भूक

Submitted by सोहनी सोहनी on 24 November, 2019 - 00:06

भूक

मनाला मोहून टाकणारे धुके सर्वत्र पसरले होते, शीतल वाऱ्याच्या लहरी अंगाशी झोम्बा झोम्बी करत होत्या, डोळे बंद करून, हि भूल घालणारी हवा फक्त अनुभवत रहावं असं ते वातावरण, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनचा आवाज सोडला तर पूर्ण आसमंत प्रसन्न हसत होतं,
कॉलेजला जाणाऱ्या मुली छान स्वेटर, स्कार्फ तर कुणी जॅकेट्स घालून हातात हात घासून त्यांची उब गालांना लावत लगबगीने खाली उतरत होत्या, काही मुलं कॉलेजच्या नावाखाली स्टेशनवर बसूनच टवाळक्या करत बसले होते,
कुणी ऑफिसच्या गडबडीत तर कुणी मुलांच्या शाळेच्या, प्रत्येकजण आपापल्या लहरीत ...

सगळे आवाज कानावर पडून देखील आज तिला उठावेसे वाटत नव्हते, एव्हाना लोक जमायच्या आधी ती आपली फाटकी चादर गुंडागून तिथून पसार व्हायची ..
पण आज त्राण नसल्या सारखी ती पडूनच राहिली, त्या शेवटच्या बाकावर अंग जमेल तितकं आकसून डोक्यावरून चादर घेऊन ती झोपून होती,
गेले दोन दिवस पाण्याव्यतिरिक्त काहीच पोटात न गेल्याने अंगात ताप होता, कमालीची अशक्तपणा जाणवत होती,अजूनही वेगळं कारण होतच ताप यायचं, कमरेखाली दुखत होतं ..

अंगावर थंड पाणी अचानक पडल्याने ती दचकून उठली ,
एक मुलगा आणि मुलगी शेवटच्या बाकावर एकांत मिळावा म्हणून बसायला आले होते,
त्या मुलाने " तुझ्या बापाचा स्टेशन आहे का, इथे झोपायला??" असं म्हणून तिची चादर झटक्यात ओढून पोरींसमोर उगीचच इम्प्रेशन पडायचा प्रयत्न केला,
" तो क्या तेरे ससुर से दहेज में मिला है, ***##***" तिच्या परिस्थितीचा राग नकळत तिच्या शब्दांतून बाहेर आला,
मुलगी असल्याने त्याचा हात आवरला नाहीतर मार भेटलाच असता... पण आज तिला कसलीच भीती नव्हती, त्या पेक्षा संवेदनाच नव्हत्या असा निर्विकार चेहरा घेऊन बाजूच्या मुतारीत जाऊन तोंड धुवून चादर तिकडेच चेपून ती परत स्टेशनवर आली,
पान, गुटका, वैगेरे थुंकून लाल झालेल्या पाणपोई वरून पोट भरून पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं,

आता रोजचंच पण दिवसभर ज्या साठी मरायचं तोच प्रश्न, पोटाचा???

" तिला पर्वा दिवशीचे त्या छोट्या हॉटेलवाल्या मालकाचे शब्द आठवले, फुकट जेवण पाहिजे असेल तेही पोटभर तर पुन्हा ये, संध्याकाळसाठी बांधूनही देईल"
ती सुन्न झाली, पुन्हा पोटात कळ आली, फाटकी मळकी गुढग्यापर्यंतची फ्रॉक सांभाळत ती पुढे चालू लागली,

नाव गाव माहित नाही, पण तिच्या दिवसाची सुरूवात इथूनच स्टेशन वरून आणि शेवट देखील इथेच व्हायचा ...
जेमतेम १५ वर्षाची,इथे कशी आली का आली, माहित नाही, इतकंच माहित कि सकाळ झाल्यापासून रात्र होईपर्यंत वणवण फिरायचं, का?? तर पोटासाठी....

