मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शिवसेना तडजोड करील काॽ

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2019 - 11:15

महाराष्ट्रात जनतेने भाजपचे अबकि बार दोसो बिसके पार हे घोषवाक्य सपानच ठरवत भाजपला सत्तेपासून दुरच ठेवले ,पण पाच वर्ष सेनेला झुलवत ठेवत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भाजपला आज सत्तेसाठी सेनेचे पाय धरण आवश्यक झाले आहे आणि त्यामुळे सेनेची बारगेनिंग पावरही वाढली आहे त्यातच आघाडीच्या नेत्यांनी सुचक वक्तव्य करुन सेनेपुढे अनेक पर्याय खुले केले आहेत तसे पाहिले तर यावेळी ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री बनवणे शक्य असतांना सेना उपमुख्यमंत्री पद स्विकारेल का हाही एक प्रश्न आहे पण तसे झाल्यास भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते आणि संख्याबळ वाढवण्यासाठी सेनेतील काही आमदारांना गळाला लाऊ शकते आता सत्तेसाठी भाजपचे कुठलाही विधिनिषेध पाळत नाही हे या निवडणुकीत दिसुन आले आहे. अश्या परीस्थितीत सेनेला आपले आमदार सांभाळून ठेवावे लागतील.अशावेळी सेना तडजोडीला तयार होईल का.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> राऊत म्हणतात शिवसेना बहुमत सिद्ध करू शकेल. ( हातावर घड्याळ बांधून?)
- स्वाभिमान सोडून गद्दारीच झाली.

राकांना बाहेरून पाठिंबा हीसुद्धा गद्दारीच. मग आदित्य ऐवजी धनंजय मुंडेच होतील मुख्यमंत्री. >>>

भाजपने १९९३, १९९७ व २००२ मध्ये बसप विरोधात निवडणुक लढवूनही व शेवटी आपल्यापेक्षा कमी आमदार असूनहींं मायावतीला मुख्यमंत्री केले होते.

भाजपने निधर्मी जनता दलाविरूद्ध निवडणुक लढवूनही व आपल्यापेक्षा कमी आमदार असूनही २००६ मध्ये कुमारस्वामीला मुख्यमंत्री केले होते.

तेव्हा गद्दारी नव्हती का?

आमदार होण्या साठी आणि सत्तेमधून मिळणारा मिळणारा मलिदा खाण्यासाठी सर्व व्याकुळ आहेत.
सरकार स्थापन होणार काही काळजी नसावी.
नीतिमत्ता कधीच संपली आहे राजकारण मधील.
त्या मुळे तो शब्द व्यवहार मध्ये लागू होत नाही .

आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान होण्याचीही स्वप्ने पाहू शकतो, शेवटी तो युवराज आहे. संधी मिळाली असती तर राहुल गांधीही पंतप्रधान झाला असता आणि यु एन मध्ये भारताचा पंतप्रधान म्हणून भाषण करताना नेहमीसारखे कागद वरखाली झालेही असते. असो. अजून पन्नाशीचाच आहे, मिळेल त्यालाही संधी भविष्यात.

भारतात 1947 साली इंग्रज देश सोडताना जी कुठली राजेशाही होती ती पुढे लोकशाही नावाने तशीच सुरू राहिली. आजही आपापल्या युवराजांना गादीवर बसलेले पाहायला उत्सुक लाखो लोक आहेत.

मिशेश मुख्यमंत्री ही सिरीयल युवराजांनाच पाहुन काढली असावी असा ठाम विश्वास आहे. त्ये बेणं पण युवराजांसारखचं दिसतं की वो. पण मग सुमी कोण हाय? आणी सुरेस?

>>> नेहरू आधी अलहाबादचे महापौर होते >>>

मुक्ता टिळक किंवा विश्वनाथ महाडेश्वर पंतप्रधान होण्यास पात्र आहेत.

फडणवीस सुद्धा महापौर होते.

