श्रीकृष्ण आणि संकर्षण

Submitted by सतीश कुमार on 23 October, 2019 - 03:18

बलराम -

चराचर सृष्टीला भगवान कृष्ण माहीत आहे. भगवदगीता तर आपल्याला माहित असतेच. आपण कृष्णाबद्दल शेकडो पुस्तके वाचलेली असतात. इस्कॉन नी तर श्रीकृष्ण याला जगद्विख्यात केलेलं आहे. किती ऐकतो व वाचतो अापण कृष्णाबद्दल पण याचा भाऊ बलराम मात्र बराच अज्ञात आहे.

बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि कृष्णाचा मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. त्याचा अर्थ सुभद्रा ही कृष्णाची सावत्र बहीण झाली. शिशुपाल याचा वध झाल्यानंतर कृष्णाच्या करंगळीला जखम झाली तेंव्हा सुभद्रेला
चिंधी मिळाली नाही म्हणून तिने नवा शालू फाडला होता हे आपण ऐकले आहे.

बलरामाला बलभद्र, बलदेव. हलधर, संकर्षण आदी नावेही आहेत. देवकीचा गर्भ कंसाच्या भीतीमुळे रोहिणी च्या गर्भाशयात रोपण्यात आला आणि हा गर्भ जन्मल्या नंतर त्याला संकर्षण असे नाव दिले गेले. श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी, मराठी पंचांगाप्रमाणे श्रावण वद्य षष्ठीला, बलराम जयंती असते. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो. रेवती हे याच्या पत्नीचे नाव. रेवती मुळात फार उंच होती पण बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून बुटके केले आणि मग तिच्याशी विवाह केला, असे सांगितले जाते. बलराम लहानपणापासूनच
अत्यंत गंभीर आणि शांत होता. तो मुष्टियुद्धात तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले. बलरामाला सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाला चकवून, सुभद्रेला लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.

ओरिसातील पुरी येथे जे प्रख्यात जगन्नाथ मंदिर आहे त्यात श्रीकृष्ण याच्या बरोबर बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ति आहेत.

जैन धर्मातील बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांचे चुलत भाऊ म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम असा एक उल्लेख आढळतो.

बुद्ध धर्मात गौतम बुद्ध हे त्यांच्या मागील जन्मात बलराम होते आणि गौतम बुद्धाचे शिष्य सारीपुत्त हे त्यांच्या मागच्या जन्मात श्रीकृष्ण होते असा उल्लेख आहे.

महाभारत युद्धप्रसंगी मात्र बलराम तटस्थ होता. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला आणि युद्ध संपल्यानंतर तो आला. भीमाने दुर्योधनाला मारले हे ऐकून तो संतापला आणि भीमाला ठार मारण्यास सरसावला पण कृष्णाने त्याला आवरले आणि भीमाला वाचवले. बलराम हा शेषाचा अवतार असल्याचे सांगितले जाते. आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम द्वारका येथील समुद्रकिनारी आसन लावून बसला आणि त्याने आपला अवतार संपवला.

बलराम याच्या बद्दल जास्त माहिती मिळत नाही. माबो वरील वाचकांनी या माहितीत भर घातली तर स्वागतार्ह आहे.

____

Group content visibility: 
Use group defaults

मेधा
तुमच्या पक्षातील लोकांनी तुमची तळी उचलताना तुमचा मूळचा प्रतिसाद न वाचताच टीकेचा सूर लावून आपली पाजळली आहे. "सुभद्रा ऐवजी द्रौपदी हवं" असे केवळ चार शब्द लिहून तुम्ही माझी चूक दाखवली असती तरी चाललं असतं. इथे बऱ्याच लोकांनी चूक दाखवताना तसे संकेत पाळले आहेत. त्या ऐवजी तुम्ही:

१) माझ्या प्रस्तावनेला " ही काय लांबड लावली आहे" असं म्हणालात. इथे लिहायला काय शब्दांची मर्यादा आहे काय? तुम्हाला लांबड वाटली तर वाचता कशाला? तुम्ही चार शब्द लिहायच्या ऐवजी भली मोठी लांब शेपटी दाखवलीय त्याचं काय? अशा शेपटीवाल्या प्राण्याला काय म्हणतात बरे?