चाप टिकल्या विकणाऱ्या मुली ट्रेन यायची वाट पाहत वाकून वाकून रुळावर लांबपर्यंत पाहत होत्या, तिने एकदा स्वतःला त्यांच्यात घ्यायची विनंती केली होती पण त्यांनी तिला हाकलवून लावल होत, १०, १२ वर्षाची ४, ५ पोर पॉलिथिन मध्ये मिरची, आवळा, काकड्या घेऊन येईल जाईल त्याला विकायचा प्रयत्न करत होते, तर काही पोरं येणाऱ्या जाणार्यांकडून भीक(पैसे) मागत होते. . .
पायऱ्या उतरून खाली आली तर एक बाई रडक्या मुलाला कडेवर घेऊन येणाऱ्या जाणार्यांकडे हात पुढे करून भीक मागत होती, रोजच दिसणाऱ्या गोष्टी पाहून न पहिल्या सारख्या करत सरळ स्टेशनच्या बाहेर आली,
२ दिवस काहीच खाल्लं नसल्याने पोटात आगीचे डोंब उसळत होते, अशक्तपणा तर होताच पण त्या पेक्षाही जास्त त्रास होत होता तो स्वतःच्या अगतिकतेचा, लाचारी आणि फाटक्या दैवाचा...

बाजूलाच सँडविच, मंचुरियन, वडापाव, सामोसा, इडलीची वैगेरे दुकान होती, पण तिथे काही मागायला गेलो तर एका गोष्टी शिवाय काही खायला मिळत नसायचं, ते म्हणजे मार आणि शिव्या...

तो पर्याय तिने ३ वर्षे झाली स्किप केला,ती सरळ रस्त्याने चालू लागली,
पायात कधीच तरी चप्पल असायची, केस मळून राठ झालेले, धुतला असला तरी काळवंडलेला चेहरा घेऊन ती इकडे तिकडे फिरत होती.
नेहमी प्रमाणे तिचे पाय वळले ते कुठल्याश्या दवाखान्याकडे, कुणीतरी लहानपणी तिला सांगितलं होत कि
तू ह्याच दवाखान्यातून इथे आलीयेस, तुझी आई म्हणे पोटाशी असताना दवाखान्यात आत गेली ती पुन्हा बाहेर आलीच नाही,
तिने कितीतरी वेळा बाहेर आलीच नाही म्हणजे ती आतच असणार, कधीतरी बाहेर येईल मला शोधत, म्हणून ती त्या गेट जवळून दवाखान्याच्या प्रवेश द्वाराकडे एक दीड तास टक लावून पाहायची १० १२ वर्षाची असताना, आणि आता नुसतीच सवयीने ...
सिक्युरिटी वाल्यांच लक्ष गेल कि ते हाकलवून लावत असायचे,
आधी ती रडायची, म्हणायची माझ्या आईला शोधायला आलीये तर ते त्याच्यावर जोर जोरात हसायचे आणि आता ते फक्त तिच्या वाढत्या शरीराकडे हपापलेपणाने पाहत राहायचे,
तिच्या लक्ष्यात आलं कि ती तिथून काढता पाय Gyaaयची,
पण आज त्या नजरेत तिला काही गैर वाटलं नाही, पुन्हा भुकेची जाणीव झाली तशी ती काही मिळतं का म्हणून अन्नाच्या शोधत वणवण करू लागली..

थोड्याच अंतरावर इन्गिश शाळा आहे, तिथून शाळेत जाणाऱ्या पोरांकडे ती रोज हरखून पाहत असे,
त्यांचे कपडे, शूज, गळ्यात ओळखपत्र,पाण्याची बाटली,पाठीवर बॅग, आणि हाताला धरून नेणारे आई वडील,
नकळत तिच्या डोळ्यात पाणी यायचं, पण पाणी येणं म्हणजे कमजोरीच लक्षण, जगायचं असेल तर विचार आणि लाज बाजूला ठेवून हात पसरायला शिकायचं असत, हे ती ह्या वयात व्यवस्थित शिकली होती, पण २ दिवस आधी जे झालं ते हि करावं लागत हे तिला माहित नव्हतं . . .

