संकेतांवर कितपत विश्वास ठेवावा

Submitted by VB on 16 November, 2019 - 10:32

माझ्या मित्रमंडळीमध्ये एक जोडपे आहे, म्हणजे अद्याप लग्न झाले नाहीये पण बोलणी चालुयेत. त्यांची एक समस्या इकडे लिहून सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हा धागा.

दोघांच्याही लग्नाच्या बोलणी करताना दरवेळी काही न काही अपशकुन घडतोय म्हणजे हळद कुंकू सांडणे, चहाचा अगदी चांगला कप फुटणे, दूध फाटने, बांगडी तुटणे. या सगळ्या मुळे दोन्ही घरची मंडळी खूप तणावात आहे. म्हणजे अंधश्रद्धा समजून सोडून द्यावे तर जर हे काही वाईटचे संकेत असतील तर पुढे वैवाहिक आयुष्यात काही त्रास किंवा कुणाच्या जीवावर बेतायला नको ही भिती, अन मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात त्यामुळे लग्न न करायचा निर्णय घेणेही सोपे नाही अन लग्न करणेही अवघड असे झालेय.

तर अश्या परिस्थितीत लग्न करावे की नाही?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वात्रट लिहिण्याचा ऊद्देश नव्हता, प्रतिसादातला ऊपरोध तुमच्या लक्षात आला नाही... असो.

कप पडणे किंवा दूध फाटणे ह्या रोजच्या जीवनातल्या नैसर्गिक भौतिक आणि रासायनिक क्रियांना दैवी संकेतांची नावे देऊन आयुष्याचे निर्णय घेणार्‍या व्यक्तीचे मन आणि व्यक्तिमत्व कमकुवत आहे, ज्याच्याशी आयुष्य बांधायचे आहे त्याचे मत टाळून तिर्‍हाईतांची मते विचारणारी व्यक्ती अडीअडचणीच्या वेळी भक्कम आधार होऊ शकत नाही हा एवढा मोठा संकेत दिसत असतांना हा संबंध जोडण्याबाबत अजून प्रश्न पडावा?

हा धागा ईंट्रेस्टेड पार्टीजना जरूर वाचायला द्या.

खरं सांगायचं तर मी गणपतीला वडापाव भरवणार होतो , आणला पण होता, पण घरचे ओरडले.
>>>>

मी सुद्धा मला आधी खायला न देता गणपतीला नैवेद्य दाखवायचाय म्हणून थांब बोलायचे तेव्हा फार रडारड करायचो. मग द्यायचे मला नाईलाजाने आधीच. गंमत म्हणजे माझी तेव्हा आंघोळही झाली नसायची. सारे काही आपल्या मान न मान मै तेरा मेहमान वर आहे. मानलं तरच आहे.

अंधश्रद्धा मी ठेवत नाही पण कोणतेही काम,प्रवास करताना अडथळे आले तर ते काम किंवा प्रवास मी करत नाही.
पहिला अनुभव गावा वरून मुंबई ला येत होतो.
8.30 आणि 9.00
दोन गाड्या होत्या मला 8.30 ची पकडायची होती.
खूप अडचणी आल्या .
Seat रिझर्व्ह असून ती गाडी सोडली आणि 9.00 ची पकडली.
पुढे 8.30 chya गाडीचा अपघात झाला जवळ जवळ 20 लोक दगावली.
दुसरा प्रसंग पर्सनल आहे तो सांगत नाही. .
अडथळे म्हणजे अपशकून हे माज मत.
आणि असे अनुभव मी खूप घेतले नंतर मत बनवले.
आता किती ही महत्वाचे काम असू ध्या अडथळे आले की त्या दिवशी मी महत्वाचे काम सुधा करत नाही

मला वाटते तुम्ही जर 8.30 ची गाडी पकडली असती तर तुमच्या पुण्यकर्माने त्या गाडीचा अपघात झाला नसता. खरं सांगायचं झालं तर 9 च्या गाडीचा अपघात होणार होता पण तुम्ही त्यात विराजमान असल्यामुळे 8.30 च्या गाडीचा अपघात झाला. आता मला विचाराल तर माझ्या मते तुम्ही अजय देवगणसारखं दोन्ही गाड्यांवर पाय ठेऊन,हाताची घडी करून प्रवास करायला पाहिजे होता म्हणजे दोन्ही गाड्या सुखरूप पोहचल्या असत्या.