२) चराचर सृष्टी लिहिण्यात काय चूक आहे? या सृष्टीचा मालकी हक्क तुमच्याकडे वारसा हक्काने आला आहे काय? आणि शेकडो पुस्तके वाचली अश्या साधारण विधानाला आक्षेप घेण्यासारखं काय आहे? ह्या वरून एवढाच बोध होतो की डोकं दुखलं तर तुम्ही गुडघ्याला झंडू बाम चोळता.

३) कृष्णाला जग ओळखत असेल नसेल. त्याला अर्धे जग ओळखत नाही असा दावा करायला तुम्ही काय जग पालथं घातलंय काय? मी तसे म्हणालो कारण जगात बहुतेक ठिकाणी इस्कॉनची मंदिरे आहेत आणि त्यात पश्चिमात्य आणि पौर्वात्य सर्व धर्माची लोकं येत असतात. उलट सर्व जगाला कृष्ण माहीत असावा अशी इच्छा भारतीय असून बाळगायची की कृष्ण अर्ध्या जगाला माहीत नाही यात भूषण मानायचे? जगप्रसिद्ध बीटल्स या बँड मधला जॉर्ज हॅरिसन हा कृष्ण भक्त होता हे ठाऊक नसेल तुम्हाला. मी जगप्रसिद्ध हा शब्द वापरलाय. त्याचं माय स्वीट लॉर्ड हे कृष्णावरचं गाणं ऐका हवं तर.

४) बलराम याच्या बद्दल माहिती असल्यास भर घालावी अशी विनंती मी लेखात केली आहे. त्या ऐवजी पहिल्याच ओळी पासून तुम्ही AK-47 ला चाप लावल्या सारखेच असंबद्ध लिहीत गेलात. केवळ जहाल टीका करावी या उद्देशानेच. तसं करताना तुम्हाला अासुरी आनंद मिळत असावा. You took a sadistic pleasure in tormenting while criticizing the article.

५) शेवटी " घुसडायच्या " असा शब्द प्रयोग केलात. हा शब्द कसा वाटला? अन पार्लमेंटरी नाही वाटला?

तुम्ही मारक्या म्हशीसारखे अंगावर धावून आल्यानंतर शिंगावर घेतलेच जाणार. अश्लाघ्य, असंस्कृत आणि अतार्किक प्रतिक्रिया असेल तर तसेच उत्तर मिळणार. नाही का? आणि तुम्ही तुमचं नाव "मॅडी" ऐवजी मेधा लिहिलंय त्या चुकीचं काय? ही चूक माझ्या सारखीच थ्रू ओवर साईट झाली असावी. तुम्ही खूप हुशार, प्रतिभावान आणि ज्ञानी असाल तर ही प्रतिभा अशीच, just for the heck of it टीका करत sadistic होण्यात वापरा.

मराठीत एक प्रख्यात लेखक होते. जी ए कुलकर्णी. तुमच्यासारखे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी त्यांनी मराठीत एक शब्द रूढ केला होता. हुच्च हुडगी.

BTW, कुठल्या तरी छापखान्यात प्रूफ रीडरचं काम करता का तुम्ही? तसं असेल तर चांगलं काम करत आहात. Wish you good luck.

ओके, ४ शब्दात: "लग्नमंडपाऐवजी देवीमंदिरातून/देवी उत्सवातून हवे". अर्जुनाने सुभद्रेच्या मर्जीविरूध्द नेले नाही हे बलरामाला सिद्ध करण्यासाठी तिनेच अर्जुनाचा रथ हाकला. सुभद्राहरण म्हणण्याचा प्रघात आहे पण जसे भीष्माने अंबा, अम्बालिकेचे लग्नमंडपातून हरण केले तसे हरण सुभद्राहरण नाही. अर्जुनाने चार लग्ने केली पण लग्नमंडपातून हरण एकही नाही. "दिल की मजबूरी" म्हणावी अशी एकच सुभद्रा, बाकी द्रौपदी, चित्रांगदा, आणि उलूपी "थोडी मजबूरी है लेकीन थोडी है मनमानी, थोडी तू तू मै मै है और थोडी खिंचातानी"....

