टीटोटलर क्लब

Submitted by कटप्पा on 22 October, 2019 - 23:10

हा क्लब मी उघडेन असे कधी वाटले नव्हते . पण आता तिशी ओलांडली आणि टिटोलिसम अनुसारायला सुरुवात केली आहे .
तुमचे अनुभव कळू द्या |

तुमच्यापैकी कित्येक जण सुरुवातीपासून फॉलो करत असतील . तुमच्या मागची प्रेरणा कळू देत. आमच्या सारख्याना फायदा होईल |

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कटप्पा
आधी तो दारू कशी पिता याचा धागा उडवा. तिथे जाल चर्चा वाचाल तर हा मोह हे व्यसन सुटणे अवघडेय. आणि आपण सुधारतोय तर लोकांनाही सुधरवावे किंवा त्यांच्या बिघडण्यात हातभार तरी लाऊ नये असे म्ला वाटते.

प्रश्न तुमचा वा माह्या एकट्याचा नाही. तर समाजमनाचा आहे. जी बाजू योग्य आहे ती अशी झुकतेय हे मला पटत नाहीये. झाल्यास वेगळा सविस्तर धागा काढतो. >>>

हो हो नक्की काढ. तू धागा काढलास की समाजमन बदलायला नक्की मदत होईल.

>>>>>> झाल्यास वेगळा सविस्तर धागा काढतो.>>>>>>>> ऋन्मेष दिवाळीबद्दल धागा काढा ना. मी ऐकलं पुण्यात, पावसाने उत्साहावर पाणी फिरलय Sad धाग्याने जरा धुगधुगी येइल.
मी काढत नाहीये कारण मला एकदम कॉन्शस व्हायला होतं मग मी प्रत्येक प्रतिक्रियेवरती धन्यवाद देत बसते Sad नाही खरच!!!

माफ करा सर पण एकीकडे तुम्ही लोकांना दारू कशी पिता असे विचारताततर दुसरीकडे स्वत:साठी दारू सोडायचे सल्ले मागता. तर कोण याला महत्वाचे समजून गंभीरपणे घेणार?
दारू ही कशी वाईट आहे याबाबत आधी तुमच्याकडून मालमसाला येऊद्या. तो देखील प्रामाणिकपणे तसे वाटत असल्यास. कारण जर तुम्हाला दारूत काहीच वाईट आढळत नसेल तर का सोडायचीय हा प्रश्न लोकांना पडणारच

दारू वाईट आहे असे मी कधी म्हणालो?
मला लाईफस्टाईल बदलायची आहे,दारू बंद केली आहे .
दारू पिणाऱ्यांनी त्या दारू वाल्या धाग्यावर जा ,दारू न पिणार्यांनी इथे थांबा |

दारू वाईट आहे असे मी कधी म्हणालो?
मला लाईफस्टाईल बदलायची आहे,दारू बंद केली आहे .
>>>>

तुम्हाला दारू पिणे बंद करायचेआहे ते ती आता तिशीनंतर शरीरस्वास्थ्याला घातक आहे म्हणूनच ना?

नाही . तिशीनंतर दारू वाईट असे काही नाही . हा एक लाईफ स्टाईल चेंज आहे .
उदाहरणार्थ मी आता विगन झालो आहे . याचा अर्थ दूध पिणे वाईट असे नाही आहे . मांसाहार वाईट असे देखील नाही .
आता सकाळी उठून व्यायाम करतो , याचा अर्थ संध्याकाळचा व्यायाम वाईट असे नाही ना |

ह्या धाग्यामुळे टी टोटलर शब्दाचा अर्थ कळला. धन्यवाद. आजपर्यंत (माझा) हाच समज होता की टी टोटलर म्हणजे चहाबाज.
प्यावी की पिऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अति तिथे माती.
आजकाल मराठी चित्रपटांत देखील सर्रास पितांना दाखवतात. जसं पूर्वीच्या चित्रपटात सर्रास चहा पितांना दाखवायचे. थोडे खटकते, पण कालाय तस्मै नमः...
बर्फ टाकलेल्या Cranberry juice च्या आयडिएबद्दल धन्यवाद. पुढील संधीत वापरून पाहीन.
नुकत्याच एका डिनरला एक जण मला म्हणाला की ह्याला सुधारायला पाहिजे (म्हणजे प्यायला शिकवायला पाहिजे). आमच्या बरोबर एक (न पिणारा) जर्मन पण होता. त्याला मात्र कोणी आग्रह केला नाही.

