बेस कॅम्प डायरी

Submitted by मधुवन्ती on 23 November, 2019 - 08:38

२७ सप्टेंबर २०१४

मुंबई एअरपोर्टकडं प्रयाण केलं. चेक इन,सिक्युरिटी चेक वगैरे सोपस्कार पार पडले आणि विमानानं टेक ऑफ घेतल्यावर मी आणि माझी मैत्रीण मीनाझनं एकमेकींना टाळी दिली. अखेर बऱ्याच ठरवाठरवी आणि तयारीनंतर आमचे पाऊल एकदाचे नेपाळच्या दिशेने पडत होते. आम्ही दोघींनीच कोणाच्याही मदतीशिवाय आणि सोबतीशिवाय या ट्रेक ला जायचं ठरवलं तेव्हा बर्याच जणांनी आम्हाला वेड्यात काढलं,आम्ही हे कसं करु शकु? असा विचार करुन कित्येकांनी आश्चर्य व्यक्त केलं पण आमची तयारी झाली होती.
विमान दिल्लीला पोहोचले आणी आधी ठरल्याप्रमाणे दिल्लीतल्या मित्राने - ललितने - आम्हाला एअरपोर्टवरून घरी नेलं आणि आम्ही त्याच्या बायकोने बनवलेल्या जेवणावर ताव मारत भरपूर गप्पा मारल्या.
नेपाळचं विमान मात्र बराच उशीर करीत सायंकाळी ६.३० वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. आमची मैत्रीण रेखा आमचं स्वागत करायला आलीच होती. बीरेंद्र आणि रेखा हे जोडपं इथं एक गायडिंग कंपनी चालवतात. तिनं आधीपासून टॅक्सी बोलावून आम्हाला आमच्या ‘थामेल’मधल्या लॉजमध्ये नेऊन सोडलं. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आला होता त्यामुळे थोडंसं जेवून लगेच झोपायला गेलो.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! पुढील भाग लवकर येऊ द्या. आणि हो, फोटो असतील आजूबाजुच्या परिसराचे तर ते टाकायला सुद्धा विसरू नका.