बेस कॅम्प डायरी भाग २

Submitted by मधुवन्ती on 24 November, 2019 - 04:45

२८ सप्टेंबर २०१४
----------------------
पहाटेच जाग आली ती डोकेदुखीनेच. कालच्या सततच्या प्रवासामुळे आणि dehydration मुळे हे झालं असावं. तरीही बाहेर जावं लागणार होतं. नेपाळ टुरिझम बोर्डच्या ऑफिसमधे पोचलो. इथे वेगवेगळ्या ट्रेक्ससाठी परमिट्स,शिखरांवर चढाईच्या परवानग्या दिल्या जातात.आमच्या ट्रेकसाठी TIMS card (Trekkers Information Management System) असणं जरुरी होतं.हे कार्ड ट्रेकर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.नेपाळची अर्थव्यवस्था शेती आणि पर्यटनावर अवलंबून आहे. जगातील अतिउंचीची शिखरे या देशात आहेत आणी त्यामुळे हा छोटासा देश आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांसाठी महत्त्वाचा आहे.हे adventure tourismपूर्णपणे सुरक्षित बनवण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.
एक छोटासा form भरला आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केली. अवघ्या १० मिनिटांत आमचं काम झालं होतं. त्यानंतर आम्ही बाजारात थोडी खरेदी करायला गेलो. इथे North Face,Mountain Hardware,Marmot असेब्रँडेडकपडे आणि trekking Equipments ची दुकाने आहेत. तुमचं budget कमी असलं तर तुम्हाला नकली गोष्टीदेखील मिळू शकतात.
‘थामेल’ हा भाग लॉजेस,रेस्टॉरंट्स,पब्स, कॅफेज आणिहस्तोद्योगाच्या वस्तूंची दुकाने आदींनी गजबजलेला दिसतो. इथे आल्यावर मला लेहच्या एका मोठ्या स्वरूपाला बघतो आहोत, असंच वाटत होतं.सगळीकडे परदेशी पर्यटक,western music,गजबजलेले cafe's आणि souvenirs नी भरलेली दुकानं...नुसता फेरफटका मारायचा ठरवला, तरी खूप विविध आणि मजेमजेदार वस्तू बघायला मिळू शकतात आणि तुमचा वेळ अगदी मजेत जातो.
खरेदी आटपून पोटपूजा करायला एका रेस्टॉरंट ‘मोमो हट’मधे जाऊन सूप ‘लसान्या’ नावाचा इटालियन पदार्थ जेवून हॉटेल रूमवर परतलो. थोडा आराम आणि आवराआवरी झाली. संध्याकाळी आधी ठरल्याप्रमाणे ’ख्रिस्तिना’ आली. थोडी नाराज दिसत होती. त्याला कारणही तसंच होतं. ख्रिस्तिना स्पेनच्या केनरी आयलंडची सायकलिस्ट. गेल्या आठ महिन्यांपासुन स्त्री-पुरुष समानतेसाठी सायकलने जगभ्रमणाला सुरुवात केलेली एक जर्नालिस्ट. माझ्याकडे तीन दिवस राहिली होती आणि त्या तीन दिवसांत आम्ही खूप घट्ट मैत्रिणी बनलो. तिला नेपाळहून तिबेटला सायकलनी पोहोचायचं होतं; पण चीनने तिचा व्हिसा नाकारला. केवळ ती एकटी आहे या कारणासाठी. शिवाय त्यातच तिच्या पाठीचं दुखणं अधिकच बळावलं. पाठीत एक छोटी गाठ असल्याचं डोक्टरांच्या लक्षात आलं आणी त्यामुळे तिच्यावर अजूनच निर्बंध आले. तिचा निश्चय अजूनही कायम आहे. तिचीट्रीटमेंटसंपल्यावर ती म्यानमार आणि तिथून इंडोनेशियाला जाऊन तिचा प्रवास सुरुच ठेवणार आहे.तिच्याबरोबर Northfield Cafe मधे गेलो. तिला मी जवळजवळ दोन महिन्यांनी भेटत होते. सगळ्या भावनांचा उद्रेकच झाला. खूप गप्पागोष्टी, खाणे-पिणे...हे क्षण खूपच छान गेले.आम्हाला हे सगळेच क्षण मुठीत घट्ट बंद करुन ठेवावेसे वाटत होते. आम्ही परत कधी भेटू? दोघींनाही माहिती नव्हतं; पण आम्ही एकमेकींसाठी आयुष्यभर टिकेल इतका आनंद निर्माण केला आहे हे मात्र खरं.

mayboli 1.jpg

आधीचा भाग वाचा,

https://www.maayboli.com/node/72432

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

छान लिहिताय पण भाग खूपच छोटे वाटत आहेत.
मनावर पकड घ्यायला सुरुवात करतात तोवर संपत आहेत.

जरा मोठे भाग लिहिलेत तर वाचायला अजून मजा येईल.

जरा मोठे भाग लिहिलेत तर वाचायला अजून मजा येईल पण एकत्र करण्यापेक्षा सविस्तर लिहा, मायबोलीकरांना सविस्तर लिखाण आवडते.