प्रकृतिमान

Submitted by pkarandikar50 on 22 November, 2019 - 02:14

सुमारे पंधरा वर्षापूर्वी मी ही कविता 'मायबोली' वर 'टाकली' होती. नंतर कशी कोण जाणे, ती गायब झाली होती! माझ्याकडे स्थळप्रत नव्हती. त्यामुळे ती कायमची हरवली असे मी समजून चाललो होतो पण आंतरजालाची दुसरी किमया म्हणजे आज ती सापडली.आपल्याकडे 'प्रकृती ' आणि 'पुरूष' ही दोन आदितत्व मानली गेली आहेत. या कवितेत प्रकृती पुरुषाला काही प्रश्न विचारते आहे.

प्रकृतिमान

लक्ष लक्ष आकाशगंगा
स्त्रवणार्याा बीजांडकोषी
झांजरगूढ वेदनेची कळ
तू ऐकलीस का?
थरथरणार्याय आकांतस्पर्शी
उमलत्या दंवकळीच्या देठी
इवलेसे तर्पण अक्षयी
तू वाहिलेस का?
चैत्रांकुरभाळी आर्तावल्या
सृजनगर्द आर्जवी संपुटीत
अंतरिक्षाचा खोल प्रतिध्वनि
तू भरलास का ?
(आगामी काव्य-संग्रहातून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच !

अतरंगी स्वप्नजाले
वसे जी गूढगर्भता
भेद घेऊनी अंती त्याचा
भावविश्व आपुले
तु जपलेस का ?