हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Submitted by Narsikar Vedant on 17 November, 2019 - 01:40

साहेब ,
2012 ला जगाचा अंत होणार असे का म्हणत होते याचे उत्तर आज कळले .
तुम्ही गेलात आणि महाराष्ट्रासह अवघा हिंदुस्थान पोरका झाला.

आपण म्हणला होतात की
"तुम्ही माझ्या हिंदूंना आणि या अखंड हिंदुस्थानला जिवंत ठेवा रसरशीत ठेवा"
पण आज तुमचीच पुढची पिढी हिंदूस्थानाला आणि समस्त हिंदूंना शरम वाटेल असे राजकारण करत आहेत. ज्या बाईला तुम्ही पंतप्रधान होण्यास विरोध केला, आज शिवसेना तिच्या इशाऱ्यावर चालते, हे पाहून खूप वाईट वाटतं.
आपल्या कार्यकाळात मुंबईत कुठलंही महान व्यक्तीमत्व आलं की त्याला 'मातोश्री'वर यावं लागायचं, ह्याचं कारण होतं तुम्ही निर्माण केलेला दरारा...!
साहेब आजही आठवतं ती दिवाळी हि दिवाळी वाटलीच नाही. कारण आमचं दैवत तेव्हा आजारी होतं. आपण गेलात त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुंबई दौरा होणार होता. पण आपण गेलात आणि देशाच्या महामहीम राष्ट्रपतींचा दौराही रद्द झाला. अशी किमया देशाच्या राजकारणात कुणीही करू शकला नव्हता.
तुम्ही आजन्म एकही शासकीय पद भुषविले नाही. परंतू आपल्या पुत्राने आपल्या शिकवणींना तिलांजली देत खुर्चीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो ह्याचं उत्तम उदाहरण दिलंय.
आपण आमच्यासाठी हिंदूहृदयसम्राट होतात आणि असाल.
तुमच्यामुळेच राजकारणातील कुतूहल निर्माण झालं होतं जे आजही टिकून आहे.
आपण १९९३ सारी झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणात म्हणाला होतात कि, " पाकिस्तान सोबत युद्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. पण त्याआधी ह्या हिंदूस्थानात यादवी युद्ध होईल!" तुम्ही त्यावेळी केलेलं ते भाकित आज सत्यात उतरताना दिसतंय.
साहेब , आज तुमची कमी खरंच भासतेय .
कधीकधी तर असं वाटतं की तुम्ही याल आणि पुन्हा 'ते' शब्द आसंमतात गुंजतील
#जमलेल्या_माझ्या_तमाम_हिंदू_बांधवांनो_भगिनींनो_आणि_मातांनो……

महानिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाला शत शत नमन!

Group content visibility: 
Use group defaults

>>> तुम्ही गेलात आणि महाराष्ट्रासह अवघा हिंदुस्थान पोरका झाला. >>>

Rofl Rofl Rofl

2012 ला जगाचा अंत होणार असे का म्हणत होते याचे उत्तर आज कळले .>>>>2050 ला पण मुंबई अशीच पाण्याखाली जाणार, बोला था ना मैने.

सोनियासमोर नाचत आहे , ह्याबद्दल वाईट वाटते म्हणे,
अन मग भाजपासमोर तरी दुसरे काय करत होते ? खोटारडेपणाचा शिक्का मारला भाजपाने सेनेच्या xxx वर.

सोनिया , पवार अन ठाकरे युतीत लेखी कलमे असणार आहेत , 35 वर्षे युती असून भाजपे मात्र तोंडी अटी ठरवतात आणि बंद दारामागल्या अटी सांगणार नाही असेही सांगते

आणि युती तर हिंदुत्वासाठी होती , राम मंदिर निक्काल लागला, युतीचे जीवितकार्य संपले

सर्व पातळ्यांवर सेनेला संपवण्याचे व्यावस्थित प्रयत्न गेली ५- ८ वर्षे भाजपा सातत्याने करत आलेला आहे. अत्यंत कमी महत्वाची खाती, आणि पदोपदी अपमानास्पद वागणूक. बाळासाहेब असते तर भाजपा चा असा खोटारडेपणा खपवला गेला नसता... किंवा खूप आधीच त्यांनी भाजपाला त्यांची खरी जागा दाखवली असती.

