संकेतांवर कितपत विश्वास ठेवावा

Submitted by VB on 16 November, 2019 - 10:32

माझ्या मित्रमंडळीमध्ये एक जोडपे आहे, म्हणजे अद्याप लग्न झाले नाहीये पण बोलणी चालुयेत. त्यांची एक समस्या इकडे लिहून सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हा धागा.

दोघांच्याही लग्नाच्या बोलणी करताना दरवेळी काही न काही अपशकुन घडतोय म्हणजे हळद कुंकू सांडणे, चहाचा अगदी चांगला कप फुटणे, दूध फाटने, बांगडी तुटणे. या सगळ्या मुळे दोन्ही घरची मंडळी खूप तणावात आहे. म्हणजे अंधश्रद्धा समजून सोडून द्यावे तर जर हे काही वाईटचे संकेत असतील तर पुढे वैवाहिक आयुष्यात काही त्रास किंवा कुणाच्या जीवावर बेतायला नको ही भिती, अन मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात त्यामुळे लग्न न करायचा निर्णय घेणेही सोपे नाही अन लग्न करणेही अवघड असे झालेय.

तर अश्या परिस्थितीत लग्न करावे की नाही?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजिबात करू नये.
मी तर म्हणेन दोघांनी एकमेकांचे तोंड सुद्धा आयुष्यात पुन्हा बघू नये.

शकुन-अपशकुन या संकल्पनेला तिलांजली द्यायला पाहिजे.
लग्न करावे की करू नये हे ती दोघे किती खंबीर आहेत यावर अवलंबून आहे. अपशकुन वगैरेला अजिबात थारा न देण्याची आणि पुढे जाऊन आयुष्यात काही बरे वाईट घडेल तेव्हा (आयुष्य म्हणजे बरेवाईट घडणारच ना) घरचे कुणी "बघा आम्ही नव्हतं म्हटलं अपशुकन होता!" असे म्हणत असतील तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करणे किंवा त्यांची कान उघडणी करणे याची तयारी असावी.
भविष्यात जे काही चांगले वाईट होईल आपण त्याचा या शकुन - अपशकुनाशी संबंध जोडणार नाही याची दोघांची मनोमन खात्री असावी.

शकुन-अपशकुन आणि पत्रिका हा भंपकपणा आहे. हळद कुंकू सांडणे, चहाचा कप फुटणे, हे वेंधळेपणामुळे झालेले आहे. यात शकुन-अपशकुन काही नाही. काळी मांजर आडवी गेली तर माणसांमध्ये अपशकून मानतात, तर आमच्या बोक्यांमध्ये शुभशकून मानतात Wink यावरून कळेल की हा शुद्ध आचरटपणा आहे.
एकमेकांना पसंत असतील तर खुशाल लग्न करा म्हणावे.

आजिबात करू नये.
मी तर म्हणेन दोघांनी एकमेकांचे तोंड सुद्धा आयुष्यात पुन्हा बघू नये. +1
चहाचा अगदी चांगला कप फुटणे ही साधीसुधी गोष्ट नव्हे.

कोणीतरी गेमही करत असेल
मला ही लवट्रॅंगलची केस वाटते
आजूबाजूला कोणी कक्क किरणवाला शाहरूख आहे का चेक करा...
पण तसे नसल्यास एखाद्या चांगल्या नॉस्त्रादेमसला पत्रिका दाखवा.