बोकलत

मी श्रद्धाळू नाही .
फॅमिली बरोबर असली तरी मी ग्राम दैवत आणि मोजकीच मंदिर सोडली तर कोणत्याच मंदिरात जात नाही .
बाहेर थांबतो.
पण ह्या पृथ्वी वरच्या जगात अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे ह्या वर माझा ठाम विश्वास आहे.

तो विश्वास असंख्य प्रसंग जीवनात अनुभवल्या वर निर्माण झाला आहे.

मी श्रद्धाळू नाही .
फॅमिली बरोबर असली तरी मी ग्राम दैवत आणि मोजकीच मंदिर सोडली तर कोणत्याच मंदिरात जात नाही .
>>>>

काही लोकं फक्त सोमवार पाळतात तर काही लोकं रविवार सोडून सारे वार पाळतात. दोन्ही तत्वत: सेमच झाले.
देवावर श्रद्धा असेल तर श्रद्धाळू म्हणवून घेण्यत संकोच नसावा असे मला वाटते. श्रद्धाळू असणे हा दुर्गुण नाही.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा मी स्वतः तपासून बघितला नसला, तरी इतर वैज्ञानिकांनी प्रयोग करून तो सिद्ध केला आहे, (गरज पडली तर इतर कुणी प्रयोग करून तपासू शकतो) म्हणून मी तो खरा मानतो >>> ही श्रद्धा आहे.

मोजकीच मंदिर सोडली तर कोणत्याच मंदिरात जात नाही . बाहेर थांबतो.
पण ह्या पृथ्वी वरच्या जगात अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे ह्या वर माझा ठाम विश्वास आहे. >>> ही अंधश्रद्धा आहे.

Hizenberg is right. Marriage is a mojor cause of divorce threatening Indian family system . Stay far away. Couple doesn't seem compatible.

<<< Couple doesn't seem compatible. >>>
ऑ, मग तर या न्यायाने अशा संकेतांवर विश्वास ठेवणाऱ्या कुणाचेच लग्न व्हायला नको.

^^^^^

मुळात घटस्फोट होणे काही वाईट नाही. एक संधी असते ती.
लहानपणी एक झिंदा नावाचा पिक्चर पाहिला होता. त्यात जॉन ईब्राहीम हा संजय दत्तला पकडून एका कोठडीत डांबतो आणि रोज एकाच चवीचा हॉटडॉग खाऊ घालतो. तब्बल १५ वर्षे हेच चालते. बाकी कसलाही अत्याचार नाही.
आपल्याकडच्या स्त्रीपुरुषांची सेक्स लाईफ यापेक्षा वेगळी नसते.

<< अन मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात त्यामुळे लग्न न करायचा निर्णय घेणेही सोपे नाही अन लग्न करणेही अवघड असे झालेय. >>

------ एकमेकांच्या सोबत लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी किमान पसंतीची एक पातळी ( % ) गाठणे आवश्यक आहे. तो तेव्हढा % गाठलेला नाही आहे, काही कमी आहेच आणि म्हणून परस्परांबद्दलचा एक अविश्वास.
परस्परांबद्दलचा अविश्वास असेल तर पायरी वरुन पाय घसरण्याला, छोट्या अपघाताला (प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घटना / अपघात घडतच असतात... पण त्यात काही संकेत नसतात) पण संकेत मानाल...

जर त्यांनी एकमेकांना १०० % पसंत केले असेल, परस्परांवर विश्वास असेल तर या "संकेतां"च्या निमीत्ताने तरी विज्ञानाचा अभ्यास सुरु करावा...

वर उल्लेख केलेले भंपक "संकेत" हे घरोघरी आणि प्रत्येक पावलावर घडणार्‍या अत्यंत नैसर्गिक घटना आहेत. त्यांत कुठलेही नसलेले अर्थ शोधण्यात काही अर्थ नाही...

