आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असते का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2019 - 05:16

पेपरात एक बातमी वाचण्यात आली. तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने भाऊबीजेच्या पुढच्याच दिवशी आत्महत्या केली. कारण त्याच्या बहिणींनी त्याला भाऊबीजेची भेट म्हणून बाईक घेऊन दिली आणि तो भाऊ असूनही त्याच्याकडे बहिणींना द्यायला प्रेमाव्यतिरीक्त काही नव्हते. तो एक सुशिक्षित बेरोजगार होता. त्याला हे शल्य बोचू लागले आणि ते देखील या थराला गेले की त्याने आपले जीवनच संपवले.

अत्यंत दुर्दैवी घटना. आदल्या दिवशीच्या आनंदी दिवसानंतर अचानक हे.. काय वाटले असेल त्याच्या बहिणींना आणि आईवडीलांना कल्पनाही करवत नाही.

योगायोगाने काही वर्षांपूर्वी माझ्याही ओळखीच्या एका घरात अशी भाऊबीज पाहण्यात आलेली. तिथेही नेमके तीन बहिणी एक भाऊ होता. चारेक महिने भाऊ जॉब सुटल्याने बेरोजगार होता. अश्यात बहिणींना काही द्यावे या परीस्थितीत नव्हता. बरं या आधी त्याच भावाने त्या बहिणींना आधीच्या भाऊबीजना मोबाईल वगैरे महागडी गिफ्टस देऊन झालेल्या. त्यावरून त्या बहिणी यंदा काही नाही का दादा अशी त्याची मजा घेत होत्या. मला तरी त्यात कुठेही टोचून बोललेले जाणवत नव्हतो. ओळखीची फॅमिली. तसा त्यांचा स्वभावही नाही. पण वेगळ्याच मनस्थितीत असलेल्या त्या भावाच्या ते मनाला लागले. आणि हसता हसता अचानक तो हुंदके देत धाय मोकलून रडायला लागला. त्या बहिणींनाही अपराधी वाटले आणि त्याही रडायला लागल्या. मी मग फार न थांबता तिथून निघालो. प्रसंग मात्र मनावर कोरला गेला.

मी स्वत:ही एकेकाळी या बेरोजगारीच्या लाचार काळातून गेलो आहे. एक नोकरी काही कारणांनी अचानक सोडावी लागली आणि दुसरी लगेच मिळायला तयार नव्हती. साधारण दोनतीन महिने मी जॉबलेस होतो. फार नाही. आणि त्यातही आधीची सेव्हिंग माझे खर्च चालवायला पुरेशी होती. घरखर्च चालवायला आईबाबा समर्थ होते. वर्षभर खुशाल स्वखुशीने घरी बसलो असतो तरी चालले असते. पैश्याची चिंता करावी अशी स्थिती दूरदूरपर्यंत नव्हती.
पण तरीही मन खात राहायचे. शिक्षण झालेय. कमवायला लायक झालो आहोत. पण कमावत नाही आहोत. ही भावना बोचत राहायची. दिवसभर घरी आयते लोळून खातोय असे उगाचच वाटत राहायचे. संध्याकाळी नेहमीच्या कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारायला जायचीही लाज वाटू लागलेली. कोणी काही तरी विचारेल. काय उत्तर द्यायचे. विचारले नाही तरी समोरच्याच्या डोक्यात तेच प्रश्न असणार असे उगाचच वाटायचे. एखादा आपल्यापेक्षा कमी शिकलेला आणि आपल्या निम्मा पगार घेणारा मित्रही आता आपल्याकडे बेकार म्हणून बघत असेल असे स्वत:लाच वाटायचे. बेकार. फार बेकार शब्द आहे हा. आणि तितकीच बेकार भावना. कमवायची पात्रता आहे पण न कमावणारा...

कदाचित मी चुकतही असेन, पण मला वाटते हे न कमावते असण्याचे दडपण मुलींपेक्षा मुलांवर जास्त असते. जसे काही समस्या महिलांशी निगडीत असतात तसे ही पुरुषांसमोरील एक समस्या वाटते. येत्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात ही समस्या जास्तीत जास्त मुलांना भोगावी लागणार. त्यांना सांभाळून घ्या _/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिमंतिनी आयडी रागाबद्दल नाही म्हटले,
समाजातील काही पुरुष नवीन विचार करू शकत नाहीत त्यांचा राग समाजातील ज्या पुरुषांवर कमावण्याचे दडपण आहे त्यांच्यावर काढू नका असे म्हणायचे होते. मी कोट केलेल्या आपल्या वरच्या पोस्टमध्ये ते तसे वाटत आहे. हे दोन वेगळे विषय आहेत.
अर्थात तुम्हाला पुरुषांवरचे कमावण्याचे अतिरीक्त दडपण मान्यच नसेल किंवा ते स्त्रीपुरुष दोघांवर समान वाटत असेल तर ते ही ठिक आहे.