समोर मस्त वेगवेगळी बिस्किटं काचेच्या आत ठेवली होती, आणि चहात घातलेल्या आल्याचा वास तिची भूक वाढवत होता,ते पाहून तिच्या पोटात जणू भुकेने दुखायलाच लागलं,
चहावाल्याकडून काहीतरी खायला मागितलं पण त्याने चार शिव्या देऊन हाकलवल, दुरूनच एक हवालदार एकेक दुकानातून एकेक वस्तू पैसे न देता नुसता वर्दीच्या जोरावर हिसकावून घेत प्रत्येक दुकानाकडे येत होता,
तो चहा वाल्याकडे पोहोचला आणि तिला पाहिलं तर पाटोरीवर २ दांडे मारेल आणि १० मिन आपल्या पायांचा त्राण गेल्याची सनक डोक्यात पोहोचेल, त्यापेक्षा तिने तिथून काढता पाय घेतला,

धावल्यामुळे धापा लागल्या, धावत धावत रस्त्यावर पोहोचली, दोन गाड्यांच्या चाव्या खिशात घालून ऑफिस कडे चाललेले आणि मागे तीन मुलं " ओ साहेब ठीक आहे घ्या पाचशे रुपये, पण चावी द्या आधी" असं म्हणताच वळलेले हवालदार होते, सिग्नल पडायच्या प्रतीक्षेत असणारी तिच्या सारखीच कितीतरी पोरी हातात काय काय वस्तू घेऊन उभ्या होत्या, सिग्नल पडला तशे, सगळे धावत सुटले, कुणी गाडी पुसत, कुणी काय काय विकण्याचा प्रयत्न करत होते, तरी काही बायका रडत नसणाऱ्या बाळाला जोरात चिमटा घेऊन रडवून पैसे मागत होते,
आपल्याला हे काम करायचं होत पण सामान आणायला हिस्सा म्हणून आपल्याकडे एकशे पन्नास रुपये नव्हते, आणि २ महिन्यांनी पैसे जमवून गेलो तेव्हा त्यांनी घेतलं नाही, म्हणे खर्च परवडणार नाही तुझा...
डोळ्यातून आलेली असावे तिने मोठा श्वास घेऊन आल्या पावली परतून लावली,
कारण ह्या पेक्षा अजून खूप काही सोसायची तयारी तिच्या मनाची चालली होती. . .

दुकानांच्या मोट्या मोठ्या कचऱ्याच्या डब्ब्यात २ वर्षे आधी तिला पोटभरून खायला मिळायचं, टाकलेलं तर टाकलेले, उष्ट तर उष्ट पण मिळायचं,
आता सफाई कामगार काहीच ठेवत नाहीत सगळं साफ करून ठेवतात, कचरा आणि डस्टबिन ...

कुणी कामाला पण ठेवत नाही, २ महिने भांडी घासायला होती एका वडापाव वाल्याकडे, पैसे नाही दिले कधी पण पोटभरून खायला द्यायचा आणि त्या नजरेने पाहत पण नसायचा म्हणून केलं काम पण
कुणी तरी काम करताना विडिओ काढून बालकामगारांना ठेवतो म्हणून केस करेल असं सांगून धमकी दिली, मी १५ वर्षाची आहे असं मी ओरडून ओरडून सांगत होते पण, मी दिसत नाही तेवढी मोठी म्हणून मला काढून टाकलं आणि पुन्हा तेच चालू झालं वणवण, २ घास अन्नासाठी...

तिची पावले तिच्या हि नकळत त्या छोट्या हॉटेल जवळ वळली,
साधारण माणूस इतकं कशासाठी कमावतो पोटासाठी, कुणी चोऱ्या माऱ्या का करतो पोटाची आग वीजवण्यासाठी, ह्या अगीपुढे कशाचंच भान उरत नाही,
उपाशी पोट, रिकामा खिसा आणि खोटं प्रेम माणसाच्या हातून काहीही करवून घेतं . . .

