श्रीकृष्ण आणि संकर्षण

Submitted by सतीश कुमार on 23 October, 2019 - 03:18

बलराम -

चराचर सृष्टीला भगवान कृष्ण माहीत आहे. भगवदगीता तर आपल्याला माहित असतेच. आपण कृष्णाबद्दल शेकडो पुस्तके वाचलेली असतात. इस्कॉन नी तर श्रीकृष्ण याला जगद्विख्यात केलेलं आहे. किती ऐकतो व वाचतो अापण कृष्णाबद्दल पण याचा भाऊ बलराम मात्र बराच अज्ञात आहे.

बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि कृष्णाचा मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. त्याचा अर्थ सुभद्रा ही कृष्णाची सावत्र बहीण झाली. शिशुपाल याचा वध झाल्यानंतर कृष्णाच्या करंगळीला जखम झाली तेंव्हा सुभद्रेला
चिंधी मिळाली नाही म्हणून तिने नवा शालू फाडला होता हे आपण ऐकले आहे.

बलरामाला बलभद्र, बलदेव. हलधर, संकर्षण आदी नावेही आहेत. देवकीचा गर्भ कंसाच्या भीतीमुळे रोहिणी च्या गर्भाशयात रोपण्यात आला आणि हा गर्भ जन्मल्या नंतर त्याला संकर्षण असे नाव दिले गेले. श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी, मराठी पंचांगाप्रमाणे श्रावण वद्य षष्ठीला, बलराम जयंती असते. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो. रेवती हे याच्या पत्नीचे नाव. रेवती मुळात फार उंच होती पण बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून बुटके केले आणि मग तिच्याशी विवाह केला, असे सांगितले जाते. बलराम लहानपणापासूनच
अत्यंत गंभीर आणि शांत होता. तो मुष्टियुद्धात तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले. बलरामाला सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाला चकवून, सुभद्रेला लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.

ओरिसातील पुरी येथे जे प्रख्यात जगन्नाथ मंदिर आहे त्यात श्रीकृष्ण याच्या बरोबर बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ति आहेत.

जैन धर्मातील बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांचे चुलत भाऊ म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम असा एक उल्लेख आढळतो.

बुद्ध धर्मात गौतम बुद्ध हे त्यांच्या मागील जन्मात बलराम होते आणि गौतम बुद्धाचे शिष्य सारीपुत्त हे त्यांच्या मागच्या जन्मात श्रीकृष्ण होते असा उल्लेख आहे.

महाभारत युद्धप्रसंगी मात्र बलराम तटस्थ होता. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला आणि युद्ध संपल्यानंतर तो आला. भीमाने दुर्योधनाला मारले हे ऐकून तो संतापला आणि भीमाला ठार मारण्यास सरसावला पण कृष्णाने त्याला आवरले आणि भीमाला वाचवले. बलराम हा शेषाचा अवतार असल्याचे सांगितले जाते. आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम द्वारका येथील समुद्रकिनारी आसन लावून बसला आणि त्याने आपला अवतार संपवला.

बलराम याच्या बद्दल जास्त माहिती मिळत नाही. माबो वरील वाचकांनी या माहितीत भर घातली तर स्वागतार्ह आहे.

____

Group content visibility: 
Use group defaults

कृष्ण हा पशुपालक समाजाचा देव वाटतो आणि त्यांच्यापैकीच एक बलराम पुढे शेती करायला लागलेल्या लोकांचा देव वाटतो. एकंदरीत नांगर वगैरे चिन्हे तेच दाखवायला वापरली असावी. बलरामाची शस्त्रे नांगर आणि मुसळ आहेत. मुसळाने झालेला यादवांचा नाश हा कुठेतरी पशुपालक समाज शेती करायला लागला आणि मुसळ वापरून धान्य कांडायला लागला आणि त्याला पशुपालनाची गरज राहिली नाही असा काहीतरी संकेत असावा.

कृष्णाच्या करंगळीला जखम झाली तेंव्हा सुभद्रेला
चिंधी मिळाली नाही म्हणून तिने नवा शालू फाडला होता हे आपण ऐकले आहे.

