मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शिवसेना तडजोड करील काॽ

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2019 - 11:15

महाराष्ट्रात जनतेने भाजपचे अबकि बार दोसो बिसके पार हे घोषवाक्य सपानच ठरवत भाजपला सत्तेपासून दुरच ठेवले ,पण पाच वर्ष सेनेला झुलवत ठेवत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भाजपला आज सत्तेसाठी सेनेचे पाय धरण आवश्यक झाले आहे आणि त्यामुळे सेनेची बारगेनिंग पावरही वाढली आहे त्यातच आघाडीच्या नेत्यांनी सुचक वक्तव्य करुन सेनेपुढे अनेक पर्याय खुले केले आहेत तसे पाहिले तर यावेळी ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री बनवणे शक्य असतांना सेना उपमुख्यमंत्री पद स्विकारेल का हाही एक प्रश्न आहे पण तसे झाल्यास भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते आणि संख्याबळ वाढवण्यासाठी सेनेतील काही आमदारांना गळाला लाऊ शकते आता सत्तेसाठी भाजपचे कुठलाही विधिनिषेध पाळत नाही हे या निवडणुकीत दिसुन आले आहे. अश्या परीस्थितीत सेनेला आपले आमदार सांभाळून ठेवावे लागतील.अशावेळी सेना तडजोडीला तयार होईल का.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दुसर्याची कौले काढून छप्पर शाकारताहेत

Submitted by BLACKCAT on 3 November, 2019 - 16:59 >>

बाळु, हे सगळीकडेच होतं. स्वतच्या धर्माचा व पंथाचा प्रसार करणारे काय वेगळं करत असतात?

देवेंद्र फडणविसांच्या अडचणींत वाढ.. चिंतामणी अॅग्रोटेक आणि श्री साइबाबा गिनींग कंपन्यांतील गुंतवणुक; शेतकर्यांकडुन स्वस्तात घेतलेल्या जमिनीचा करोडोंमध्ये सौदा...

प्रतिज्ञापत्रांत लपवली कंपन्यांची माहिती...

आतुन फुटली बातमी....सेनेतर्फे मोदीजींना माहिती देण्यासाठी दुत रवाना....

देवेंद्र फडणवीसांनी प्रतिज्ञापत्रात लपवली गुंवणुक; चिंतामणी अॅग्रेटेक मध्ये होते संचालक विधान सभेवर असताना. ह्या कंपनीने शेतकर्यांकडुन साडे आठ लाख रुपयांना घेतली 127 एकर जमीन. त्यातली 63 एकर विकली 15 करोड रुपयांत.

त्यानंतर निलेश अमरचंद शहा आणि मनीष शहा ह्या भावांच्या अनेक खोका कंपन्यांमार्फत चिंतामणी अॅग्रोटेकमध्ये शेकडो करोड रुपये आले. काहीही व्यवहार नाही, धंदा नाही. कोळशाच कंत्राट मिळाल केंद्र सरकार कडुन ते उच्च न्यायालयाने रद्द केल ह्या कारणाने की पैसे गुंतवणारी कंपनीही निलेश शहाची च आणि कंत्राट मिळालेली चिंतामणी ही त्याचीच.

उच्च न्यायालयाच्या ह्या निकाला च्या दिवशी (26 जुलै 2011) देवेंद्र फडणवीस आणि निलेश मेहता हे दोघेही चिंतामणी अॅग्रोटेकच्या संचालक मंडळावर होते. त्यानंतर 21 मे 2012 रोजी फडणवीसांनी राजिनामा दिला तर 1 डिसेंबर 2011 रोजी निलेश मेहता नी संचालकपदाचा राजिनामा दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्या कंपनीचे संचालक होते फडणविसांआधी. त्यांच्या नावाने मिडीयाने काहुर उठवल होत. तथापी आजतागायत त्यांनी देवेंद्रचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

श्री साइबाबा Ginning & Pressing कंपनीत देवेंद्र फडणवीस संचालक होते 2005 ते 2009 दरम्यान. तथापी 2016 सालीही त्यांच्याकडे ह्या कंपनीचे भागभांडवल होते. त्यांच्या मातोश्री श्रिमती सरिताजी फडणवीस आजही ह्या कंपनीत संचालिका आहेत. फडणविसांनी ही माहिती लपवल्याच दिसुन येत आहे.