आदित्य ठाकरेंना अनुराग ठाकुर सारखं एक दिवसाचं मुंबईचं महापौर पद देऊन मुख्यमंत्रीपदासाठी तयार करता येईल.
त्यासाठी मुंबई मनपात एक तातडीची पोटनिवडणूक घेता येईल.

संधी मिळाली असती तर राहुल गांधीही पंतप्रधान झाला असता आणि यु एन मध्ये भारताचा पंतप्रधान म्हणून भाषण करताना नेहमीसारखे कागद वरखाली झालेही असते. असो. अजून पन्नाशीचाच आहे, मिळेल त्यालाही संधी भविष्यात. >> काही लोकांची गाडी रागाचा उल्लेख केल्याशिवाय पुढं जातच नाही... पराकोटीचा द्वेष..

त्यात द्वेष कसला?

जसा राजा हरीश्चंद्र सत्यवचनाचे व कर्ण दानशूरपणाचे प्रमाण आहे, तसाच रागा अपरिपक्वतेचे व विदूषकगिरीचे प्रमाण असल्याने त्याचा सर्वत्र उल्लेख होणारच.

मागील पाच वर्षांपासून सुरु असलेला अपमान सेना सहन करीत होती आता वचपा काढणारच , भाजप आजपर्यंत एकदाही स्वबळावर महाराष्ट्रात सरकार स्थापन करु शकलेली नाही आणि आता पुढे तर शक्यच नाही कारण तिनं एमच्या मनी, मिडिया आणि मॅनेजमेंट याआधारे चालणारा वस्वपक्षातील कार्यकर्ते नाराज करुन आयात उमेदवारांसाठी पायघड्या टाकणारा कुठलाही पक्ष जास्त काळ जनतेला मुर्ख बनवु शकत नाही.ते काहीही असले तरी भाजपने शिवसेनेला दिलेली आश्वासने पाळावित तिढा आपोआपच सुटेल.आणि शिवसेनेने पाठींबा दिला नव्हता तेंव्हा आवाजी मतदानाने राष्ट्रवादीच्या पाठींबा घेवून भाजप सत्तेवर आली तेंव्हा ती गद्दारी नव्हती का , राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रु वा मित्र नसतो कारण प्रत्येक पक्षाला सत्ता हवी असते आणि त्यासाठी तडजोड होतच असते.

Submitted by पुरोगामी on 31 October, 2019 - 23:58 >> चांगली विस्तृत माहिती पुरोगामी.
अपक्षांनाही पकडावे लागेल समीकरणात, पुन्हा राष्ट्रपती राजवट, काळजीवाहू सरकार अशा शक्यताही समीकरणे बदलवू शकतात. राज्यपालाने (जे आरएसएस/भाजप धार्जिणे आहेत) ठरवल्यास ते परिस्थिती ईन्फ्ल्युएन्स करू शकतात हे आपण दिल्ली आणि काश्मिरच्या ऊदाहरणावरून पाहिलेच.

समजा भाजपने सेनेचे ३८+ आमदार फोडले, तर त्यांना मंत्रीपदे किंवा महामंडळाची अध्यक्षपदे द्यावी लागतील. मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४२ मंत्री असू शकतात. त्यामुळे इतक्या फुटिरांना आमिष दाखवून फोडणे अत्यंत एवघड आहे. >> ज्यांना त्यांच्या पक्षात मंत्रीपद तर सोडाच पण सत्तेच्या खाऊचा योग्य हिस्साही मिळण्याचा काही चान्स नाही असेच भाजपला जॉईन करण्याची रिस्क घेतील ना. त्यामुळे नुसते पैशाने किंवा त्यांच्या लोकल मागण्या पुरवून काम होऊ शकते मंत्रीपद नाही मिळाले तरी ठीकच. पुन्हा पक्षातही आमदारांचे छुपे गट असतात, एकदम ३८ लोकांशी डील न करता गटाच्या म्होरक्याशी डील करता येते. काँ आणि राकाँ शी लढण्यात हयात घालवलेले शिवसिअनिक आमदार गठ्ठ्याने नाराज होऊ शकतात. पण हो ३८ आकडा फार अवघड आहे हे खरे.