युती तोडण्यामागे भाजपाचा खोटेपणा हेच कारण दिसते आहे. रोज अपमानाचे कडवट डोस पिण्यापेक्षा आणि सेनेचे अस्तित्व धोक्यात आणणार्‍या युतीला काहीच अर्थ नव्हता.

या अनुभवातुन फडणविस आणि भाजपा सुधारेल आणि देशाशी एकनिष्ठ रहात जनतेसाठी काम करेल अशी अपेक्षा. पुढे मुख्यमंत्री पद कुणाला मिळेल हे महत्वाचे नाही आहे....

<< आणि युती तर हिंदुत्वासाठी होती , राम मंदिर निक्काल लागला, युतीचे जीवितकार्य >>
---- युती २०१४ च्या निवडणूकीच्या आधीच तुटली होती... केवळ सोपस्कार राहिले होते.

राम मंदिर मुद्दा लोकांना महत्वाचा नाही आहे. त्यांच्यासाठी नोकरी, बेरोजगार, शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न, पाणी, पूर... आणि मुख्य म्हणजे शुद्ध हवा... हे महत्वाचे आहे.... त्यावर कुणीच बोलत नाही.... दातखिळ बसते.

>>> राम मंदिर मुद्दा लोकांना महत्वाचा नाही आहे. >>>

इतर प्रश्न महत्त्वाचे आहेतच, परंतु श्रीराम मंदीर हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे.

< >>> राम मंदिर मुद्दा लोकांना महत्वाचा नाही आहे. >>>
इतर प्रश्न महत्त्वाचे आहेतच, परंतु श्रीराम मंदीर हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. >>

------- < ०.०१ % लोकांसाठी तो सर्वात महत्वाचा प्रश्न असेल...

युती तोडण्यामागे भाजपाचा खोटेपणा हेच कारण दिसते आहे. रोज अपमानाचे कडवट डोस पिण्यापेक्षा आणि सेनेचे अस्तित्व धोक्यात आणणार्‍या युतीला काहीच अर्थ नव्हता.>>>>>>>> आता तर एकदम महत्वाची आणी सन्मानाचीच खाती मिळणारेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृह, वित्त वगैरे वगैरे वगैरे....

बरं, जलसंपदा कोण संभाळणारे? धरणं भरलीयत म्हणून बरे.

<आता तर एकदम महत्वाची आणी सन्मानाचीच खाती मिळणारेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृह, वित्त वगैरे वगैरे वगैरे....> पण जात्या मंत्रीमंडळात तरी ही खाती सेनेकडे होती का? की भाजपने नाही दिली ते बरोबर आणि काँ राकॉ ने नाही दिली तर तो अन्याय असा नीरक्षीर न्याय आहे?

<< युती तोडण्यामागे भाजपाचा खोटेपणा हेच कारण दिसते आहे. रोज अपमानाचे कडवट डोस पिण्यापेक्षा आणि सेनेचे अस्तित्व धोक्यात आणणार्‍या युतीला काहीच अर्थ नव्हता.>>>>>>>> आता तर एकदम महत्वाची आणी सन्मानाचीच खाती मिळणारेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृह, वित्त वगैरे वगैरे वगैरे....

बरं, जलसंपदा कोण संभाळणारे? धरणं भरलीयत म्हणून बरे.
>>

----- सेनेला काहीच मिळणार नाही.... पण निदान रोजचे अपमान तर होणार नाहीत...

२४ ऑक्टोबरला फडणविसांना मुख्यमंत्री होण्यापासुन थांबवले... यापेक्षा जास्त काही अपेक्षाच नव्हत्या... १०० % यश... आणि यशाचे मानकरी खुद्द फडणविस....
पाच वर्षात मित्राच्या / बरोबरीच्या नात्याने वागविले असते तर अशी शोभा नसती झाली. १५ दिवसांत साधा फोन स्विकारल्या जात नाही... काय दयनिय अवस्था.

मी येणार.... मी येणार.... मी येणार... अर्थात राष्ट्रपती राजवटी नंतर.