काही नवीन माहितीसाठी वाचत होतो, पण तुमचे खालचे प्रतिसाद बघून वैतागलो! तुम्हाला एखाद्याचा राग येणं समजू शकतो, पण अश्या भाषेत उत्तर देणं शोभत नाही हो. त्यांचे काही मुद्दे जरी 'उगाचच' वाटले तरी त्यांनी काहीही अनपार्लमेंटरी वापरले नाहिये. (शब्द घुसडणे - यात काय आक्षेपार्ह आहे? ते घुसडणे शब्दाम्च्या बाबतीतच आहे, त्याचा उगीच वाईट अर्थ घ्यायची गरज नाही.)

भगवान कृष्ण हा युग पुरुष आहे. तो बंगाल आणि दक्षिण कर्नाटक, उडुपी इत्यादी ठिकाणी देव म्हणून पूजला जातो. तो विष्णुचा आठवा अवतार आहे. बँड एड चे चित्र दाखवून त्याची खिल्ली उडविणाऱ्या भरत खंडातील एका व्यक्तीला अशा अवघड जागी जखम झाली आहे की तिथे बँड एड ही लावता येत नाही आणि अश्वत्थामा प्रमाणे जखम ही बरी होत नाही हे विदित होते आहेच तसेच या शूर भरता सोबतच अस्सलाम आलेकुम असा मुजरा करणाऱ्या आणि स्वतःला अहं मधुरम् म्हणवून घेणाऱ्या कडवट व्यक्तींची बौद्धिक पातळी शाळकरीही नसून त्याही पेक्षा कितीतरी पटींनी खालावली आहे याचाही प्रत्यय येतो. स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या अशा बिनडोक व्यक्ती जेंव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी बनून भगवदगीता हा राष्ट्रीय ग्रंथ देणाऱ्या असामान्य आणि जगन्मान्य व्यक्तिमत्वाची आणि परमेश्वराची टर उडवतात तेंव्हा प्री हिस्टोरिक डायनासोर्स ( पी एच डी ) अजून नामशेष झाले नाहीत असे वाटते आणि झाले असल्यास त्यांचे रूपांतर नाल्यातल्या जंतूत झाले की काय असे वाटू लागते. असो. या टर उडवायच्या पापाची शिक्षा आयुष्यात कधीतरी मिळेलच. तोपर्यंत अशीच मस्करी करत राहा

सहमत,
पौराणिक पात्रांची खिल्ली उडवण्याचे अधिकार फक्त दोघांनाच आहेत, दशावतारवाले अन संगीत नाटकवाले, कारण त्यांच्या खिल्लीतही 99% भक्तिभाव असतो,

इतरांनी असे करणे हे सामाजिक शांततेचा भंग करू शकते

सतीशकुमार,

तुम्ही स्वतः सुभद्रेचा उल्लेख द्रौपदी ऐवजी केलात. यात तुम्हीच अपमान केला नाहीत का देवी-देवतांचा? चूक कळल्यावरही धाग्यात बदल करण्या ऐवजी आधी तुम्ही मेधावर टिका केलीत, आता इतरांवर करता आहात. निदान सभ्यता म्हणून का होईना शब्द जपून वापरावेत.

आणि मी कुठे देवांवर विनोद केला आहे, हे जरा सांगालं का?
भरत आणि बेग च्या प्रतिक्रिया वाचून असे वाटले की ते केवळ वातावरण हलके करत आहेत धाग्यावरचे. म्हणून मी हसण्याची चिंहे दिली.

पण आता तुमच्या धाग्यांपासून चार हात लांबच बरे, असे तुमचे प्रतिसाद वाचून वाटते.

प्रतिसादांतली तडतडबाजी वाचायला मज्जा येते आहे.
भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ ? कोणत्या राष्ट्राचा?

कुणा मायबोलीकराची बौद्धिक पातळी काढल्या बद्दल आयडी उडा ल्याची एक केस असली, तरी यांचा आयडी उडवू नये, असे वाटते. मनोरंजनाची हमखास सोय आहे ही.

मला वाटते काही लेखक / लेखिका हल्ली मुद्दाम त्यांच्या धाग्यावर उद्धट प्रतिसाद देवून क्षुल्लक महत्व असलेल्या धाग्यांचा अश्या उथळ गोष्टी करत टी आर पी वाढवायचा केविलवाणा प्रयत्न करत असावेत.

Pages