संस्कृती रीतिरिवाज हे भले तुलनेने
विज्ञान (कथित,)ह्या संकलापणा आहे त्या नुसार भाकड असेल .
पण समाजातील सर्व समस्येचा विचार केला तर विज्ञान भंकस ठरते...
सामाजिक दृष्ट्या

(सॉरी)
संकेत वगैरे असू शकतील पण दुसरे स्पष्टीकरण घरातले एकमेकांशी इंटरऍक्ट करताना नर्व्हस आहेत आणि त्यांच्याकडून वस्तू पडतायत असाही होऊ शकतो.
लग्न करायचे असल्यास ,एकमेकांना आवडत असल्यास या सर्व गोष्टी नजरेआड करून आनंदाने पुढे जावे

जोपर्यंत वाईट शकुन होणे थांबत नाही आणि तेवढेच चांगले शकुन होतं नाहीत तोवर दोघांच्या घरच्यांनी भेटत राहायचे, लग्नाचं बोलणं करायला. पुरेशी पोसिटीव्हीटी तयार झाली की सहज होईल.

आजिबात करू नये.
मी तर म्हणेन दोघांनी एकमेकांचे तोंड सुद्धा आयुष्यात पुन्हा बघू नये. +1
चहाचा अगदी चांगला कप फुटणे ही साधीसुधी गोष्ट नव्हे. +२

हल्लीच्या तरुण पिढीला काही ऐकून घ्यायचं नसतं. चहाचा कप फुटण्यापेक्षाही दूध फाटणं जास्त सिरियस आहे. पंजाब आणि बंगालमध्ये सारखं दूध फाडून पनीर करतात म्हणून तिकडे फाळणी झाली. अहो देश तुटला, रिलेशनशिपचं काय घेऊन बसलात..

Submitted by सनव on 16 November, 2019 - 13:01 >> Lol

गडबडीत सांडलवंड, फूट-तूट होणे हे सामान्य आहे. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांची पसंती महत्वाची. काचेची वस्तू ही नीट हाताळली नाही तर तुटते, दुधाला इतर कसला हात लागला असेल तर ते फाटते, हे नैसर्गिक आहे. त्यावरुन उगाच मनात शंका आणून स्वतःला घाबरवून काय साध्य होणार. त्यातूनही श्रद्धा असेलच तर मग ती देवावर ठेवा ना बांगडी, दूध अशा नाशीवंत वस्तूंवर का ठेवता.
माझा स्वत:चा किस्सा- कुंकू-टिकली, बांगड्या वगैरे वापरायची सवय अजिबातच नाही. तर माझ्या साखरपुड्याच्या समारंभात धापकन आर्मरेस्टवर हात टाकून बांगडी तोडणे, कपाळावर आलेले केस मागे सारताना दोनदा टिकली उडवून हरवणे झाले.

ऑन ए सिरीअस नोट जर हे प्रकार वारंवार झाले असतील आणि तुमचा यावर विश्वास असेल तर नका जोडू हे नाते.
लोकांचे सल्ले न घेता आपल्या मनाचे ऐका. लोकांचे काय, दुसरयांच्या श्रद्धा आणि विश्वासाला हसतील आणि स्वत: मंदिरात जाऊन घंटा वाजवून येतील. वर प्रसाद न चुकता उजव्या हातातच घेतील. दुसरयाच्या गाडीला लावलेल्या लिंबाला हस्स्तील पण आपले पोर जरा रडू लागतात मीठमोहरीने दृष्ट काढतील.
म्हणून या बाबतीत करावे तर मनाचेच पण जनाचे ऐकूही नये Happy

खुशाल लग्न करा वगैरे म्हणणार्‍या लोकांच्या मतांना फार किंमत देऊ नका. त्यांना काय जातंय म्हणायला? ईथे गाठ आपल्या प्राणाशी आहे.
जोवर धक्का लागलेला चहाचा कप किंवा हळदी कुंकू खाली जमिनीवर न पडता हवेत तरंगत नाही वा वर छताकडे जात नाही तोवर आजिबात असा जीवाशी खेळ करू नका. शेवटी अजून नेटफ्लिक्सही पूर्ण नीटसं न पाहिलेल्या दोन तरूण मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
प्रत्येक वेळी लग्नाची बोलणी करतांना एका तुटक्या कानाच्या अर्ध्या भरलेल्या कपाबरोबर गुरुत्वाकर्षणाची लिटमस टेस्ट करून पहा. जोवर ती पास होत नाही तोवर आजिबात लग्नाचा विचार करू नये.