काहीतरी भरीव मिळवून स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची हीच ती वेळ. >> राज्यात नाही पण केंद्रात काहीतरी मिळवण्याबद्दलही सेना प्रयत्न करू शकते.
अन्यथा अंत अटळ आहे. >> अंत नाही पण रिलेव्हन्स कमी होऊ शकेल ज्याचा फायदा भाजपापेक्षा काँ आणि राकाँ ला जास्त होईल.

एकदा एका माणसाला १ कोटीची लॉटरी लागते. तो तिकीट घेऊन दुकानदारां कडे जातो
.
दुकानदार : ट्यॅक्स वगैरे कापून तुम्हाला ६५ लाख मिळतील ..
.
माणूस : येडा समजला का रे ?
घेईन तर एक कोटी घेईन नाही तर तिकिटाचे १० रुपये परत दे ......

यालाच म्हणतात शिवसेना

पराकोटीचा द्वेष>>>>>

गैरसमज. मी राहुल गांधीचा अजिबात द्वेष करत नाही किंवा त्याचे मला कौतुकही नाही. त्याचे नशीब म्हणून तो गांधी घराण्यात जन्मला, जे काही यश/अपयश त्याच्या वाट्याला आले त्याला कारणीभूत त्याचे आडनाव आहे. आजतरी गांधी आडनाव वजा केले तर त्याचे कर्तृत्व शून्य आहे.. अशा माणसाचा द्वेष का करावा आणि कौतुक तरी कशासाठी करावे?

वर बऱ्याच जणांचा पूर्वपीठिका नसताना मोठी पदे मिळण्याबाबत उल्लेख आलेला आहे. 2014 मध्ये मोदीउदय झाला नसता तर राहुल पंप्र होऊन त्याचेही नाव वरच्या यादीत आले असते.

रागाला संधी मिळती तर तोही ट्वेंटीन, Streanh असे विदुषकी चाळे करता.

ते तो आताही करतो. आणि संधी तर त्याला रोजच मिळते, संधीचे सोने तो करतोच.

मला हे काय हेच माहीत नाही. मी हल्ली टीव्हीवरील बातम्या, फेसबुक व पेपर तिन्ही बंद केलेले आहेत. पण विदूषकी चाळे म्हटलात तर राहुल गांधी ते नित्य नियमाने करतो याबद्दल मी लिहिले.

असुद्याहो. सतत तेच ते उगाळण्यापेक्षा दुसरी महत्त्वाची कामे केलेली बरी. आणि तसेही जे दिसते त्यातले किती खरे आणि किती खोटे कसे कळायचे, काहीच विश्वास ठेवण्याजोगे उरले नाही... त्यामुळे मी हल्ली ह्या भानगडीमध्ये पडत नाही.

होना.
हल्ली म्हणजे मागच्या दोन मिनिटांपासून.

बरं. गाडी रुळावर आणू. शिवसेनेला आपले आमदार सुरक्षित ठेवायला दुसरं राज्यही नाही.
काय करावं त्यांनी?
मातोश्रीवर राहतील का सुरक्षित?

हल्ली म्हणजे मागच्या दोन मिनिटांपासून>>>>

हल्ली राजकारणाच्या किती धाग्यांवर मी तुम्हाला दिवसभर पडीक दिसले? ह्या धाग्यावरही किती कमेंट्स आहेत? माझ्या मागच्या दोन मिनिटांपासूनच्या सोडून?

असो. ___/\__

ते विदूषकी चाळे हल्लीचे नव्हेत, 3 4 वर्षातले आहेत,
तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह होता,

पण असोच...

हायला हे (a+B)^2 माहितच न्हवतं. Biggrin
२+२ = ५ जास्त योग्य राहिलं असतं. पण टेक्निकली बरोबर बोलणे महत्त्वाचे नसून व्होटर बेसला भारी वाटेल असे बोलणे महत्त्वाचे असते. आणि ते होतंय.