जो म्हणाला याला सुधारवायचा आहे त्याने खरं तर त्या जर्मनलाच आग्रह करायचा असता. 'बाबारे सोशल ड्रिंकिंग म्हणजे काय, कशी प्यावी, का प्यावी, ड्रिंक्स म्हणजे पुढारलेल्या, दिलखुलास लोकांचे प्रतीक वगैरे वगैरेचे आम्ही काही लोक तुमच्याकडेच बोट दाखवून दाखले देत असतो, आणि तूच पीत नाहीस? असं कसं?' म्हणत.

बर्फ टाकलेल्या Cranberry juice च्या आयडिएबद्दल धन्यवाद. पुढील संधीत वापरून पाहीन.>> Biggrin

उसापासून लास्ट स्टेप म्हणून दारु बनते तर ह्या रैफ्रेंसने दारु पिण्याचे विरुद्ध टोक आणि दारु पिणाऱ्याचा (/पाजणाऱ्याचा) निषेध म्हणून त्या उसाच्या पहिल्या स्टेपचा प्रचार करण्यासाठी टीटोटलरवाल्याने आजपासून पार्टी / सोशल ड्रिंकिंग ठिकाणी मस्त भरलेला ग्लास हातात घ्यायचा पण उसाच्या रसाचा ( ज्यात बियर सारखा फेस सुद्धा मिळेल आणि ice cubes मुळे ऑन द रॉक्सवाला फिलसुद्धा मिरवता येईल)

ज्याला आवडते त्याने दारू प्यावि आणि ज्याला पटत नाही त्याने पिऊ नये. इतके साधे आहे ते.

दांभिकपणा नसावा. आपल्या जावयाने प्यायले कि ते ड्रिंक असते आणि मोलकरणीच्या नवऱ्याने प्यायली कि ती दारू असते.

लष्करात /नौदलात २२ वर्षे राहून दारूच्या थेंबाला स्पर्श करायची कधी गरज भासली नाही. दारू पित नाही याचा कधी दुराभिमान वाटलं नाही किंवा न्यूनगंडही वाटला नाही. हातात दारू नसलेल्या कोल्ड ड्रिंक्स चा किंवा फळांच्या रसाचा ग्लास धरत असताना लोकांना दारू न पिण्याचे समर्थनहि करायची गरज पडली नाही.

ज्याला आनंद वाटतो त्याने दारू प्यावी. ज्याला वाटत नाही त्याने पिऊ नये. उगाच त्याचा डंका कशाला पिटायचा

उगाच मी फक्त अमुक तमुक सिंगल माल्टच पितो किंवा अमुक तमुक व्हिस्की किंवा वाईन इतकी दुर्मिळ आहे तीच फक्त पितो म्हणून स्वतःची अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे केविलवाणे दिसतात.

उदये सविता रक्ते रक्तास्च अस्तमे तथा
संपतौच विपतौच महत्तामी एकरूपता

उगवताना असतो तसाच मावळताना सूर्य तांबडा लाल असतो.
संपत्ती आली किंवा विपत्ती आली तरी मोठ्या माणसांची वृत्ती बदलत नाही.

ज्याला आनंद वाटतो त्याने दारू प्यावी. ज्याला वाटत नाही त्याने पिऊ नये. उगाच त्याचा डंका कशाला पिटायचा +१

उगवताना असतो तसाच मावळताना सूर्य तांबडा लाल असतो. >>>>

आणि मधल्या काळात? Wink

लोक दारूचे आणि चकण्याचे धागे मुद्दाम वर काढत आहेत .
मी हा धागा नक्कीच वर काढणार .
दारू सुटू शकते . नक्कीच सुटू शकते .
एकाची जरी दारू सुटली - हा धागा काढण्याचे समाधान मिळेल
मला .

Pages