Submitted by Asu on 25 October, 2019 - 05:56
शुभ दिपावली!
ही दिवाळी आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबियांना आरोग्यमय, सुखसमृद्धीची भरभराटीची व आनंदाची जावो, ह्याच पाटील परिवारातर्फे शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त आज मी पहिला काव्यदीप लावत आहे. तो सतत तेवत ठेवण्यासाठी आपण स्नेह पुरवालच-
*वसुबारस*
अश्विन कृष्ण द्वादशीला
वसुबारस सांगत आली
दिवाळीची सुरुवात झाली
सवत्स धेनु आज ओवाळी
घरी-दारी आली दिवाळी
अंगणी आज काढा रांगोळी
पूजा गोमातेची सायंकाळी
नैवेद्य भरवून पुरणपोळी
आरोग्य वसु मिळे सर्वदा
कृष्णरूप गाऊली पूजिता
कपिला जणू शेतकऱ्याची
समृद्धी देईल मनी इच्छिता
वसुबारस सण गाय वासरांचा
पशुधन वाढवा श्वेतक्रांती घडवा
दूध पूर्णान्न असे अमृत ठेवा
अशक्त भारत सशक्त बनवा
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप छान.
खूप छान.
अश्विन कृष्ण द्वादशी - श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजानंद गमनाचा दिवस. काल पोथीतील एक अध्याय वाचला.
आपल्यालाही दिवाळीच्या शुभेच्छा.