पुरूषांना कमवण्याच अतिरिक्त दडपण वाटत असेल तर ते नवीन विचार न करू शकणार्‍या पुरूषांमुळेच. पुरूषाचा खरा शत्रू पुरूषच असतो.

पुरूषावर कमवण्याचे दडपण आणि स्त्रीवर कमावण्याचे दडपण हे स्वतंत्र विषय आहेत. त्याची तुलना नाही.

ते ट्रॅक करत असतील pms बॉस चा.जिज्ञासा तुम्ही जे ज्ञान पाजळलय इथे ते शाळेतल्या मुलांना देखील माहित आहे.
कशाच्या आधारे अजय ला मूर्ख म्हणताय? >> जर अजय चव्हाण यांनी सांगितले की ते त्यांच्या बॉसचा PMS pattern track करतात तर मी त्यांची माफी मागेन. महिन्याच्या विशिष्ट तारखेला is too vague to believe that he really understands the natural cycle of periods. या चक्रात भरपूर व्यक्तीसापेक्षता असते. एक biologist म्हणून मला ही गोष्ट मांडणे जरुरीचे वाटले. He may have to track for a year or so to know the exact pattern without asking/verifying with the boss. If he has tracked it then great! I will definitely apologize. But until then his statements are nothing more than a hypothesis which could be wrong.
तुम्ही म्हणता तशी ही फार बेसिक माहिती आहे जी सगळ्यांना माहीत हवी. I hope unlike you there were people for whom this information was a TIL.

पूर्वज मासिक पाळी च्या वेळेस स्त्री ला पूर्ण आराम देत होते .
शिवाशिव नको ह्या नावाखाली तिला कोणत्याच कामाला हात लावून देत नव्हते त्या प्रथे विरूद्ध आवाज उठवून पूर्वजांना मूर्ख ठरवणारे हेच शिक्षित लोक त्याच मासिक
पाळी त स्त्री बॉस तिच्या चिडचिडा करण्या ला शास्त्रीय आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत
डबल स्टॅंडर्ड ह्यालाच म्हणतात

@जिज्ञासा तुम्ही म्हणता तसं मी मूर्ख आहे...खरचं..कारण इथे व्ययक्तिक अनुभव शेअर केला तो मूर्खपणाच झाला माझा...

मी pms ट्रक करतो की. आणखी काय करतो किंवा आणखी कसं कळतं हे इथे सांगून मी अजिबात वादाला खतपाणी घालणार नाही..

राहीला प्रश्न त्या ज्ञानाविषयी तर सांगतो..माझं लग्न झालयं आणि एका लग्न झालेल्या पुरूषाला ह्या गोष्टी माहीत होतातच...स्पेशली बेबी प्लांनिग करत असेल तर काकणभर जास्तच ह्या गोष्टी कळतात..

मी रजा घेतोय ..आज खुप छान दिवस आहे आणि तो मी इंजोय करणार आहे.. जे लोक माहीत नाही त्यांनी लावलेल्या विशेषणामुळे मी माझा दिवस नाही खराब करणार...अलविदा..
तुम्हालाही हा दिवस शुभ जावो ही सदिच्छा..

पण अजयराव, एका स्त्री च्या मूड पॅटर्न वरून तुम्ही समस्त वर्किंग/नॉन वर्किंग स्त्रियांच्या सर्व रिएक्शन पी एम एस चा परिणाम असेल असा अंदाज करणं ही किंचित ओव्हर रिएक्शन नव्हे का?
मुळात सध्या बॉस चिडचिडा/डी, चांगला/ली,खडूस/तत्वनिष्ठ/पाताळयंत्री असणं हे लिंग निरपेक्ष आहे.पुरुष आणि स्त्री दोन्ही स्पिशिज मध्ये सर्व प्रकारचे बॉसेस बघायला मिळतील.

लग्न झालेल्या पुरुषाला, सर्वच स्त्रीयांविषयी कळतं असं असतं तर मजा असती. मुळात हॉर्मोन्स हे एकाच पद्धतीने परीणाम करत नसतात म्हणूनच प्रत्येक स्त्री व पुरुष सुद्धा खास असतो/असते.
चिडचिड तर माझा पुरुष बॉस सुद्धा करायचा ठरावीक काळात , मग इतर ऑफीसातले म्हणात की, बायको सोडून गेलीय म्हणून असं करतो. म्हणजे एकंदरीत हि सामाजिक मानसिकता आहे.
आता मूळ विषयाकडे,
मी स्त्री असून , मला घरची कामं विषेश आवडात नाही. नोकरी आणी स्वतःचा काम करत करते. पण जे मला आवडतं.

