फटाके आणि प्रदूषण..

Submitted by प्रशि_क on 7 November, 2019 - 00:52

दिवाळी संपली पण यावेळी पहिल्यांदाच घरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाली. मागील ४ वर्षांत मी एकही फटाका फोडला नव्हता, पण लहान भाऊ आणि त्याला फटाके किती निर्रथक असतात हे समजायला बराच कालावधी लागला त्यामुळे मी जरी का फटाके फोडत नसलो तरी घरी फटाक्यांची खरेदी व्हायची. पण यावेळी भावाला काय वाटले काय माहीत त्यानेही यावेळी फटाके वाजवणार नाही हा दृढनिश्चय केला आणि कदाचित आमच्या घराण्यातील पहिली फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाली.

हे सर्व लिहायचं हेच उद्दीष्ट की, मी दिवाळी साजरी न करून खरंच प्रदूषण कमी केलं आहे का?? लोकं मला, मी हे उघडपने बोललो तर शिव्या-शाप देतील का?? की मी फक्त ही गोष्ट माझ्यापुरतीच मर्यादित ठेवावी व जवळच्या मित्रांशी यावर बोलणे टाळावे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरजी
हवेत प्रदूषण करणारे सर्वात जास्त फटाके तर वडापावच्या गाडीभोवती फुटतात. त्यानंतर आकाशातले फटाके ३१ डिसेंबरला जगभर फुटतात त्यापुढे एकटा बिचारा भारत दिवाळीत फटाके फोडून काय नी किती प्रदूषण करणार आहे ?

३१ डिसेंबरच्या रात्री फटाके फुटतात पण ते सुद्धा काही महत्त्वाच्या शहरात, आणि हे फटाके फक्त उंच बिल्डिंगवर लावले जातात; सामान्य लोकांना फटाके फोडण्याची मुभा नसते. फटाके फोडण्याचा कालावधी हा फक्त १ मिनिटांचा असतो. 00:00 प्रहरापासून ते 00:01 पर्यंत. त्यामुळे त्याची आणि भारताच्या दीवाळीशी तुलना होऊ शकत नाही.

भारतात हेच चित्र उलट असून सामान्य माणूस वाटेल तेव्हा वाटेल तेवढे फटाके खरेदी करून फोडू शकतो, आणि निश्चितच याला १ मिनिटांची मर्यादा नसते. उलट हा कार्यक्रम चांगलाच ४ ५ तास चालतो.

मी सातवीत असल्यापासून फोडत नाही आहे.
फटाक्यांच्या विरोधात अस नाही पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असावी असं वाटतं.
यावर्षीच आयसी कॉलनीमध्ये एका कुत्र्याच्या शेपटीवर फटाके फोडले होते लहान मुलांनी..
कितीतरी owners नी फटाक्यांच्या आवाजाने pets missing झालेल्या पोस्ट्स केल्या होत्या.
Even local feeders च्या पण पोस्ट होत्या.
:|

मी तुळशीच्या लग्नापर्यंत रोज फटाके फोडतो. नन्तर जे फटाके उरतात ते दुपारी नायतर रात्री शेजारांच्या अंगणात नायतर ओटीवर लावतो. जर मी नसेल गावात तर माझ्यावतीने इतर कोणालातरी हे करायला सांगतो.

फटाके फोडण्यापेक्षा घराच्या छतावर मोठा डिजे लावून फटाके वाजवल्याची ऑडियो टेप लावायची. दणक्यात दिवाळी Proud

तटी:- सल्ला पैसे वाचविण्यासाठी आहे, पर्यावरण वाचविण्यासाठी नाही काही Wink

बिनधास्त फटाके फोडा. तापमान वाढू द्या आणि मुंबई पाण्याखाली जाऊ द्या . नायतर 2050 मध्ये रुन्मेष अजून एक धागा काढेल अजून मुंबई पाण्याखाली कशी नाही गेली.

उत्तम केलेत.

झाडे लावणे = फटाके न फोडणे

दारू म्हणजे वाईटच. मग ती प्यायची असो वा जाळायची.

फटाके फ्क्त लहान मुलांच्या मनोरंजनापुरतेच असावेत. जसे त्यांना अक्कल येऊ लागेल तसे बंद करावेत.
शिक्ष्णाच्या माध्यमातून मुलांनाही ही समज लवकर येईल हे बघावे.

बोकलत २०५० ला पाणी मारेल
पण प्रदूषणाचा, वृक्षतोडीचा आणि विकासाचा वेग पाहता त्याआधी हवा तर मारणार नाही ना अशी भिती वाटू लागलीय गेले काही दिवस...