>>हल्ली म्हणजे मागच्या दोन मिनिटांपासून<<
>>पण असोच...<<
ऑल आय वांट टु से इज - शीशोंके घर में रेहनेवाले, दुसरोंके घरोंपें पत्थर फेंका नहि करतें... Proud

9 नोहेंबर ला राम मंदिर निकाल आहे. भाजप साठी हि संधी आहे का? शिवसेना राममंदिर च्या बाजूने असल्याने सेक्युलर काँग्रेस शिवसेनेसोबत जायची रिस्क घेईल का?

बरेच घटक ह्या खेळात सहभागी असतील.
फक्त सेना आणि bjp च खेळाडू नाही..
राजकीय पक्षांबरोबर निवडणुकीत funding करणारे प्रायोजक,पण खेळाडू आहेत
Bjp वर नाराज असणारा व्यापारी वर्ग आतून सेने च्या पाठी असेल
म्हणून तर शिवसेनेला ताणून tharayala बळ मिळत नसेल कशा वरून

"शिवसेना राममंदिर च्या बाजूने असल्याने सेक्युलर काँग्रेस शिवसेनेसोबत जायची रिस्क घेईल का?">>>>> काँग्रेसला सेक्युलर लावण्याची गरज नव्हती. सत्तेसाठी एका विशिष्ट धर्माचे लांगूनचालन करणारा पक्ष सेक्युलर असू शकत नाही. असेल तर मग भाजप आणि शिवसेनापण सेक्युलर असायला पाहिजेत

काँग्रेसला सेक्युलर लावण्याची गरज नव्हती >>> मी कशाला लावू? अख्या जगाला माहीत आहे की काँग्रेस स्वतःला सेक्युलर म्हणवून घेते, भले त्यांचं वागणं कसं का असेना.

सेक्युलर म्हणजे काय भानगड असते.
कोणता ही पक्ष सत्तेवर असला तरी सरकारी योजना सर्वांसाठी असतात.
Bjp हिंदू वादी आहे म्हणून काय bjp हिंदू ना खास दर्जा देवून आर्थिक मदत करत आहे .
सेक्युलर ह्या शब्दाला काही अर्थ नाही .

<मी हल्ली टीव्हीवरील बातम्या, फेसबुक व पेपर तिन्ही बंद केलेले आहेत. पण विदूषकी चाळे म्हटलात तर राहुल गांधी ते नित्य नियमाने करतो याबद्दल मी लिहिले.>

टीव्ही च्या बातम्या , फेसबुक , पेपर बंद केलेत तर राहुल गांधी नित्य नेमाने करीत असलेल्या विदुषकी चाळ्यांची माहिती कुठून मिळते?

<तसेही जे दिसते त्यातले किती खरे आणि किती खोटे कसे कळायचे, काहीच विश्वास ठेवण्याजोगे उरले नाही...>
राहुल गांधी विदुषकी चाळे करतो यावर मात्र मी विश्वास ठेवतो.

या सगळ्याचा सोर्स व्हॉट्स अ‍ॅप आहे हे स्वतःच उघड केलं ते बरं झालं.

रागाबद्दल फीड केलेल्या सगळ्या बातम्या खर्‍या असतात, पण मोदींब द्दलच्या एकतर मी माझ्या पर्यंत पोहोचूच देत नाही किंवा त्यांवर विश्वास ठेवत नाही.

रागाबद्दल बोलायचं तेव्हा कीबोर्ड चुरू चुरू चा लतो. तेच चाळे मोदींनी केलेले दिसले की मी या भानगडीत पडत नाही.

मोदी समर्थक शीशे के घरो में रहते हो हे त्यांनी रागाला विदुषक म्हण ण्यापूर्वी लक्षात ठेवावे.
त्यात ते ट्रंप समर्थक असतील तर....

-------------
गोव्यात दोन उपमुख्यमंत्री, कर्नाटकात चार. मग शिवसेनेशीच असा सापत्न भाव का बरे?

