लग्ना नंतर

Submitted by Swamini Chougule on 18 November, 2019 - 05:43

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

आपलं घर समजून ती

घरी परत येते

सासरी झालेल्या जखमांनी

ती व्यथित होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

माहेरी आधार मिळेल

म्हणून ती आशा करते

आधार सोडा पण ती

सहानुभूती ला ही पारखी होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

बाप नीट बोलत नाही

आई तर दुसरी सासू होते

भाऊ तर विचारात ही नाही

बहिणी साठी गौण होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

ज्यांची सेवा करण्यात ती

अर्ध आयुष्य काढते

त्यांच्या कडून अपमानित होऊन

कोपऱ्यात जाऊन रडते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

कमावत असेल तर जरा बर

पण अपमान चुकत नाही हे खरं

घरात किती राबली तरी

समाधान त्यांचं होत नाही

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

नातेवाईकांची करडी नजर

घाराच्याची बोलणी जहर

स्वतः ला देऊन दिलासा

जळत राहते रात्रं दिवसा

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

आप्तेष्टां ची रूपे पाहून

पुन्हा नवा डाव मांडते

तडजोड करून(दुसऱ्या) लग्नाची

घरातून निघून जाते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

गेल्यावर एकदा परत फिरून येत नाही

माहेर बद्दल तीच्या मनात प्रेम जरा राहत नाही

आई तक्रार करते माहेर पणाला येत नाही

काही केल्या तिच्या मनातली जखम भरत नाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अ‍ॅडल्ट मुलीने तिचे स्वतःचे घर घेउन राहावे. परत माहेरी का बरे जायचे. गरज नाही परत माहेरी जायची. तोपरेन्त घरातल्या नात्यांचे डायनामिक्स बदललेले असते. ह्या नणंदा जावेला नीट संसार करू देत नाहीत. सर्वत्र बॉसिन्ग करत राहतात. त्यापेक्षा स्वतः फ्लॅट घेउन राहावे.

छान लिहिली आहे..
अमा यांच्याशी सहमत. हॉस्टेल असतात ना working women's चे तिकडे राहायचा. सोबत ही मिळते. किंवा flat sharing मध्ये.