>>>> कि द्रोपदीने ????

बलराम हा लक्ष्मणाचा अवतार होता. पूर्वजन्मात त्याला रामाचा लहान भाऊ असल्याने दादाचे खूपच ऐकावे लागे..म्हणून त्याने पुढील जन्म हा रामाचा थोरला भाऊ मिळावा असा वर मागितला होता. त्यानुसार तो कृष्णाचा मोठा भाऊ झाला. अतिशय पराक्रमी, भोळा, गदायुद्धात निपुण असा हा दुर्योधनाचा गुरु होता.

इस्कॉनची मंडळी आणि पुष्टिमार्गीय वैष्णव बलरामाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

सगळ्याच साहित्यात त्याचे रूप-गुण कृष्णाच्या विरुद्ध कल्पिलेले आहेत. कृष्ण श्यामवर्णी, बलराम गौर. कृष्ण नाजूक, तो बलदंड. कृष्ण कलाप्रिय बासरीवादक, तो मुष्टियोद्धा /बॉक्सर. कृष्णाच्या अनेक प्रियतमा, त्याची एकच. त्याचा जन्म पौणिमेच्या उजळ रात्री, महालात तर कृष्णाचा कृष्णपक्षात, बंदिवासात. असे सगळेच विरुद्ध. पण बंधूप्रेम अतूट.

हे घ्या पट्ट-शैलीतले कृष्ण बलरामाचे एक चित्र.

IMG_3501.jpg

>>देवकीचा गर्भ कंसाच्या भीतीमुळे रोहिणी च्या गर्भाशयात रोपण्यात आला आणि हा गर्भ जन्मल्या नंतर त्याला संकर्षण असे नाव दिले गेले. <<
हे माहित नव्हतं. यात काहि तथ्य असेल तर बलराम टेक्निकली (जेनेटिकली) कृष्णाचा सख्खा भाऊ ठरतो, सावत्र किंवा हाफ-ब्रदर नाहि. त्या काळात सरोगसी (क्न्सेप्च्युअली तरी शक्य) होती हि बाब इंटरेस्टिंग आहे...

@ अनिंद्य, मस्त फोटो आहे. मी माझ्या लेखात इमेज टाकायचा प्रयत्न करतो पण ते स्विकारले जात नाही. हे कसे करायचे असते? कृपया कळवा. Thank you.

चराचर सृष्टीला भगवान कृष्ण माहीत आहे. भगवदगीता तर आपल्याला माहित असतेच. आपण कृष्णाबद्दल शेकडो पुस्तके वाचलेली असतात. इस्कॉन नी तर श्रीकृष्ण याला जगद्विख्यात केलेलं आहे. किती ऐकतो व वाचतो अापण कृष्णाबद्दल पण याचा भाऊ बलराम मात्र बराच अज्ञात आहे.

बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि कृष्णाचा मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. त्याचा अर्थ सुभद्रा ही कृष्णाची सावत्र बहीण झाली. शिशुपाल याचा वध झाल्यानंतर कृष्णाच्या करंगळीला जखम झाली तेंव्हा सुभद्रेला
चिंधी मिळाली नाही म्हणून तिने नवा शालू फाडला होता हे आपण ऐकले आहे.
>>

किती चुका आहेत ? चराचर सृष्टीला ? जगातल्या ७ बिलियन मनुष्य प्राण्यांपैकी अर्ध्यांना माहिती नसेल कृष्ण कोण ते !

शेकडो पुस्तके कुठली आहेत कृष्णावर जी सगळ्यांनी वाचली असतील ? त्याच्याबद्दलच्या आख्यायिका असतील शेकडोंनी पण पुस्तके ? एकाच विषयावरची शंभर पुस्तके कदाचित पी एच डी करणारे विद्यार्थी सुद्धा वाचत नसतील.

आसपासच्या स्त्रिया चिंधी सापडत नाही म्हणून शोधाशोध करत असताना द्रौपदीने आपल्या भरजरी शालूची चिंधी फाडून दिल्याची गोष्ट ऐकली आहे. सुभद्रा कुठून आली यात ?

