. काहींना जन्म घ्यायच्या आधी गर्भातच मारलं जातं. कोणत्याही आईला ही पटणारी गोष्टच नव्हे. तरी सुद्धा आपल्या नजरेआड किंवा वर्तुळाच्या बाहेर अशा अनेक प्रकारच्या घटना कमीअधिक तीव्रतेने घडतच असतात. कधी त्या घटनांना वाचा फुटते तर कधी बिनबोभाट अशी कृत्ये होत राहतात इतकेच.
मी तसा सुखी आहे. आमच्याकडे
मी तसा सुखी आहे. आमच्याकडे सर्व मोठे आणि महत्वाचे निर्णय मी घेतो. छोटे मोठे निर्णय माझी पत्नी घेतेे. उदा. अमेरिकेने अफगाणिस्तान मागून सैन्य मागे घ्यावे कि नाही किंवा ब्रिटन ने EU मधून बाहेर पडावे कि नाही असे निर्णय मी धेतो. मेहुणीला बर्थ डेला काय गिफ्ट द्यावी किंवा माझ्या बहिणीला भाऊ बीज काय द्यावी असे क्षुल्लक निर्णय माझी पत्नी घेते. त्यामुळे आमच्या घरांत शांतता असते. तुम्हीही ही पॉलिसी करून पहा.
प्रभुदेसाई भावू आपण बोकलतच्या
प्रभुदेसाई भावू आपण बोकलतच्या भावकीतले हैतासा काय ?
(No subject)
भयंकर...आई धैर्यवान...यापुढे
भयंकर...आई धैर्यवान...यापुढे असेच घट्ट राहावे...
बाळ बरं झाल्यावर नवऱ्याला आणि सासूबाईंना औषधाच्या बाटल्या दाखवायला हव्या होत्या आणि त्यांना डॉक्टरकडे न्यायला हवं होतं...
Pages