Pms मध्ये स्त्री चिडचिडी होत नाही का? हा काय मुद्दा आहे भांडायला?
सत्य आहे ते स्वीकारा कि . Stomach pain - will be wfh नित्य नियमाने येणारी ईमेल आहेत . नेक्स्ट डे येऊन बाई चीड चीड करत असेल तर काय बोलणार .
दोन अधिक दोन चार कळते सगळ्यांना .

असंही असेल ना, बाई wfh मध्ये आहे म्हणून हाताखालच्या पब्लिक(स्त्री पुरुष दोन्ही)नी बॉस शी कामातील संवाद कमी होऊन चुकीच्या गृहितकांनी कामं करून गोंधळ झाले आणि म्हणून आल्यावर बाई चिडल्या?

अजय चव्हाण, मला खरं तर तुमची पहिली पोस्ट पाहून आश्चर्य + आनंद झाला होता की कोणीतरी हा फॅक्टर आपल्या स्त्री सहकारी/बॉस बद्दल विचार करताना लक्षात घेत आहे. इतके दिवस मी एक स्त्री असून माझ्या स्री सहकारी वा बॉस बद्दल असा विचार कधीच केला नाही.
पण नंतर तुम्हाला विचारले असता तुम्ही फार vague उत्तरे दिलीत. त्यामुळे मला असे वाटले की तुम्हाला खरी माहिती नसताना तुम्ही गोष्टी गृहीत धरता आहात. जो माझ्या मते मुर्खपणा आहे. तुमच्या नवीन पोस्टवरून तुम्हाला या विषयाची बरीच माहिती आहे असे वाटत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या बॉसचे पिरियड्स ट्रॅक करता आणि तुमच्या बॉसच्या PMS चा तुम्हाला खरोखरच त्रास होतो आहे असे मला वाटते.
तेव्हा तुम्हाला या आधीच्या पोस्ट मध्ये मूर्ख म्हटल्याबद्दल मी तुमची माफी मागते! तुमचा दिवस चांगला जावो!
I'm really glad to know that you are so genuinely concerned about your female colleagues. तुमच्यासारखे समजून घेणारे सहकारी असतील तर स्त्रियांना कामाच्या ठिकाणी अधिक comfortable वाटेल!

राजेश, परिस्थिती तीच आहे अजूनही. फक्त पूर्वी विश्रांती घ्यायची की नाही याचा चॉईस बाईला नव्हता आणि आता (बऱ्यापैकी) आहे. ज्या बाईला पाळीच्या दिवसांत त्रास होतो ती बाई विश्रांती घेऊच शकते आजही! ज्या व्यक्तीला त्रास होतो त्या व्यक्तीला आपल्याला विश्रांती हवी आहे का हे ठरवता यायला हवे असा साधा विचार आहे खरंतर.

माफी का मागताय आता ? थुंकून चाटणे बरे नव्हे जिज्ञासा .
अनु - काय बोलताय . तुम्ही स्त्री आहात म्हणून स्त्री ची बाजू घेणे जरुरी आहे का . फेमिनिस्ट आहात का ? Equalist बना ...

असंही असेल ना, करत असतील दर पौर्णिमेला गजानन महाराजांच्या पोथीची पारायण. खाल्लं पिठलं-भाकरी तर होतो कुणाकुणाला गॅस. मग होते चिडचिड. पण बॉस बाईला पोटात दुखलं, चिडचिड झाली तर तिला "स्टमक पेन"चे डिफरंशियल डायग्नोसिस पण नाही... ते हिंदी सिनेमात बाईला उलटी गरोदर असल्यामुळेच होते, एरवी नाही... नेहमी उलटीचे डायग्नोसिस - मुबारक हो, आपके घर नन्हा मेहमान आनेवाला है......
तसं इथे चालू आहे Happy

थुंकून चाटणे बरे नव्हे .>> अंदाज अपना अपना! आपण चुकलो असताना माफी मागणे यात मला काहीच गैर वाटत नाही.
यापूर्वी देखील मी माफी मागितली आहे. एक माणूस म्हणून गैरसमज आणि चुका होतच असतात. त्या मान्य करून माफी मागणे केव्हाही अधिक श्रेयस्कर असते असे मला वाटते.
I also stand by my previous opinion that it is foolish to assume things when you are unaware of the reality.