बलरामाबद्दलची माहिती लिहायची तर ती सरळ लिहावी की. उगाच मोठं प्रिअँबल लिहायच्या नादात चुका कशाला घुसडायच्या ?

@मेधा, व्वा. छान प्रतिक्रिया आहे तुमची. मेधावी आणि प्रज्ञावान आहात. तुम्ही पीएचडी कराच. तुमच्या पीएचडीला आपण पर्मनंट हेड डैमेज किंवा पैंटीज हैंगिंग डाउन असं म्हणूया. Passed Highschool with Difficulty हा पीएचडी लाँग फॉर्म कसा वाटतो? ते म्हणू या हवं तर.

सतीशकुमार, तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि बहुश्रुत व्यक्तीच्या तोंडी पॅन्टीज डाउन वगैरे प्राथमिक शाळकरी भाषा शोभते का?
संयत शब्दात, अश्लाघ्य भाषा न वापरता, अगदी तार्किक दृष्टिकोनातून मुद्दे कसे मांडावेत वा खोडावेत याचा आदर्श तुम्हीच घालून द्यायला नको का?

बलराम शेष नागाचा अवतार...... लक्ष्मणाप्रमाणेच! पण त्रेतायुगाप्रमाणे त्याने विष्णुअवतारचा लहान भाऊ म्हणून जन्म घेण्याऐवजी द्वापारयुगात मोठा भाऊ म्हणून जन्म घेतला.

द्रौपदीने कृष्णाच्या जखमेवर कापड बांधले होते.
'भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण' आशा भोसले यांच्या एका गाण्याचीच ही सुरवात आहे. (गाणे सुरेल आहेच, पण त्यात महाभारतातील एक आख्यायिका सुद्धा मांडलेली आहे.)

बलराम दुर्योधनाचा गुरु होता. त्याने त्याला गदा युद्ध शिकवले होते.
महाभारत युद्धात तो सामिल झाला नाही. परंतू नियम उलंघन झाले तेव्हा तो भीमला शिक्षा द्यायला निघाला होता.
कृष्णाने मध्यस्थी केल्याने शांतही झाला.

एकूणच तो शीघ्रकोपी आणि संवेदनशील असावा असे मला वाटते.

बलराम हा शांत व अहिंसावादी होता, म्हणून जैन व बौद्ध आख्यायिकात त्याला कृष्णापेक्षा जास्त महत्व आहे.

कुठेही युद्ध चालू झाले की तो सरळ तीर्थाटना ला जायचा ( आमचे लाडकेजी इलेक्शन झाले की फिरायला जातात तसे, मतमोजणी झाली की पुन्हा हजर)

कृष्णाचे वडील वसुदेव व नेमिनाथांचे वडील समुद्रविजय हे सख्खे भाऊ होते. समुद्रविजय बहुदा द्वारकेत रहात होते, नेमिनाथांचे लग्न कृष्णानेच जुळवले होते, पण लग्नविधित मारायला खूप पशु आणले होते, ते पाहून नेमिनाथांचे मन द्रवले व ते तपश्चर्येला निघून गेले,

म्हणून जैन धर्मात नेमीनाथ व बलराम यांना मोठे स्थान आहे

@मेधा, व्वा. छान प्रतिक्रिया आहे तुमची. मेधावी आणि प्रज्ञावान आहात. तुम्ही पीएचडी कराच. तुमच्या पीएचडीला आपण पर्मनंट हेड डैमेज किंवा पैंटीज हैंगिंग डाउन असं म्हणूया. Passed Highschool with Difficulty हा पीएचडी लाँग फॉर्म कसा वाटतो? ते म्हणू या हवं तर. >> चुका दाखवून दिल्यावर पर्सनल आणि अन पार्लमेंटरी टीका ! तीव्र निषेध. ही प्रतिक्रिया पाहता तुम्हाला आदर्श संगोपनावर लिहायचा देखील काय अधिकार असा विचार आलाच मनात .