हळद कुंकू सांडणे, चहाचा अगदी चांगला कप फुटणे, दूध फाटने, बांगडी तुटणे>>>> बापरे! फार वाईट संकेत आहेत.
अजुन पुढे काही झाले का? कुणाला ठेच लागली, चाकुने बोटाला कापलं, कुणा आत्या/काकु बाईच्या उजव्या डोळ्याची खालची पापणी उडु लागणे वैगेरे. लग्नाळु जोडप्याला शुभेच्छा.

कप पडणे किंवा दूध फाटणे ह्या रोजच्या जीवनातल्या नैसर्गिक भौतिक आणि रासायनिक क्रियांना दैवी संकेतांची नावे देऊन आयुष्याचे निर्णय घेणार्‍या व्यक्तीचे मन आणि व्यक्तिमत्व कमकुवत आहे, ज्याच्याशी आयुष्य बांधायचे आहे त्याचे मत टाळून तिर्‍हाईतांची मते विचारणारी व्यक्ती अडीअडचणीच्या वेळी भक्कम आधार होऊ शकत नाही हा एवढा मोठा संकेत दिसत असतांना हा संबंध जोडण्याबाबत अजून प्रश्न पडावा>>>
एकदम खरं सांगितलय... छान प्रतिसाद..

एकुणात मुलगी गळक्या हाताची दिसत आहे. जर दर १५ दिवसांनी नविन कपबशी सेटच्या खर्चाची तयारी असेल तरच लग्न करावे.

Mairragr is a major the only cause of divorce. Wink

<< जर दर १५ दिवसांनी नविन कपबशी सेटच्या खर्चाची तयारी असेल तरच लग्न करावे. >>
----- स्टेनलेस स्टिलचे कप/ प्याले वापरायचे... आजन्म पुरेल.

कप बशीचा सेट जमीनीवर पडून फुटतोय नं...
मग चिंता नसावी.
जर तो नवऱ्याच्या डोक्यावर आपटुन फुटू लागला तर मात्र भविष्यात काळजीचे कारण असू शकते.

मला वाटते तुम्ही जर 8.30 ची गाडी पकडली असती तर तुमच्या पुण्यकर्माने त्या गाडीचा अपघात झाला नसता. खरं सांगायचं झालं तर 9 च्या गाडीचा अपघात होणार होता पण तुम्ही त्यात विराजमान असल्यामुळे 8.30 च्या गाडीचा अपघात झाला. आता मला विचाराल तर माझ्या मते तुम्ही अजय देवगणसारखं दोन्ही गाड्यांवर पाय ठेऊन,हाताची घडी करून प्रवास करायला पाहिजे होता म्हणजे दोन्ही गाड्या सुखरूप पोहचल्या असत्या.

Submitted by बोकलत on 17 November, 2019 - 11:02

laugh.jpg

खरंच हा धागा त्या होऊ घातलेल्या नवरा नवरीला आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचायला सांगाच.

स्टेनलेस स्टीलचे कप्स वापरले, क्रॉकरी वापरणे बंद केले, दूध पावडर वापरली /काळ्या चहा-कॉफीची सवय लावली, कुंकवाच्या टिकल्या मिळतातच, हळदीच्या ऑर्डर करून बनवून घेतल्या, सेफ्टी शूज, ग्लोव्ह्ज वापरले तरीही
पाल चुकचुकवायची, टिटवी ओरडायची, मांजर आडवी जायची कशी थांबवणार?
अपशकुनवाल्या घटना थांबवणे मुश्कीलही नही, नामुमकीन है.
शकुनापशुकूनालाच गोळी मारणे आपल्या हाती / मनी आहे.
उजव्या हाताची दोन बोटं पुढं करून, अंगठा वर करून एकदा त्याला ढिश्क्यांव केले की परत तिकडे कधी वळून नाही पहायचे.

पाल चुकचुकवायची, टिटवी ओरडायची, मांजर आडवी जायची कशी थांबवणार?>> हे बिचारे प्राणी आपले नैसर्गिक जीवन जगत असतात. माणसाने आपले काहीतरी संकेत भ्रम त्यांना जोडून त्यांना जग णे अव घड केले आहे.

पाल कदाचीत बाळाला अंगाई गात असेल.
टि टवी मैत्रीणीला चल ग दाणे शोधू म्हणत असेल.

