माननीय श्री मुख्यमंत्र्यांना टरबूज बोलल्यावर तुम्हाला राग येतो का?

Submitted by बोकलत on 24 November, 2019 - 23:27

आपले माननीय मुख्यमंत्री हे खूपच मनमिळावू स्वभावाचे आहेत, तसेच ते खूप मेहनतीने काम करताना दिसतात. परंतु त्यांची मेहनत झाकोळली जाते. अनेक लोकं त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून त्यांना टरबूज, टरबूज्या अशी नावं ठेऊन त्यांचा अनादर करत असतात. परवाचीच गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमध्ये एकजण बोलत होता की त्याच्या बायकोला मुख्यमंत्री दिसले की टरबूज ज्यूस प्यायची इच्छा होते. घाईघाईने शपथविधी उरकला त्या दिवशी सकाळी सकाळी बायकोने त्याला ज्यूस आणायला पिटाळले. तर आपल्या मुख्यमंत्र्यांना अशी नावं ठेवणं योग्य आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी काही सापडले नाही की लोक शारीरिक ठेवण वगैरेवर घसरतात आणि सगळ्यात मोठ्ठी गम्मत म्हणजे हेच लोक दुसऱ्यांवर पातळी सोडल्याचा आरोप करतात Rofl

नावे ठेऊन काय होणारे? आता नावे ठेवणारे स्वतःच्या आई बापाला, भावा- बहीणीला, मित्रांना, शेजार्‍या-पाजार्‍यांना, बॉसला, शाळेला, कॉलेजला, सगळ्या दुनियेला नावे ठेवत हिंडतात. मग मुख्यमण्त्री कसे वाचतील?

मुख्यमंत्री - टरबुज

उ. मुख्यमम्त्री - काकडी

मोठे ठाकरे - सील

छोटे ठाकरे- पेंग्विन

काकाश्री - वांगे

राज - टॉमेटो

जयंत पाटील- डाळिंब

पृथ्वीराज चव्हाण- लाल भोपळा

अशोक चव्हाण- दोडका

गिरीश बापट - गिलके

रामदास आठवले - कांदा

येऊ द्या अजून.....

मागे कोणा आमदार की खासदार बाईंनी पंतप्रधानांना फुटाणा म्हणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला. त्यावर अजितदादा पवारांनी बाईंची कानउघाडणी पण केली होती

भाजपा आणि फडणविस आवडत नसले तरी एखाद्याला त्याच्या शरिराबद्दल (किंवा अजुन काही व्यंग असतील तर) असे संबोधणे मला आवडणार नाही.

मी स्वत: असे संबोधत नाही आणि असे करण्याच्या प्रकाराला उत्तेजन देत नाही.

माननीय श्री मुख्यमंत्र्यांना टरबूज बोलल्यावर तुम्हाला राग येतो का?
<<

अजीबात राग येत नाही,
उलट बोलणार्‍याच्या बुद्धीची किव येते.

अजिबात नाही... आता काका पवारांना शिवसैनिकांनी मैद्याचं पोतं म्हटलं म्हणुन कोणाला राग आला काय? माणसांकडचे चर्चेचे मुद्दे सम्पले की नावे ठेवणे सुरु होते.

अरे बाबांनो आपल्याला आला राग तरी काय होणार? म्हणतात ना मारणार्‍याचा हात धरता येतो, पण बोलणार्‍याचे तोंड धरता येत नाही. आता मागे स्व. बाळासाहेब , सोनिया गांधींना पांढरी पाल म्हणले होते, पवारांना मैद्याचे पोते. मग आता काय झाले की पवार व सोनिया हे दोघेही ते विसरले? हो ना ? द्या सोडुन. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही न काही गुण-दोष असतात. पण ८० टक्के गुण असले तरी उरलेल्या २० टक्के वैगुण्याकडे लक्ष जाते हे खरे आहे. वास्तवीक ते खरे व्हायला नको आहे, पण होते.

राजकारणात कोणीच कोणाचा शत्रु नसतो हे आता १०० टक्के सिद्ध झालेय. मग जाऊ द्या त्रास करुन घेऊ नका.

आता सगळेच पक्ष एकमेकांचे चांगले मित्र झालेत त्यामुळे हा प्रकार कमी होईल/थांबेल असं वाटतंय का?

नाही

आमच्या गावी लोक मित्रांनाही प्रेमाने असे संबोधत असत.
भेरक्या(तिरळा), ढेरपोट्या, बारक्या, टकल्या, फेंगड्या (लंगडा) वगैरे संबोधने सर्रासपणे तोंडावरच वापरली जात.
मी याचे समर्थन करत नाही, फक्त निरीक्षण सांगतोय.

मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला मैद्याचे पोते म्हणणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, ती सोडून हे टरबूज वगैरे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.

कुणालाही टरबूज, मैद्याचं पोतं किंवा पांढरी पाल असे म्हणण्यापूर्वी

आपली लायकी किती? आपला पगार किती? आणि आपलं वय किती?

याचा एकदा तरी विचार करावा.

या सर्व व्यक्ती लोकनियुक्त खासदार आमदार आणि घटनात्मक पदांवर आहेत/ होत्या.

बाकी काही नाही तरी निदान भारतीय घटनेचा आदर म्हणून सार्वजनिक न्यासावर लिहिताना काही तरी किमान विधिनिषेध बाळगावा असे मला वाटते.

खाजगीत आपण आपल्या बापाला काय म्हणता हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे.

इथं पंतप्रधानांना फेकू, चायवाला, हिटलर छाप कित्येक विशेषणं आहेत, त्या मानाने टरबूज काहीच नाही. ते स्वतः मनावर घेत नाहीत, मग तुम्ही कशाला रक्त आटवताय ?

खरेजी परत आले.

आता ते मला सर्कमसीजनवर प्रश्न विचारत बसतील, पण मी उत्तर देणार नाही

Proud

पंतप्रधान मनावर घेतात हो. एका सभेत त्यांनी ही सगळी विशेषणं गाऊन दाखवली होती.

मुझे ये कहा मुझे वो कहा.

गळा काढायचाच शिल्लक होते.

राणेंचे अभिनंदन

राणे भाजपातच राहावेत आणि पुन्हा भाजपा 2 वर यावी.

unnamed_0.png

बाबर की पनवती,

बाबर को तरबुजा बहोत पसंत था, एक दिन किसी ने उस्को तरबुजा दिया , तो उस्को अफगाण के तरबुजे की याद आई और वो बहोत रोया था.

https://asia.si.edu/food-for-thought-melons-mangoes-and-mughals/

Pages