>>> गोव्यात दोन उपमुख्यमंत्री, कर्नाटकात चार. मग शिवसेनेशीच असा सापत्न भाव का बरे? >>>

कारण शिवसेना फक्त पोकळ फुशारक्या मारते व पोकळ डरकाळ्या फोडते. प्रत्यक्षात शिवसेना अत्यंत लाचार असून कोणत्याही भूमिकेवर कधीच ठाम नसल्याने त्यांना हवे तसे वाकवून फरपटत नेता येते. तसेच हुकुमाची पाने व चांगली पाने हातात असूनही शिवसेना आपली पाने आधीच उघडी करून वाटाघाटीत नेहमीच हरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे अस्तित्व मुंबई-ठाण्याच्या बाहेर फारसे नाही. हा प्रादेशिक पातळीचा सुद्धा पक्ष नसून १-२ महापालिका पातळीचा पक्ष आहे.

राजकारणावरचे लेख लोक ललित लेखनात का पाडतात?
----------
आजच्या इं ए आणि लोकसत्ताच्या हेडला इन्स परस्परविरोधी आहेत. लोकसत्ता म्हणतेय भाजप सेनेच्या दबा व तंत्राला भीक घालत नाही. वाटाघाटींतून अंग काढून घेतल्यावर दिल्लीहून फोन येईल अशी सेनेची अपेक्षा होती. ती फोल केली.
इं ए म्हणतय - फडणवीसनी ५०-५० खात्यांची ऑफर दिलीय. फर्स्ट साइन ऑफ थॉ.
--------
ट्विटरवरून - मी परत येईन ऐवजी आम्ही परत येऊ असं म्हटल्याने फरक पडला असता.

पण मला वाटतं भाजप चा उद्देश अध्य्क्षीय लोकशाही आहे. त्यामुळे मी परत येईन , अब की बार / फिर एक बार मोदी सरकार हे या धोरणात फिट बसतं.

Bjp आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार हे त्रिवार सत्य आहे.
Bjp सेना संगनमताने तमाशा चा फड उभा करत आहेत.
काही तरी हेतू दोन्ही पक्ष चा नक्की आहे.
युती व्यतिरिक्त सरकार स्थापन करण्याच्या स्थिती मध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी नाही.
इथे जर संख्याबळ मध्ये खूप थोडा फरक असता
तर कधीच सरकार स्थापन झाले असते.
सेना ,bjp मध्ये खरोखर मतभेद असते तर आमची बोलणी चालू आहे लवकरच सत्ता स्थापन केली जाईल अशी एका वाक्यात दोन्ही पक्ष कडून स्टेटमेंट आली असती.
मीडिया समोर जाहीर मतभेद चा देखावा निर्माण करण्या मागे
पक्षीय हेतू आहे

वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री होऊन आजपर्यंतचा महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री हे रेकॉर्ड करणारा व ते रेकॉर्ड आजतागायत कायम ठेवणारा व आजवर चारवेळा मुख्यमंत्री होऊनही वय व तब्येत साथ देत असूनही एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न करु शकणारा जाणता राजा पंतप्रधान व राष्ट्रपती या पदांची स्वप्ने पूर्ण न करु शकल्यानंतर आता वयाच्या ७९ व्या वर्षी राज्याचा सर्वात वृद्ध मुख्यमंत्री असा रेकॉर्ड बनवल्यावर तरी या वयात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल काय?

रंगीला सिनेमाचं टायटल साँग प्रसिद्ध झालं होतं तेव्हा गायक व गायिकेच्या वयात असलेलं प्रचंड अंतर (तिन पिढ्याहूनही अधिक फरक) कौतुकाचा विषय ठरलं होतं आता शरद पवार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ही जोडी त्याहूनही मोठ्या वय फरकाबद्दलचं कौतूक मिरवू शकेल. चांगलंच आहे म्हणा. मुमं पहाटे लवकर उठून कामाला लागतील आणि उमुमं रात्रभर जागून नाईट लाईफचा पुरस्कार करतील. महाराष्ट्रातील जनतेला चोवीस ताशी घड्याळाचं सरकार मिळेल.