> या सगळ्या मुळे दोन्ही घरची मंडळी खूप तणावात आहे. > दोन्ही घरची मंडळी तणावात असल्याने
१. हे दोघेही (किंवा दोघांपैकी एकजण) विचलीत झाले आहेत का? तसेअसेल तर सहाएक महीने थांबा. मुलगा-मुलगी भेटत राहुदेत. किंवा त्यांनादेखील थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर घेऊदेत. सहा महिन्यांनी त्या दोघांना काय वाटतंय ते बघून पुन्हा प्रोसेस चालू करा.
२. हे दोघे ठाम असतील तर घरच्यांना बाजूला ठेवा, मित्रमंडळाची मदत घेऊन रजिस्टर/ आळंदीला जाऊन लग्न वगैरे करा.

हे सगळे माझ्याच कर्माचे भोग आहेत, मागे मी इकडे मुलींच्या लग्नानंतर आईवडिलांच्या जबाबदारी विषयी धागा काढला होता अन तो यांना सांगून डिस्कस पण केला तेच अंगाशी आले. काल माझ्या मागे लागली ती की तिरर्हाइतांचे काय मत असे कळू तर दे. खूप समजावले इकडे वरच्या वर्गातील वात्रट पोरे जास्त आहेत हो तरी ऐकले नाही अन मज्जा बघा न सुरुवातच हाब सारख्या सरांपासून झाली म्हणजे काही चांगले प्रतिसाद येतील याची अशाच संपली. तरी काही चांगले अन प्रामाणिक प्रतिसाद आले बरे वाटले अन त्यांची आभारी देखील आहे.काहो निगेटिव्ह प्रतिसाद वाचून गंमत वाटली हेही खरे

मी वर खूप थोडक्यात लिहिलेय, तसे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे दोन्ही घरचे नाहीत पण जेव्हा हे वारंवार अन तेही लग्नाचा विषय निघाला की किंवा बोलणी करतानाच होऊ लागले तेव्हा भिती वाटतेच. असो, देते हा धागा तिला वाचायला कारण तीच मागे लागली होती, मी अन मित्र दोघे बोललो नको तरी

दोन्ही घरचे यावर विश्वास ठेवणारेच आहेत. वारंवार असं झालं म्हणून विचार आला याला काही अर्थ नाही. विचार आला सो तो मनात दडलेला होता म्हणूनच आला.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कमी जास्त सुख दुःख येतंच असतं, लग्नानंतर ही येतंच राहणार आहे. त्या प्रत्येक दुःख्खाच्या प्रसंगी दोन्ही किंवा ज्या कुटुंबावर कठीण प्रसंग कोसळला आहे त्या कुटुंबातील लोकांच्या मनात किंतू येतंच रहाणार. सुखाच्या प्रसंगी टेक इट फॉर ग्रां टेड धरून कोणाच्या पायगुणांची आठवण येणार नाही.
लग्न करू नये. करायचं असलं तर भविष्यात असल्या शंकेखोर व्यक्तीनी तोंड उघडलं तर ते बंद करण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी असली पाहिजे. हे आत्ताच वाईटपणा घेऊन जाहीर बोललेल असेल तर आणखी उत्तम.

VB, too little information to give any wise advice. म्हणून धाग्यावर असे प्रतिसाद येत आहेत. दोघांनाही ज्या गोष्टींनी मानसिक आधार वाटेल अशा गोष्टी करा - पत्रिका दाखवा, शांत करा, उपास करा, किंवा या साऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करून बिनधास्त लग्न करा!
कारण विश्वास is a slippery sloap. मग तो कशावरही असो - देवावर, विज्ञानावर, स्वतःवर. त्यामुळे कशावरही अंधविश्वास ठेवणे धोक्याचे. तेव्हा या साऱ्यासकट जो निर्णय योग्य वाटेल तो घ्यावा. शेवटी आयुष्य वाघ म्हटले तरी खाते आणि वाघोबा म्हटले तरी खातेच! तुमच्या मित्रांना शुभेच्छा!