ती निर्जीव नजरेने आत गेली, तिला पाहून तो गल्ल्यावरूनच ओरडला, ए राम्या हिला पोटभर खायला दे रे, पैसे मागू नकोस,
तो गडी तिच्याकडे कुत्सित नजरेने पाहून समोर ताट आपटून गेला,
वाटण्याची भाजी, ४ पुऱ्या, वरण भात, १ लोणच्याची फोड, अर्धा पापड, आणि कडेला प्रसादा इतका शिरा, आयुष्यात पहिल्यांदाच असं जेवण तिला मिळालं होत, ताज्या जेवणाचा वास तिला वेडावून गेला,
त्या वासाने ती त्या ताटावर तुटून पडली,
पण तिच्या डोळ्यांतून अविरत पाणी येत होत, भुकेपुढे सगळं गौण होत, जेवण संपलं तरी डोळ्यातलं पाणी थांबलं नाही,
कारण आता वेळ होती त्या जेवणाची किंमत मोजण्याची. . .

तो तर गल्ल्यावरून कधीच उठून मागच्या छोट्या सामान ठेवण्याच्या रूम मध्ये गेला होता, आणि आता तीही तिकडेच चालली होती,

त्यादिवशी तिच्याकडे कधी नव्हे ते एकसोबत अठरा रुपये होते, हा हॉटेल पाहून काशी काय देव जाणो पण तिला आत जायची हिम्मत झाली, कधीतरी चांगलं खावं हि इच्छा इतकी प्रबळ झाली कि ती स्वतःला थांबवू शकली नाही,
वीस रुपयाची वडा उसळ तिने खाल्ली, गल्ल्यावर देताना होती तितकी सगळी चिल्लर देऊ केली, त्याने मोजले तर अठरा रुपये तसं त्याने वर पाहिलं, तिला पाहून तो खवळालाच, पूर्ण पैसे दे तो खेचकलाच, तिने नाहीत म्हणून सांगितलं, न जाणे क्षणभर त्याच्या मनात काय आलं, त्याने अठरा रुपये तिच्या अंगावर फेकून चल भांडी घास म्हणून तिला ओढत त्या रूम मध्ये नेलं, दरवाजा लावून घेतला, भीतीने थरथरणारी ती ओरडू हि शकली नाही, त्याने तिला लोटून दिलं, खाली पडली तशी तो तिच्या अंगावर झेपावला,
वाईट नजरेचा अनुभव होता तिला पण स्पर्शाचा नव्हता, तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंड दाबलं गेलं, त्यांना वजनापुढे तिच्या कृश देहाचा प्रतिकार म्हणजे मुंगी ने हत्तीला मारायला धावावं असं होत,

तिच्या नग्न देहाकडे जाताना एकवार पाहून म्हणाला होता " पोटभर जेवायचं असेल ते हि फुकट तर पुन्हा ये इकडे"

तिनेही त्या रूम मध्ये पाऊल ठेवलं आज पुन्हा, तो आधीच तिथे आला होता,
तिच्या देहावर त्याची हवस पूर्ण करत होता, आणि निर्जीव नजरेत सुकलेल्या अश्रूंसोबत आज जाताना पिशवीत बांधून मिळणार जेवण होतं''

( काही चुका असतील तर आवर्जून सांगा )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भयंकर आहे.

कथा म्हणून लेखन आणि शैली मस्त!
लघुकथा आणि त्यात मांडणी छान.

तो तर गल्ल्यावरून कधीच उठून मागच्या छोट्या सामान ठेवण्याच्या रूम मध्ये गेला होता, आणि आता तीही तिकडेच चालली होती,>>>>>>>>> इथेच कथेचा शेवट केला असतात तर अजुन मस्त वाटलं असतं.

तुमचे बाकीचे लिखाण जसे उतरते तसे हे वाटले नाही. ठरवून लिहिल्यासारखे/ थोडे कृत्रिम असे वाटले.

कदाचित माबुदो.

सुगध मॅम, राधानीशामॅम, प्राजक्ता मॅम, किल्ली मॅम, सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार,

वैभव सर, योग्य म्हणत आहेत तुम्ही, पण मला असं वाटलं कि काय झालं आहे ते डिटेल लिहायला हवे, म्हणजे वाचणाऱ्यांना सोयीचं पडेल, इतकंच . . .

अतरंगी सर, कृत्रिम म्हणजे मला आता कळलं नाहीये, पण म्हणजे जसा विचार आला तसं लिहिलं, तरीही पुढच्या वेळेस नक्कीच काळजी घेईन, वेळोवेळी सांगत चला प्लिज . . .