कटप्पा, धन्यवाद!
सी, हाहाहा खरंय! We are truly spoilt by bollywood movie stereotypes Wink

ईक्वालिस्ट आहेच हो.पण इथे येणारे निष्कर्ष पुरेश्या सॅम्पल डाटा अभावी आणि इतर बाह्य फॅक्टर विचारात न घेता येत आहेत वाटलं म्हणून मध्ये बोलले ☺️☺️
एरवी मी माझं काम, माझा(झी) बॉस,टिम खुश राहिले की झालां.बाकी फेमिनिस्ट, मेलिस्ट काय वाट्टेल ते गोंधळ घाला तिकडे.

मला तर बॉस नावाची जमातच आवडत नाही. रक्तपिपासू व्यक्ती ही संकल्पना बॉस / सिनियर वरूनच आली असावी. Biggrin

गंभीरपणे सांगायचे तर, स्त्री बॉस/लिडचा एक अत्यंत वाईट, एक बरा आणि एक अत्यंत चांगला अनुभव मिळाला.

गंभीरपणे सांगायचे तर, स्त्री बॉस/लिडचा एक अत्यंत वाईट, एक बरा आणि एक अत्यंत चांगला अनुभव मिळाला.

शेअर करा ना..
दुसर्या धाग्यावर केला तरी ऊत्तम

शेअर करा ना..>>>>>> चांगला वाला आधी सांगते. रेखा मॅमचा. त्या खूप छान explain करायच्या काम आम्हा फ्रेशर्स ना. एकदा-दोनदा लिफ्टपण दिली होती त्यांनी गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून.

बाकी वाईट अनुभव तापदायक आहेत.

abc होती. डोळे वटारून बघत राहायची सुट्टी घेतली की.
'तुम नही आओगी तो ये काम कौन करेगा?'
'अप्सताल जाना पडा इतना क्या हुआ था?'
'यहाँ पर मत रखो टिफिन, बॉटल' वगैरे! स्वतः मात्र काजू-बदामाचे बकाणे भरायची तोंडात वर्क प्लेस वर बसून; आणि दुसऱ्या बाजूला मुड आला की पार्टी म्हणून सकाळी नाष्टा आणायची. त्याच वर्क प्लेसवर चटण्या सांडत सांडत ढोकळा, केक वगैरे खायची. Biggrin
छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकट करायची. हाताखालच्या लोकांचं जिणं हैराण केलं होतं तिनं. त्या नंतर पुरुष बॉस आला तिच्याही वरच्या पोस्ट वर. तो अधिकच त्रासदायक निघाला. अर्धवट बोलणारा आणि नुसताच ताप डोक्याला. त्याचंच ठरलेलं नसायचं की काय काम आधी करायचे आहे. मध्येच मिटींगला बोलवायचा, मध्येच रद्द करायचा. काम आहे म्हणून बोलवायचं, आणि आपण तिथे गेलो, कि केबीन मधून गायब. फोन केला तेव्हा कॅंटिन मध्ये आहे म्हणाला. चहा घेऊन येतोच म्हणे. आणि तो पर्यंत आपण वाट पाहत उभे! १५-२० मिनिटांनी यायचा आणि म्हणे 'आता मीटिंग आहे माझी, नंतर बोलू.'
सगळे वैतागले होते.
त्यामानाने ती बरी असे वाटू लागले.

Biggrin

रच्याकने - माबोवर परत भरपूर सक्रिय झालायस, नोकरी लागली वाटतं Wink
Submitted by हर्पेन on 2 November, 2019 - 15:58

>>

हो जॉब चेंज
आणि सध्या पुरुष बॉसच्या हाताखाली काम करतोय. त्यामुळे मोक्ळा वेळ पुरेसा मिळतो Happy

पुरेसा वेळ नसतो पटकन उत्तर द्यायला.
तसेच धागा पुन्हा माझ्यावर फोकस करून भरकटवायचा नव्हता
आता धागा गेलाच भलत्या वळणावर तर ...

वरची पोस्टही सोडावी लागली अर्धवट.. नवीन पुरुष बॉसचा कॉल आलेला.
आणि आधीची स्त्री बॉसही अध्येमध्ये आठवण काढते तिला एंटरटेन करावे लागतेच..
घरची भाकर कमावणारा पुरुष हा अनंतकाळचा चाकर असतो असे माझे आजोबा का म्हणायचेय ते समजतेय आता

मग तू "आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा" असे टेप सारखे बोलत रहायचे.
काही दीड शहाणे बॉस मग "एय! मी रांगेत नाहीये. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून बोलतो(ते)य. नीट बोल माझ्याशी!" असे दरडावून बोलतात. तर आपण तिकडे साफ दुर्लक्ष करून आपल्या सेलफोन / हेडफोनच्या माईकवर रेमंडचा रुमाल ठेवुन आपण रांगेत आहात वाली टेप सुरू ठेवायची.

Pages