ऋन्मेऽऽष>>> अनुमोदन. या प्रकारात इथे विचारून काही उपयोग नाही.....
मनाचे समाधान हवे असेल तर एखाद्या चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवा जो फक्त गुण ना जुळवता दोघांच्या पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करून लग्न करावे की नको हे सांगेल. त्यांना या संकेतबाबत पण सांगणे. हवे असल्यास व्यनि करा चांगल्या ज्योतिषाचा कॉन्टॅक्ट देतो (ही जाहिरात नाही.....म्ह्णून हवे असल्यास व्यक्तिगत मेसेज मध्ये कळवेन)
अश्या बाबतीत जाणकार लोकांनाच विचारून सल्ला घेतलेले जास्त चांगले. माहित असतील कोणी तर चांगल्या गुरुजींना पण एकदा विचारून सल्ला घ्या.

घरच्या मंडळींची द्विधा मनस्थिती होतेय म्हणजे त्यांचा या सगळ्यावर विश्वास आहे. विश्वास असला की तिकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. आमचे एक उत्साही शेजारी जे हौस म्हणून गणपती आणायचे व 11 दिवस त्याला रोज भाजी भाकरी खायला घालायचे, त्यांच्या गणपतीचे पूर्ण मखर एके वर्षी जळून गेले. त्यांचा विश्वास नसल्याने त्यांनी त्याच दिवशी दुसरे मखर केले. माझी आई मात्र चिंताग्रस्त होती, काहीतरी वाईट घडणार याची ही सूचना आहे म्हणत. तसे काहीही वाईट त्यांच्या घरात घडले नाही.

घडत असलेल्या घटनांचा खरेच ताण येत असेल तर लग्न वर्षभर स्थगित करा. दोघेही एकमेकांना आवडताहेत तर त्यांना वर्षभर एकमेकांचा, घरातल्यांचा अंदाज घेऊ द्या. एक वर्ष लग्न लांबले तर काही फरक पडत नाही. पण या एक वर्षात दोन्ही घरे एकमेकांची दोस्त होतील, नाती भक्कम होतील व पुढचे आयुष्य अजून चांगले जाईल.

असे न घडता काही वेगळे घडले तर फारसे नुकसान न होता दोघांनाही दूर होता येईल.

संकेतांवर कितपत विश्वास ठेवावा --- अजिबात ठेवू नए ही बाजू पटली
पण हे कधी शक्य ??
जर त्या कपल्सचे प्रेम सुदृढ़ असेल आणि लव्ह मॅरेज असेल तेव्हाच ! येथे मनाने ठाम निर्धार केलेला आहे की हाच / हीच माझी जीवनसाथी आणि (+ve)मनाच्या दृढ़ संकल्पापुढे भल्या भल्या अडचणी चुटकीसरशी सोडवण्याची ताकद उपजत असते.

वरच्या उदाहरणत एकदंर प्रकार अरेंज मैरिज वाटतो आणि तसे असेल तर पत्रिका पाहुन गुण जुळवून स्थळ पसंत केले असेल तर हे जे काही घडते आहे ते त्यांच्या (अंध)श्रद्धाळु मनाला शुभ संकेत नक्कीच वाटणार नाहीत त्यामुळे जसे आधी ज्योतिष शास्त्राचे मार्गदर्शन घेतले असेल तसे आता ह्या संबधी सुद्धा घेणे मनाच्या समाधानासाठी त्यांच्यासाठी आवश्यक आहे