असुद्याहो. सतत तेच ते उगाळण्यापेक्षा दुसरी महत्त्वाची कामे केलेली बरी. >> चला उपरती तर झाली.. बघुया तुम्ही हे किती वेळ लक्षात ठेवता...

सत्ता कशी वाटून घ्यायची ह्या अमित शह आणि उध्दव ठाकरे मध्ये ठरलेलं आहे.
त्या मुळे जोपर्यंत अमित शाह मुंबई मध्ये येवून चर्चेला बसत नाहीत तो पर्यंत वेळकाढू पना चालू आहे.
बाकी काही तर्क लावायची गरज नाही.
पवार सेनेला साथ देवून सत्तेत येतील .
आदित्य cm बनतील,
असले काही घडणार नाही.
Cm bjp चाच असणार .एक दोन महत्त्वाची खाती सेनेला दिली जातील.
ह्या वर सेनेला काही मिळणार नाही.
Bmc मध्ये सुधा युती शिवाय सत्ता चालवता येणार नाही.
Bmc सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.
किती तरी राज्यसरकार पेक्षा जास्त बजेट bmc चे आहे .
ती कोंबडी कोण्ही कापून खाणार नाही

खालील शक्यता आहेत (सर्वाधिक होण्याची शक्यता ते सर्वात कमी होण्याची शक्यता या उतरत्या क्रमाने) -

१) सेनेला १६-१८ मंत्रीपदे देऊन फडणवीस मुख्यमंत्री

२) सेनेला पूर्वीएवढीच मंत्रीपदे देऊन फडणवीस मुख्यमंत्री

३) सर्वात मोठा पक्ष म्हणून फडणवीस अल्पमतातील सरकार स्थापन करणार. परंतु जर भाजपला स्वत:चा सभापती निवडून आणता आला नाही तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता ते राजीनामा देतील.

४) राष्ट्रपती राजवट

५) शिवसेना व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसच्या पाठिंब्याने संयुक्त सरकार. पवार किंवा सेनेचा मुख्यमंत्री.

वाटाघाटी करण्यात सेना खरेच अडाणी आहे हे स्पष्टपणे जाणवते आहे. आताच्या परिस्थितीचे थोडे विश्लेषण जरी केले तरी फार ठळकपणे जाणवते. निकाल लागल्यापासून सगळ्यात उजवी बाजू सेनेची आहे. सेना विरोधात बसण्याची शक्यता इतर पक्षांच्या तुलनेत फारच कमी आहे. अशा परिस्थितीत इतर अपक्ष आमदार, छोटे पक्ष यांचा जितका अधिक पाठिंबा घेत संख्याबळ वाढवायला हवे होते तितके काही झालेले नाही. भाजप इथेही पुढेच आहे.

Bjp ला सत्तेत बसण्याचा कौल जनतेनी दिला आहे .
तिला सत्तेबाहेर ठेवले तर तो मतदारांचा सुधा अपमान आहे.
तुम्ही मतदारांना च फाट्यावर मारायला गेला तर ::::;;

Bjp ला सत्तेत बसण्याचा कौल जनतेनी दिला आहे>>
इथे युती म्हणायचं होतं का राजेशभौ? मग थोडे बरोबर होईल नाही का? बिजेपीला १४५+ नाही गाठता आलेले.

युती ल सत्तेत बसण्याचा कौल आहे .
मुंबई चा विचार केला तर फक्त bjp शी युती आहे म्हणून ठरवून गुजराती,मारवाडी लोकांनी सेनेला मत दिले आहे ती bjp ची votebank आहे.
तोच प्रकार bjp विषयी सुधा झाला आहे.
अल्पसंख्यक मराठी मतदार असलेल्या शहरात जास्तीतजास्त नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्यात ह्याच मतदारांचा हात आहे हे विसरून चालणार नाही.

काय हे इतके दिवस झाले निकाल लागून तरी हिंदुराष्ट्र व्हावे म्हणून कोणी तडजोड करायला तयार नाही, अरेरे, अरेरे.

Pages