भाजप च्या आतील गोटातुन ही माहिती व्यक्तिगत रित्या मातोश्रीवर पोहचवण्यात आली.
https://www.facebook.com/100030804397186/posts/189405905429555/

**

निवडणूकीनंतर फोकस शरद पवारांवर गेला होता. तो परत भाजपा व शिवसेनेकडे वळवणे चाललंय. गेली ५ वर्षे हेच चाललंय.
खाते वाटप ठरलं की काही झालंच नाही असं वाटावं, इतक्या सहजतेने दोघे एकत्र येतील. फडणवीस परत मुख्यमंत्री बनतील.
तोपर्यंत सर्वांना सतत काहीतरी चावत बसायला टुकडे टाकायचे काम राऊत साहेबाकडे असणारेय.

Happy

>>> खाते वाटप ठरलं की काही झालंच नाही असं वाटावं, इतक्या सहजतेने दोघे एकत्र येतील. फडणवीस परत मुख्यमंत्री बनतील. >>>

कधी नव्हे इतका कणखरपणा व संयम यावेळी सेना दाखवत आहे. हाच कणखरपणा व संयम २०१४ मध्ये दाखवला असता तर सेनेची अशी दारूण अवस्था झाली नसती.

अर्थात सेना नेत्यांचा जिभेवर ताबा कधीच नव्हता व अजूनही नाही.

मी तर २००% सांगतो
संजय राऊत किती ही
तोंड वाजवू ध्या bjp चा मुख्यमंत्री होणार आणि सुमार खाती घेवून सेना
सत्तेत असणार.
ह्याचा अर्थ सेनेचा कोण्ही अपमान करायचा विचार करू नये.
मराठी अस्मिता सेने शी जोडली गेली आहे.

निवडणूकीनंतर फोकस शरद पवारांवर गेला होता. तो परत भाजपा व शिवसेनेकडे वळवणे चाललंय. गेली ५ वर्षे हेच चाललंय.
खाते वाटप ठरलं की काही झालंच नाही असं वाटावं, इतक्या सहजतेने दोघे एकत्र येतील. फडणवीस परत मुख्यमंत्री बनतील.
तोपर्यंत सर्वांना सतत काहीतरी चावत बसायला टुकडे टाकायचे काम राऊत साहेबाकडे असणारेय. >>>

हे सर्व असं होऊदे, खरंच.

>>> मराठी अस्मिता सेने शी जोडली गेली आहे. >>>

Rofl Rofl Rofl

स्वतःच्या मुलांना कॉन्वेंटमध्ये शिकविणारे मराठी अस्मितेशी जोडले गेलेत?

हार्दिक पटेल व ममता सारख्यांना मतांसाठी सन्मानपूर्वक मातोश्रीवर आमंत्रण देऊन पायघड्या घालणारे मराठी अस्मितेशी जोडले गेलेत?

मराठी माणसांना डावलून चंद्रिका केनिया, जेठमलानी, संजय निरूपम, मुकेश पटेल, प्रीतिश नंदी, राहुल बजाज, धूत अशा अमराठींना राज्यसभेची खासदारकी देणारे मराठी अस्मितेशी जोडले गेलेत?

मुंबईत हिंदी वर्तमानपत्र सुरू करून संजय निरूपमला संपादक व खासदार करणारे मराठी अस्मितेशी जोडले गेलेत?

निवडणुकीच्या काळात अरेबिक, गुजराती, उर्दू, तामिळ वगैरे अमराठी भाषेत प्रचारफलक लावणारे मराठी अस्मितेशी जोडले गेलेत?

शिवसेनेचा मराठी बाणा हे निव्वळ थोतांड आहे. शिवसैनिकांचा सुद्धा या थापांवर विश्वास नाही.

शेवटी चाणक्यची एक मातोश्रीवारी होईल आणि बॅटिंग बॉलिंग साठी भांडत असलेले हे दोन मित्र पुन्हा एकत्र येऊन विरोधकांविरुद्धचा सामना सहजपणे जिंकतील. आपण फक्त 'सामना' पाहत राहायचे आणि मनोरंजन करून घ्यायचे.

<निवडणूकीनंतर फोकस शरद पवारांवर गेला होता. तो परत भाजपा व शिवसेनेकडे वळवणे चाललंय. गेली ५ वर्षे हेच चाललंय>
So its all about managing the headlines..

मी परत येईन
मी परत येईन
मी परत येईन
...
.
.
.
.
मला येऊ द्या ना.

Screenshot_2019-11-05-21-32-32-901_com.Slack_.pngपूर्वी कधीतरी काँग्रेस शिवसेना युती झाली होती , तेंव्हा बाळासाहेबांनी हे चित्र काढले होते

Pages