मन दोन्ही बाजूनी विचार करतं. अपशकुन धारणा दोन्ही पार्टी आणि मुलगा मुलगी यांच्या मनात घट्ट असतील तर पुढे न जाणे योग्य.
पण जर हे नातं तोडून वेगवेगळे जोडीदार केले आणि त्यांच्यात वागण्याचा दोष निघाला तरी मन खात राहील, की त्यावेळी आवडलेला संबंध जुळवायला हवा होता.
एक सुप्त विचार असा की मनात अलरेडी काही खटकलंय आणि बाह्यकरणी नातं तोडायला स्वतःच्या मनाला कारण म्हणून या बाह्य संकेतांचा विचार केला जातोय?
निर्णय दोन कुटुंबांचा आहे.नातं पुढे न्या अथवा तोडा, आयुष्यात पुढच्या संघर्षाच्या वेळी स्वतःच्या निर्णयांना दोष देत बसू नये इतकंच.
(एक उदाहरण आठवलं.ही माझी कथा नाही.एका घरात एक 35 वर्षं डायबिटीस,दगदगीचा प्रवास वाली नोकरी, डायबिटीस मुळे डोळ्यांचे इश्यू असलेले आजोबा होते.त्या घरात फर्टिलिटी ट्रीटमेंट नंतर काही वर्षांनी एक गोड मुलगी जन्माला आली.आणि आजोबा दुर्दैवाने तिच्या वर्ष वाढदिवसाच्या थोडं आधी सायलेंट हार्ट ऍटॅक ने केले.जवळच्या एक काकू असं इंडिकेट करत होत्या की नेमकं हे बाळ घरात आल्यावर असं झालं.त्यांना सर्वानी योग्य वेळी लगेच गप्प केलं.बाळ सगळ्यांचं लाडकं आहे.अपशकुन, पांढरे पाय, वाईट संकेत हे कधीकधी स्वतःच्या निर्णयांना समर्थन, किंवा स्वतःच्या वाईट परिस्थितीत स्वतःचा नसून दुसऱ्याचा दोष आहे असं स्वतःला सांगायला वापरले जातात.
मी स्वतः असे काही संकेत नकळत पाळते.तो चक्रमपणा आहे हे कळून.जी कंपनी आवडली असेल त्याच्या इंटरव्ह्यू ला कंपनीत खायचं नाही.(कधीमधी तासनतास इंटरव्ह्यू चालले तर खायचा प्रसंग येतो.)पणजिथे जाताना आपण स्वतः अभ्यासात गंडलो आहोत, किंवा पोस्ट आपल्यासाठी, आपल्या पगारासाठी योग्य नाही या खऱ्या कारणापुढे खाणे, न खाणे, इंटरव्ह्यू ला रिक्षाने जाणे,न जाणे यांचे संकेत बापडे काय करणार?☺️☺️)

> एक सुप्त विचार असा की मनात अलरेडी काही खटकलंय आणि बाह्यकरणी नातं तोडायला स्वतःच्या मनाला कारण म्हणून या बाह्य संकेतांचा विचार केला जातोय? > +१

> अपशकुन, पांढरे पाय, वाईट संकेत हे कधीकधी स्वतःच्या निर्णयांना समर्थन, किंवा स्वतःच्या वाईट परिस्थितीत स्वतःचा नसून दुसऱ्याचा दोष आहे असं स्वतःला सांगायला वापरले जातात. > +१

आमचे एक उत्साही शेजारी जे हौस म्हणून गणपती आणायचे व 11 दिवस त्याला रोज भाजी भाकरी खायला घालायचे,
>>>>.
माझ्या लहानपणी गणपती दूध प्यायला लागला अशी अफवा उठलेली त्याची आठवण झाली Happy

ईतका धांदरट पणा करणारी....सांडलवंड करणारी...पाडापाडी ...फोडाफोडी करणारी मुलगी स्वभावाने खुप शांत...समजुतदार असणार।.......

करा बींदास लग्न

Pages