माझ्या पीएचडीला काय म्हणायचं ते ती डिग्री देणारी युनिव्हर्सिटी ठरवेल.

Submitted by सतीशकुमार on 24 October, 2019 - 13:26
>> मेधा यांना प्रतिसाद देताना तुम्ही जी भाषा वापरली आहे त्याबद्द्ल मी आक्षेप नोंदवत आहे.

लेख लिहिताना आपण देत आहोत ती माहिती चूक की बरोबर याची खातरजमा करायची ना! बरे माहिती चुकीची आहे हे इतरांनी प्रतिसादात सांगितल्यावर तुम्ही त्याचा सरळ अनुल्लेख केलात, आणि आता वर मेधा यांना हा असा पातळीसोडून प्रतिसाद?

>>द्रौपदीने कृष्णाच्या जखमेवर कापड बांधले होते. 'भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदीसी बंधु शोभे नारायण' आशा भोसले यांच्या एका गाण्याचीच ही सुरवात आहे. <<
ऐकलंय हे गाणं; बहुतेक "शामची आई" या चित्रपटातलं आहे. हे जर खरं असेल तर एक शंका - पितांबर पुरुष नेसतात, एस्पेश्यली विष्णु/कृष्ण्/पांडुरंग (आठवा पिवळा पितांबर... येहि ओ विठ्ठले आरतीतला). तर मग द्रौपदीने कृष्णाचाच पितांबर फाडुन, त्यातलीच चिंधी काढुन क्रेडिट घेतलं का? एक्दम चलाख बाई...

द्रौपदीने कृष्णाचाच पितांबर फाडुन, त्यातलीच चिंधी काढुन क्रेडिट घेतलं का? >> धोतराच्या सोग्यालाच हात घातलात की राज तुम्ही! Rofl
पिवळ्या रंगाच्या कुठल्याही कपड्याला पितांबर म्हणतील की!
आणि पितांबर अत्र्यांनी मात्रांत बसतं म्हणून घेतलं असेल हो. Lol

कृष्णाची करंगळी कापली . नारदमुनी चिंधीसाठी फिरत होते, असं एक व्हर्शन आहे. आधी सुभद्रेकडे गेले. तिने मी चिंधी कुठून आणू म्हणून दार बंद केले. द्रौपदीने पितांबर फाडला असेल आणि तो तिच्याकडचा नसेल, तर नारदमुनींचा असावा.

या प्रसंगावर मराठी चित्रपटांत तीन गाणी आहेत.
दोन गाण्यांचे उल्लेख आलेच आहेत.
तिसरं हे

ह्या लेखकाच्या लेखावर प्रतिक्रिया देउ नका लोकहो.
कुणी विरोधात लिहिलं की अश्लाघ्य भाषेत प्रतिसाद देतो लेखक.

सतीश्कुमार,
काहीतरी चार ओळी खरडल्या की आपण मोठे लेखक असा भ्रम झाला असेल तर ताळ्यावर या.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे.
आता माझ्यासाठीही काहीतरी लिहालच. त्यातुन तुमची बुद्धीमत्ता आणि पातळी दिसुन येइल.

तर मग द्रौपदीने कृष्णाचाच पितांबर फाडुन, त्यातलीच चिंधी काढुन क्रेडिट घेतलं का? एक्दम चलाख बाई...>>>>>>>> Rofl

नाही ओ! तिने फाडलेले कापड तिच्याच वस्त्राचा तुकडा होते.

आता कसे आहे, की पिवळ्या रंगाचे द्योतक म्हणून पितांबर शब्द वापरला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही आणि शेला शब्दाऐवजी वापरला असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.

पण मला १ शंका आहे... भुत भविष्य वर्तमान सर्वापलिकडे असलेल्या देव लोकात जखम बांधायला हे ---
का नाही वापरले ?

हाइजीन वगैरे काही गोष्ट असते का नै ! शेल्याला आपण काय काय पुसले असेल दिवस भरात Uhoh ह्याचा तरी जरा विचार करायचा की ..

Pages