फटाके आणि प्रदूषण..

Submitted by प्रशि_क on 7 November, 2019 - 00:52

दिवाळी संपली पण यावेळी पहिल्यांदाच घरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाली. मागील ४ वर्षांत मी एकही फटाका फोडला नव्हता, पण लहान भाऊ आणि त्याला फटाके किती निर्रथक असतात हे समजायला बराच कालावधी लागला त्यामुळे मी जरी का फटाके फोडत नसलो तरी घरी फटाक्यांची खरेदी व्हायची. पण यावेळी भावाला काय वाटले काय माहीत त्यानेही यावेळी फटाके वाजवणार नाही हा दृढनिश्चय केला आणि कदाचित आमच्या घराण्यातील पहिली फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाली.

हे सर्व लिहायचं हेच उद्दीष्ट की, मी दिवाळी साजरी न करून खरंच प्रदूषण कमी केलं आहे का?? लोकं मला, मी हे उघडपने बोललो तर शिव्या-शाप देतील का?? की मी फक्त ही गोष्ट माझ्यापुरतीच मर्यादित ठेवावी व जवळच्या मित्रांशी यावर बोलणे टाळावे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरजी
हवेत प्रदूषण करणारे सर्वात जास्त फटाके तर वडापावच्या गाडीभोवती फुटतात. त्यानंतर आकाशातले फटाके ३१ डिसेंबरला जगभर फुटतात त्यापुढे एकटा बिचारा भारत दिवाळीत फटाके फोडून काय नी किती प्रदूषण करणार आहे ?

३१ डिसेंबरच्या रात्री फटाके फुटतात पण ते सुद्धा काही महत्त्वाच्या शहरात, आणि हे फटाके फक्त उंच बिल्डिंगवर लावले जातात; सामान्य लोकांना फटाके फोडण्याची मुभा नसते. फटाके फोडण्याचा कालावधी हा फक्त १ मिनिटांचा असतो. 00:00 प्रहरापासून ते 00:01 पर्यंत. त्यामुळे त्याची आणि भारताच्या दीवाळीशी तुलना होऊ शकत नाही.

भारतात हेच चित्र उलट असून सामान्य माणूस वाटेल तेव्हा वाटेल तेवढे फटाके खरेदी करून फोडू शकतो, आणि निश्चितच याला १ मिनिटांची मर्यादा नसते. उलट हा कार्यक्रम चांगलाच ४ ५ तास चालतो.

मी सातवीत असल्यापासून फोडत नाही आहे.
फटाक्यांच्या विरोधात अस नाही पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असावी असं वाटतं.
यावर्षीच आयसी कॉलनीमध्ये एका कुत्र्याच्या शेपटीवर फटाके फोडले होते लहान मुलांनी..
कितीतरी owners नी फटाक्यांच्या आवाजाने pets missing झालेल्या पोस्ट्स केल्या होत्या.
Even local feeders च्या पण पोस्ट होत्या.
:|

मी तुळशीच्या लग्नापर्यंत रोज फटाके फोडतो. नन्तर जे फटाके उरतात ते दुपारी नायतर रात्री शेजारांच्या अंगणात नायतर ओटीवर लावतो. जर मी नसेल गावात तर माझ्यावतीने इतर कोणालातरी हे करायला सांगतो.

फटाके फोडण्यापेक्षा घराच्या छतावर मोठा डिजे लावून फटाके वाजवल्याची ऑडियो टेप लावायची. दणक्यात दिवाळी Proud

तटी:- सल्ला पैसे वाचविण्यासाठी आहे, पर्यावरण वाचविण्यासाठी नाही काही Wink

बिनधास्त फटाके फोडा. तापमान वाढू द्या आणि मुंबई पाण्याखाली जाऊ द्या . नायतर 2050 मध्ये रुन्मेष अजून एक धागा काढेल अजून मुंबई पाण्याखाली कशी नाही गेली.

उत्तम केलेत.

झाडे लावणे = फटाके न फोडणे

दारू म्हणजे वाईटच. मग ती प्यायची असो वा जाळायची.

फटाके फ्क्त लहान मुलांच्या मनोरंजनापुरतेच असावेत. जसे त्यांना अक्कल येऊ लागेल तसे बंद करावेत.
शिक्ष्णाच्या माध्यमातून मुलांनाही ही समज लवकर येईल हे बघावे.

बोकलत २०५० ला पाणी मारेल
पण प्रदूषणाचा, वृक्षतोडीचा आणि विकासाचा वेग पाहता त्याआधी हवा तर मारणार नाही ना अशी भिती वाटू लागलीय गेले काही दिवस...

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
ख्रिसमसच्या दिवसात साधारण कोट्यवधी मेणबत्त्या जगभर विकल्या जातात, यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांइतकाच घातक आहे .
शिवाय त्या अशा प्रकारे वाया घालवण्या पेक्षा
वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा.
आजही जगात 300 मिलियन लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्‍या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या कित्येक कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.
चला तर मग आपल्या ख्रिस्ती बांधवाना मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी जागरूक करूया!

+१

+786

चूक आहे. मेणबत्तीचं महत्त्व आजच्या पिढीला माहीत नाही. फक्त old testament च नाही, तर दिव्य पुराण, झेंडा इस्ता इत्यादी अनेक वेदोत्तर वांगमयात मेणबत्तीचा उल्लेख आहे. सगळ्या बत्त्यांमध्ये ती मेन बत्ती आहे. लोड शेडिंगच्या काळात हिचा अत्यंत उपयोग होत असे असे उल्लेख उत्खननात सापडतात. अंधारावर प्रकाश मात करतो ही संकल्पना त्यामागे आहे. मेण पावसाळ्यात खूप उपयोगी असतं. म्हणून तर चिऊचं घर मेणाचं असतं हे शेमड्या पोरालाही माहीत आहे. उद्या मेणबत्तीच नसेल तर पोरांना चिऊ काऊची गोष्ट कशी कळणार? आज घरातून खलबत्ता हद्दपार झाला आहे, त्यामुळे कुणाला बत्ता माहीत नाही. तीच वेळ आता बत्तीवर येईल. मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करून अनेक मोठे महात्मे घडले. मेणबत्तीवर बंदी आणून आपण पुढच्या पिढीची प्रगती रोखतो आहोत हे या राजकारणी लोकांच्या कधी लक्षात येणार?

शकेल.
चला तर मग आपल्या ख्रिस्ती बांधवाना मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी जागरूक करूया!

प्रदूषण फक्त आणि फक्त हिंदू सण साजरे करतानाच होते.
बाकी कोणत्याही धर्माचे सण कसे ही साजरे केले तरी प्रदूषण होत नाही

मी मेणबत्ती लावली नाही. काही ख्रिश्चन लोकांना सांगितले पण ते फुगूच्या मुलांसारखे चिडले आणि दुप्पट मेणबत्त्या लावल्या