की भाजपने नाही दिली ते बरोबर आणि काँ राकॉ ने नाही दिली तर तो अन्याय असा नीरक्षीर न्याय आहे?>>>>> अजीबात नाही. कारण या दोन्ही पक्षात खाते वाटपाचे नक्की काय धोरण तेव्हा होते आणी आज आहे ते कळलेच नाही. वास्तवीक सेनेने १४ साली सत्तेत ( युतीत ) रहायला नकार दिला होता कारण महत्वाची खाती त्यांना हवी होती, ती मिळाली नाहीत . मग रा कॉ बाहेरुन भाजपाला पाठिंबा द्यायला तयार झाल्यावर सेनेने मध्ये उडी घेतली. पण काय उपयोग होता? जे पाहीजे ते तेव्हाही मिळाले नाही. मग आज ते मिळाले असते किंवा मिळेल हे ही कशावरुन? मग आधीचा अनूभव गाठीशी असतांना परत युती करुन कशाला तीच अपेक्षा करायची?

आता गाठ कोणाशी तर अटी आधीच ठरवणार्‍या पक्षाशी. हे दोन्हीकडुन मार खाणार हे निश्चीत. आणी जर नाही खाल्ला तर आनंदच आहे, कारण परत निवडणूका घेऊन काय फायदा. लोकच येऊन चपलांनी हाणतील या सर्वपक्षीय नेत्यांना. सगळे एका माळेचे मणी असल्याने हा साव तो साधु असे म्हणण्यात अर्थ नाही. पण या ५ वर्षात फडणवीसांनी जर भ्रष्ट कारभार केला असता तर आज भाजपाचे एवढे सदस्य निवडुन आलेच नसते हे नजरे आड करु नका. ते सत्यच आहे. लोक मुर्ख नाहीत.

उदय भाउ , थोडा धीर धरा. अजुन शिवसेनेचा शपथविधी झालेला नाही. तो झाला की येउद्या तुमच्या प्रतीक्रिया... नाहीतर शिवसेनेसारखे तुम्हीही उताणे पडाल (आताच्या परिस्थितीत शरद पवार हे नक्कीच करु शकतील)

>>> ०.०१ % लोकांसाठी तो सर्वात महत्वाचा प्रश्न असेल... >>>

हा आकडा कोठून मिळवला?

हे सर्व संधिसाधू आहेत.

मानापमान वगैरे सर्व दिशाभूल करणारे शब्द आहेत.
सर्व जनतेच्या पैशांच्या लुटीचा खेळ आहे.

चारही पक्ष तसेच. भाजप नेही आयराम घेऊन पक्ष कलंकित करून टाकलाय.

त्यांच्या सत्तेचा खेळ, आणि भांडत बसते जनता.

त्यांना तुमच्या कसल्याही कळकळीशी काहीच घेणं देणं नाही.

काल ते भांडत होते, आज सत्तेसाठी घरोबा करायला तयार झाले, उद्या परत भांडतील. ह्या राजकारणातील राजपुत्रांनी लाज घालवली त्यांच्या पक्षाची. सर्व स्वाभिमान आणि मूल्ये विकून, ते सत्तांधळे झालेत.
अगोदर कुणाला PM व्हायचे होते , आता कुणाला CM व्हायचेय. पण जनता सर्व बघत आहे आणि त्यांना त्यांची जागा जरूर दाखवून देईल.

बाळासाहेब खरंच स्वर्गात खूप दुःखी असतील हा सर्व पोरखेळ बघून.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब हा विषय बाजूला राहून शिवसेना आणि तत्कालिन राजकारणावरच पोस्ट येताहेत.

पोलीस आजूबाजूला असल्याशिवाय गाडीतून जमिनीला पायसुद्धा न लावणारे बाळासाहेब, सुरक्षा पोलिसांना मात्र 'ही माकडं', 'या माकडांना', 'ए माकडा' असाच उल्लेख करायचे. (माहितीचा स्रोत - सिनियर पोस्टला असलेली पोलीस मैत्रीण आणि तिच्या टीममधील पोलिसांचे अनुभव) हिंदुहृदयसम्राट असतील कदाचित पण स्वतःबरोबर काम करणाऱया माणसांची मनं मात्र जिंकू शकले नाहीत. अजूनही इतक्या वर्षांनी कित्येक पोलिसांना त्यांची हीच आठवण आहे. Sad