मांजरीला माणसे उभी जात असतील. तिला अन्न मिळायला अवघड जात असेल.

शकुनापशुकूनालाच गोळी मारणे आपल्या हाती / मनी आहे>> सही बोला मानव भाई.

एकुणात मुलगी गळक्या हाताची दिसत आहे.>>>अशा अर्थाचे बरेच प्रतिसाद दिसले म्हणून विचारत आहे,हे सगळं मुलीच्या हातातूनच होतंय का? उत्तर हो असेल तर मुलीला थोडे टेन्शन असेल म्हणून होत असेल असं,
मी लग्नापूर्वी सासरी 2 3 वेळा गेले होते तेव्हा अति टेन्शन मध्ये मी एकूण 3 काचेचे ग्लास ,एक हळदी कुंकू कुयरी आणि चहा ओतत असताना एक कप बशी इतके साहित्य फोडले होते,आणि actully मागच्या वेळी आपण ग्लास फोडले या भावनेने मी अति काळजी घेऊन काम करत असले तरीही मी अति घाबरून चूका केल्या आहेत,अगदी लग्नानंतर वर्षं सहा महिने तरी मी काहीतरी फोडत,आपटत,मोडत ,हरवत होते,
थोडी वेंधळी आहे इतकंच बोलायच्या साबा तेव्हा,
आता लग्नाला 12 वर्षे झाली आहेत

पण या अशा काहीतरी फुटले,फाटले आणि सांडले या वरून लग्न मुळातच करावे की नाही इथपर्यंत विचारांची मजल जाणाऱ्या जोड्याने या लग्नाच्या फंदात पडण्यापूर्वी हजारदा विचार करावा,कारण लग्न झालं म्हणचे ऑल is वेल नसतं न उलट हजारो प्रश्न अडचणी अन संकटे सुद्धा येणारच तेव्हा हा जुना संकेत वाला विषय फणा काढून अजून मानसिक स्वास्थ्य बिघाड करेल,
आणि अजून एक 36 गुन जुळून, पत्रिका पाहून,शांत्या करून नंतर मोडलेली लग्ने आणि त्याचबरोबर पूर्ण कडक मंगळाची पण स्वभाव जमला म्हणून घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊनही लग्न करून अतिशय छान संसार करत असलेली जोडपी आजूबाजूला आहेतच,

दोन्ही पानांवर पहिला प्रतिसाद हाबएवानिक यांचा आहे हा कुठला संकेत मानायचा Wink

पण या अशा काहीतरी फुटले,फाटले आणि सांडले या वरून लग्न मुळातच करावे की नाही इथपर्यंत विचारांची मजल जाणाऱ्या जोड्याने या लग्नाच्या फंदात पडण्यापूर्वी हजारदा विचार करावा >> +१

अजून एक 36 गुन जुळून, पत्रिका पाहून,शांत्या करून नंतर मोडलेली लग्ने आणि त्याचबरोबर पूर्ण कडक मंगळाची पण स्वभाव जमला म्हणून घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊनही लग्न करून अतिशय छान संसार करत असलेली जोडपी आजूबाजूला आहेतच,>>>>>>+१ नक्कीच अगदी माझ्या विषयातल बोललात.

मुळात, ह्या प्रश्णांचा नीट विचार करून नवरीने आणि नवर्‍याने प्रामाणिक उत्तरं स्वतःला द्यायचीत व प्रश्ण का विचारलेत ते सुद्धा कळेलच मग.

१)असे काही जे घडले( कप फुटणे वगैरे वगैरे) ते सर्वात आधी कोणी कोणाच्या सर्वात प्रथम निदर्शनास आणले व सुचित केले?
आणि मग कोणत्या बाजूने { नवर्‍याची की नवरीच्या माणसांनी) रेटून धरले आहे?
२) ह्या चुका, मुलीच्या हातातून घडल्या का? की मुलाच्या? तर का?

बाकी, लिहिलेल्या गोष्टीतून इतकेच सांगता येते, साशंक मन भीतीने फक्त प्रश्णच आणि वाद करेल जीवनात.

मी असे प्रश्ण का विचारले ते कळलेच नाही तर नंतर सांगेन .

Pages